क्लीक- २
"अगं मुलाला भेट. बोला दोघे. कसं वाटतंय ते फील करा मग पुढे पाहू काय करायचं ते." गांगरलेल्या बॉलरला कॅप्टनने येवून पाठीवर हात ठेवत दिलासा द्यावा तस्सा बाबाने मला दिलासा दिला. "तु भेट एकदा श्री ला .भेटेल ग ती " बाबाने आईला परस्परच सांगुन टाकले. बाबाला नाही म्हणणं अवघड जातं. पक्का सेल्स्मन आहे.
निदान भेटीसाठी तरी मी तयार झाले या आनंदात आईने चहात तिसर्यांदा साखर घातली आणि तोंड गोड करा म्हणून तो कप बाबापुढे ठेवला.