एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ११

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
23 Jun 2009 - 2:09 pm

(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)

आधीचे भाग येथे वाचा :

भाग एक - http://misalpav.com/node/8127

भाग दोन - http://misalpav.com/node/8138
भाग तीन - http://www.misalpav.com/node/8149
भाग चार - http://misalpav.com/node/8172
भाग पाच - http://www.misalpav.com/node/8189
भाग सहा - http://www.misalpav.com/node/8204
भाग सात - http://www.misalpav.com/node/8219
भाग आठ - http://misalpav.com/node/8233
भाग नऊ - http://misalpav.com/node/8251
भाग दहा - http://misalpav.com/node/8282
भाग अकरा - http://www.misalpav.com/node/8295

७ ऑगस्ट
त्या फ कंपनीच्या लफड्यातुन पक्या सहीसलामत बचावेल असे आता वाटते. आज बाराथे साहेबांना पक्याला धमक्या मिळत असल्याचे सांगितले. त्यांनी लगेच पोलिस कमीशनर गोळेसाहेबांना फोन केला आणि या प्रकाराबाबत माहिती दिली. गोळेसाहेबांनी पोलिस शिपायांची भरती सुरु असल्याचे सांगितले आणि पक्याला डिपार्टमेंटमधे भरती करून घ्यायची तयारी दाखवली. पक्याला तसा निरोपही दिलाय. चला त्याचे आयुष्य तरी मार्गी लागेल.....
८ ऑगस्ट
परत लोच्या झाला..... पण यावेळी चूक पूर्णपणे माझीच आहे.....
काल रात्री दहा वाजता घरी जायला निघालो तर फोन आला एक डेड बॉडी नेणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्सला अपघात झालाय अन तीन्-चार जण मेलेत असा. अपघात शहरापासुन ३० किलोमीटर दूर हायवेवर झाला होता अन सगळ्यात जवळचे पोलिस स्टेशन अपघातस्थळापासुन वीस किलोमीटर दूर होते.
मी लगेच पोलिस स्टेशनला फोन केला. तिथल्या ठाणे अंम्मलदाराने अपघात झाल्याचे कन्फर्म केले पण तोवर गुन्हा दाखल झाला नसल्याने माहिती द्यायला नकार दिला. मी विचार केला की गुन्हा दाखल होईपर्यंत किमान तीन तास लागतील अन त्यानंतर माहिती घेऊन बातमी देईपर्यंत पेपर छापायला जाईल.... मग आमच्या पेपर मधे ती बातमी छापुन आली नसती पण ईतर वॄत्तपत्रांची डेड्लाईन उशीरा असल्याने त्यांना छापता आली असती. शेवटी ठाणे अंम्मलदाराला मस्का मारला अन घटना स्थळी गेलेल्या एका पोलिसाचा मोबाईल नंबर विचारला. त्याने सांगितले आमच्या शहरातल्या एका दवाखान्यात उपचार घेत असताना त्या भागातल्या एका खेड्यातल्या एका माणसाचा संध्याकाळी मॄत्यू झाला. त्याचा मुडदा घेवून जाताना अँब्युलन्स उलटली अन त्यानंतर पेटली. मुडदा घेवून जाणारे सगळे खांदेकरी, अँब्युलन्स ड्रायव्हर अन त्याचा मदतनीस.... सगळे जागीच ठार झाले होते अन त्यांच्या बॉड्यापण बर्‍याच जळाल्या होत्या. नशीबाने अपघाताची माहीती त्या लोकांच्या गावी कळल्याने गावकरी तिथे पोचले होते अन त्यांनी मयतांची ओळख घटनास्थळीच पटवली होती.... त्या पोलिसाने ज्या सात बॉड्या अँब्युलन्समधे मिळाल्या त्यांची नावे पण दिली... अगदी अँब्युलन्स ड्रायव्हर अन त्याचा मदतनीस सकट.....
डेड्लाईन जवळ येत असल्याने घाईघाईत बातमी लिहिली, अगदी छान रंगवून.... सात मयतांची नावे पण दिली..... अन दिली ती रात्रपाळीच्या उपसंपादकाकडे.... तो ही बिचारा डेड्लाईन गाठण्याच्या तणावाखाली होता. त्याने बातमी गडबडीत पाहिली अन दिली पहिल्या पानावर लावून "डब्बल ट्रॅजिडी - नातेवाईकाचा मृतदेह नेणारे सात गावकरी महामार्गावरच्या अँब्युलन्स अपघातात ठार" म्हणुन हेडिंग सह. तसे काहीतरी चुकत असल्याचे तेव्हाही वाटत होते, पण काय ते लक्षात येत नव्हते.....
अन काय चुकले ते आज सकाळी फोन वाजल्यावर लक्षात आले..... सकाळी सकाळी त्या काल रात्री माहिती देणार्‍या पोलिसाचा फोन आला अन तेव्हा लक्षात आले.... अरेच्या ज्या मुडद्याला घेवून ते गावकरी घेवून चालले होते त्याचा समावेश आपण अपघातात ठार झालेल्या लोकांमधेच केला. गडबडीत मयत लोकांचा हिशेब चुकीचा लागला. ईतर पेपर बघीतले तर तिथे बरोबर अपघातात सहा ठार अशीच बातमी होती.....
