सूड
त्याचे असंख्य नातेवाईक त्याच्या डोळ्यासमोरच मारले गेले होते. मृतदेह जळतानाचा तो विचित्र वास स्मृतीत साठून राहिला होता. त्या आठवणींनी त्याला भडभडून आलं.
सूडाच्या उद्देशानं तो पेटून उठला होता. पण त्याचा एकही प्रयत्न यशस्वी ठरत नव्हता.शत्रूकडे त्याच्या सगळ्या हल्ल्यांना परतवून लावण्याची ताकद होती.
आजचा दिवस काही निराळाच उजाडला.
त्याची एका नव्या खेळाडूशी ओळख झाली. माणसं मारण्यात हा नवखा भिडू तरबेज होता.
शांतपणे, कुठल्याही हालचालींशिवाय तासनतास सावजाची वाट पाहण्याचा संयम त्याच्याकडे होता.
दोघांनी हातमिळवणी केली.
ह्या जोडीनं थंड डोक्याने शत्रूला गारद करायला सुरवात केली. दणादण मुडदे पडू लागले. कोणाला पुसटशीही शंका अजून आलेली नव्हती.
करोना विषाणू आता डासांमार्फत पसरायला लागला होता.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
14 Apr 2020 - 6:39 pm | चांदणे संदीप
+१
हे कथाबीज डोक्यात होतं. आम्ही पेरायच्या आत तुम्ही उगवून मोकळे.
पण लिहिलंय भारी, शेवटच्या बॉलवर सिक्सर!
सं - दी - प
14 Apr 2020 - 7:20 pm | मीअपर्णा
वाटली. फार धक्कादायक शेवट वगैरेही वाटला नाही. दोष तुमच्या लेखणीत नसून आमच्या अति कॉरोना अवेअर्नेसचा आहे.
14 Apr 2020 - 7:40 pm | प्रचेतस
+१
14 Apr 2020 - 7:55 pm | सौंदाळा
+१
14 Apr 2020 - 11:27 pm | जव्हेरगंज
+१
वा! मस्त! शेवटचा धक्का एकदम जबरी!!
15 Apr 2020 - 8:31 am | जेम्स वांड
पण हे कथेपुरते ठीक आहे ओरिजिनल असलं काही झालं तर जगाचे वाईट हाल होतील.
15 Apr 2020 - 11:21 am | राजाभाउ
+१
16 Apr 2020 - 4:17 pm | पलाश
+१
16 Apr 2020 - 10:07 pm | बेंगुताई
+१
17 Apr 2020 - 2:44 am | ज्योति अळवणी
+1
17 Apr 2020 - 1:59 pm | निओ
+१
जरि ...मृतदेह जळतानाचा तो विचित्र वास स्मृतीत साठून राहिला होता..याचा सन्दर्भ लागला नाहि तरिहि.
17 Apr 2020 - 7:29 pm | चांदणे संदीप
मच्छर मारायचं इलेक्ट्रीक रॅकेट... बघा आठवून.
सं - दी - प
18 Apr 2020 - 3:23 pm | निओ
ट्यूब पेटली :)
चांगलंच वजनदार वाक्य सुटलं होतं म्हणायचं.
धन्यवाद संदिप.
17 Apr 2020 - 7:26 pm | स्मिताके
+१
19 Apr 2020 - 12:29 pm | तुषार काळभोर
मला आधी वाटलं कॉरोना ला नाव भिडू मच्छर मिळाला.
संदिपदादांची प्रतिक्रिया वाचून कळलं, उलट आहे. मच्छर ला नवा भिडू कोरोना मिळाला.
27 Apr 2020 - 11:15 am | मनस्विता
+१
27 Apr 2020 - 3:44 pm | योगी९००
+१ आवडली..
खरोखर असं घडलं असत तर आत्तापर्यंत जगातले निम्मे लोक गेले असते.
29 Apr 2020 - 10:23 am | सुमो
+1