- काही नवे करावे म्हणून - भाग १
- काही नवे करावे म्हणून - भाग २
- काही नवे करावे म्हणून - भाग ३
- काही नवे करावे म्हणून - भाग ४
- काही नवे करावे म्हणून - भाग ५
- काही नवे करावे म्हणून - भाग ६
- काही नवे करावे म्हणून - भाग ७
- काही नवे करावे म्हणून - भाग ८
< /ul>नऊ वाजले, दहा वाजले, अकरा वाजले, कोणाचाच पत्ता नाही.पातेरेमामा त्यांच्या घरी जाऊन बघून आले तर घरीही कोणी नाही.आता काय करायचं?सुरेखाचे यजमान म्हणाले,”तुम्ही घरी चला आता ताई.थोडा आराम करा.फराळासाठी सुरेखा वाट बघत असेल घरी.तिने आज मला तुम्हाला घरीच आण्याला सांगितलेलं दुपारी.म्हणते,ताई अशी हातावर भाकर घेऊन जेवते ते मला बरं नाही वाटत.”
आम्ही सुरेखाकडे आलो.
(क्रमशः)
***************************************************************************************************सुरेखाच्या घरी पोचलो.तिने माझा चेहरा पाहून विचारले,”का ग ताई ?दमलीस ना?तुला कुठे सवय अशा कामांची?”
“अग. आज काहीच काम नाही झालं,कोणी आलेच नाहीत कामाला?”या माझ्या उत्तरावर नवऱ्याकडे पाहत तिने विचारले,”काय हो हे?मग घरी नाही का गेलात त्यांच्या?”.
“अग, कोणीच घरी नाहीयेत.”मीच उत्तर दिले.
सुरेखा म्हणाली.”मरुदेत त्यांना,तू खाऊन तर घे आधी.मग बघू.”आणि आत गेली.आम्हीही हातपाय धुऊन आत गेलो.सुरेखाने पानं वाढलीच होती.मसाला भगर, दाण्याची आमटी, बटाट्याची भाजी,रताळ्याची खीर असा बेत.”आज काम नाहीय ते बरंच आहे.इतकं खाल्ल्ल्यावर काम होईल ग शहाणे?”या माझ्या हसत हसत दिलेल्या शेऱ्यावर तीपण हसून म्हणाली,”मग बरंच झालं तो बाळू रजेवर गेलाय ते!” तिच्य पाठीत हलकासा धपका मारीत मी फराळ करायला बसले.
फराळ करून आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या.आणि थोड्या वेळाने मयूला म्हटलं,” आता चल.उपद्रव मूल्य दाखवायची वेळ आलीय.”सुरेखाला म्हटलं,” एवढा छान फराळ दिलास, खूप कष्ट केलेस.आता तुला गंमत दाखवते चल. तुम्हीपण चला काम नसलं तर.”शेवटचे वाक्य तिच्या यजमानांना उद्देशून होतं.तेही तयार झाले. आम्ही बाळूच्या घराकडे मोर्चा वळवला.
बाळूच्या घरी जायचा रस्ता पातेरेमामांच्या घरावरूनच होता.तेसुद्धा आम्ही बाळूच्या घरी चाललो म्हटल्यावर आमच्यासोबत निघाले. बनातल्या भाईच्या घरावरून पुढे गेलो न् मागून त्यांची हक आली,” ओ वैनी, कुठे चाललात?या,चहा घ्या.” "मी वळत उत्तरले,” कुटवलंत? आता माझं काम नाही झालं तर चहाच काय? जेवायलाच येते.”त्यांचा चेहराच पडला.
आम्ही पुढे निघालो आणि बाळूच्या दारात आलो. लहानसे केंबळ्याचे घर. दारातच एक गावठी गुलाबाचे झाड पुरुषभर उंचीचे आणि फांद्यांवरच्या प्रत्येक फुटव्याला फुले धरलेली, तीही सोबत पाच सहा कळ्या घेऊन. कुंणाला असलेल्या निर्गुंडीच्या कडवट वासावर मात करत त्याचा सुवास पसरलेला होता.पागोळ्यांना लावलेल्या दोन बादल्या भरलेल्या होत्या. आणि ओटीवर बाळू अस्ताव्यस्त पालथा पसरलेला होता.