सकाळी ऑफिसमधे गेल्यावर सरळ बाराथे साहेबांसमोर उभा राहिलो अन चूक मान्य केली. संपादकांची पण माफी मागितली.... सगळे ऐकुन संपादक फक्त म्हणाले, "आता मी या चुकीची दुरुस्ती कशी करणार? खुलासातरी काय लिहिणार...."
दिवसभर जेथे जाईन तेथे सगळे मला बघून हसत होते. फार अपराधी वाटतेय..... आपल्यामुळे पेपरची इज्जत पार गेली.
२० ऑगस्ट
नशीब तरी कसे असते ते बघा....
मी क्राईम रिपोर्टिंग नुकतेच सुरु केले होते तेव्हा त्या लचके पीआय बरोबर माझे भांडण झाले होते... त्याने एका म्हातार्‍याला हुसकावून त्याची प्रॉपर्टी बळकावायला एका बिल्डरला मदत केली अन त्या बिल्डरकडून मिळालेल्या लाचेतला वाटा मला देवू केला म्हणुन.... त्यानंतर तो लचके म्हणे नेहमी बढाई मारायचा त्याच्या त्या अपमानाचा बदला तो माझ्यावर कधी ना कधी घेणार म्हणुन... आज तोच लचके माझ्या तावडीत चांगला सापडलाय.... अन ते ही त्याच जागेच्या प्रकरणात......
त्याचे काय झाले, त्या बोकिल नावाच्या म्हातार्‍या माणसाला लचकेने त्याच्या स्वतःच्या बंगल्यातुन हुसकावुन दिले बेकायदा अन प्रॉपर्टीचा ताबा दिला त्या लफडावाला नावाच्या बिल्डरला... तो बोकिल म्हातारा त्यानंतर तक्रार करत गेला सगळीकडे लचके अन लफडावाला विरुद्ध. पण ते दोघेही असे पोहोचलेले की त्यानी सगळ्याना पैशाचे तोबरे भरले अन सुटले ना सही सलामत... पार वैतागला बोकिल.... बरोबरच आहे, सगळे पुरावे असुन पण क्राईम ब्रान्च, अँटी करप्शनवाले... कुणीच कारवाई करेनात. सगळे बोकिललाच सांगायला लागले ही सिव्हील केस
आहे, कोर्टात जा म्हणुन... शेवटी बोकिल आला आमच्या पेपरकडे अन भेटला मला....
त्याच्याकडची सगळी कागदपत्रे बघितली तर भरपूर पुरावा दिसत होता त्याला लुबाडल्याचा. कागद्पत्रांवरुन तर बोकिल त्या जागेचा १९६० पासुन मालक होता अन अचानक २००७ मधे लफडावालाचे नाव सात बारावर मालक म्हणुन लागले होते. बोकिलने कलेक्टरकडे माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती मागितली होती त्यावरून सात बारावर नाव बदलताना लफडावाल्याच्या एका अर्जाशिवाय खरेदीखत वगैरे कुठलीही कागद्पत्रे तलाठ्याला सादर केली नसल्याचे सिद्ध होत होते. शिवाय बोकिलच्या बँक पासबुकात त्याच्या पेंशनशिवाय कुठलीच रक्कम त्याच्या खात्यात जमा झालेली दिसत नव्हती....
सरळ बोकिलला माझ्या गाडीवर घातला अन नेला जोशी वकिलांकडे... जोशी वकिल म्हणजे सिव्हील कोर्टातला बाप माणुस... कोर्ट सुद्धा अनेकदा त्यांचा सल्ला घेतात म्हणे... त्यांनी सर्व कागदपत्रे बघितली अन सरळ सांगितले ही सरळ सरळ लॅन्ड ग्रॅबिंगची केस आहे म्हणुन... मी विचारले छापु का बातमी म्हणुन तर म्हधास्त"बिनधास्त! फक्त यांचे सर्व घटनाक्रम स्पष्ट करणारे एक अ‍ॅफीडेव्हीट मात्र करून घे सेफ साईड्साठी." लगेच बोकिल आजोबांना चघळे नोटरीकडे नेले अन त्यांचे अ‍ॅफीडेव्हीट करुन घेतले. नंतर त्यांना घेवून त्या प्रॉपर्टीवर गेलो तर त्यांच्या नावाची गेटवरची पाटी पण अजून तशीच... बहुतेक ओव्हर कॉन्फीडन्समुळे नव्हती काढ्ली लचके अन लफडावाल्याने.... मग डोळस फोटोग्राफरला तिथे बोलावला अन प्रॉपर्टीच्या बॅकग्राऊंडवर उभे करून फोटो काढला....
परत ऑफिसमधे जावून बातमी लिहिली अन बाराथे साहेबांच्या हाती दिली. त्यांना कागदपत्रे पण दाखवली. त्यांनी ती बातमी संपादक आगलावेना दाखवली. संपादक म्हणाले छान बातमी आहे फक्त लचके अन लफडावालाला या बाबत त्यांची बाजु विचार अन काही म्हणायचे असेल तर ते पण बातमीत घाल.... ही पहिल्या पानावर उद्या मोठी करून छापू. लगेच त्यानी सांगितले तसे केले अन बातमी त्यांना दिली. त्यांनी स्वतः तपासली अन हेडिंग दिले - "बिल्डर लफडावालाचे नवे लफडे - पीआय लचक्याच्या मदतीने ज्येष्ठ नागरीकाची प्रॉपर्टी गिळंकॄत."
२१ ऑगस्ट
बोकिलच्या बातमीचा दणका चांगलाच बसलाय. आज सगळे पेपर अन चॅनेल ती बातमी उचलतायत.
२२ ऑगस्ट
मेले लफडावाला अन लचके. आज त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. स्वतः पोलिस कमीशनर गोळेसाहेबांनी आदेश दिलेत कारवाईचे. लचकेला सस्पेन्ड केलेय अन आता लफडावाला अन लचके, दोघेही फरार आहेत.

