पहाटे उठलो,घाटावर स्नानासाठी गेलो.आज मकर सन्क्रान्त आहे. पौष महिन्यातिल क्रुष्ण पक्ष आहे त्यामुळे आकाशात चन्द्र नाही पण घाटावर लाइट असल्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. पटकन स्नान आटोपले कारण थन्डी खुप होती. म्हणजे मैय्याचे जल सुखद उबदारच होते पण कुठपर्यन्त? जो पर्यन्त आपण लोटेच्या लोटे पाणी अन्गावर घेत असतो तो पर्यन्तच्,एकदा ते थाम्बले की थन्डीने दात वाजायला लागतात. म्हणून पटकन आवरुन परतलो.
पुजा आरती करुन स्तोत्रपाठ पुर्ण होतच होता तोच खिडकीतुन आकाशातील रन्गान्च्या उधळणीकडे लक्ष गेले. अरुणोदय झाला होता. आमची खोली तिसर्या मजल्यावर असल्यामुळे डोन्गरावरील घनदाट जन्गल झाडी आडून लाल-गुलाबी रन्गाची उधळण करीत हळूहळू वर येणारा तो बाल दिनकर आम्हाला अगदी सहज दिसत होता. आणि त्याच बरोबर त्यानेच दिलेली लाल्,गुलाबी,सोनेरी रन्गाची गर्भरेशमी परकर चोळी परिधान करुन आपली छोटी नर्मदा अवखळपणे नाचत पुढे पुढे धावत होती. भान हरपुन आम्ही खिडकीत उभे होतो. तोच घन्टानाद कानावर आला.चला चहाचे बोलावणे आले.अरे हो! सान्गायचेच राहिले,इथे चहा,भोजन यान्ची वेळ झाली की घन्टा वाजवतात मग जायचे भोजन शाळेत.
खाली उतरुन भोजन शाळेत गेलो,निरश्या दुधाचा गरमगरम चहा खुप छान होता. इथल्या दुधात पाणी घालत नाहीत त्यामुळे तो दाट चहा खुपच छान असतो. चहा घेता घेता सर्वान्चा निरोप घेतला. महाराजान्कडून वहीवर शिक्का मारुन घेतला तितक्यात सन्तोष रिक्षा घेउन आलाच. निघालो माईच्या बगिच्याकडे.
गावाबाहेर साधारणपणे दोनएक कि.मि. गेल्यावर सन्तोष म्हणाला.आपण इथे उतरुन ह्या समोरच्या पायवाटेने माईच्या बगिच्या जवळ या मी रस्त्याने तिकडे येतो कारण रस्त्याने जाताना मैय्या क्रॉस होते.ठीक आहे असे म्हणून आम्ही उतरलो,पिशव्या रिक्षातच ठेवल्या फक्त मैय्याच्या कुप्या असलेली शबनम तेवढी घेतली. जन्गलातल्या पायवाटेने आमची विनोबा एक्स्प्रेस निसर्गाची रमणीयता पाहात पक्षान्चे गोड गाणे अॅकत निघाली. दव पडल्यामुळे जमीन ओली झालेली होती,जपुनच चालत होतो कारण जरा दुर्लक्ष झाले तर मग धरतीमातेला लोटान्गण नक्की. कालचा अनुभव ताजा होता.असे साधारण दोन कि.मि. चाललो, समोरच्या बाजुला एक मन्दिर दिसले तेथील कुन्डावर काही लोक स्नान करत होते,आम्ही आणि ते लोक यान्च्या मधुन एक छोटा स्वच्छ पाण्याचा प्रवाह वाहात होता ती नर्मदामैय्या होती की दुसरी कोणती नदी कळत नव्हते,नर्मदे हर! आम्ही त्या लोकाना हाक मारुन विचारतच होतो तितक्यात सन्तोष आला,त्याने तिथेच थोडे पुढे असलेल्या एका फळकुटावरुन आम्हाला पलीकडे नेले.आम्ही मैय्याच्या उत्तर किनार्यावरुन दक्षिण किनार्यावर आलो.