त्याला पाहताच मयू दोन ढांगातच ओटीवर चढला. आणि त्याची खांदा धरून हलवू लागला. तोंडाने अस्सल शिव्यांची डिक्शनरी उघडलेली.बाळू उताणा झाला आणि जड आवाजात बोलला,”कोन हाय?”त्याने तोंड उघडताच देशी दारूच्या भपकाऱ्याने गुलाबाच्या दरवळावर मात केली.आता मयूने त्याची कमरेत एक लाथ हाणली आणि म्हणाला,”ताई, आज तू मध्ये पडू नको. आज ह्याला वारीलाच पाठवतो.”
बाळू जड आवाजात,”अवो दादा,आज एकादशीचा उपास ना?”म्हणत उठून बसलेला एव्हाना.त्याची बायकोपण आतून धावत बाहेर आलेली”म्हणून दारूचा फराळ केलायस वाटते?म्हणत दुसरी लाथ घालणार तोच मी मयूला नेहमीप्रमाणेच थांबवले.”अरे,थांब.तो शुद्धीवर नाहीये.इकडे ये.”सुरेखापण मला कोपराला धरून, ”अग, तूच थांब”, म्हणायला लागली. मी माझे कोपर सोडवून घेत तिला हलक्या आवाजात म्हटले,”तुला गंमत बघायचीय ना? मग तू पण गप्प बस.”तोवर मयू माझ्या शेजारी मोठ्या नाराजीने येऊन उभा राहिला होता. आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातले पुरुष, बायका,आणि मुलेबाळे तिथे जमली.
मयूच्या नाराज चेहऱ्याकडे बघत मी त्यला सांगितलं,”तुला माहीत आहे ना? मी प्रत्येक काम कसे रीतसर करते ते?”बादल्यांकडे बोट दाखवत मी त्याला सांगितलं,”आधी त्यला शुद्धीवर आण.” नव्या उत्साहाने मयू सरसावला.पुढे येत त्याने एक बदली उचलताच सुरेखाचे यजमानही दुसरी बदली उचलायला सरसावले.त्यांचे कोपर धरून त्यांना मी थांबवले,”तुम्ही नाही”, असे हलक्या आवाजात बजावले.
एव्हाना मयू बादली उचलून ओटीवर पोचला होता. अजून अर्धवट झोपेत,अर्धवट धुंदीत असलेल्या बाळूच्या डोक्यावर त्याने भसकन् बदली ओतली. जमलेले टाळ्या वाजवू लागले,मुलांनी हुर्यो करायला सरुवात केली.मयूने येऊन दुसरी बादली नेऊन त्याच्या डोक्यावर रिकामी केली.एव्हाना बाळू चांगालाच शुद्धीवर येऊन गयावया करू लागला होता,”दादा मला एकडाव मापी करा.माझा कडक उपास हाय.” मी त्याच्या बायकोकडे पहिले तर ती नकारार्थी मान हलवत दोन्ही बादल्या उचलून आत निघून गेली. मी पण एक निर्गुंडीचीची बारीकशी लांब शिमटी तोडून हातात घेतली.
मी मयूला सांगिले.”आता याला इतका मार की, ह्याने मला फसवलंय तसं दुसऱ्याला फसवण्याची कल्पनासुद्धा याच्या मनात आली तर ह्याला हा मार आठवला पाहिजे.”मग काय? मयूने त्याला जी धुवायला सुरुवात केली की बस रे बस. तसा बाळूही हट्टाकट्टा होता.पण अपराधीपणाच्या भावनेने सुन्न झाला होता.शेवटी धडपडत मार चुकवत तो माझ्या पायाशी आला.”वैनी, वैनी,एकडाव मापी करा. परत असा व्हणार नाय.”
