दुसऱ्या दिवशी भावाचा फोन आला,"ताई,मी आज जाऊन आलो फणसोपला.तो चाफेरकर (तलाठी)काय म्हणाला म्हीतीय? तुमची बहिण आणि मेहुणे मंत्रालयात आहेत न?मग मग त्यांना माहिती नाही वटते काम कसे करतात?वजन कसे ठेवतात?मी त्याला सांगून आलोय की, ताई येऊन तुझ्या डोक्यावरच वजन मारेल म्हणून?" "ठीक आहे."असे म्हणून मी फोन ठेवला. (क्रमशः)
जळ जळ महिन्याने मी गावी जायला निघाले.त्यवेळीही युती सरकार होते.मा.मनोहरपंत जोशी मुख्यमंत्री होते.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सात बारा उतारा दर महिन्याला शेतकऱ्याच्या घरी पोस्टाने पाठवण्यात यावा असा शासन निर्णय निर्गमित केला होता.महसूल खात्यातून त्याची कॉपी मिळवली.अजून थोडी माहिती घेतली.पूर्वतयारी पूर्ण करून मी निघाले.रत्नागिरीला पोचून सकाळीच फणसोप गाठले.सोबत भाऊपण होता.एक आजी चालल्या होत्या.
चौशी केली," चाफेरकर कुठे राहतात? "
आजींनी विचारले,"कोन चापेरकर.?तलाटी?"
"हो.हो तेच."मी उत्तरले.
"मेलो रांडेचो ," आजींचे अनुद्गार.
मला बसलेला धक्का माझ्या तोंडावर प्रतिबिंबित झालेला पाहून आजींनी खुलासा केला."नाय,मंजे तसो नाय मरुक.पण मेलो तर बरा व्हतला."
'असं का बोलताय?" मी विचारले.
"काय सांगू बाय.माज्याकडे जेवानाचो डबो मागता न्हेमी.माजेच वांदे आसत.माजा हातावरचा प्वाट.कोणाकोणाची कामा करून मी माजा नि नातवाचा प्वाट भरतंय.चटणीभाकरीची येवस्था झाली तर बास.आणि ह्यास कवटा तरी हवीतच.मी कोंबड्या पाळलेल्या आसतना त्याच्येर मेल्याचो डोळो.मी कवटा विकताय आणि माज्या नातवाक शिकवतंय,"आजींनी सविस्तरपणे खुलासा केला.
मला आठवले,त्या दिवशी मी तलाठी कार्यालयात बसले असताना याच आजी तिथे होत्या.आणि तलाठी जेवणाचा डब्बा मागवतो अशी तक्रार तिथे जमलेल्या लोकांपुढे करत होत्या.
मी विचारले,"आजी ,पण तुमची तर जुनी जमीन असेल ना?मग तुमचे तिथे काय काय काम असतं?"
"माज्या कर्माच्ये भोग."आजी उसासली."माजो लेक दारू पीवून फटफटी चालवी होतो.आक्शिडन झालो नि माजी सून पण संगाती होती.दोगाय एकदम ग्येली.एक नातू हाय.थोडा रान हाय.थय गवत येता.गुरा असलेल्या लोकांका ता गवात दितंय आणि दूध घेतंय.हो मेलो सांगता कि तू माका जेवनाचो डब्बो नाय दिलंस तर तुजा रान कोणाच्याय नावावर लावीन.तू माझा काय बिगडवू शकनार नाहीस.मगे घालतंय त्याचे मढयार."मी हादरलेच.माझा भाऊ माझ्यासाबत होता.हा माझा भाऊ म्हणजे शेजारच्या काकींचा मुलगा.पण काकी म्हणजे त्याची आई तो लहान म्हणजे ३ वर्षांचा असताना गेली.आणि तो आमच्या घरातला सगळ्यात छोटा मुलगा बनला.गावातच लहानाचा मोठा झाला. पण आमचे संबंध खूप चांगले आहेत. गावातच वाढल्याने विचारसरणी आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्याची.तो संतापून म्हणाला फटकावतोच त्याला आता
"शान्त हो मयू.तुला त्याला मारायचं होतं तर तू त्याच दिवशी मारायचं होतं,आता माझ्यावर सोपव."मी मयूची समजूत घातली.
