जे न देखे रवी...
(पावश्या लवकर आलाच आहे तर.....)
हे ताडपत्रीवाल्या,
गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक
हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू,
फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव
हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका,
ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव
हे नगर सेवका,
नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे
रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन
रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन
(1925--2025)
हा गुढी पाडवा
नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
RSS शताब्दी वर्ष
मोदी जी करणार
साजरा सहर्ष ।।
मरणप्राय,मुर्दाड हिंदूंना
डॉ.हेगडेवार यांनी
दिला हिंदुत्ववाद ...
चाणक्या सारखा
केला खानग्रेस शी वाद ।।
सौगात-ए-मोदी
म्हणे सौगात-ए-मोदी
भाजपा देणार ईदी !!
कमी करण्या हेट,
मोदी देणार भेट ।।
विरोध रेवडी संस्कृतीला,
काय म्हणावे या कृती ला?
नको हे लांगुलचालन,
आठवा बटेंगे कटेंगे स्लोगन ।।
मते मिळणार नाहीत,
नाही का तुम्हा माहित ।।
करदात्यांचा अपमान,
थांबवा फुकट सामान ।।
असत्यवक्ता स्वर्णकेश:
Composed with the help of DeepSeek -
असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः।
जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥
आग व संशयाचा धुर
दिल्ली न्यायाधीशाच्या
घरी लागली आग,
अग्निशमन कर्मचाऱ्यांना,
घरात दिसली नोटांची थप्पी,
काढता आगीचा माग ।।
होते म्हणे 15 कोटी घबाड,
तरीही नाही धरला लबाड ।।
वर्मावर बोट आल्यावर,
केली त्यांनी रदबदली,
राजीनामा न घेता,
त्यांची फक्त
केली बदली ।।
निघा निघा चिऊताई
निघा निघा चिऊताई
सारीकडे काँक्रीटले
दाणा पाणी हरवले
शहरी ह्या
विषारी धुरके आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही
उरलेली पाखरे ही
भयसूचनांचे गाणे
गाऊनी टिपती दाणे
अखेरचे
झोपू नका अशा तुम्ही
वाचविण्या मृत्युक्षणी
येईल का मग कोणी
बाळाला ह्या
तुकाराम बीज सोहळा...
तुकाराम बीज सोहळा...
(375 वर्ष पूर्ण सोहळा )
तीर्थ देहू,
झाले सज्ज
बीज आज,
तुकाराम ।।
त्रिशतकोत्तर,
अमृतमहोत्सव,
हा सण उत्सव,
देहू क्षेत्री ।।
बीजसोहळा,
टाळ मृदंग,
भाविक दंग,
विठूनाम ।।
लाखो भाविक,
फुलांची सजावट,
दु:खाची वजावट,
नाचू रंगे ।।
अभ्यासोनी मग ...
"अभ्यासोनी मग | प्रकटावे" ऐसे
कुण्या रामदासे | सांगितले
"दिसामाजी काही | तरी ते लिहावे
प्रसंगी वाचावे | अखंडित"
असेही वदले | तेव्हा रामदास
मना उपदेश | करताना
आता मला सांगा | लिहिणे, वाचणे
अभ्यास करणे | कोणा झेपे?
अभ्यास कशाला | प्रकटण्या आधी?
इंटरनेट हाती | असताना !
नाराजीनामा
अखेर ते घडले
दागी मंत्री पडले ।।
मंत्रिपदाचे ते कवच,
भ्रष्टांना असते हवंच ।।
कवच असता
न्याय ओलीस,
कवच नसता
ओढतील पोलीस ।।
म्हणे फोटो पाहून
हेलावले,
राजीनाम्याला
पेन लावले ।।
पोलीस,राजकारणी,
मीडिया, डॉक्टर, न्याय,
सर्वांची आहे मिलीभगत,
वोटर जनता पाहतेय
भांबावल्यागत ।।
दिसे ची ना
प्रसंग बाका,
वाल्या च आका,
दिवसा डाका,
दिसेचीना।।
पवन चक्की,
जेल ची चक्की,
गोष्ट पक्की,
होईचिना।।
सरपंच,
रंगमंच,
भ्रष्ट संच,
न्याय चि ना ।।
दागी मंत्री,
गुन्हे जंत्री,
राजीनामा,
मागेचीना।।
पळालं आंधळं,
पोलीस पांगळं,
दिसतंय सगळं
सापडेचीना ।।
लाडकी झाली दोडकी...