मी मयूला हाताने थांबण्याची खूण केली आणि हातात धरलेल्या शिमटीने त्याच्या उघड्या दंडांवर, पाठीवर फटके द्यायला सुरवात केली. ओली निर्गुंडीची शिमटी जेवढी बारीक तितकीच चिवट असते. वेतासारखीच लागते. त्याने कळवळून हात जोडले आणि तो गडाबडा लोळू लागला.सात आठ फटक्यानंतर मी थांबून हातातली शिमटी त्याच्या अंगावर फेकून दिली.”तू काय समजलास?तो भ** भाई तुला वाचवायला येईल?तो जर आता इथे आला असता ना त्यालापण इथेच लोळवला असता तुझ्या शेजारी. दारू त्याच्याच कडे जाऊन प्यायलास ना?” बाळूने कशीबशी उभी मान हलवली. ”आणि तू त्याच्याच घरात लपून बसला होतास ना?मामा तुला शोधायला आले तेव्हा.”पुन्हा होकारार्थी मान हलवत तो हात जोडू लागला.
पण आता मी त्याला आणि भाईलापण तसेच सोडणार नव्हते. त्याची गचांडी धरून त्याला पुढे घालून त्याची वरात भाईच्या घराकडे चालवली.त्याच्या अंगणातून बाहेर पडताना एका सहा/सात वर्षाच्या मुलाने नवी शिमटी तोडून माझ्या हातात दिली. कोणीतरी त्याला दटावले,”अरे,असा नाय करुचा.” दुसरे कोणीतरी म्हणाले,”त्याक बरा वाटला कोनीतरी बापसाक मारता ता.न्हेमी बगता ना आयेक मार खाताना, बापसाच्या हातून, दारवा खाऊन. ”म्हणजे तो बाळूचा मुलगा होता. आणि बाळूची बायकोपण परस्पर पावण्याच्या काठीने साप मरतोय म्हणूनच आत गेली होती. मला हसूच आले.पण तसे न दाखवता मी ती शिमटी हातात घेतली. गर्दीही वाढली होती.
भाईंच्या घराकडे आलो आणि त्यांना आवाज दिला,”भाई ,बाहेर या,” भाईंची बायको बाहेर येऊन म्हणाली,”झोपलेत.” मयू रागाने बोलला,”तुम्ही उठवता की मी येऊन उठवू. फालतू वेळ नाही आम्हाला घालवायला.ह्याची अवस्था बघताय ना काय केलीय ती?”तशी ती पुन्हा आत गेली.बाहेर लोकांचा गलका चालूच होता.पाच मिनिटांनी भाई बाहेर येत म्हणाले.”काय वैनी,तुम्ही झोपायला पण देत नाही.”मयूनेच उत्तर दिले, ”ये, तुला कायमचा झोपवतो.”जमावातून खसखस पिकल्याचा आवाज आला. मी मयूला हाताने थोपवले. बाहेर आल्यवर लोळागोळा झालेल्या,चिखलाने माखलेल्या बाळूला आणि गर्दीला पाहून ते सर्दच झाले.”काय झालं? काय झालं?”
“मी सांगते तुम्हाला काय झालंय ते?”,असे म्हणत आम्ही त्यांच्या अंगणात उतरलो. बाकीच्या लोकांना त्याने ,”ए,तुमचे काय काम आहे?रिकामटेकडे नुसते. चला चालायला लागा.”असे खडसावले.पण कोणीतरी, ”आमी तर रस्त्यावर हाव. तुमी आमाला बोलू नाय शकत”,असे उत्तर दिले. ”कोण रे,कोण तो?’असे भाईंनी उसन्या अवसानाने म्हटले.
“ए भाई, नाटक बंद.”, मयू ओरडला.” ह्याला बघ कसलाझोडलाय तो? आता चूप बसायचं आणि ताई काय बोलते ते ऐकायचं.” तरीही भाई ,” अरे, पण मी काय केलं?”असे कुरकुरत दोन पावले मागे सरकून बायकोला म्हणाले, ”अग,चहा ठेव.”माझा पारा चढतच होता. मी त्यांना रागानेच विचारले की,”तुम्हाला काय वाटतं की मी खरंच चहा प्यायला आलेय. इतकी मूर्ख समजता तुम्ही मला?” तसे ते गप्पच झाले.”मी तुम्हाला जाब विचारायला आलेय. आणि पूर्ण विचार करून बोला. पुढे जे काय घडेल त्याला तुम्हीच जबाबदार राहाल याची पण कल्पना मी तुम्हाला देते आहे.”
