ओशाळून म्हणाला.” घरी चाललोय.राजापूरला.”मी काहीच बोलले नाही.पण सुरेखाचे यजमान कसले गप्प बसतात?,”आणि उद्यारे?” “नाय त्याच कामासाठी चाललोय .येणार ना उद्या !पण मॅडम, तेवढी केस मागे घ्याल ना?”ते बघू पुडे पुढे ते प्रकरण आणि हे प्रकरण वेगवेगळे आहे तेव्हा आताच काही सांगू शकत नाही.”मी आजच्या दिवसातली सिक्सर ठोकली.(क्रमश:)
************************************************ इतक्यात बस आली. मी आणि मयू चढलो.मागोमाग चाफेरकर.मयू खेकसला.”ए चल,लांब बस.”तो पाच-सहा रांगा सोडून बसला.मयूने मला विचारलं,”ताई ,उद्या तो येईलना पैसे घेऊन?” हे बघ,उद्याचं उद्या आता डोक्यातून काढ त्याला.आपण थोडावेळ मांडवीत जाऊयात.मस्त समुद्राची ताजी हवा खाऊन प्रशांतमध्ये मस्त जेवून घरी जाऊ.” सकाळी नऊ वाजता मी आणि मयू बँकेत पोचलो.सुरेखा आणि तिचे यजमान आजी, आणि एका वृद्ध गृह्स्थांसोबत उभे होते.सुरेखाच्य यजमानांनी माझी ओळख करून दिले,” हे आजोबा.” आजोबांच्या चेहऱ्यावर मला भेटण्याची उत्सुकता दिसत होती. मी हात जोडून नमस्कार केला.त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला.मी आजीला म्हटलं,”बघ, असं करायचं असतं.”आजीने फणकारून म्हटलं,”तू नको माला सांगूस.मी बगलंय ता त्यांनी नाय बगल्यानी. देवी सगळ्यांना नाय दिसत.”
त्यावेळी तिथे तात्या आणि अण्णा रिक्षातून उतरले.”मेलो चाफेरकर खंय गेलो.आलो नाय का काय?”मी गमतीने म्हटलं,”मी तुम्हालाच विचारणार होते की,तो कुठे आहे?तुम्ही त्याची माणसं ना?” “काय वैनी,चेष्टा करता की काय?आमाला खरं काय ते समजल्यावर आम्ही त्याला सुनावला की नाय?” “मग आता असं करा.आजीचे खाते उघडूया तोपर्यंत.आणि तो राजापूरला गेलाय काल,त्यामुळे त्याला वेळ होईलच.ओळख्दार म्हणून यांच्या सह्या घे सुरेखा फॉर्मवर. ”सुरेखा लटांबर घेऊन आत गेल्यवर तिचे यजमान म्हणाले.”ताई,तुमचे आंबे आणले आहेत.त्या टेम्पोत आहेत.” “इतके?”३७ पेट्या आहेत तुमच्या बागेतल्या आणि पाच आमची भेट.”.मयू हसायला लागला.आता टेम्पोतूनच जा मुंबईला,” मी विचारात पडले होते. “चल रे,”काही नवे करावे म्हणून”, आपण बाग घेतली ना?आता आंबे विकूया.”मी हसत तोडगा काढला.”फळ कसं आहे?पाच डझनी का?”मी सुरेखाच्या यजमानांना विचारलं.”हो. पण सगळं तयार आहे.” म्हणजे आजच व्यवहार झाला पाहिजे.शिवाय टेम्पोचं भाडंपण द्यावंलागेल.तुमच्या.ओळखीत आहे का कोणी घेणारा.”ते म्हणाले,”जाऊन बघायला पाहिजे बाजारात जाऊन आणि टेम्पो आपलाच आहे.त्याचं कसलं भाडं?
“असं कसं चालेल?टेम्पो काय हवेवर चालतो का?आपलाच असला तरी.बऱं ते काय ते नंतर बघू.आधी बाजारात जायचं का?” एवढयात तात्या बाहेर आले.त्यांना चाफेरकर न दिसल्यामुळे ते वैतागले.”ह्यास गाडी गावली नाय की काय अजून?खंय हरवलो नाय ना?” “तात्यानू, तुम्ही बसा इथेच.आम्ही येतो दहा मिनिटांत.”तात्या,’कुठे चाललात?’ असं विचारायच्या आधीच मी म्हटलं,”माझं कआहे,आम्हीआलोच.” विहार हॉटेलजवळच्या बाजारात गेलो.”ताई तुम्ही इथेच थांबा,मी बघतो कोण मिळतंय का?”मला आणि मयुला सावलीत उभे करून सुरेखाचे यजमान निघाले.दोन पावले पुढे जाऊन मागे आले.म्हणाले,”दादांना घेऊन जातो. उगाच शंकेला जागा नको.”मला हसू आले.” अहो, ज्याअर्थी मयू इथे चुपचाप थांबलाय त्याअर्थी त्याला तुमच्याबद्दल शंका नाहीये.आणि तुम्ही ठरवून आलात तुमचं कमिशन तरी चालेल.कारण नुसतं टेम्पोचं भाडंच नाही तर पेट्यांचे पैसे,गडयांची मजुरी सगळ्याचाच हिशेब करायचाय.तेव्हा जा आता, आटपून टाकूयात.मला वाटलं नव्हतं इतक्या पेट्या निघतील म्हणून.मला वाटलं होतं की, १०/१२ पेट्या निघतील म्हणून.आणि आता तुम्ही इतक्या घेऊन आलात तिथेच तुमच्या इमानदारीची परीक्षा झालीय.” सुरेखाच्या यजमानांच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर दिसून आली. ते गेले आणि आम्हाला समोरून तात्या आणि अण्णा येताना दिसले.त्यांच्यामागे. चाफेरकर हातात एक पिशवी.त्याच्यामागे सुरेखा.तिचा चेहरा वैतागलेला.मयू माझ्याजवळून हलला आणि चाफेरकरला हातभर अंतरावर रोखून म्हणाला.”ए, तू इथेच थांब”. आमच्याजवळ आल्यावर तात्या हलक्या आवाजात म्हणाले,”वैनी,रांडेच्यान घोळ केल्यान हाय. रोक पैशे एक लाखभर हायत आणि दागिने घेवन आलाय पन्नासहजाराच्ये." “तुम्हाला कसं कळलं?तुम्ही हात लावून बघितलेत?”मी चमकून विचारले.हो,एक करता एक व्हायचं.त्यात चाफेरकर हा बारा गावाचं पाणी प्यायलेला माणूस. “नाय ओ वैनी.तसा कसा करीन मी?ह्याच्या घातकीपनाची मला काल बरोबर कल्पना आली हाय.”तात्या मवाळपणे बोलले. “असं,करा तर.तुम्ही आणि सुरेखा त्याच्याबरोबर जाऊन रोख पैसे बँकेत भरून टाका.आणि त्यला सांगा ,’तुझ्या दागिन्याचे काय करायचे ते तूच कर.आणि बँकेत रोख रक्कम घेऊन ये.’तुम्ही उगाच उन्हात वणवण करू नका.”मी तात्यांना सांगितले. त्यांना वाटेला लावले तेवढ्यात सुरेखाचे यजमान एका फळविक्याला घेऊन आले.”काय भाव ठरला?.”मी विचारले.मयूही परत आला होता.त्याचीही ओळख निघाली.त्याने सरळच सांगितले,”अरे रवी,माझ्या ताईचीच बाग आहे.मी स्वत:फळ पाहिलंय.उगाच टाईली करू नको. मला बाजारभाव माहीत आहे.तर बोल काय ते. टेम्पो गल्लीत उभा आहे, म्हणशील तिथे माल उतरवतो.” “एकच भाव सांगतो.४००ने घेतो.” रवी बोलला मयूनेउत्तर दिले..” वेडा आहेस काय?पेट्या भरलेल्या आहेत,तुला काय कामच नाही नाव घालण्यपलिकडे.आता ११च्या गाडीवर(मुंबई एसटी) चढवू शकशील.” सुरेखाच्या यजमानांनी खात्री दिली,”अरे, मीच आंबे काढून पेट्या भरल्या आहेत.माझी जबादारी.आहे.” तसा रवी म्हणाला, “किती पेट्या आहेत?”आता मी भाग घेत सांगितले.”३० पेट्या अहेत." “५००च्यावर नाही देऊ शकणार.पण मला ११च्य गाडीवर पोचवून दे.’’रवी बोलला.”एका अटीवर,माझ्या दहा पेट्या त्याच गाडीवरून पाठवायच्या.जमेल का?”एवढ्या पेट्यांवर नाव पत्ता घालायला लागेल ना?माझ्या पट्ट्या तयार असतात नुसाया चिकटवायच्या” परत सुरेखाच्या यजमानांनी बाजू सांभाळली,”तू दहा पट्ट्या मला दे. बाकीचे मी बघतो.टेम्पोत काळ्या रंगाचा डबा आणि ब्रश आहे.मी दहा पेट्यांवर ताईचे नाव घालतो,चालेल न?”शेवटचा प्रश्न मला होता.मी मान डोलावली. त्यांनी रवीला सांगितले,” ठीक आहे,तू ताईला घेऊन तुझ्या जागेवर जा. तिला पैसे दे. मी तोपर्यंत टेम्पो घेऊन येतो.”रवी आम्हाला घेऊन निघाला. “पण ताई ३७ पेट्या होत्या ना?”मयूची पृच्छा.”अरे,दोन तुला नकोत का?”मी उत्तरले”.आपल्या बागेचं पहिलं फळ तुला टाकून मी आणि तुझे भाऊ (माझा नवरा) खाऊ शकू का?” इतक्यात रवीचं दुकान आलंच.रवीने ५०० रुपये डझनाच्या भावाने मला पैसे दिले तोपर्यंत सुरेखाचे यजमान टेम्पो घेऊन आलेच. आम्ही टेम्पोत बसून एसटी स्टँडवर गेलो. ११ची मुंबई गाडी लागलेली होती.दहा पेट्या ‘ताई’असे नाव मिरवत होत्या. सगळय पेट्याना रवीच्या नावाच्या पट्ट्या चिकटवल्या गेल्या.एकूण ,चाळीस पेट्या गाडीवर चढवेपर्यंत रवीने प्रोसिजर पूर्ण केले.कागदपत्र वाहकाकडे दिली तेव्हा गाडी सुटायला २ मिनिटे उरली होती. आम्ही परत टेम्पोतून बँकेत आलो.अजून चाफेरकर परतला नव्हता. मंडळी चुळबुळत होती.जागेचा व्यवहार करण्यासाठी मीही त्याच बँकेत खाते उघडले होते.त्यात पैसे भरले.व्यवस्थापक ओळखीचे होतेच.त्यांना म्हटलं ,”आज सकाळी सीताबाई रामराव साळवी यांचे खाते उघडले आहे न?त्यांना पैसे फिक्सला ठेवून दार तिमाहीला व्याज मिळेल अशी व्यवस्था कायची करायची आहे.पण थोडा वेळ थांबा. अजून पैसे भरायचे आहेत त्यांना.” इतक्यात घामाघूम झालेला चाफेरकर बँकेत शिरला.सुरेखाने त्याच्याकडून पैसे घेतले.आणि भरले.दीड लाख रुपये फिक्स मध्ये ठेऊन दार तिमाहीला व्याज मिळेल अशी व्यवस्था केली. आजी आजोबा दोघेही भारावले होते.काय बोलू न काय नको ,या संभ्रमावस्थेत होते. चाफेरकर तात्यांना म्हणाला,”तुम्ही काल काल दीड लाख म्हणालात, आणि आज माझ्य्कडून दीड लाख घेतलेत.कालचे दहा हजार विसरलात का?”तात्यांनी माझ्याकडे पहिले. “इथून पुढच्या जेवणाचे आगाऊ घेतलेत असे समज. दहा हजार काही जास्त नाहीत.नऊ आठवडे फक्त.” मी हिशेब समजावला.चाफेरकर काय बोलणार? खाली मान घालून म्हणाला,”ठीक आहे. मॅडम, ते तेवढं केसचं बघाल ना आता?,” “त्यात काय बघायचं? ती केस वेगळी,आणि हे प्रकरण वेगळे आहे तेव्हा त्याच्याबद्दल मला आता तुमच्याशी बोलायला वेळ नाही.”मी फटकारल्यावर ,’आता काय करूया.’ या विचारात चाफेरकर पडला.बाकीच्यांना मी म्हटलं ,”चला आज माझ्या बागेचा पहिला व्याहर झालाय.तर आपण आता जेवायला जाऊ." आजीची हॉटेलमध्ये जायची पहिलीच वेळ. आम्ही सगळे प्रशांतमध्ये गेलो.अतिशय घरगुती वातावरण,घरगुती जेवण. मला जेवायला आवडणारया जागांपैकी एक जागा.आता ते मुख्य रसत्यावरच आहे. तेव्हा ते आतल्या बाजूला घराच्या पडवीतच बाहेर अंगण, अंगणाभोवती बाग, आणि अंगणावर मांडव असे. आम्ही बसल्यावर सुरेखाने मला विचारले की,”ताई, तू केस नाय काढून घेणार?’ माझ्याआधी अण्णा म्हणाले,”ओ,सरपंच, कशास केस काढून घेवची?बाकीचांची कोणाची काय देणी असतली ती विचारुयात आदी!”.मी पण दुजोरा दिला.”चालेल, तुम्हीच लक्ष घाला यात.” “म्हणजे काय वैनी?तुम्ही नाय पडणार आता यात?”अण्णा बावरले. मी,मयू,सुरेखां नी तिचे यजमान हसू लागलो.”पावण्याच्या काठीने किती साप मारणार अण्णा तुम्ही.? तुम्ही दोघे पुढाकार घ्या आता आणि हे काम फत्ते करा. ”आता तात्यांनीही पुढाकार घेत आण्णांना गप्प केले.”वगी ऱ्हव..नसता मोठेपणा कोणी सांगीतल्यान तुज, जेव गपचीप..”जेवण झाल्यावर त्या दोघांना रिक्षा करून दिली. आजी आजोबांचा निरोप घेतला.आजोबा म्हणाले,”आतागावात आलीस की आमच्यकडे हां तुमचा जेवन” त्यानाही रिक्षा करून दिली.त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या डोक्यावर हात ठेवत रिक्षात बसले. ते गेल्यावर मी सुरेखाला म्हटलं,”चला ग माझ्याबरोबर तुम्ही दोघे.”त्यांना घेऊन मी कापड दुकानात गेले तिच्यासाठी साधी आणि तिच्या यजमानांसाठी पँट-शर्टचे कापड घेतले. माहेरचा आहेर म्हणून त्यांना तो घ्ययला लावला.निरोप घेताना म्हटलं,”चाफेरकर प्रकरण अजून संपलेलं नाहीये बरं. मी गेले की काही माहिती मिळवून तुला काय ते सांगते,त्याप्रमाणे तू करायचं.” दुसऱ्यादिवशी मी मुंबईलापरतले. (क्रमश:)

प्रतिक्रिया
26 May 2015 - 7:48 pm | रुस्तम
हा ही भाग मस्तच... पु भा प्र...
26 May 2015 - 8:13 pm | निवेदिता-ताई
मस्त
26 May 2015 - 8:14 pm | मनुराणी
एकदम मस्त चालू आहे.
29 May 2015 - 7:55 pm | यशोधरा
वर काढतेय... वाचते निवांत थोड्या वेळात.
29 May 2015 - 8:40 pm | श्रीरंग_जोशी
या भागात टेन्शन टेन्शन नव्हत :-) . बरं वाटलं
हा भाग वाचून बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
आमच्या घराशेजारी वरुडला संत्र्याच्या बागा होत्या. अनेक ओळखीच्या लोकांच्याही बागा होत्याच. संत्र्यांचे ओझे सहन न होणारी झाडे बघायला मिळायची. अशावेळी झाडांना बांबूंद्वारे आधार दिला जायचा. आम्हाला त्या काळात संत्री विकत घेऊन खाण्याची कधी वेळ आलीच नाही. अन एकदम ताजी संत्री खायला मिळायची.
तेव्हा वरूडला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणायचे. त्या काळात तिथे कॅलिफोर्निया टाइम्स नावाचे मराठी पाक्षिकही प्रसिद्ध होत असे ;-) .
29 May 2015 - 8:47 pm | यशोधरा
मस्त. भारी एकदम. अजून आहे काय बाग तुमची?
पुढल्या
29 May 2015 - 10:31 pm | एस
मस्त भाग. तुमच्यातली माणुसकी आवडली. सलाम!
30 May 2015 - 6:18 am | स्पंदना
भारावल्यासारखं झालं वाचून. आजी आजोबांची व्यवस्था लागलेली पाहून खरच फार बरं वाटलं.
30 May 2015 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार
तुमच्या या लेखमाले मधुन बरेच काही शिकायला मिळाले.
काही जून्या मनाला सलत असलेल्या प्रतिक्रियां कडे नव्याने, वेगळ्या दृष्टीकोनातून पहाता आले.
शेवटी क्रमशः पाहून अजून काय लिहिणार याची उत्सुकता वाढली आहे.
पुभालटा
पैजारबुवा,
30 May 2015 - 9:36 am | नाखु
हाही भाग फार आवडला. चाफे(फ्)रेकर ची कशी जिरवली हे वाचायला ज्याम उत्सुक
चाकरमानी नाखु
30 May 2015 - 10:27 am | नूतन सावंत
यशो, आता बाग नाही.पण बागेमुळे आलेले अनुभव लिहायला घेतले त्यात आलेला पहिला अडथळा होता चाफेरकर.
नाद खुळा,या बागेमुळे अनेकांची जिरवता आली आहे.
31 May 2015 - 8:58 am | स्वच्छंद
बाकी दुस-याची जिरवण्यात तुम्हाला सुरन्गी (आय मिन आसुरी ) आनंद मिळतो हे पटलं.
30 May 2015 - 4:29 pm | बॅटमॅन
पुभाप्र. काय काय अनुभव एकेक!
30 May 2015 - 8:02 pm | स्नेहानिकेत
हा भाग देखील मस्त!!!!
31 May 2015 - 1:07 am | स्वच्छंद
एकांगी नि अतिशयोक्तीपूर्ण..असे कर्मचारी असतात याबद्दल दुमत नाही पण त्यांना घरच्या नोकरासारखं वागवून अनादर करणं म्हणजे जरा अतिच झालं..त्याच्याकडून पैसे उकळून तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळे काय वागलात?
31 May 2015 - 9:12 am | श्रीरंग_जोशी
पूर्वीच्या भागांचे दुवे
सुरंगीतै - कृपया पुढील भागाच्या सुरुवातीला खालचा मजकुर डकवा.

काही नवे करावे म्हणून - भाग १

काही नवे करावे म्हणून - भाग २

काही नवे करावे म्हणून - भाग ३/a>

काही नवे करावे म्हणून - भाग ४

काही नवे करावे म्हणून - भाग ५

31 May 2015 - 4:41 pm | टवाळ कार्टा
सुरंगीतैंनी कसे वागायला हवे होते याबाबत तुमची बाजू जाणून घ्यायला आवडेल...कदाचित तुमचा पर्याय जास्त उपयुक्त असू शकेल :)
1 Jun 2015 - 1:35 am | स्वच्छंद
कायद्याच्या कचाट्यात अडकवून टाकले असं अपेक्षिलं होतं..पण अपेक्षाभंग झाला..
1 Jun 2015 - 6:03 am | स्पंदना
तुमचा अपेक्षाभंग येथे हे वाचून कमी होतो का पहा.कायद्याचा कचाटा!धन्य!तू खा मी खातो या तत्वज्ञानावर चालतो कायदा.
3 Jun 2015 - 8:14 pm | अभिजित - १
तुमची इतकी का जळली ? त्यांनी केले ते एकदम योग्यच केले.
31 May 2015 - 1:56 pm | नूतन सावंत
स्वच्छंद,दुसाय्राची जिरवण्यात मला आसुरी आनंद मिळतो असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते खरे आहे मी राक्षस गणाचीच आहे.त्यशिवाय "नडला त्याल फोडला" हे माझे ब्रीदवाक्य आहे.
एक तर तुम्हाला वर जोशीसाहेबांनी उत्तर देऊन सर्व भाग वाचण्याचा सल्ला आणि धागेही दिले आहेत.मला उत्तर द्यायला उशीर झाला कारण मी पुन्हा एकदा सगळे भाग वाचून पहिले. तुम्ही ते वाचलेच नसावेत किंवा नीट वाचले नसावेत.मी स्वतः कुठेही चाफेरकरशी "अरे,तूरेच्या भाषेत बोलले नाहीये.बाकीचे माझ्यापेक्षा त्याच्या ओळखीचेच लोक होते.ते त्याच्याशी कसे बोलतात याची फिकीर मी करण्याचा किंवा कसे बोलावे हे मी शिकवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.मयू त्याच्याशी जे वागला ते एक भाऊ म्हणून वागला आणि ते योग्यच होते असे माझे मत आहे.
त्याच्याकडून मी एकही पैसा उकळलेला नाही.उलट त्यानेच पैसे घेऊन प्रकरण मिटविण्याची मला ऑफर दिली होती हे त्याचे मला ""नडणे" होते आणि त्यमुळे त्याने खाल्लेया गरीबाच्च्या अन्नाचे पैसे त्याच्याकडून वसूल करून त्यांना दोन साक्षीदारांसमोर देणे हे मी त्याला "फोडणे" होते.
ती आजी माझी कोणीही लागत नाही हे तुम्ही जरी एकच भाग वाचला असेल तर तुमच्या लक्षात यायला हवे होते.
तुम्हाला हे लेखान अतिशयोक्तीपूर्ण आणि एकांगी वाटत असेल तर तुम्ही दुसरी बाजू तपासू शकता.
त्या गृह्स्थाला मी काही माझी घरची भांडी घासायला सागितली नव्हती.त्यामुळे घरच्या नोकरासारखे वागवण्याचा सवालच येत नाही.तो जनातेचा नोकर होता आणि त्याने जसे वागणे अपेक्षित होते तसेच मी त्याला माझ्या कामाच्या संदर्भात वागवले होते.
असे कर्मचारी असतात हे तरी तुम्ही मान्य करताय म्हणजे तुम्हालाही असे कोणीतरी भेटलेले दिसतेय.पण माझ्याप्रमाणे त्याचा प्रतिकार तुम्ही केलेला दिसत नाही .त्याची खंत वाटत नाही का तुम्हाला?
या प्रकरणात अशा मला नडलेल्या सर्व लोकांना मी फोडलेले आहे.त्यचेच हे वर्णन आहे.त्यातून कुणाला काही फायदा झाला तर झाला.सगळेच काही माझ्यासारखे वागू शकतील असे नाही.माझ्यापेक्षा जास्त किंवा कमीही असतील पण अन्यायाचा प्रतिकार करणे हेच माझे ध्येय आहे.मला नाही गप्प बसता येत. मग त्यांची जिरली की मला आनंद होतोच.आणि माझ्यासारख्या अनेकांना होतो.
31 May 2015 - 3:54 pm | रुस्तम
सुरंगी ताई हे ही पटलं
1 Jun 2015 - 1:30 am | स्वच्छंद
स्पष्टीकरण आवडले..तुमची बाजूही समजली..आता गावक-यांनी त्या अधिका-यासोबत कसे वागावे हे तुमच्या हातात नाही हे ही पटले.
पण तुमच्या सपोर्टमुळे ते तसे वागले असं वाटलं म्हणून लिहलं..काय माहीत कदाचित ती व्यक्ती तसं वागलीही असेल, तुम्ही एक निमित्त झालात आणि त्यांनी सगळा राग बाहेर काढला असावा..
मी संपूर्ण भाग वाचले आहेत..पहिला वाचला तेव्हा काहीतरी उणीव जाणवली व नंतर प्रत्येक भागावेळी ती वाढत गेली..ही भावना कसली होती माहीत नाही पण स्पष्टीकरणानंतर खूपच ठीक वाटतंय..छान स्पष्टीकरण मिळावं म्हणून थोड हार्श शब्द वापरले..असं केल नसतं तर एवढा सुंदर प्रतिसाद (की प्रसाद??) मिळाला नसता..
31 May 2015 - 4:33 pm | अजया
आजचा भाग आणि अात्ताचे स्पष्टीकरण जोरदार आवडल्या गेले आहे!
1 Jun 2015 - 9:33 am | नाखु
चांभाराचे देवाला खेटराची पूजा आणि ठकाशी ठक हे निरर्थकच म्हणायचे चला २ मिनिट मॅगीची वेळ झाली.
विविधभारतीप्रेमी
नाखुस
1 Jun 2015 - 8:23 pm | नूतन सावंत
रंगभाऊ,आभार,तुम्ही सांगितल्याप्रमाणे करते.
टका,स्पंदना,निलापी,नाखू अजया धन्यवाद.
स्वच्छंद,तुमचेही आभार.
2 Jun 2015 - 12:34 am | गणेशा
अप्रतिम .. मला वाटले नव्हते तुम्ही त्याला १.६० लाखाला झोपवताल म्हणुन.. ग्रेट एकदम ... त्या आज्जीं साठी तुम्ही लक्ष्मीच ...
2 Jun 2015 - 12:33 pm | मोहनराव
फारच छान लेखन. वाचतोय.
3 Jun 2015 - 4:28 pm | सनईचौघडा
अतिशय छान धडा शिकवलात की तुम्ही त्याला.
पुभाप्र असलेला.
3 Jun 2015 - 6:40 pm | रुस्तम
पुभा - काही नवे करावे म्हणून.-भाग ६
http://www.misalpav.com/node/31509
25 Dec 2015 - 8:27 pm | शाम भागवत
काही नवे करावे म्हणून.-भाग ६