लागली कडकी,
घटली लाडकी ।।
9 लाख अपात्री,
135 कोटी/महिना
खर्चाला कात्री ।।
लाडकी बहिणीमुळे जिंकले,
आता माशी शिंकली ।।
चारचाकी नाहीना,
कितीउत्पन्न महिना ?।
आला 'त्यांचा ' आदेश,
आता तपासा निकष ।।
गरजू बहिणी राहूद्या
अपात्र बहिणी जाऊद्या ।।
म्हणे वेळ कमी होता,
ना केलाआधार लिंक कोटा ।।
सतारीचे बोल
जरा सोडला लगाम ढिला,
अंग प्रत्यंगाने संकेत दिला.
हळूहळू कुरकूर करू लागलं.
गोबरे झाले गाल,टम्मं पोट फुगलं.
हात पायाच्या झाल्या काड्या,
कांट्यांनी चढल्या नव्वद माड्या.
कधी नव्हे तो पिंगळा साद देत होता.
दिवसा घोरासुर कुस्ती खेळत होता.
कधी माझ्या भोवती जग फिरले,
तर कधी डोळ्यासमोर तारे विरले.
परीक्षा...कुणाची ?
परीक्षा...कुणाची?
'सी ई ओ'समोर पडला
कॉप्यांचा पाऊस !
डोके गरगरले,संताप
आला भाऊस ।।
'विकास मीना'- करारी,
मारली धडक भरारी ।।
बारावी चा गणिताचा पेपर,
खोके भरून कॉप्या,गाईड,
पाहून आले फेफरं ।।
परीक्षाकेंद्रातून अनेकांनी
मारली धूम,
कॉपी फॅक्टरी हँडलूम ।।
शब्दांचा दंश जिव्हारी
शब्दांचा दंश जिव्हारी-
होता मी विमुक्त झालो
माथ्यावर सूर्य तरीही
काजव्यासवे झगमगलो
शब्दांची अविरत गाज
भवताल भारूनी उरली
नादावर अनुनादाची
हलकेच लहर शिरशिरली
शब्दांचा अबलख वारू
चौखूर उधळुनी गेला
अर्थाचा लगाम लहरी
हातून कधीचा सुटला
घरगुती हिंसा व पोटगी
https://marathi.freepressjournal.in/maharashtra/court-slaps-dhananjay-mu...
घ्या कविता
faster than instant coffee
कुणाची घ्यावी बाजू,
confuse झाला तराजू ।।
आयकर सुट
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट!
पोळीत लपला आलूवडा, चहा कपभर खास
बजेटची चर्चा झाली, आता सगळं झालं बास
खिशात राहतं थोडं, केला सगळ्यांनी नवस
निर्मला ताईंनी बनवला सगळ्यांचा हसरा दिवस
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट!
मौनी कुंभ
मोक्षाची ती घाई,
संगम त्रिवेणी नेई,
मौनी डूबकी देही,
अमृतस्नान ।।
नेत्यांचे स्नान,
गर्दी ही बेभान,
गमावले प्राण,
निष्पाप तीस ।।
सर्वा तीच वेळ,
मग तोच खेळ,
कसा करील मेळ,
प्रशासन ।।
मौनी अमावस्या,
मोक्षाची समस्या,
कीव आली मत्स्या,
तैरतांना।।
खरा तरुण !
(सासवड - कस्तुरबा आश्रम येथील एका
सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी , एका ८५ वर्षाच्या आजोबांनी खणखणीत आवाजामध्ये गीतरामायणातलं एक गाणं सादर केलं . त्यावेळी माझ्या मनात त्यांच्या माझ्यातल्या तुलनेबद्दल जी भावना झाली, ती मी या कवितेतून मांडलेली आहे . )
------------------------------
काठावर अज्ञाताच्या
जिज्ञासेच्या ज्योतीवर
फुंक अज्ञाताची येते
ज्ञेय-अज्ञेय द्वैताने
तर्कबुद्धी काजळते
कृष्ण ऊर्जा, कृष्ण द्रव्य,
संज्ञा पल्याड तर्काच्या
हुलकावण्या देतात
काठावर अज्ञाताच्या
किती कोडी अवघड
चराचरात दाटती
वाटे एक सुटले तो
नवी पुढ्यात ठाकती
- ‹ previous
- 3 of 467
- next ›