“तुम्ही बसा तरी वैनी, आत या”, त्यांनी विनंती केली. इतक्यात आपली आजी आणि आजोबानाही बातमी पोचली होती.तेही तिथे पोचले. आजीने बाळूची अवस्था बघताच त्याला शिव्या घालायला सुरुवात केली,”मेल्या, तुज सांगितला होता,ह्या भाईच्या नादाला लागून तिच्या कामात गडबड करू नको म्हनून.”लगेच भाईपण तिच्यावर घसरले.”गे काकू,मी काय केलाय?. माज कशास बोलतंस?.” मी सुरेखाला खुणावून आजीला मागे घ्यायला लावले.
पुन्हा मयूने त्यांच्या खांद्यावर थोपटत त्यांना गप्प केले,”ए, तुला समजत नाही का?एकदा सांगितलेलं.”आता तू गप्पा बसला नाहीस तर कानफाटच फोडीन सा*.” असं कधी ऐकायची सवय नसते या लोकांना त्यात चार माणसांसमोर तर नाहीच नाही. ”ओ वैनी,मी ऐकून घेतोय म्हणून तुम्ही काहीपण बोलाल का?”ते गुरगुरतच पुन्हा एक पाऊल पुढे झाले. पण ते अवसान उसनंच होतं.
“मी अजून तुम्हाला काहीही उलटसुलट बोलले नाहीय आणि त्याला इथली ही सगळी माणसं साक्षीला आहेत. मयूचं म्हणाल तर तुम्हीच नीट बोला नाहीतर मी काही त्याला अडवू शकणार नाही कारण माझंही डोकं ठिकाणावर नाहीये आज .”या माझ्या उत्तरावर त्यांनी शरणागती पत्करत,”ठीक आहे, बोला तुम्हाला काय बोलायचंय ते”असे गुळमुळीत उत्तर दिले.
मी त्यांना विचारले, ”टाळमातीचे कॉन्ट्रॅक्ट ह्याच्याबरोबर तुम्हीच मला ठरवून दिलंत ना?”ते चाचरतच म्हणाले,”मी ठरवून दिलं म्हणजे.....म्हणजे तो कामं करतो अशी म्हणून.....म्हणून तुमच्याशी रुजवात करून दिली.माझं त्यात काय नाय.” आता बाळू जास्त विव्हळू लागला आणि मी माझ्या हातातल्या शिमटीचा मान राखत तिचे उद्घाटन केले.
आणि त्याबाबतच्या माझ्या ”आवाज एकदम बंद.” या दरडावणीवर भाई समजून चुकले की, आपण काय करायचे ते.”नाय म्हणजे त्याने मला थोडे पैसे दिलान त्यातले पण त्याच्या खुशीने, मी काय मागितले नायत.”
इतक्यात त्या गर्दीतून दोन माणसे इतरांना ढकलत खाली उतरली. वेळ बरी असली की असंच घडतं, हे दोघेही तुमच्या ओळखीचे आहेतच. तात्या आणि अण्णा. अगदी बरोबर ओळखलंत. चाफेरकरबरोबर मला जाब विचारायला आलेले आणि वस्तुस्थिती समजल्यावर माझ्या बाजूने झालेले गावातले मान्यवर रहिवासी. त्यांना पाहताच मी म्हटलं, “झालं तुम्हीपण आलात.ऐका जरा.”इतक्यात तात्यांनी बाळूकडे पाहतटाकलाच,”ह्यास कोणी दिलान् रेवाचीनिचो जुलाब?”सगळे हसायला लागले.बाळूही डोक्याला हात लावून बसला होता आता.
मी पुन्हा भाईकडे पाहत विचारले”, म्हणजे या व्यवहारातलेरातले पैसे तुमच्याकडे आल्याचं तुम्ही कबूल करताय तर?”
“हो,पण मी काय मागितले नव्हते, त्याने त्याच्या खुशीने दिलान्.” या भाईच्या उत्तरावर अण्णा सक्रिय झाले आणि म्हणाले, ”कधीपासून तू इतका सुधारलास भाई?” आणि अण्णा, तात्या दोघेही हसू लागले.
भाईना काय बोलावे ते सुचेना. मी फायदा घेतला. ”मग तुम्ही ते पैसे तुम्हाला नको आहेत ते त्याला देऊन का टाकत नाही? कारण त्याच्याकडे आता पैसे नाहीत इतर माणसाना द्यायला हे एक कारण आणि उरलेल्या पैशांची तो इथे येऊनच दारू प्यायलाय हे दुसरे आणि त्यामुळे माझे काम अडलेय ते तिसरे.” यावर घाईघाईने भाई म्हणाले, ”अहो, विचारा तरी त्याला आजपण उधारीवर प्यायलाय तो!”
मला हेच हवं होतं. आज त्यांनी बाळूला फुकट दारू पाजालीय ते त्यांनीच त्यांच्या तोंडाने कबूल केलं होतं. बस,मग काय?मी कडाडलेच,” तुम्हाला माहीत होतं ना माझ्या बागेत कालपासून काम चालू झालंय ते? मग तुम्ही त्याला इतकी दारू पाजून तुमच्या घरात लपवून का ठेवलात?त्याची अजून पण उतरली नसती आम्ही औषध दिले नसते तर.काय रे, हो की नाही?”शेवटचा प्रश्न बाळूसाठी होता.”बाळूने मान हलवली आणि भाईंचा धीर सुटला. ते नुसते,”नाय वो, नाय वो.”करत राहिले.
“चला, तुम्ही पैसे देताय की मी पोलिसांना फोन लावू?” या माझ्या प्रश्नावर उत्तरही देईनात. आता तात्या परत माझ्या मदतीला.”लावाच वैनी तुमी फोन, सा* ही घान जाऊंदेतच गावातून.”पण पावण्याच्या काठीने साप मारायची प्रवृत्ती पाहून मला त्यांचीही चीड आली”. चला तर ग्रामपंचायतीच्या ऑफिसात.मी नंबर लावून देते तुम्हाला एस.पी.चा .तुम्ही बोला.”लगेच आणणा त्याच्या मदतीला,”छॅ,छॅ,वैनी तुमी शिकलेली माणसा बोलाल तसा काय ह्यानला जमणार हाय?”
मी एकदम एस.पी.नाच फोन लावते बघितल्यावर भाई अगदीच मऊ झाला.बायकोला म्हणाला,” जा माझं पाकीट आण.”तिने पाकीट आणल्यावर त्यांनी त्यातले नऊशेरुपय्रे काढून माझ्या हातात दिले.”सुट्टे नायत माझ्य्जवळ.”
“ते उरलेले होतील तुमचे वसूल नंतर.पण तुम्हाला सांगून ठेवते.माझं काम संपेपर्यंत जर तुम्ही ह्याला दारू दिलीत तर मग तुम्हाला लक्ष्मीकेशवपण वाचवू शकणार नाही हे तुम्ही समजून असा.”य्ह्याच्यावर पाणीच ओतलाय.तुमच्यासाठी काय वापरेन ते तुम्हाला सांगायला नकोच. सावंत नाही साळवीना भारी पडले तर बघा.”काडी ओढण्याचा आविर्भाव करत मी संतापाने म्हटलं.”. मी तुम्हाला धमकी दिली अशी तक्रार करा जा आता पोलिसात.”
“अहो, मी काय वेडा हाय का वैनी तुम्हाला राग येणारच. तुम्ही रागाने बोलताय हे समजतंय मला.”असे भाईंचे ‘पडलो तरीही नाक वर’ थाटाने बोलणे ऐकून मी सावध झाले. हा माणूस असा गप्प बसणार नाही याचीही खुणगाठ बांधली. सापाच्या शेपटीवर पाय दिलाय आपण. लक्ष ठेवाल्यला लागणार ह्या माणसावर.
