काही नवे करावे म्हणून-भाग ७

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in जनातलं, मनातलं
8 Jun 2015 - 11:43 am
  • काही नवे करावे म्हणून - भाग १
  • काही नवे करावे म्हणून - भाग २
  • काही नवे करावे म्हणून - भाग ३
  • काही नवे करावे म्हणून - भाग ४
  • काही नवे करावे म्हणून - भाग ५
  • काही नवे करावे म्हणून - भाग ६
  • < /ul>

    “हो. तुम्ही तुमच्या अर्जात याचाही उल्लेख करा.म्हणजे हे कागदपत्र त्यासोबत असतील तर तेही मिळतीलआणि तुम्ही निर्धास्त होऊ शकाल.तसाही तुमचा व्यवहार जोशीसाहेबंबरोबर झालाय शामरावबरोबर नाही.” घोसाळकर म्हणाले.मी त्यांना अर्ज लिहून दिला आणि त्यांचा निरोप घेतला.

    (क्रमशः)
    *********************************************************************************************************************
    मुंबईला आल्यावर नवऱ्याला सगळं सांगितलं.तो पण हलला.जोशींना लवकरात लवकर भेटायचे ठरवले.बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत ते आहेत ही माहिती मिळवून मी आले होते.त्यप्रमाणे त्यांना भेटण्यासाठी तिथे गेलो असता समजले की त्यांची पुन्हा रत्नागिरीला बदली झालीय न ते जॉइनिन्ग पिरीयडमध्ये आहेत.मग ठरवले की जेव्हा पुढच्या वेळी जाणे होईल तेव्हाच त्यांना भेटू.

    त्यांना भेटूनही त्याच्याकडे साईन्ड कॉपी मिळाली तरी या साठ प्रकरणांचा शोध घेणेही महत्वाचे होते, कारण त्या साठप्रकरणांच्या यादीत जर या क्रमांकाची नोंद असती तर हाच काय पण जोशीसाहेबानी केलेलाही वव्यवहार आपोआपच बेकादेशीर ठरला असता.कारण त्यामुळे जोशीसाहेबांच्या पत्नीच्या नावावर ती जमीनच नाहीये असे सिद्ध झाले असते.पण आता माझे पैसे जोशीसाहेबांकडे अडकलेले होते.त्यांनी ते परत करायला जर नकार दिला असता तर...............

    मग कारवाईसाठी एक दिवाणी आणि एक फौजदारी असे दोन वेगवेगळे खटले दाखल करावे लागले तो एक नवा व्याप.”काही तरी नवे करावे म्हणून” घेतलेल्या बागेसाठी काय काय नवे करावे लागणार होते देव जाणे.त्यातल्या त्यात समाधान हेच होते की, निदान काही रक्कम तरी, “अर्धे आंबे तुम्ही काढा” असे, जोशीसाहेबानी सांगितल्यामुळे वसूल झाली होती. पण, ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ म्हणीप्रमाणे मनात विचार येत होते,’मुद्दामच मोहात पाडले की काय त्यांनी आपल्याला?लवकर पैसे देऊन व्यवहार पुरा करावा म्हणून.’

    सात-आठ दिवस असेच गेले.घोसाळकराना फोन केला चौकशी साठी,तर अजून कागदपत्र सापडलेले नाहीत असे त्यांनी सांगितले.पुढची महिन्यापासूनमला बागेच्या कामाला सुरुवात करायची होती?मी पुन्हा मामांचा सल्ला घेतला.त्यांना पण हा किस्सा ऐकून धक्काच बसला”.पण सातबारावर मधुकर धर्माजी साळवीचे नाव कूळ लागले आहे आणि त्याने ही जागा विकण्याची परवानगी कलेक्टर ऑफिसमधून घेतली आहे.तर या घटकेला तुझ्याकडे असलेल्या कागदपतांवरून असे दिसतेय की, तू कागदोपत्री तरी मालक आहेस.” त्यांनी मला धीर दिला.

