श श क २०२२
|
[शशक' १९] - एकतीसचिमाजीअप्पा भलतेच खूष होते. बऱ्याच दिवसांनी कंबरेच्या चामडी पट्ट्याची खरेदी करण्यास निघाले. गेली सतत सात वर्षे पोटाच्या उजव्या बाजूचे दुखणे सहन करीत शेवटी महागडी शस्त्रक्रिया करून उजवे मूत्रपिंड व ऍपेंडिक्स काढून घेतले. दुखण्यापोटी बरेच बुवा, साधू, गंडे, गुरु, तांत्रिक, मांत्रिक, वैद्य, डॉक्टर झाले होते. खिशाला चांगलाच चुना लागला पण पोटदुखी आता शस्त्रक्रियेनंतर थांबली होती. |
[शशक' १९] - मराठीएकमेकांशी कधीही पटवून न घेणारे आज्जी-आजोबा बऱ्याच वर्षांनी दोघेच तिरुपतीला गेले होते. |
[शशक' १९] - आज्जालहानगा शंकर्या आज खुप खुश होता. गणपती विसर्जनाची मिरवणुक त्याच्या बैलगाडीतुन निघणार होती. रात्रभर त्याला गाडी सजवायचेच स्वप्न पडत होते. |
[शशक' १९] - आठवणीतली तीतिचं कुणाशीच जास्त पटायचं नाही, पण पहिल्याच नजरेत आमच्या दोघांची गट्टी जमली. |
[शशक' १९] - सौंदर्य"काळेभोर, लांबसडक केस म्हणजेच स्त्रीचं खरं 'सौंदर्य'!" ब्युटीपार्लर मध्ये नवीनच आलेली स्वप्नाली इतर मुलींशी गप्पा मारताना म्हणाली. गर्दी नसल्यामुळे सगळ्याच निवांत होत्या. एक मुलगी पार्लरमध्ये आल्यावर गप्पा थांबल्या. कमरेपर्यंत कमी केल्यावर म्हणाली, "अजून थोडे". थोडा वेगळा मस्त खांद्यापर्यंत कट; तरीपण आरशात बघून म्हणते, "यापेक्षा कमी!". |
[शशक' १९] - दखलतो जितक्या वेळा समोरून जाईल तितक्या वेळा अपेक्षेने त्याच्याकडे बघणारी ती. ओळख वाढवण्यासाठी कळेल ना कळेल असा प्रयत्न करणारी. |
[शशक' १९] - पैशाचा धूरपैशाचा धूर निघतो माझ्या बंगल्यातुन. दिसतो सगळ्यांना, पण त्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत नाहि कोणाची. सरकारी यंत्रणेत योग्य ठिकाणी तेलपाणी, आमच्या कम्युनिटी लॉबीचा सपोर्ट, आणि रक्तातच असलेला बिझनेस सेन्स... असा मी स्वाभावीक बिझनेस बादशाह. |
[शशक' १९] - स्ट्रेट ?चालत्या ट्रेनच्या प्रथम श्रेणीमध्ये बाकावर बसून तो जीनीच्या साडी नेसण्याच्या धडपडीकडे बघत तिला न्याहाळत होता... "जीनी... आपण पुन्हा भेटणार ना?" तिने फक्त जालीम कटाक्ष टाकला आणि आपली बॅग आवरायला लागली |
[शशक' १९] - व्हॅलेंटाईन इव्हिनिंगकितीतरी दिवस सोफिया सरळच पडून राहायची. आज व्हॅलेंटाईन डे. अखेर तो आलाच. |
[शशक' १९] - संधी" शेसुकाका लवकर चला, आमच्या कोकराला कायतरी चावलंय, तोंडातून फेस येतोय". |
[शशक' १९] - गारेगारआठवणी उलगडून बसतो, फोटोज डिलीट करताना, तुझ्या आठवणींच्या रोपट्याचा |
[शशक' १९] - वारसदार"हॅलो पप्पा, बीपीच्या गोळ्या संपल्या होत्या ना? कृष्णा आहे ना ड्रायव्हिंगला? " |
[शशक' १९] - प्राक्तन"या; काय हवंय ? " |
[शशक' १९] - निरोपहातातली तीन नाणी सावरत तिने होस्टेलच्या सार्वजनिक फोनवरून एक नंबर फिरवला. चक्क रॉंङ्ग नंबर! दोनदा!! आपल्या खंद्या स्मरणशक्तीने दगा दिल्याचे दुःख पचवून १९८ फिरवला. नाव पत्ता सांगून नंबर मिळवला. नाणं परत आलं. मैत्रिणीच्या शेजारच्यांनी तत्परतेने तिच्या घराची बेल वाजवली. फोन घेतला तिच्या नवऱ्याने. सांगितला निरोप - तिच्या गाइडनी आज दुपारी साडेबारा वाजता बोलावलंय. तीनही नाणी गेली. |
[शशक' १९] - प्रतीक्षा संपलीतो कंटाळला होता ती असंबद्ध आणि सततची बडबड ऐकून. मागचे शंभर वर्षे तो इथे पोस्ट होता. वेगवेगळ्या भाषा पण तोच हिंसकपणा आणि तीच चर्चा. सुरुवातीला त्याला वाटलं की चुकांतून आणि इतिहासातून शिकतील पण कसलं काय. इथे इतिहासाचं चक्र असतं एवढं मात्र त्याला कळलं. त्याला जेव्हा पोस्ट सोडायचा आदेश आला आणि ते ही पोस्ट कायमची मोकळी ठेवत आहेत असं कळलं तेव्हा त्याला हर्षवायू झाला. |
[शशक' १९] - सोंगदेवपूजा झाली. माईंनी देव्हाऱ्यात निरांजन ठेवला. वाटीतले कुंकू कपाळावर लावले. डोक्यावरून पदर घेवून दोन्ही हात जोडून नमस्कार केला. |
[शशक' १९] - वेंधळानेहमी वेंधळेपणा करतो म्हणे! एखाद्या वेळेस चावी किंवा ग्रोसरी गाडीत राहिली म्हणुन लगेच? त्याने आठवणीने गाडी रिवर्स लावली, वायपर्स उभे करुन ठेवले. शॉवेल आणि ब्रश ट्रंकमधुन घेताना त्याला मागच्या वेळची फजिती आठवली. दोन फुट बर्फ आणि हत्यारं सगळी गाडीच्या ट्रंकेत! रात्रभरात गुडघ्याइतका बर्फ पडला होता. अर्धा तास आधीच उठुन समीर खाली गेला. |
[शशक' १९] - लोणचंसर्वांनी डबे उघडले आणि त्यातले जिन्नस चवीपुरते वाटून घेतले. त्याच्या डब्यात चपातीच्या घडीत लोणच्यातल्या चार मिरच्या होत्या. मित्र म्हणाला, ‘लोणच्यानं मजा आणली! उद्याही घेऊन येना थोडं.’ त्याचा घास घश्यातच अडकला. भरून आलेले डोळे कुणाला न दिसेलसे पुसत म्हणाला, ‘माफ करा मित्रहो! हे लोणचं मी पुन्हा कधीही आणू शकणार नाही.’ |
- ‹ previous
- 12 of 20
- next ›