पुन्हा बाळूला घरी घेऊन गेलो. इतक्यात लक्षामामा आणि बाकीचे तिघे येउन हात जोडू लागले. मी लक्षामामाना म्हटलं,”तुम्ही का हात जोडताय?”
“आम्चापन चुकलाच. ह्यांना सांगीतलान् की, आता त्याच्याकडे पैशे नायत तर ते तुम्हाला सांगायला पायजेल होता. मंग आमी रानात गेलाव दुसऱ्या कामावर. आमचा हातावरचा पोट. एकडाव मापी करा.” ते अजीजीने बोलत होते आणि बाकी तिघे मान डोलावत होते.
“ठीक आहे आता ह्यानेच करार मोडलाय तर आता तुम्ही बोला. माझं काम पुढच्या दोन दिवसात पूर्ण करता का? त्याला ठरलेले पैसे तुम्हाला देते.” पण सकाळी सातला सुरु करायचं ते रात्री सातपर्यंत काम करायचं मंजूर असेल तर बोला. तुमचा चहा नष्टा, जेवण सगळ्याची व्यवस्था करते.”लक्षामानी बाकीच्यांकडे पाहिलं, त्यांनीही मना डोलावल्या.”तुमच्यात दारू पिणारे किती आहेत?” या माझ्या प्रश्नावर त्यातल्या दोघांकडे बोट दाखवत ते म्हणाले,”हे दोघे, धोंडू आणि बंड्या.”
त्यांच्याकडे पाहत मयू म्हणाला,”मग ह्यांना आणू नका. मी आणतो बाकीच्यांना.”तसे दोघे म्हणतात कसे बाळूकडे हात दाखवत,”नाय नाय दादा, आमी काय ह्याच्येवढी नाय पित. तुमानला काल कल्ला तरी की अमी वायच टाकलाव हाय म्हनून.”.
आता बाळूची बायको हात जोडू लागली”’त्यान्ला पन येउंद्यात कामावर.”मी सांगितले,” येउदेत. पण उद्या हा कामावर येऊ शकेल का?”तर लक्षामामा म्हणाले,” न यायाला काय झाला?गो शेवत्या, त्यास निगडीच्या पान्याची अंगुल देस आणि गरमगरम पेज देवन झोपव. सकाली वोक्के.”माझ्याकडे बघत ते म्हणाले,”येल तो. येवदे ना?”. मीपण ताणून न धरता त्याला,” येता आलं तर ये. पण आता लक्षामामा मुकादम असतील. हे मान्य असेल तर ये.” असे सांगून टाकले.
मग शेवंतीला म्हणजे बाळूच्या बायकोला विचारले,”तू काय करतेस ग? ”ती म्हणाली,” असाच कुठलापन काम करताय.”दोन दिवस आम्हाला भाजी, भाकरीचे जेवण, नाष्टा आणि दोन वेळा चहा बनवून देशील का? लागल्यास तिसरा दिवस.” सामान मी आणून देते. त्यातच तुझं आणि लेकाचंहि होईल, तुला दिवसाचे १०० रुपये देईन. दुधाची व्यवस्था तू बघ,त्याचे वेगळे पैसे देईन.” तीही लगेच तयार झाली. ”दहाबारा लोकांचं करशील ना?” म्हटल्यावर,” तुमी काय बी काळजी करू नका. मी समदं नीट करीन.”
आजीने पण ती सगळं नीट करेल याची ग्वाही दिली. मग मी लक्षामामांच्या हातात पाचशे रुपये ठेवले आणि ‘हिशेब नंतर करू’ असे सांगितले.”चला आता. गंमत संपली सुरेखा,”असे म्हणत तिचा हात धरला.
“अग ताई,मी तर थक्कच होऊन गेलेय. तुझं हे रूप बघून. मयूला मी पहिल्यापासून बघतेय. पण तूही वेळ पडली तर असं काही करू शकशील असं मला नव्हतं वाटलं. मी पण किती गोष्टी शिकलेय आज.” सुरेखाला कंठ फुटला.”चल, तुला मस्त कॉफी करते.”
आजी म्हणाली,”मी सांगतललंय तुमका ही देवी हाय म्हणून. पण तुमका आज पटला असात, म्हैशासुरमर्दिनी दिसली की नाय आज. तो मेलो भाई असुरापेक्षा कमी नाय.त्याच्याकड्सून पैशे काडणे म्हणजे सापाच्या गळ्यात्सून बेडूक काडणे.”आजोबा हसले आणि म्हणाले ,”अग,खान तशी माती. बाय, तू भाटीमिऱ्यावरच्या पंधरा माडातल्या दत्तात्रेय मोऱ्यांची कोण?.”
“मी नात त्यांची”. मी उत्तर दिले. ”ते आमचे हेडमास्तर होते.मला सुरेखाकडून समजला तू त्यांची नात ते.” त्यांनी सांगितले.”तेपन अशेच होते. कोणावर अन्याय त्यांना सहन व्हायचा व्हायचा नाय. पदराला खार लावून दुसऱ्याची पोटं भरणार.” माझे आजोबा व्यवसायशाळेचे हेडमास्तर होते. व्यवसायशाळा म्हजे आताचे आय.टी.आय. तिथे शिकवल्या जाणाऱ्या साऱ्या व्यवसायांच्या कामात ते पारंगत होते. माझे मन माझ्या आजोबांच्या आठवणीनी भरून आले.
आम्ही निघणार एवढ्यात बाळूची बायको चहा करून घेऊन आली. मला हसू आवरेना.तिच्या नवऱ्याला ठोकणाऱ्या आम्हाला ती चहा पाजत होती.सुरेखाच म्हणाली “अग ताई चहा घेत नाही.”तिला वाईट वाटल्याचं तिचा पडलेला चेहरा सांगत होता.मी एक उचलून एक घोट घेतला न् कप मयूच्या हातात दिला. तेवढ्यानेही तिचा चेहरा खुलला.
“चला आता, दुकानातून हिला धान्य घेऊन देऊया.” आम्ही शेवंतीला घेऊन दुकानावर आलो.तिला सामान काय लागेल ते घ्यायला सानितलं.सामान घेऊन पैसे देईपर्यंत दुकानदाराने सुरेखाला हळूच विचारले, ”सरपंचताई,बनात्ल्याला आवाज देणाऱ्या ह्याच ताई का?” सुरेखाने मान हलवून होकार दिला.
तिथून सुरेखाच्या घरी पोचलो तर आजी तांब्या भरून दूध घेऊन आलेली.मस्त ताज्या दुधाची कॉफी पिऊन दुसऱ्या दिवशी येते असे सांगून मी निघाले. आज बसस्टॉपवर उभे असलेले लोक आम्हाला ओळख दाखवून नमस्कार करत होते.चमत्काराशिवाय नमस्कार नाही हेच खरे.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
7 Jul 2015 - 4:57 pm | एस
हाहाहा! टाळ्या!! मानलं तुम्हांला...
7 Jul 2015 - 5:16 pm | पिलीयन रायडर
दंडवत स्वीकारा हो!!!!!!
अरे काय!! भारीच लोक असतात!!
7 Jul 2015 - 5:38 pm | स्वाती२
_/\_
सुरंगीताई सॉलीड आहात तुम्ही!
7 Jul 2015 - 6:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
शॉल्लीड ! यावर एका शिनेमाची पटकथा होऊ शकेल. जरूर विचार करा.
7 Jul 2015 - 6:13 pm | स्मिता श्रीपाद
सुरंगीताई तुम्हाला भेटायचय हो...
शॉल्लेट्ट आहात तुम्ही :-)
साष्टांग दंडवत __/\__
7 Jul 2015 - 6:19 pm | रुस्तम
+१००
सुरंगीताई साष्टांग दंडवत __/\__
7 Jul 2015 - 6:37 pm | उमा @ मिपा
__/\__
त्या बाळूच्या बायकोचा, शेवंतीचा चेहरा आला डोळ्यासमोर!
7 Jul 2015 - 6:47 pm | बॅटमॅन
हाण्ण्ण्ण तेज्यामारी.