    पण त्याच्या पुढच्या शब्दांनी मी पुन्हा गटांगळ्या खाऊ लागले.”आता जर कोणी ऑब्जेक्शन घेतले नाही तर काही प्रोब्लेम नाही.फक्त त्या साठ प्रकरणात हे प्रकरण यायला नको.अजून कागदपत्र सापडले नाहीत ना?मग या लोकांना पुन्हा भेटण्याआधी त्या जोशींना भेट आणि आपली माहिती पुरी करून घे.आणि ठरवलेल्याप्रमाणे कामाला लाग.हो,सगळा घोळ निस्तरेपर्यंतलागणारा वेळ फुकट घालवू नकोस.नाहीतर तुझे वेळापत्रक कोलमडेल.नंतर काही करता येणार नाही.”

    ‘ओ.के..सध्या हातात असलेली पत्त्याप्रमाणे डाव तर मांडू.पुढचे पुढे पाहूया.’असे ठरवले.पण इतर कामात असताना, मध्येच मनात बागेच विचार आला की,गडबडायला व्हायचं.जोशी साहेब जॅाईनिंग पिरीयडमध्ये असल्याने तेवढे दिवस तर जाऊ द्यायला हवेच होते.त्याशिवाय काही गत्यंतर नव्हते.

    मी कलमांची टाळमाती आणि त्याचवेळी करायच्या ठरवलेल्या अमृतपाण्याच्या प्रयोगाची तयारी करू लागले.पावसाळ्यात आब्याच्या झाडांना खत म्हणून आजुबाजूच्या रानात आणि बागेतही इतर वाढलेल्या झाडांच्या पाने, छोट्या डहाळ्या, ओले गवत इ.बुन्ध्याभोवती पसरून त्यवर माती टाकून तो पालापाचोळा झाकून टाकायचे, यालाच टाळमाती म्हणतात.

    अमृतपाणी व अंगारा प्रयोग ऋषी आणि कृषी या पुस्तकातून वाचला होता.अमृतपाणी म्हणजे देशी गाईचे तूप +मध+देशी गायीचे शेण एकता करून पाण्यात मिसाळून झाडाखालाच्या मातीवर निर्गुंडीच्या पानाचा झाडू करून त्याने शिंपायचे. १:२ प्रमाणात तूप आणि मध घेऊन एकजीव करायचे आणि त्यात गायीचे शेण मिसळून पुन्हा एकजीव करायचे.मग त्यात पाणी मिसळायचे व उपयोगात आणायचे.
    अंगारा म्हजे शक्यतो वडाच्या झाडाखालची माती. ती न मिळाल्यास पिंपळा च्या झाडाखालची माती. या प्रयोगासाठी आधी माझ्या बागेतल्या झाडाच्या खाली दुपारी बारा वाजता पडणाऱ्या सावलीचे आकारमान मोजून घ्यायला हवे होते.पण आधी ते लक्षात आले नाही.हे बरेच झाले कारण जी काही चार/पाच झाडे या प्रयोगावाचून वंचित राहिली त्यांची प्रयोग केलेल्या झाडांशी तुलना करता आली.

    सुरुवातीला पाव किलो तूप +अर्धा किलो मध +१० किलो शेण =२००लिटर पाणी या प्रयोगासाठी लागणार होते. निर्गुंडीची झाडे आजूबाजूला भरपूर होती.वडाचीही झाडे खूप होती.त्यामुळे टाळमाती करताना वडाखालची माती वापरायचे ठरवले.दाशी गायीचे तूप आणि मध मी इथून घेऊन जाऊ शकत होते.पण शेण आणि पाण्याची व्यवस्था जागेवर करणे आवश्यक होते.मागच्या वेळेस शामरावाच्या गोंधळात पातेरेमामा भेटू शकले नव्हते.
    त्यामुळे त्यांच्याची शेणाचा पुरवठा करण्याबाबत आणि पाण्याच्या व्यवस्थेबाबत बोलायचे राहूनच गेले होते.शिवाय टाळमातीसाठी व अमृतपाणी प्रयोगासाठी गडी सांगायला हवे होते,त्यांची मजुरी ठरवायला हवी होती.गावात जाऊन ययला हवे होते.शिवाय जोशीसाहेबांची भेट घेणेही आवश्यक होते.मी पंधरा दिवसांनी पुन्हा रत्नागिरी गाठले.

