"काळेभोर, लांबसडक केस म्हणजेच स्त्रीचं खरं 'सौंदर्य'!" ब्युटीपार्लर मध्ये नवीनच आलेली स्वप्नाली इतर मुलींशी गप्पा मारताना म्हणाली. गर्दी नसल्यामुळे सगळ्याच निवांत होत्या. एक मुलगी पार्लरमध्ये आल्यावर गप्पा थांबल्या.
"माझे केस कमी करायचेत!"
कमरेपर्यंत कमी केल्यावर म्हणाली, "अजून थोडे".
थोडा वेगळा मस्त खांद्यापर्यंत कट; तरीपण आरशात बघून म्हणते, "यापेक्षा कमी!".
सगळेच चक्रावतात; एवढे दाट केस कमी करतेय! पण आग्रहास्तव अगदी कानापर्यंत कमी करून एकदम टॉमबॉय लुक देतात.
स्वतःच प्रतिबिंब न्याहाळत हरवून गेलेल्या त्या मुलीकडे स्वप्नाली प्रश्नार्थक नजरेने पाहते, तर ती एकदम ओंजळीत तोंड लपवून रडायला लागत म्हणते, "माझे केस एवढे कमी करा की माझ्या घरचे कोणी माझे केस ओढू शकणार नाहीत!"
__________________________________________________________________________
डिस्क्लेमर: कथाबीज हे आंतरजालावरच्या वाचनावर आधारित काही गोष्टींचा कोलाज आहे.
प्रतिक्रिया
19 Feb 2019 - 3:01 pm | विनिता००२
बिचारी :(
19 Feb 2019 - 3:02 pm | विनिता००२
+१
19 Feb 2019 - 3:04 pm | लई भारी
दुर्दैवी!
19 Feb 2019 - 3:06 pm | ज्ञानोबाचे पैजार
हे कनफ्युजन टाळण्यासाठीच कटिंगला गेलो की आम्ही डोक्यावर पहिले झिरो मशिन चालवुन घेतो.
त्याचे दोन फायदे होतात दहा मिनिटात कटिंग होते आणि मग महिना दिड महिना पहावे लागत नाही.
आज तिसरा फायदाही समजला.
पैजारबुवा,
19 Feb 2019 - 3:33 pm | सिद्धार्थ ४
+१
19 Feb 2019 - 9:08 pm | रांचो
+१
20 Feb 2019 - 9:16 am | ज्योति अळवणी
अरेरे
20 Feb 2019 - 11:17 am | निखिल माने
https://www.youtube.com/watch?v=Ckr4zzUyd64
20 Feb 2019 - 12:34 pm | आनन्दा
अरेरे.. पण तरीहि 100 शब्दात बसवण्याचे कसब आहेच.
22 Feb 2019 - 6:05 pm | चौथा कोनाडा
शोर्टफिल्म भारी आहे
थानक्यु निमा संदर्भासाठी.
20 Feb 2019 - 12:32 pm | आनन्दा
*uck!! जोरदार पंच
+1
20 Feb 2019 - 1:27 pm | मानसी१
क्रुपया ओरीजीनल गोष्टी लिहून पाठवा
20 Feb 2019 - 8:25 pm | तुषार काळभोर
छान कथा
20 Feb 2019 - 10:13 pm | Ganes Gaitonde
(1
20 Feb 2019 - 11:52 pm | मराठी कथालेखक
भूतकाळ
स्वप्नाली इतर मुलींशी गप्पा मारताना म्हणाली. गर्दी नसल्यामुळे सगळ्याच निवांत होत्या. एक मुलगी पार्लरमध्ये आल्यावर गप्पा थांबल्या.
वर्तमानकाळ
थोडा वेगळा मस्त खांद्यापर्यंत कट; तरीपण आरशात बघून म्हणते, "यापेक्षा कमी!".
21 Feb 2019 - 1:14 pm | विनिता००२
व्हिडीओ पाहून डोळे भरुन आले. :(
23 Feb 2019 - 1:06 am | दादा कोंडके
अशीच एक गोष्ट वाचली होती.
23 Feb 2019 - 10:51 am | कुमार१
+१