देवपूजा झाली. माईंनी देव्हाऱ्यात निरांजन ठेवला. वाटीतले कुंकू कपाळावर लावले. डोक्यावरून पदर घेवून दोन्ही हात जोडून नमस्कार केला.
सर्व आटोपून त्या इस्पितळात पोचल्या. मुलगा ICU बाहेर ताटकळत उभा होता. डॉक्टर नुकतेच भेटून गेल्याचे कळाले.
"काय रे, काय म्हटले डॉक्टर?" त्यांनी मुलाला विचारले.
"Tracheotomy Tube काढली कि जातील दोन तीन दिवसात." पोरगा चिंताग्रस्त होता. डोळ्यात पाणी तरळले होते.
"मग कधी काढायची?" अधिरपणा न लपवता माई म्हणाल्या.
तितक्यात कोणीतरी भेटायला आले. माई पुढे झाल्या.
अथपासून इथंपर्यंत नवर्याच्या आजारपणाची कॅसेट वाजवून माईंनी पदराने डोळे पुसले. दोन हुंदके दिले. भेटायला आलेले माईंचे सांत्वन करू लागले.
पित्याच्या शेवटच्या क्षणीही आईच्या कोडगेपणाची मुलाला किव येत होती.
--------------------------------------------------------------
--सत्य घटनेवर आधारित --
प्रतिक्रिया
14 Feb 2019 - 6:08 am | पुष्कर
+१ मत म्हणून देतोय. ह्याला 'आवडली' म्हणणं म्हणजे विचित्र वाटतंय.
14 Feb 2019 - 6:53 am | एमी
कोडगेपणा काये यात? दांभिकपणा आहे. आणि तो तसा का झाला असेल याचा विचार एक समाज म्हणून करायला हरकत नाही.
मुलाचे वडिलांशी जसे नाते आहे किंवा तो वडलांना जसे बघतोय तसेच बायकोचे नवऱ्याबद्दल असावे असे काही. आर्थिक परावलंबन आणि सामाजिक दबाव नसता तर किती लग्न टिकली असती, किती नवराबायकोचे खरंच एकमेकांवर प्रेम असते शंकाच आहे.
14 Feb 2019 - 5:17 pm | यशोधरा
बऱ्यापैकी सहमत. ह्यात कोडगेपणा काय आहे, खरंच.
ह्या दंपतीचे एकमेकांशी नाते कसे होते, ह्या स्त्रीने उभ्या आयुष्यात काही सोसले होते का, म्हणून आज ती असे वागत आहे, असे काही अनुत्तरित प्रश्न येतात मनात. ( सत्य कथेवर आधारीत, असे लिहिले आहे म्हणून)
15 Feb 2019 - 8:17 pm | गामा पैलवान
एमी,
अहो, तुमचा प्रतिसाद वाचून बाजूच्या मोकळ्या मैदानाकडे धावंत सुटलो. म्हंटलं बघूया सूर्य पश्चिमेस तर उगवला नाही ना. कारण की तुमच्याशी चक्क सहमत!
कदाचित कोडगेपणा च्या ऐवजी वेदनेचं भांडवल करणं दर्शवणारा दुसरा एखादा शब्द चपखल बसला असता.
आ.न.,
-गा.पै.
14 Feb 2019 - 6:54 am | एमी
काही = नाही
14 Feb 2019 - 10:09 am | विनिता००२
माईची असे वागण्यामागची पार्श्वभूमी कळत नाही.
कथा अपूर्ण वाटते.
14 Feb 2019 - 10:18 am | विजुभाऊ
आजारी पेशंट ला लाईफ सपोर्ट वर ठेवून त्याचे हालच करतो .
नैसर्गीक मरण लांबवून नक्की काय मिळते.
उगीच हॉस्पिटलची भर होते इतकेच.
वयोव्रुद्ध झालेला कोम्यात गेलेला ,बेड सोर्सेस झालेला पेशंट आय सी यू मधे लाईफ सपोर्टवर ठेवून नक्की काय साधतात लोक?
15 Feb 2019 - 10:01 pm | NiluMP
+१
14 Feb 2019 - 4:52 pm | रिम झिम
+१
14 Feb 2019 - 5:20 pm | चौथा कोनाडा
हे सर्व प्रतिसाद, ही कथा पुर्ण हवी असं सुच्वतायत !
15 Feb 2019 - 2:39 pm | विजुभाऊ
कोडगेपणाची कीव येत नाही.
कोडगेपणाचा राग येतो.
कीव हा दया भावना व्यक्त करणारा " अरेरे बिच्चारा " अशा भावना व्यक्त करणारा शब्द आहे.
16 Feb 2019 - 11:14 pm | ज्योति अळवणी
एकदम सहमत एमी शी
19 Feb 2019 - 9:15 pm | रांचो
+१