सतारीचे बोल

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
24 Feb 2025 - 2:16 pm

जरा सोडला लगाम ढिला,
अंग प्रत्यंगाने संकेत दिला.

हळूहळू कुरकूर करू लागलं.
गोबरे झाले गाल,टम्मं पोट फुगलं.

हात पायाच्या झाल्या काड्या,
कांट्यांनी चढल्या नव्वद माड्या.

कधी नव्हे तो पिंगळा साद देत होता.
दिवसा घोरासुर कुस्ती खेळत होता.

कधी माझ्या भोवती जग फिरले,
तर कधी डोळ्यासमोर तारे विरले.

भर दुपारी जगाला भोवळ आली.
आणी बोळवण धन्वंतरींच्या घरी झाली.

काही रक्तपिपासू रक्त शोषू लागले,
तर प्रकांड पंडीत कारण शोधू लागले.

हृदयाची सतार बिघडली होती
दिड दा दिड दा लय बेकाबू होती

गवसणीतूनच तारा छेडल्या
सतारीच्या खुंट्या पिळल्या

सतार झाली म्हातारी...
तारा नाजूक झाल्यात.

तार सप्तक लावू नका.
आर्त स्वरात गावू नका.

धन्वंतरीने दिला सल्ला.

ठिक झाली,ठिक झाली....
शुभेच्छुकांचा एकच कल्ला.

नुकतीच एन्जिओप्लास्टी झाली. तीन ब्लाॅक आहेत पैकी एक शंभर टक्के ठिक झाला. दोन मेडिसीन ने विरघळतात ते एक महिना बघणार व नंतर पुढचा निर्णय घेतील.

तब्येत सुधारत आहे. सकाळचे वाॅक सुरू झाले आहे. तसा काही त्रास नाही सध्यातरी. शुभेच्छकांच्या शुभेच्छांनी खुप मनोबल वाढवले.

हर फिक्र को...धुऐंमे मत ऊडाओ.

आयुष्यजीवनमान

प्रतिक्रिया

कंजूस's picture

24 Feb 2025 - 3:29 pm | कंजूस

तब्येत सुधारत आहे.

सुधारू दे लवकर . घाबरू नका.

हाॅस्पिटल मधे आढ्याकडे बघताना काही ओळी सुचल्या त्या इथे व कायप्पावर डकवल्या एवढेच काय ते. हाय काय नाय काय...याच बरोबर मित्रपरिवारांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल एकत्रित आभार मानण्याचा प्रयत्न.

मी मस्त आहे.

युयुत्सु's picture

24 Feb 2025 - 3:51 pm | युयुत्सु

लवकर बरे व्हा. प्राणायाम करा!

Bhakti's picture

24 Feb 2025 - 4:46 pm | Bhakti

लवकर बरे होताल.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Feb 2025 - 5:06 pm | अमरेंद्र बाहुबली

लवकर बरे व्हा! श्रीकृष्ण भुवनच्या मिसळवर ताव मारायचाय पुन्हा!

बाजीगर's picture

25 Feb 2025 - 7:12 pm | बाजीगर

वाह वा सर काय बेफिकिर attitude आहे,
मन जवा मर्द आहे,शरीर कुरकुर करतेय.

काय शैलीदार ओळी लिहिल्यात...
"हृदयाची सतार बिघडली होती !"

काळजी घ्या
गोळ्या,आहार विहार डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाने करा.

(अस्मादिकांना सुद्धा १३ एप्रिल् २०२४ ला हार्ट अटॅक आला होता, मायबाप कतार सरकार ने तात्काळ
एन्जिओप्लास्टी करून 2 स्टेन्ट टाकल्या, जीव वाचला, ह्या एप्रिल ला दक्षिण अमेरिका टुर ला जातोय, साजरा करायला....
माझा ब्लॉग

https://www.blogger.com/blog/post/edit/5935388206732301965/2657780580706...
)

कर्नलतपस्वी's picture

28 Feb 2025 - 9:01 am | कर्नलतपस्वी

धन्यवाद. आमची एप्रिल मधे उत्तर अमेरिकेची सहल नियोजित आहे.