कथाविनोदविडंबनसमाजनोकरीमौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jun 2009 - 2:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त रंगते आहे गोष्ट. पक्याला झकास सेट केलात आणि लचक्याही चांगलाच गेम झाला.
लफडावाला आणि बोकील नावंही भारीच.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jun 2009 - 2:54 pm | बिपिन कार्यकर्ते

मिष्टर पुनेरी,

गोष्ट चांगली चालली आहे. पण आता भाग जरा मोठे टाका की राव. खूपच लहान होत आहेत.

बिपिन कार्यकर्ते

ऍडीजोशी's picture

23 Jun 2009 - 3:15 pm | ऍडीजोशी (not verified)

भाग पटापट टाकताय हे छानच आहे पण भाग अजून मोठे असतील तर अजून मजा येईल.

इस्टोरीमधे घुसतोय न घुसतोय तोवर क्रमशः येतं :(

श्रावण मोडक's picture

23 Jun 2009 - 4:13 pm | श्रावण मोडक

वाचतो आहे...

धमाल मुलगा's picture

23 Jun 2009 - 4:14 pm | धमाल मुलगा

मस्तच.
बाकी, नवख्या पत्रकारांकडून उत्साहाच्या भरात अशा तपशीलात चुका होतच असतील, नाही का? आणि डेडलाईनच्या टेंशनमध्ये डिटेलिंगकडं कुठे इतकं लक्ष जाणार?

असो,साला फटक्या लटकला तर शेवटी! लय नडला पम्याला तो.
पण मला अचानक असं का वाटतंय की पम्या हळूहळू हिरोमधून पुढे व्हिलनच्या रोलमध्ये जाणार आहे? :?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

संदीप चित्रे's picture

23 Jun 2009 - 7:30 pm | संदीप चित्रे

असं वाटतंय की प्रवास 'वास्तव' किंवा 'फॅशन' सिनेमातल्या मध्यवर्ती कॅरेक्टरसारखा होणार आहे !!
(अंदाज चुकला तर खूपच आनंद होईल !)
--------
पक्याचे लाईफ सेट केलं आणि लफडावाला, लचके अशा लोकांना लटकवलं ते उत्तम झालं.

Nile's picture

27 Jun 2009 - 4:11 am | Nile

आहो वाचकजन, तुम्ही अंदाज आडाखे बांधताय पण त्यामुळे उगाच त्यांच्याकडुन डेड्लाईन चुकेल म्हणुन कायतरीच बद्ल करुन बातमीचा गोंधळ व्हायचा ओ! :)

चालुद्या.

विसोबा खेचर's picture

23 Jun 2009 - 5:38 pm | विसोबा खेचर

पुणेरीबुवा,

मस्त लेखन..!

येऊ द्या अजूनही...

तात्या.

अनंत छंदी's picture

23 Jun 2009 - 6:51 pm | अनंत छंदी

=D> =D> =D> =D> =D>

सुचेल तसं's picture

25 Jun 2009 - 9:23 am | सुचेल तसं

मस्त... हे प्रॉपर्टीवालं प्रकरण पुण्यात सध्या गाजत असलेल्या दीपक मानकर केसशी चांगलंच जुळतंय...

सातारकर's picture

25 Jun 2009 - 11:24 am | सातारकर

कथा एक नंबर आहे पुनेरी.

ह्या कथेत प्रव्रूत्ती आणि त्या त्या व्यवसायातील लोकांची बनवलेली आडनाव यांची सांगड ज्या पद्धतीने घातली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन.

-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden