विरंगुळा

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Oct 2014 - 2:07 am

ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.

डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे.

ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.

डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...

१. ठिकाण ===> नंदी पॅलेस

२. दिनांक ===> १८-१०-२०१४

३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०

४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.

डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

ओम भवती भिक्षांदेही

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Oct 2014 - 12:34 am

डिस्क्लेमर : खालील लेख हा तद्दन पोरकटपणा असून त्यात कुठलीही वैचारीक मुल्ये नाहीत.

खूप दिवसांनी "बाबां"कडे गेलो होतो.त्यावेळेचा किस्सा.

सौदीला जाण्यापुर्वी बाबांनी. "धन्य ते संताजी धनाजी" अशी दीक्षा दिली होती.त्या दीक्षेचा थोडा-फार फायदा झाला आणि आम्ही "संताजी-धनाजी" यांच्या सहवासात वेळ काढायला लागलो.विचारांत आणि आचारात काही विशेष फरक पडला नाही.(असे आमची सौ. म्हणते...म्हणजे ते नक्कीच सत्य असेल...असे समजायला हरकत नाही.)

मौजमजाविरंगुळा

शेख चिल्ली !

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
4 Oct 2014 - 10:40 am

कुणीही अजाणता अथवा बावळटपणे स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागत असेल तर सहसा ज्या चित्राची पटकन आठवण येते त्यातील एक म्हणजे शेख चिल्ली झाडाच्या फांदीवर उलटा बसून झाडाची फांदी कापतोय, झाडाची फांदी कापून झाली की तो आपोआप झाडावरून फांदी सहीत खाली पडणार हे सुज्ञांच्या लक्षात येतच. या शेख चिल्लीच्या इतर बर्‍याच कथा असल्या तरीही या धाग्याचा उद्देश अजाणता अथवा अज्ञानातून स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, तर्क मांडणे या संदर्भाने आहे.

कुणी प्याल का पिलवाल का

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
2 Oct 2014 - 8:01 pm

कुणी प्याल का पिलवाल का
खिलवाल का तो चकणा |
रात्री तरी पिऊ नको
सोडू नको अपुला बाणा || धृ ||

आधीच संध्याकाळची
पार्टी आहे लांबली |
परत जाता अजून एक
पेग देत थांबली ||
चकणा शिळा दिला
जो मद्य सांडुन भिजला |
आत्ताच हातातला
ग्लास मी कुरवाळीला || १ ||

सांभाळुनी माझ्या जीवाला,
मी जराशी घेतली |
बोकाणा भरताना चकण्याचा,
हिची चाहूल लागली ||
सांगाल का त्या महिलेला,
कि जास्त नाही ढोसली ||
आणि उतराया नशा कोणी
रात्र जागून काढली || २ ||

आगामी निवडणूकीत तुम्ही कोणाला मत देणार?

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
29 Sep 2014 - 9:59 am

तुम्ही कोणाला मत देणार हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे, म्हणून मी खालील पर्याय समोर र्ठेवत आहे. बाकी इतर पर्याय वाढवण्यासही माझी हरकत नाही, हे काही प्रातिधिनिक पर्याय आहेत.

१. माझे मत विकासाला
२. मझे मत स्थिर सरकारला
३. माझे मत निष्ठेला
४. माझे मत प्रामाणिकपणाला
५. माझे मत संरक्षणाला.
६. माझे मत संस्क्रुतीला
७. माझे मत पैशाला
८. माझे मत प्रशासनाला

इत्यादी इत्यादी. तुम्ही यापैकी एकाहून अधिक पर्याय देखील निवडू शकता. पण त्यावेळेस तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागेल.

बघूया तर.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
27 Sep 2014 - 12:09 pm

chawadee

“नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत.

“अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात! घारुअण्णा, ऐकताय का?”, नारुतात्या शक्य तितका गोंधळलेला चेहरा करत.

“कसं चळ लागलंय बघा बारामतीकरांना!”, घारुअण्णा उद्विग्न होत.

राजकारणमौजमजामाध्यमवेधविरंगुळा

अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा) भाग - १

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
25 Sep 2014 - 8:24 pm

“कुठून सुरवात करावी?  कुठून ही सुरवात केली तरी तुम्हाला काय फरक पडणार म्हणा.  येथे फक्त फरक पडणारा एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे मी.  कारण ते सगळे आठवून आठवून मला सांगावे लागणार प्रत्येक क्षण, मिनिट, तास, दिवस, महिने आणि वर्षे पुन्हा एकदा जगावे लागणार... तो आनंद, तो त्रास, ती यातना आणि ते अतीव सुख! आपल्या आपल्याच बद्दल खूप विचित्र अश्या कल्पना असतात आणि त्या विचित्र आहेत याची आपल्याला जाणीव देखील नसते.  प्रत्येकाला एक आरंभबिंदू असतो आणि एक त्याची ओळख असते. आणि ती ओळख आयुष्यभर त्याला सावली सारखी साथ देत असते.

कथाविरंगुळा

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
24 Sep 2014 - 9:08 pm

http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729

---------------------------

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons)

कलामौजमजाछायाचित्रणप्रकटनसद्भावनाशुभेच्छाआस्वादविरंगुळा

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद" : निकाल

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
24 Sep 2014 - 8:57 pm

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद"

नमस्कार मंडळी. पहिल्या छायाचित्रण स्पर्धेप्रमाणेच दुसर्‍या स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण ३१ प्रवेशिकांना ४० जणांनी मते दिली. त्यातून सर्वात जास्त मते मिळणारी छायाचित्रे पुढीलप्रमाणे:

विशेष म्हणजे यावेळी बहुतेक छायाचित्रांना कोणी ना कोणी तरी पसंती दिली आहे. सर्वच छायाचित्रे विषयानुरूप आनंद देणारी होती. यातील पहिल्या आलेल्या ३ छायचित्रांचा समावेश मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये करत आहोत. तसेच विजेत्यांची प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत.

संस्कृतीकलाछायाचित्रणविरंगुळा