हाय काय अन् नाय काय!
मला चांगलंच ठाऊकाये, की चित्रबित्र मला बिल्कुलच काढता येत नाही. पण तरीही..
एकदा मी तुझं चित्र काढणार आहे. बघंच तू.
सोप्पं तर आहे. हाय काय अन् नाय काय!
आधी दहाचा आकडा काढेन. हं पण त्यातला एक जरा पसरटच.
का म्हंजे काय? तुझ्या कपाळावरच्या इतक्या सगळ्या आठ्या मावायला नकोत का?
आणि त्यावरचा शुन्य थोडा चपटा, मला चिडवतानाचा तुझा मिश्किलपणा पुरेपूर भरलेला.