चिमाजीअप्पा भलतेच खूष होते. बऱ्याच दिवसांनी कंबरेच्या चामडी पट्ट्याची खरेदी करण्यास निघाले. गेली सतत सात वर्षे पोटाच्या उजव्या बाजूचे दुखणे सहन करीत शेवटी महागडी शस्त्रक्रिया करून उजवे मूत्रपिंड व ऍपेंडिक्स काढून घेतले. दुखण्यापोटी बरेच बुवा, साधू, गंडे, गुरु, तांत्रिक, मांत्रिक, वैद्य, डॉक्टर झाले होते. खिशाला चांगलाच चुना लागला पण पोटदुखी आता शस्त्रक्रियेनंतर थांबली होती. आता वेळ खिसेदुखीची होती.
पट्ट्याच्या दुकानदाराने कंबरेचे माप विचारले.
"एकतीस."
चिमाजींच्या तुंदिल शरीरयष्टीकडे पाहत व अनावर हास्य दाबत दुकानदार गंभीर चेहऱ्याने म्हणाले, "राव, एकतीसचा पट्टा तुमच्या स्थूल कंबरेला करकचून वेटाळल्याने तुमच्या खालून तिसऱ्या मणक्यावर दाब पडून सततची पोटदुखी नाही का होणार? अडतीसचा घ्या, त्याच किंमतीला देतो."
प्रतिक्रिया
20 Feb 2019 - 10:11 pm | Ganes Gaitonde
+1
21 Feb 2019 - 5:25 am | रुपी
+१
पण, चिमाजीअप्पा ?? =)
21 Feb 2019 - 9:31 am | विनिता००२
अरे देवा!!
+१
21 Feb 2019 - 12:39 pm | एकविरा
छान
21 Feb 2019 - 12:40 pm | एकविरा
छान
21 Feb 2019 - 12:40 pm | एकविरा
छान
21 Feb 2019 - 12:59 pm | राजाभाउ
+१
21 Feb 2019 - 4:44 pm | nanaba
Ha ha
21 Feb 2019 - 5:14 pm | आनन्दा
रुपांतरण चांगले आहे. पण मी अधिक एक देणार नाही.
21 Feb 2019 - 8:13 pm | खिलजि
+१
21 Feb 2019 - 10:52 pm | गामा पैलवान
ऐकलेली कथा वाटली. म्हणून जालावर शोधलं, तर हे सापडलं : https://www.reddit.com/r/Jokes/comments/3qjgxf/headache_and_testicles/
माझ्याकडनं +०. क्षमस्व!
आधारित म्हणून लिहिलं असतं तर धनभारित प्रतिसाद दिला असता.
-गा.पै.
तळटीप :
वाचक या लक्षणाच्या आधारे लेखकास संशयाचा फायदा देऊ शकतात : https://en.wikipedia.org/wiki/Multiple_discovery#The_arts
मात्र मी देऊ इच्छित नाही कारण कथा अगदीच छोटी आहे.
23 Feb 2019 - 5:07 pm | आनन्दा
आधारित आहे असे लिहिले असते तर मी पण दिला असता अधिक एक..
22 Feb 2019 - 5:26 pm | चौथा कोनाडा
रुपांतरण आवडले.
23 Feb 2019 - 9:25 am | तुषार काळभोर
मस्त.
23 Feb 2019 - 11:02 am | ज्योति अळवणी
आवडले. रूपांतरण का होईना पण 100 शब्दात लिहिलंय आणि मजा आली वाचताना. तस तर अशा प्रकारचा किस्सा जोक म्हणून आपण सर्वनीच पूर्वीच वाचलेला/ऐकलेला आहे
23 Feb 2019 - 10:20 pm | वन
+१