चिटिश कुमार
बिहारीमुस्लिम
नितीशकुमार वर चिडले,
गिरगिट (सरडा),ठग,धोकेबाज
म्हणत भिडले ।।
RSS सर्टिफाईड मुख्यमंत्री,
सेक्युलर आता भगवा मंत्री ।।
कैसे कैसे मीम्स चे काम,
अविश्वनीय हा पलटुराम ।।
हाफ पॅन्ट, काळी टोपी.
म्हणें RJD झाली BJP ।।
17% वोटबँक आता कसले,
नितीश फक्त गुलजार हसले ।।
पसमांदा (दलित) मुस्लिम
त्यांच्या बरोबर आहे,
नितीशकुमार यांची राजकीय
दृष्टी बरोबर आहे ।।
प्रतिक्रिया
4 Apr 2025 - 9:54 pm | श्रीगुरुजी
एक चूक.
RJD नाही, JDU हवे.
5 Apr 2025 - 10:15 am | बाजीगर
धन्यवाद श्रीगुरुजी,
सही पकडे है.
4 Apr 2025 - 10:01 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजप सोबत जाऊन नितीश कुमारांचाही सत्यानाश होईल! (नव्हे! व्हायलाच हवा!)
5 Apr 2025 - 10:20 am | बाजीगर
https://www.misalpav.com/node/51909
4 Apr 2025 - 10:58 pm | श्रीगुरुजी
नितीश उठाइतकाच भोंदू व नालायक आहे. भाछपने मूर्खपणा करून शेणेला शुन्यातून मोठे केले तसाच मूर्खपणा करून नितीशलाही शुन्यातून मोठे केले. भाजपने उठाचा २०२४ विधानसभा निवडणुकीनंतर भंगार माल केला तसाच नितीश सुद्धा डिसेंबर २०२५ निवडणुकीनंतर भंगार माल व्हायला हवा.
5 Apr 2025 - 10:20 am | चंद्रसूर्यकुमार
एकूणच समाजवादी लोकं एकाहून एक फालतू असतात. एक झाकावा आणि दुसरा काढावा. कधीनाकधी समाजवादी लोक आपले खरे रंग दाखवून देतात.
भाजपला उगीच इतरांना मोठे करायची फार हौस असते. नितीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी समता पक्षाची स्थापना केली १९९४ मध्ये. मार्च १९९५ मधील बिहार विधानसभा निवडणुक त्या पक्षाची पहिली निवडणुक होती. त्यावेळी त्या पक्षाची कामगिरी कशी होती? एकूण ७.१% मते आणि जागा जिंकल्या ७. भाजपची त्यावेळी कामगिरी कशी होती? एकूण १३% मते आणि जागा जिंकल्या ४१. समता पक्ष अनुक्रमे २२ आणि ६० जागांवर दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर होता. तर भाजप अनुक्रमे ५६ आणि ७१ जागांवर दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर होता. बरं भाजपने जागा जास्त लढवल्या म्हणून हे आकडे दिसत होते का? तर तसे नाही. भाजपने ३१५ तर समता पक्षाने ३१० जागा लढविल्या होत्या म्हणजे दोन पक्षांनी लढविलेल्या जागांमध्येही फार फरक नव्हता. म्हणजे १९९५ मध्ये नितीशपेक्षा भाजपची ताकद बिहारमध्ये बरीच जास्त होती. १९९६ मध्ये पहिल्यांदा नितीश-भाजप युती झाली तेव्हा १९९५ च्या निवडणुकांचेच आकडे समोर होते. तरीही भाजपने नितीशला त्या पक्षाच्या ताकदीपेक्षा जास्त जागा दिल्या आणि आपल्या किंमतीवर नितीशला वाढायला वाव दिला. २००० च्या विधानसभा निवडणुकांनंतर त्रिशंकू विधानसभा आली होती. राजद आघाडीला १२५ तर भाजप आघाडीला १२४ जागा होत्या. तसे असताना भाजप आघाडीला सुरवातीला सरकार बनवायला पाचारण करणे हे अयोग्य होते पण केंद्रातील भाजप सरकारने राज्यपालांना हाताशी धरून तो डाव खेळला. आणि मुख्यमंत्री कोण झाले? तर नितीशकुमार. त्यावेळी भाजपला ६७ तर नितीशकुमारांच्या पक्षाला ३४ जागा होत्या- म्हणजे भाजपला नितीशच्या जवळपास दुप्पट जागा होत्या. तरीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे कोण? तर नितीशकुमार. त्यांचे सरकार आठवड्याभरात पडले आणि परत राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या. बिहारमध्ये काळाकुट्ट अध्याय पुढे सुरू राहिला.