    यावेळी नवराही सोबत होता.आम्ही त्यांना बँकेतच जाऊन भेटलो.एव्हाना ते व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागले होते.त्यांना सगळे सांगितल्यावर तेही हादरले.मी निदान त्यांना जाब विचारू शकत होते,पण ते कोणाला पकडणार?त्यांनी सांगितले की ती कॉपी त्यांच्य्कडे आहे पण ती साईन्ड आहे की नाही नाही हे आठवत नाही.ती कॉपी द्यायला ते लगेच तयार झाले.शिवाय या प्रकरणात त्यांनी वकिलाकडून सल्ला घेतला होता.त्यामुळे संध्याकाळी सर्व पेपर घेऊन आपण वकिलांकडे जाऊ असेही ठरले.

    फणसोपला येऊन पातेरेमामांची गाठ घेऊन गडी कुठे मिळतील याची चौकशी केली तर मामीम्हणाल्या,”तो नाय का, त्यादिवशी भाई आला होता, तुमाला जेवायला बोलवायला, त्यालाच भेटा ना?”त्यावर “कुठचा भाई?”पातेरेमामानी विचारलेल्या प्रश्नाला ”बनातला”,असे मामीनी उत्तर दिले.गावात हे असेच असते.एकाच नावाने बरेचजण परिचित असतात.मग त्याची विशेषनामे बनातला,कोन्डीवरचा,घाटीतला,अशा प्रकारची असतात.

    “चला, मला जरा घर दाखवता का ?” मी पातेरेमामना विनंती करताच ते आमच्य्सोबत आले.भाईंच्या घराजवळ पोचताच,”वैनी, एक पाच रुपये देता का?”मी दिले. त्यानंतर आम्हाला दार दाखवून ते मागच्या बाजूला निघून गेले.

    “कोणी आहे का घरात?”चौकशी केली तर दस्तुरखुद्द भाई दार उघडायला आलेले.”अरे वा सावंत वैनी,या, या.सावंत साहेबही आलेत का?”तोंड भरून स्वागत करत भाईनी आम्हाला आत घेतले.”एक काम होतं तुमच्याकडे.”मी सुतोवाच केले.

    “बोला ना बोला.तुमच्या उपयोगी पडायला मिळतंय तर मी काय मागे येईन का?तुम्ही फक्त बोला,मी काय करू शकतो तुमच्यासाठी?”भाईचा प्रतिसाद पाहून बरे वाटले.”टाळमाती करायची आहे ना बागेत.त्यासाठी गडी सांगायचेत.पातेरे मामीनी तुमचे नाव सांगितले म्हणून तुमची मदत मागायला आलोय.” भाईही लगेच बोलले.” मामेणी सांगीतलेन काय?हो, हो, का नाही?काय आहे ना?काही पोरं आहेत ती ऐकतात हां आपलं.बसा हां थोडावेळ,निरोप पाठवतो कोणाबरोबर तरी.”इतक्यात मागच्या बाजूने येऊन पातेरेमामा जाताना दिसले.

    त्यांना हाक मारून भाईनी त्यांना कोणा बाळूला लगेच बोलावलंय असा निरोप दिला.आमच्यासाठी आत चहा करायला सांगितला.वर म्हणतात कसे?”चहा घेतल्याशिवाय सोडणार नाय हां तुम्हाला.”मी आणि मयूने एकमेकांकडे पहिले. त्यादिवशी हा माणूस आम्हाला जेवायला आग्रह करत होता आणि आता ऐन जेवायच्या वेळेस चहा?मी तर चहा घेत नाही.

    चहा येईपर्यंत इतर गप्पांमध्ये झालेल्या बोलण्याचा गोषवारा एवढाच होता, की भाई म्हणवणाऱ्या या माणसाला माझी बाग विकत घ्यायची होती पण सौदा फिस्कटला.आणि मला ही बाग महागात पडली, मी जरा गावात चौकशी केली नाही,केली असती तर अजून थोडे कमी पैसे लागले असते.

