तंत्र

शोधा म्हन्जे सापडेल!

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
11 Dec 2014 - 1:53 pm

मी एका संधीच्या शोधात आहे, जेणेकरून विदर्भातील शेतकऱ्याच्या आत्महत्या बंद होतील.
भारतात राहून काही संधी आहे काय आमच्यासाठी/आमच्या विदर्भातील शेतकरी लोकांसाठी?

त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायची, नवीन गोष्टी शिकायची, वाट्टेल तितका खर्च करायची, वाट्टेल तेथे येवून आपली भेट घेण्याची, ह्या आयुष्यातील लागेल तेव्हढा वेळ देण्याची माझी तयारी आहे.

मिपावरच्या "शोधा म्हन्जे सापडेल" या आय डी मुळे मला हे प्रखरतेने जाणवले आहे.
आशा आहे की सर्व मिपाकर आपआपल्या कुवतीनुसार मार्गदर्शन व प्रसंगी सर्व मदतही करतील.
आणि मिपाचा एक चांगला आदर्श जगापुढे ठेवू या.

निमंत्रण- पुण्यातल्या एका पुस्तक प्रकाशनाचे

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
10 Dec 2014 - 7:13 pm

कुठल्याही शाळेत जावं. पाचवीच्या पुढील हाताला लागेल त्या पोराला विचारावं, ‘'भीती वाटते असा तुझ्या अभ्यासातला विषय कुठला?'' समोरून ‘गणित’ असं उत्तर आलं नाही तर आपल्याला त्या पोराचीच भीती वाटू लागेल ! गणित-भूमिती सारख्या ‘डेंजर’ विषयांनी आपलं कोवळं बालजीवन किती खडतर केलं होतं, हे प्रत्येकाने आठवून पाहावं ! ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही गणित-भूमिती विषयांना घाबरून त्यापासून दूर पळत राहिलो. गावाकडच्या विद्यार्थ्याना जणू विज्ञान -इंग्रजी व गणित म्हणजे पारंपारिक शत्रूच वाटत. अर्थात सन्माननीय अपवाद बरेच आहेत!

मांडणीवाङ्मयसमाजजीवनमानतंत्रप्रकटनशुभेच्छा

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ५: "भूक"

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
8 Dec 2014 - 9:48 am

http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
http://www.misalpav.com/node/28931
http://www.misalpav.com/node/29297

********************************************

नमस्कार मंडळी! प्रकाशाच्या उत्सवानंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त पाचवी स्पर्धा सुरू करूया!
यावेळचा विषय आहे 'भूक'

कलाजीवनमानतंत्रछायाचित्रणस्थिरचित्र

दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
4 Dec 2014 - 8:54 pm

खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.

पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.

श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.

आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?

किती वाजता करायचा?

खायला-प्यायला काय आणायचे?

इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.

तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.

(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)

तिसरी मुंबई : जागा घेण्यास योग्य आहे का ?

hitesh's picture
hitesh in काथ्याकूट
25 Nov 2014 - 3:56 am

सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे.

सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते.

पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत..

सॅअ‍ॅ लिक शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल.

सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल.

बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग

नवे अएर्पोर्ट

सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल.

फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

वोल्क्सवॅगन वेंटो बद्दल मत

देशपांडे अमोल's picture
देशपांडे अमोल in काथ्याकूट
23 Nov 2014 - 1:18 pm

नमस्कार मंडळी,

प्रथमच आपली मते जाणून घेण्यासाठी हा धागा टाकतोय. मी माझी सध्याची ह्युंदाई वेरणा पेट्रोल 2008 मॉडेल चेंज करून वोल्क्सवॅगन वेंटो 1.6 हाइलाइन एम टी पेट्रोल घेण्याचा विचार करतोय.

ह्या गाडी बद्दल कुणाला अनुभव आहे का?

एकूणात कशी आहे? कंपेर्ड टू वेरणा कशी? किंवा माइलेज च्या दृष्टीने कशी? पॉवर? ड्राइविंग कंफर्ट? लॉँग रन साठी? किंवा डेली वापर 60 की मी असेल विविध ठिकाणी फिरण्यासाठी तर कंफर्ट च्या दृष्टीने कशी? ए सी बद्दल ?

तसं मी बर्‍या पैकी अभ्यास व कंपॅरिज़न्स केले आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या पैकी कुणाची मते कळावी म्हणून प्रयोजन.

स्मार्ट फोन आणि त्यांचे स्मार्ट नखरे

स न वि वि's picture
स न वि वि in काथ्याकूट
19 Nov 2014 - 1:08 pm

आत्ता सगळिकडे samsung phone चा सुळ्सुळट झाला आहे . मला तुम्ही कोणते फोने वापरता आणि त्यात काही irritating गोष्टी अनुभवताय का हे माही करायचं . माझा Samsung galaxy grand २ आहे. घेतल्या पासून जेव्हा software update चे notification आले तेव्हा लगेच WI - FI zone मधेय जाऊन update केले आणि तेव्हा पासून फोन चे नखरे चालू झाले. Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे? कारण माझा फोन update केल्यावरच नखरे करायला लागला आहे. नखरे काहीसे असे….
१. अचानक बंद होतो
२. गडद निळा रंग होतो स्क्रीन चा
३. अचानक mute मोड मधेय जातो
४. फोन घेताना hang होतो.

त्यागासारखं ढोंग नाही

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
19 Nov 2014 - 12:34 am

सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं.

धोरणवावरसमाजजीवनमानतंत्रराहणीविचारमत

सत्यनारायण पूजा:

वगिश's picture
वगिश in काथ्याकूट
12 Nov 2014 - 9:17 pm

सत्यनारायण पूजा:

मी मिपा वर नविन आहे.येथे असलेले लेख व त्यावरील प्रतिक्रिया वाचून माझे शंकानिरिसन होईल असे वाटते.

काही दिवसापुर्वी आम्हा उभयतास सत्यनारायण पुजेस बसण्याचा योग अल.पुजा लक्षपुर्वक ऐकली.
पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली.

ही पूजा म्हणजे नेमकी काय आहे?महाराष्ट्रात ती इतकी प्रसिध्ह का?