दरम्यानच्या काळात बिहारमधून झारखंड वेगळा झाला होता आणि विधानसभेत जागा ३२४ वरून २४३ इतक्या कमी झाल्या. २००५ मध्ये दोनदा निवडणुक झाली. मार्च २००५ मध्ये नितीशकुमारांच्या जनता दल (यु) ने १३८ तर भाजपने १०३ जागा लढविल्या. त्या निवडणुकांनंतर कोणतेच स्थिर सरकार बनणार्यातले नव्हते या नावाखाली विधानसभेची एकही बैठक न घेता राज्यपाल बुटासिंगांना हाताशी धरून केंद्रातील युपीए सरकारने बिहार विधानसभा विसर्जित केली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर २००५ मध्ये परत विधानसभा निवडणुक झाली. त्यावेळी जनता दल (यु) ने १३९ तर भाजपने १०२ जागा लढविल्या. नितीशपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे हे समोर दिसत असतानाही भाजपने नितीशला जास्त जागा लढायला दिल्या.
म्हणजेच भाजपने १९९६ ते २००५ या काळात नितीशला मोठे केले. समजा भाजप-नितीश युती झाली नसती तर लालू जिंकला असता. ठीक आहे. पण त्यासाठी भाजपने स्वतःला कमी जागा लढवायला घेऊन त्याग केला. दरवेळेस असा त्याग भाजपनेच का करायचा? तसे न करता समजा भाजपने स्वबळावर निवडणुक लढवली असती तर १९९५ मधील ४१ पासून आधी ६०-७० आणि त्यानंतर आणखी जास्त जागा अशी प्रगती नक्की करता आली असती. पण नितीशला भाजपने मोठे केले आणि मग नितीशने स्वतःची प्रतिमा सुशासनबाबू अशी उभी केली. लालूंच्या काळातील अनागोंदीपुढे कोणीही मुख्यमंत्री लोकांना बराच वाटला असता. त्याचा पुरेपूर फायदा नितीशने घेतला आणि भाजप मात्र बाहेरून सगळा खेळ बघत बसला.
भाजपने जी चूक महाराष्ट्रात केली तीच चूक बिहारमध्ये पण केली.
5 Apr 2025 - 1:22 pm | श्रीगुरुजी
पूर्ण सहमत. भारतातील सर्वाधिक विश्वासघातकी राजकारण्यांची यादी केली तर त्यात नितीश प्रथम क्रमांकावर व पवार दुसऱ्या क्रमांकावर असतील.
नितीश अत्यंत विश्वासघातकी व लबाड आहे याचा अनुभव येऊनही भाजपने २०१७ मध्ये पुन्हा एकदा नितीशशी युती करणे ही गंभीर घोडचूक होती. तसेही राजद-कॉंग्रेस-संजद यांचे संयुक्त सरकार फार काळ टिकले नसते. अगदी टिकले असते तरीही २०२० विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवर येण्याची चांगली संधी मिळाली असती. निदान आता तरी भाजपने स्वतंत्र लढावे किंवा मुख्यमंत्री आपलाच होणार हे जाहीर करून संजदपेक्षा जास्त जागा लढवाव्या.
5 Apr 2025 - 1:39 pm | अमरेंद्र बाहुबली
थोडक्यात, नीतीशला(ही) धोका द्यावा?
4 Apr 2025 - 11:06 pm | अमरेंद्र बाहुबली
नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचं घाट केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!
4 Apr 2025 - 11:06 pm | अमरेंद्र बाहुबली
नितिश कुमारांनी वेळीच भाजपला ओळखावे! नाहीतर ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचा घात केला ह्या तत्त्वानुसार लवकरच जेडीयूचा महाराष्ट्र गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल किंवा शिवसेना करेल भाजप!
5 Apr 2025 - 10:13 am | रात्रीचे चांदणे
उबाटानीअसाच भाजपला ओळखले आणि ४० चे २० करून घेतले.