"पण ते राहतात कुठे?"मी आजीना विचारले. "चला माज्यासंगाती,मी दाखवतंय.मी त्याचो डब्बोच घेवन चाललंय."आम्ही आजींच्या मागून निघालो.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
14 May 2015 - 8:12 pm | सूड
पुभाप्र
14 May 2015 - 8:16 pm | एस
पुढील भाग लवकर टाका हो.
साला आमचेपण हात शिवशिवताहेत. हरामखोर साला! (@#$&*@!#$^*&#$) भावना समजून घेणे!
14 May 2015 - 9:18 pm | स्रुजा
काय हलकट लोक असतात. अशा गरीबांचं काय होत असेल कोण जाणे. पुढचा भाग थोडा मोठा टाका सुरंगी ताई.
14 May 2015 - 9:02 pm | आदूबाळ
पुभाप्र. आणि मोठा भाग टाकावा अशी विनंती.
14 May 2015 - 10:59 pm | रुपी
सहमत. थोडा मोठा भाग टाका.
14 May 2015 - 10:56 pm | NiluMP
पुढे काय होणार याची उत्सुकता आहे.
15 May 2015 - 12:14 am | रातराणी
किती असंवेदनशील असतात काही लोक! प.भा प्र.
15 May 2015 - 11:48 am | पिलीयन रायडर
वाचतेय सुरंगी ताई..
वाचुनच संताप होतोय.. तुम्ही बर्याच शांतपणे हाताळलेली दिसते परिस्थिती..
पुढचे भाग मोठे आणि लवकर टाका प्लिझ.. फार उत्सुकता आहे..
15 May 2015 - 12:05 pm | यशोधरा
वाचते आहे..
15 May 2015 - 3:49 pm | त्रिवेणी
ईल्लुसा भाग का टाकला ताई. आता पुढ्चा भाग खुप मोठ्ठा येवु द्या.
15 May 2015 - 4:38 pm | नूतन सावंत
पिरा,तत्कालिक शिक्षेपेक्षा मोठी शिक्षा डोके शान्त ठेऊन करावी लागते.त्यावेळी मयूने त्याला मारले असते तर सरकारी कर्मचाऱ्याला मारले म्हणून प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता होती.नाहीतर मीपण नडला त्याला फोडला जातकुळीतली आहे.पुढचा भाग टाकला आहे.
त्रिवेणी इतका मोठठा पुरे न?
15 May 2015 - 4:44 pm | नूतन सावंत
आदुबळ,सृजा इतका मोठ्ठा पुरे न?
स्वॅप्स,तुमची भावना समजून घेतल्या आहेत.पण हे सर्व जासेच्या तसे घडले आहे.जिथे संधी मिळेल तिथे हात साफ करून घ्या.
15 May 2015 - 5:43 pm | बॅटमॅन
सुरंगी मॅडम, भाग अजून मोठा आणि डीटेल्ड मध्ये टाका.
15 May 2015 - 6:13 pm | नूतन सावंत
बॅटमॅन,मला वाटलं होतं,हा भाग मोठा आहे म्हणून.आणि मॅडम म्हणायची गरज नाही, ताई म्हटलं तरी चालतंय.मला इतके लिहायची सवय नाहीये अजून पण प्रयत्न करेन.
16 May 2015 - 10:08 am | नाखु
हे बेष्ट आहे.
बनचुका नाखु
17 May 2015 - 3:37 pm | नूतन सावंत
सगळ्यांचे आभार.
19 May 2015 - 11:02 am | कविता१९७८
मस्त, हा भागही आवडला
19 May 2015 - 3:48 pm | स्पंदना
देवा!
कुठे असते या देवाची काठी?
बिचारी म्हातारी!! लाज सुद्धा नसते असल्या बदमाश्यांना.
25 Dec 2015 - 8:21 pm | शाम भागवत
काही नवे करावे म्हणून.-भाग ३