    माझ्या डोक्यात घंटा वाजू लागली.’या माणसाच्या जमिनीला लागून माझा गडगा.हा मला इथे टिकू देईल का?’ चहा आणि बाळू एकदमच आले.ओळख झाली.त्याने लगेच काम करायला होकार दिला.”किती मजुरी असते तुमची?”या माझ्या बोलण्यावर भाईने म्हटले,”वैनी.मी एक सांगू का तुम्हाला? काम नेहमी कॉन्टरॅक्टवर द्यायचे.दिवसांवर दिलात तर हे लोक लवकर काम करणार नाहीत.उगाच तुम्हाला अडकवून ठेवतील.”मनातल्या शंका बाजूला सारून मी त्याची बोलण्याकडे लक्ष देऊ लागले.

    “कसं करायचं मग?”मी विचारलं
    .”मी ठरवू का?तुम्हाला पसंत नसलं तर तुम्ही नको म्हणा.”भाईने सुचवले.
    “हो.चालेल.”मी संमती दिली.
    “बघ बाळू,एकूण झाडे ८४ आहेत.तू प्रत्येक झाडामागे किती घेशील ते सांग.आणि किती दिवसात काम करशील ते सांग.आता हे गावकरी हायत तर समजून बोल.भाई प्रास्तव मांडला.
    बाळूने हिशेब मांडायला सुरुवात केली.”चार मान्सं आन्खी लागतील.चार दिवसात काम करून देतो.चाळीस रुपये एका झाडाप्रमाणे पकडा.आणि करा हिशेब.”
    “गप रे,चाळीस काय?गावातल्या माणसाची काय तर पर्वा करशील का नाय?चाल तीस रुपयात ठरव.” भाई त्याला बोलला.बाळूने मान डोलावताच आमच्याकडे बघत त्याने विचारले,”काय वैनी ठीक हाय ना?”
    “अरे,बाळू ८४ झाडे आहेत हे बरोबर आहे पण सगळीच काही मोठी नाहीयेत.काही तर अगदी लहान आहेत.दोन घमेली पण माती नाही लागणार.तू सरसकट २५ने ठरव.”या माझ्या मधल्या मार्गाला बाळूने, ‘नाय जमायचा’,असे उत्तर दिले.
    लगेच भाईने हस्तक्षेप करत बाळूला समजावले,”अरे,आता तुला नेहमी काम मिळेल. एक वर्ष तू कमी पैशे घे मेल्या.पुढच्या वर्षी वाढवतील वैनी आणि वेळे काम पुरा केलास तर वैनी काय तरी बक्षीस देतीलच..” यावर बाळू विचारात पडला आणि नकारार्थी मान हलवू लागला.पण भाईने त्याला तयार केला. पंधरा दिवसांनी काम करायचे ठरले.एकमेकांचे फोन नंबर घेऊन आम्ही निघालो.अर्धे पैसे आता आणि अर्धे काम झाल्यावर असे ठरले होते. २१०० रुपयांपैकी १०५० रुपये बाळूला देऊन आम्ही भाईचा निरोप घेतला.

    “ताई,तू त्याला २० वर आणायला पाहिजे होतं,आपल्याकडे एका दिवसात शंभर अळी करतात.”मयूने तोंड उघडलं.माझ्या नवऱ्याचे त्यांचे गावाला काही संबंध नसल्याने कधी गाव पहिलेच नव्हते.त्यानेगाव पहिले आमच्या लाग्नान्न्तारच.त्यामुळे त्याला यातली काहीच माहिती नव्हती.”अरे आपल्याकडे रेती. ती सुटीच असते.त्यापेक्षा माती खणून काढून घालयची शिवाय थोडी दुरून आणायची वेळ लागेल ना? सुरेखा आणि तिचे यजमान असते तर काहीतरी माहिती मिळाली असती.मगच्या वेळीपण त्या शामरावाच्या गोंधळात त्यांना भेटू शालो नाही.आणि बागेने पैसा दिलाय न आता तो लावू की तिच्यासाठीच.” मी मयूला समजावले.

    “चला,आता.”सगळ्यांना भूक लागली होती.रत्नागिरीला पोचून जेवायला अर्धा पुन्हा तास नक्कीच गेला असता.इतक्य्त समोरून आजी येताना दिसली.नवऱ्याची ओळख करून दिली.आजी लटक्या रागाने म्हणाली.”मागच्या वेळेस पण माज फसव्लास.आता पण तशीच चाललीस.माजो उंबरो वाट बगता तुजी.मी नाय जावन देणार.” मी सारवासारव केली.”अग, पुढच्यावेळी येणारच होते.आता जाऊंदे.”
    “छॅ, छॅ, छॅ,अज्जिबात चालणार नाय.मी जावनच नाय देणार तर.”आजीचा हुकुम मोडणे कठीण झाले. आता आजीच्या घरीथोडा वेळतरी जायलाच पाहिजे होतं.
    तिच्या घरी पोचलो तर आजोबा नातवाला घेऊन ओटीवर बसले होते.शिवाय आजूबाजूचेही काही लोक बसले होते.ओळखीचा सोपस्कार पार पडला आणि चाफेरकरच्या कथा रंगू लागल्या. इतक्यात आजीने आम्हाला आत बोलावले.आत जाऊन पाहतो तर पाच ताटे वाढलेली. आजोबांनी आमचे हात धरून पानावर बसवले.बोलण्यासारखे काही नव्हतेच.भरल्या डोळ्यांनी पहिला घास घेतला.कुठल्या जन्मीचे ऋणानुबंध होते की मी त्याचं मीठ खात होते.मस्त भाकरी ,पालेभाजी,ओल्या खोबऱ्याची चटणी ,कवटाचे (अंड्याचे) कालवण, भात असा जंगी बेत होता.जेऊन झाल्यवर पुन्हा गप्पा रंगल्या.आताच ठरलेल्या टाळमाती घालण्याच्या ठेक्याच्या गोष्टी निघाल्या.बनातल्या भाईने यात पुढकार घेतल्याचे समजल्यावर उपस्थितात नेत्रपल्लवी होऊ लागली.

    “बनातला भाई?लबाड तो,तुज दाखवल्यान की मदत करतोयआणि ह्यात कमिशन खाल्लेन असेल.जारे कोणी बाळूस बोलवून आणा.”आहीने शेऱ्यासोबत आज्ञाही दिली.कोणीतरी उठून बाळूला बोलवायला गेले.बाळू आला. आम्हाला बघून तो जरा चमकलाच.आता आजोबांनी विचारले,”काय रे ,बनातल्यान किती घेतल्य्यान रे ?”बाळू काही सांगेना तेव्हा आजोबा म्हणाले,” अरे पुढल्या पावटी तुज्याबरोबर डायरेक बोलतीळ ना?त्यांना अंधारात ठेव नुकोस”तेव्हा बाळूमहाराजानी सांगितले,की ,”झाडामागे धा रुपये घेतल्यान आणि तेपन लगेच..” म्हणजे त्याला दिलेल्या १०५० मधले ८४० रुपये त्या भाईने घरबसल्या कमावले होते. आम्ही अवाक्.
    मी थोड्या वेळाने विचारलं ,”मग पातेरे मामीनी मला त्याचे नाव कसं सांगितलं?त्याचंपण यात काही आहे का? आणि हा सगळा तुमचा व्यवहार ठरला तरी कधी? तू तर आमच्यासमोरच आलास.”
    “‘नाय नाय पातेर्नीचा यात काय नसात.”आजीने मामीची बाजू घेतल्याने मला थोडे बरे वाटले.”बनातल्यानंच सांगून ठेवला असेल तिला.”
    “हो.ह्ये आदीच ठरला होता.तुमी मागच्या टायमाला आला होतात न तेवाच.”बळूनेही कबुली दिली.

    म्हणजे मागच्या वेळी जेवणाचे आमिष त्याच्या घरी येण्यासाठी आणि यासंबंधीच बोलण्यासाठी होते.यावेळी आम्ही आपणहून त्याच्या घरी गेलो होतो.मग चहावर बोळवण करने काही गैर नव्हते.आणि आम्ही त्याचाघारीच जावे यासाठी त्याने पातेरेमामींचा उपयोग करून खुंटा बळकट करून घेतला होता.

    तिथेच मला समजले हि त्याचा दारूचा धंदा होता.त्यामुळे त्याच्याकडे दारू प्यायला येणाऱ्याना हाताशी धरून तो गाववागुंडीही करायचा.बाळू त्याकडे दारू प्यायला जाणाऱ्यांपैकी होता.सांगितलेले काम केले नाही तर दारू मिळत नसे आणि केले तर एक ग्लास दारू फुकट मिळत असे.त्याच्या उप्द्रव्मुल्याला घाबरून पातेरे मामीनी मला त्याच्याकडे पाठवले होते.आता माझ्या लक्षात आले होते पातेरेमामानी पाच रुपयांचे काय केले होते ते.

    पुन्हा माझ्या डोक्यात घंटा वाजायला लागल्या.पण त्याविषयी काही न बोलता “आपण निघूया आता.”असं म्हणत मी उठलेच.आता वकिलांकडे जायचे होते.त्यामुळे रत्नागिरीलाही वेळेत पोचायला हवे होते.

    जोशी साहेबांकडच्या कागदपत्रात ती कॉपी सापडली खरी पण साईन्ड कॉपी नव्हती.वकिलांकडे गेल्यावर त्यानी कागदपत्र पाहून जोशींना सांगितले की ,”तुम्ही ही कॉपी सावंतांना देऊ नका.ही तुमच्याकडेच ठेवा.याची झेरॉक्स द्या.”
    पण मी आणि नवऱ्याने त्यांना समजावले की,”झेरॉक्सवर कोणीही सही करणार नाही.आता तुम्हाला साईन्ड कॉपी लागणार नाही.कारण जागेचा ताबा तुमच्याकडे नाही. झेरॉक्स तुम्ही ठेवा आणि नाहीतर तुम्ही मला साईन्ड कॉपी द्या.”ते तर त्यांना शक्यच नव्हते.यावर वकीलहेबांकडेही यावर काही मार्ग नव्हता.शेवटी जोशीसाहेब ती कॉपी द्यालाआणि झेरॉक्स ठेवायला तयार झाले.

    (क्रमशः)

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

8 Jun 2015 - 11:54 am | स्पंदना

गावातली माणस!!
शहरात मोठ्या परिअसरात जसे नमुमे भेटतील तसेच नमुने एका छोट्याश्या गावात एकवटलेले असतात.
बाकी टाळ्माती, अमृत वगैरे गोश्टी पहिल्यांदाच वाचत आहे. आण्खी सव्विस्तर माहीती मिळाली तरी चालेल.

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2015 - 11:56 am | टवाळ कार्टा

पुभाप्र :)

पिलीयन रायडर's picture

8 Jun 2015 - 12:06 pm | पिलीयन रायडर

प्रत्येक भाग वाचुन आणखीन थक्क व्हायला होतंय..
म्हणता म्हणता बरीच लफडी लागली की हो मागे..

पुढच्या भागाच्या तीव्र प्रतिक्षेत..

काही तरे नविन करावे म्हणुन ... अजुन कीती नविन नविन थक्क करायला लावणार्या गोष्टी घडल्यात या मुळे ?

बाकी जाता जाता कोकणी गावातले खरे राहणीमान छान चित्रीत झाले आहे या लेखनामधुन ...

नाखु's picture

8 Jun 2015 - 12:41 pm | नाखु

सुरस आणि विस्मयकारक.

पुलेप्र

वरील वानगीदाखल नमुने प्रत्यक्ष पाहिलेला.

नावालाच गाव असलेला
गावकरी नाखुस.

बाप रे! एकामागून एक लफडी! या सगळ्यातून तुम्ही कसा मार्ग काढलात हे रोचक असणार आहे.

कविता१९७८'s picture

8 Jun 2015 - 5:57 pm | कविता१९७८

मस्तच, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..

आजच सगळे भाग वाचून काढले..बापरे काय एकेक अनुभव आहेत..लेखनशैली आवडली..पुभाप्र..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 9:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप छान.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 1:29 am | डॉ सुहास म्हात्रे

बघा ! आणि तिकडे एका धाग्यावर कोणीतरी "गरीब बिचार्‍या शेतकर्‍याचा सगळे जग फायदा घेत आहे" म्हणून आरडाओरडा करत आहे. त्यांना ही मालिका वाचायला सांगा !

