विरंगुळा

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१५

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
11 Oct 2014 - 5:05 pm

भाग-१४
हे वरती सर्व आलं. ते माझ्या भावविश्वातला गुरुजी आज बाहेर-आला म्हणून! पण एरवी आमची ही सप्तपदी म्हणजे ..विचारू नका...!!! ... पुढे चालू...
===============

संस्कृतीसमाजविरंगुळा

"काही नाही… "

योगी_१९८५'s picture
योगी_१९८५ in जनातलं, मनातलं
9 Oct 2014 - 5:34 pm

मनात गोंधळ घालणाऱ्या बहुतेक भावनांना आपल्या जवळील स्त्री-वर्ग, मग तो कोणत्या पण नात्याने जोडलेला असो "काही नाही " या दोन शब्दात सगळी भावना गुंडाळून टाकतो…
त्या पैकी काही खालीलप्रमाणे…

कधी कधी… इशश्य…
कधी कधी… काही तरीच काय हो…
कधी कधी… आता शांत बसा…
कधी कधी…खाऊ कि मारू आता…
कधी कधी…अरे बापरे!!! काय करून ठेवलाय हे…
कधी कधी…जवळ येउन अस्सा……… घ्यावा… (मधला शब्द प्रत्येकाच्या विचार शक्तीनुसार टाकावा.)
कधी कधी…आई शप्पथ…इथेच नाचव…
कधी कधी…संपल सगळ…

मुक्तकविरंगुळा

चावडीवरच्या गप्पा - अफझलखानाचे सै(दै)न्य

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
8 Oct 2014 - 9:11 pm

chawadee

“काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.

“काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे.

“हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे.

साहित्यिकसमाजमाध्यमवेधवादविरंगुळा

गम्मत (शतशब्दकथा)

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
8 Oct 2014 - 4:34 pm

''तुला काय काय करता येतं बेटा ?''

''मला … नं ? जादू करता येते !''

''कसली ? ''

''मी जादूनं काळंकुट्ट करून टाकते माझं नाई ऐकलं कुणी तर . . ''

''बापरे ! मलां नको गं काळं करूस . मी तुला बिस्कीट आणलं ना?''

''हेहे ! तुमाला कसं काळं करणार? तुमी आधीच तर काळे आहात ! ''

ममानं डोळे मोठे केले- '' शरू! काकांना असं बोलतात? से सॉरी !''

''सॉरी अंकल !''

वेरी सॉरी हं . .
'' जाउद्या हो - लहान आहे ती'' - काका म्हणले .

- काईपण बोल्लं तरी रागवतेच !

''थांबा -आता - मी ना, ममाची एक गम्मतच सांगते सगळ्यांना ! ''

कथाआस्वादविरंगुळा

झक मारली का?

योगी९००'s picture
योगी९०० in काथ्याकूट
6 Oct 2014 - 10:07 am

नुकतेच मा.रा.रा. शरदचंद्रजी पवारजी साहेब यांनी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्यावर जाहीर सभेत टिका करताना खालील भाषण केले..

"उजनीच्या २१ टीएमसी पाण्याचा कांगावा करीत निवडणूक लढविणारे मधुकर चव्हाण इतके दिवस काय 'झक' मारीत होते का?"

लगेच प्रसारमाध्यमांनी खालच्या पातळीवरची टिका, पवारांचा दर्जा घसरला असे बोलायला सुरूवात केली. सविस्तर बातमी

आता मला सांगा,