शिवकल्याणराजा - ११ गाणी निवेदनासहित

कौन्तेय's picture
कौन्तेय in जनातलं, मनातलं
18 Jul 2012 - 6:05 pm

॥ शिवकल्याणराजा ॥ लहानपणापासून कॅसेटवर ऐकत असलेली ही गाणी. शिवचरित्राभोवतीचं सगळं भावविश्व चपखलपणे लघुरूपात उभं करणारी. समर्थ रामदास, वीर सावरकर, कुसुमाग्रज, शंकर वैद्य आदि दिग्गजांच्या रचना, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लताबाईंचा आवाज नि खुद्द बाबासाहेब पुरंद्ऱ्यांच्या आवाजात ओजस्वी निवेदन! आणखी काय पायजे? हे संकलन काही वर्षांपूर्वी सीडी स्वरूपात आल्यावर एक एक गाणं वेगवेगळं ऐकता येत नाही ही बोच बरेच दिवस मनात होती. काल रात्री बैठक मांडून हे काम फ़त्ते केलं. सगळी गाणी अन्य उपकरणांवर सहज ऐकता तर येतीलच, पण आयफ़ोन/पॅड/पॉड सिंकेबलही आहेत. खालच्या दुव्यावरून उतरवा नि इतरांनाही द्या -

http://sdrv.ms/MH1wyb

जय भवानी!

मी 'बलसागर भारत होवो'च्या शोधात आहे. शाळेतली चाल, सुधीर फ़डक्यांची नाही. बऱ्यापैकी क्वालिटी असलेली फ़ीत काही सापडत नाहीए. कुणाकडे असल्यास कृपया कळवावे.

कलासंगीतसंस्कृतीकवितावाङ्मयइतिहाससमाजप्रकटनसंदर्भशिफारसमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

विटेकर's picture

18 Jul 2012 - 6:16 pm | विटेकर

झकास !

पैसा's picture

18 Jul 2012 - 6:28 pm | पैसा

गाण्यांसाठी धन्यवाद!

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2012 - 6:47 pm | परिकथेतील राजकुमार

संकल्पना उत्तम आहे.

मात्र हे कॉपीराईट कायदा उल्लंघन प्रकरण नाही ना ? नाही तर तुम्ही आणि मिपा दोन्ही गोत्यात यायचे.

कौन्तेय's picture

18 Jul 2012 - 6:57 pm | कौन्तेय

आक्सिडेन झाला की पोलिससमोर साक्षीदारी करायला सरसावलेला एखादा बघ्या गोत्यात यावा तसे तुम्हीसुद्धा!
डोण्ट वरी -
:-)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jul 2012 - 7:39 pm | परिकथेतील राजकुमार

आम्हाला शाट फरक पडत नाही हो. मायक्रोसॉफ्ट पासून सगळ्यांना टांगून हिंडतो आम्ही.
आम्हाला काळजी मिपाची.

कौन्तेय's picture

18 Jul 2012 - 8:43 pm | कौन्तेय

मंडळात या (जॉइन द क्लब) - म्हंजे आपण सर्व त्यातलेच!
मिपाची डिस्क्लेमर ती वेळ (आलीच तर) मारून नेईल. त्यामुळे काळजी नसावी. आपण ही देवघेव निव्वळ निरुपद्रवी छंदिष्टपणाने नि काही अंशी शिव-देशभक्तीने करत असल्याने फ़ार शंकाही नसावी. भावना पोहोचल्या. आमची आधीची पोष्ट जरूरीपेक्षा जास्त कडवी झाली म्हणून क्षमस्व.
चरैवेति।

खूप खूप धन्यवाद हा अमूल्य ठेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल

किसन शिंदे's picture

20 Jul 2012 - 8:50 am | किसन शिंदे

अनेक धन्यवाद मित्रा!!

या गाण्यांची पुढे आणखी सहदेवघेव केली असालच.
आणखी एक कलाकृती म्हणजे 'जाणता राजा' महानाट्याच्या तीन ऐकायच्या क्यासेट्स. पूर्वी मिळत असत. आता माझ्या माहितीप्रमाणे बन्द झाल्यात. कुणाकडे असतील तर एक करू शकता. कुणाही संगीत क्यासेट / सीडीज विकणार्‍या बर्‍यापैकी दुकानांत काही किंमत भरून त्याच्या एम्पी थ्री वा सीड्या करून भेटतील. त्या करा. नि वरीलप्रमाणेच हॉटमेलच्या फुकट भेटणार्‍या स्कायड्राइव्हवर पब्लिक शेअर करा.
हे सर्व शिस्तीत करनारास वा करनारीस अपार पुन्यप्राप्ती होऊन सर्व शुभविच्छा फळतील याची ग्यारंटी आहे.

बलसागर भारताच्या प्रतीक्षेतच आहे -

मनोज श्रीनिवास जोशी's picture

22 Jul 2012 - 4:31 pm | मनोज श्रीनिवास जोशी

मस्तच !