=))

ष्टोरी लईच रंगत चालली आहे. पुभाप्र.

नाखु's picture

9 Jun 2015 - 9:20 am | नाखु

अश्या धाग्यावरच काय पण इतर धाग्यांवरही त्यांना प्रतिसाद द्यायला वेळ नसतो. फार म्हणजे फार बिझी आहेत.

माझा हाच प्रतीसाद दै.फुकाची बोंबाबोंब आणि दै कोरडा उमाळा
पळवाट

येथे छापून आला आहे गरजूंनी अवश्य वाचावा.

याचकांची पत्रे मधून साभार

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jun 2015 - 10:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

खिक्क.

यशोधरा's picture

9 Jun 2015 - 8:31 am | यशोधरा

ताई, मस्त लिहिताय. खमक्या आहात हो तुम्ही :) असेच हवे ह्या जगात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jun 2015 - 2:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

+१
मालिका रंगतदार होत चालली आहे हेवेसांन.

पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

9 Jun 2015 - 9:04 am | श्रीरंग_जोशी

नेहमीप्रमाणेच खिळवून ठेवणारी लेखन शैली. तुमचा आव्हानांना सामोरे जाण्याचा गुण आवडला.

सुरुवातीच्या भागांच्या तुलनेत लेखनाच्या सादरीकरणात लक्षणीय सुधारणा झाली आहे.

पुभाप्र.

प्रमोद देर्देकर's picture

9 Jun 2015 - 9:18 am | प्रमोद देर्देकर

एक गाव बारा भानगडी म्हणतात ते काय उगीच नै. बाकी पुभाप्र.

उपास's picture

9 Jun 2015 - 2:26 pm | उपास

एवढे पेशन्स आणि खोलात शिरण्याची वृत्ती मुळातच लागते, तुमचं खरंच कौतुक..
'जाने दो ना मेरा क्या जाता है..' म्हणणारेच अधिक असतात..
तरी बरां तं बरां, त्यो भाई नि चाफेरकरांन एक होऊन उगली नाय केली ती, नाहीतर कठिणच व्हतां नाय का ताई, धीराची बाय तू..

म्हणजे त्याला दिलेल्या १०५० मधले ८४० रुपये त्या भाईने घरबसल्या कमावले होते.

कठीण आहे. पुभाप्र!!

रुस्तम's picture

9 Jun 2015 - 8:13 pm | रुस्तम

कठीण आहे. पुभाप्र!!

क्रेझी's picture

10 Jun 2015 - 10:16 am | क्रेझी

आज एका दमात सगळी लेखमाला वाचून काढली मस्त आहे एकदम आणि सुरन्गी ताई तुमच्या हिमतीला आणि डोकेबाजपणाला तोड नाही, एकदम मस्त :)

बाकी तुम्ही लेख लिहीतांना डोक्यातले विचार आणि लिहीण्याची गती याचा ताळमेळ नीट लागत नाही असं वाचतांना जाणवलं. तुमचं लिखाण झाल्यावर फक्त एकदा स्वत: वाचून मग लेख इथे पोस्ट करा म्हणजे अशा चूका टाळता येतील. पूर्वपरीक्षण हा पर्याय वापरून तुम्हांला हे करता येईल.

पुढचा भाग लवकर टाका :)

नूतन सावंत's picture

11 Jun 2015 - 10:40 pm | नूतन सावंत

सगाळ्यांचे आभार.
रंगभाऊ,धन्यवाद.
क्रेझी,सविस्तर सांगाल का?

सतोंष महाजन's picture

13 Jun 2015 - 10:38 am | सतोंष महाजन

ऐखादा चित्रपट बघत असल्यासारखेच वाटत आहे.फारच सुरेख लेखनशैली आहे तुमची .पुढचा भाग तेवढा लवकर टका उत्सुकता वाढतच चाललीय.

पैसा's picture

13 Jun 2015 - 12:47 pm | पैसा

एक गाव बारा भानगडी

एकदम खमकी लेखमालिका सुरु आहे तुझ्यासारखीच!