7 Jul 2015 - 7:23 pm | शलभ
खतरनाक :)
नारबाची वाडी सारखा मूवी काढू..सुरन्गीतैची वाडी..:)
7 Jul 2015 - 7:30 pm | श्रीरंग_जोशी
आजवर तुमच्यासारखी माणसे प्रत्यक्षात पाहण्याचा योग क्वचितच आला आहे.
तुमच्या या लेखमालिकेत वर्णिलेल्या कामगिरीसाठी तुम्हाल दंडवत.
लेखनशैली नेहमीप्रमाणेच खिळवून ठेवणारी.
7 Jul 2015 - 8:05 pm | सूड
पुभाप्र!!
7 Jul 2015 - 9:41 pm | वॉल्टर व्हाईट
वाचून वाईट वाटले. तुम्हाला आलेला अनुभव वाईट आहेच पण तो सोल्व करण्याचा तुमचा एप्रोच विशेष आवडला/प्रशंसनिय वाटला नाही.
7 Jul 2015 - 11:53 pm | रातराणी
+१
7 Jul 2015 - 9:55 pm | टवाळ कार्टा
हिहिहि भारीये...ते "सा*" म्हणजे कै ते कोणी सांगेल कै? :)
8 Jul 2015 - 12:00 am | मयुरा गुप्ते
असा जबरदस्त हिसका दाखवणं आणि ते ही योग्य वेळेला दाखवणं हे खुपच धाडसाचं आहे. ग्रास रुट लेव्हल ला जाउन कामे मार्गी लावणं म्हणजे दिव्यच दिसतयं.
लगे रहो.
-मयुरा.
8 Jul 2015 - 9:19 am | नाखु
एकडाव भेटावं लागेल तुम्हाला.
सध्या बाग आहे की नाही??
तिथे नसल्यास दुसरीकडे कुठे घेतली आहे काय?
8 Jul 2015 - 9:48 am | ज्ञानोबाचे पैजार
सुरन्गीताई साष्टांग दंडवत हो तुम्हाला,
अशा वेळी असे काही करता येऊ शकते याचा विचारच केला नव्हता मी.
वेगळा दृष्टीकोन देउन जाणारी लेखमाला,
जिओ.
पैजारबुवा
8 Jul 2015 - 10:22 am | यशोधरा
सुरंगीताई,हाही भाग वाचला. कोकणातल्या गडीमाणसांकडून कामे करुन घेताना पाहण्याचा अनुभव आहे व बरे वाईट प्रसंग जवळून पाहिले आहेत. तू छान लिहितेस पण मारणे वगैरे बरोबर वाटले नाही गं. कोकणातील त्या काळची गडी माणसे म्हणूनच ऐकून घेतले बघ त्यांनी - काही वर्षांपूर्वीचे अनुभव तू लिहिते आहेस असे वाटते मला. खरा दोषी तर भाई होता. गडीमाणूस बिचारा प्यादं.
आत्ता असे कोणी ऐकून घेणार नाही. घ्यायलाही नको. फसवाफसवीहे करु नये हेही तितकेच खरे. असो.
9 Jul 2015 - 7:55 pm | नूतन सावंत
सगळ्यांचे आभार ,
यशो,त्यवेळी मला जे सुचले ते मी केले,कारण वेळ अपुरा होता माझ्याकडे,शिवाय माझ्याकडून पैसे घेतले होते बाळूने, त्यात भैही भागीदार आहे हे,भाईकडून वदवून घेणेही आवश्यक होते.त्या गावात माझी तक्रार ऐकण्यासाठी तिथे पोलिसही उपलब्ध नव्हते.मी माझ्या पातळीवर माझ्या अकलेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.तू म्हणतेस ते बरोबर आहे.ही घटना १९९५मध्ये झाली.
नाद्खूळा, आता बाग नाही,दहा वर्षांनी विकली,दुसरी घेतली नाही.
9 Jul 2015 - 8:01 pm | यशोधरा
त्यवेळी मला जे सुचले ते मी केले >> हो, ते आहेच :)
26 Dec 2015 - 11:06 am | शाम भागवत
काही नवे करावे म्हणून - भाग १०