" शेसुकाका लवकर चला, आमच्या कोकराला कायतरी चावलंय, तोंडातून फेस येतोय".
मागच्या मळ्यात घर असलेला छोटा युवराज काकुळतीला येऊन सांगत होता, युवराजचा त्या कोकरावर खूप जीव.
दारुडा असला तरी शेसुला झाडपाल्याचे बऱ्यापैकी ज्ञान होते.
बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याने शेवटचा उपाय म्हणून कोकराचा अर्धा कान कापून काहीतरी औषध कोकराच्या तोंडात कोंबले, कान कापल्यानंतर कोकराचा आवाज शेसूच्या घरात ऐकू आला तसा शेसूच्या बायकोने मसाला वाटायला घेतला.
शेसुकडे राहिलेली बॅटरी मागायला संध्याकाळी युवराज पुन्हा शेसूच्या अंगणात गेला तेव्हा तिथूनच डोळ्यात पाणी घेऊन निपचित घरी येऊन पडला , शेसु खाटेवर झोपून मस्तपैकी बिड्या ओढत होता, चुलीवरच्या मटणाचा सुगंध पसरला होता आणि कोकराचे कातडे दोरीवर वाळायला घातले होते
प्रतिक्रिया
16 Feb 2019 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
18 Feb 2019 - 10:34 am | सतिश पाटील
+१
18 Feb 2019 - 12:37 pm | ज्ञानोबाचे पैजार
अरे रे बिचारा निरागस युवराज,
पैजारबुवा,
18 Feb 2019 - 1:30 pm | तुषार काळभोर
बिचारा निरागस युवराज आणि बिचारं कोकरू!
18 Feb 2019 - 1:52 pm | मोहन
+१
18 Feb 2019 - 2:53 pm | सिद्धार्थ ४
+१
18 Feb 2019 - 3:30 pm | विनिता००२
:(
+१
19 Feb 2019 - 2:44 pm | लई भारी
+१
19 Feb 2019 - 9:10 pm | रांचो
+१
20 Feb 2019 - 6:08 am | बाबा योगिराज
1+
20 Feb 2019 - 9:21 am | ज्योति अळवणी
बिचारं कोकरू आणि युवराज
20 Feb 2019 - 12:52 pm | खंडेराव
+1
21 Feb 2019 - 4:26 pm | सविता००१
आईग