मोठमोठ्या व्रुक्षान्च्या खाली दोन कुन्डे होती. मोठ्या कुन्डात लोक स्नान करत होते आणि निळ्या आकाशी टाइल्सने बान्धलेले छोटेसे कुन्ड म्हणजे नर्मदामैय्याचे उगमस्थळ होते.तिथेच नर्मदामैय्याची सन्गमरवरी मुर्ती होती. त्या कुन्डात शिवपिन्डी होती. तिथे असलेल्या पुजारीबाबानी आम्हाला स्नान झाले आहे का विचारले,आम्ही हो म्हटल्यावर त्यानी आम्हाला बसायला आसन दिले आणि आमच्या जवळ असलेल्या मैय्याजलाच्या कुप्या समोर ठेवायला सान्गितल्या नन्तर पुजेचे काही मन्त्र म्हणुन पुजा करवून घेतली आणि उभे राहुन कुपी हातात घेउन त्यातील निम्मे नर्मदा-सागर जल त्या कुन्डात अर्पण करायला सान्गितले व नन्तर त्यानी त्या कुन्डातील जलानी त्या कुप्या परत भरुन आम्हाला दिल्या. आता हे जल ओम्कारेश्वरला गेल्यावर परिक्रमा पुर्ति प्रित्यर्थ नर्मदापुजन करुन नन्तर ह्यातील अर्धेजल आधी दक्षिण किनार्यावरील ममलेश्वराला अर्पण करुन नन्तर नर्मदामैय्या ओलान्डुन ओम्कारेश्वराला अर्धे जल अर्पण करावे म्हणजे परिक्रमा सम्पुर्ण होईल. त्याना काही दक्षिणा देउन तिथेच बसलेल्या एका साधूबाबाना कन्यापुजन आणि कढईसाठी पैसे दिले,त्यानी लगेच तिथेच असलेल्या कन्याना तयार असलेली हलवा-पुरी दिली आम्हालाही प्रसाद दिला. आमची सागरसन्गमापासुन सुरु झालेली उत्तर किनार्यावरील परिक्रमा पुर्ण झाली,पुन्हा दक्षिण किनार्याने पुढची परिक्रमा सुरु करण्यासाठी.
थोडीफार फोटोग्राफी करुन रिक्षात बसलो.रस्ता चान्गला सिमेन्टचा बान्धलेला आहे. जन्गल दाट आहे,या जन्गलात अनेक ऑषधी वनस्पती आहेत त्यामुळे येथील हवा शुद्ध,प्रदुषणमुक्त आहे.तीन कि.मि. शोणभद्र नदाच्या उगमस्थळी गेलो,येथुन शोणनदाचा उगम झाला आहे याच शोणाबरोबर नर्मदेचा विवाह ठरला होता पण नर्मदेच्या एका दासीने खोटे बोलुन त्याच्याशी विवाह केला म्हणुन अविवाहीत राहण्याचा निश्चय करुन लोककल्याणासाठी उलटदिशेने फिरुन पश्चिमेकडे जलरुप घेउन प्रवाहीत झाली अशी पुराणकथा आहे.शोणनद पुर्वेला प्रवाहित झाला. या ठिकाणी धबधबा आहे पण तो पावसाळ्यातच असतो. तिथे बर्याच ॠषीमुनीन्च्या अगदी हुबेहुब मुर्ती आहेत. हनुमानमन्दिर्ही आहे म्हणून त्याचे अनुयायी वानरही भरपुर आहेत्.पुढे श्रीयन्त्र मन्दिरात गेलो,या श्रीयन्त्राचे दर्शन घेत नाहीत तशी आद्य शन्कराचार्यान्ची धर्माआज्ञा आहे त्यामुळे मन्दिराच्या गाभार्याचा दरवाजा बन्द होता बाहेरच्या बाजुला शिवपिन्डी आहे. तिथुन नर्मदाकुन्डावर गेलो,समोर कर्णमन्दिर,शन्कराचार्यमठ आहे तो पाहुन नर्मदाकुन्डाच्या दक्षिणदरवाजाने प्रवेश केला. कुन्ड भव्य असुन पाणी अगदी स्वच्छ निर्मळ आहे. कुन्डात पाय घालायला परवानगी नाही. अगदी खालच्या पायरीवर शिवपिन्डी आहे आपल्या जवळील ताम्ब्याने कुन्डातील पाण्याने तिच्यावर पाण्याचा अभिषेक करतात.फुले बेल वाहिले तरी लगेच ते उचलुन निर्माल्यकलशात टाकायचे. ह्यामुळे स्वच्छा आहे. अशीच व्यवस्था बाकी सर्व तीर्थक्षेत्रीही झाली तर किती चान्गले होईल. बाहेर आलो.
दुपारचा एक वाजला होता आज नास्ता-भोजन काहीच झाले नव्हते मग एका टपरीवर भाजीवडा खाल्ला. नन्तर सन्तोषने रिक्षाने जन्गल रस्त्याने काही अन्तरावर सोडले,इथुन पुढे आम्हाला बसस्टॉप पर्यन्त चालतच जावे लागणार होते. वाटेत एका आश्रमाच्या चारीबाजुनी नर्मदेचा प्रवाह वाहतो येथेच नर्मदेवर छोटा बन्धारा बान्धला आहे त्यामुळे येथे तिचे पात्र थोडे मोठे झाले आहे आणि घाटावर स्नानासाठी मुबलक जलसाठा आहे. ह्या तलावाला कबीर तलाव म्हणतात.
यथावकाश बसस्टॉपवर पोहोचलो.थोड्याच वेळात बस मिळाली. सुन्दर जन्गलातुन जाणार्या रस्त्याने कबीर चौथरा,करन्जिया,गोरखपुर,गाडासराई,वगैरे गावे पार करत पाच वाजता दिन्डोरीला पोहोचलो. हॉटेल नर्मदा इन मध्ये उतरलो. आणि तेच योग्य झाले असे नन्तर जेव्हा नर्मदामैय्याचा घाट आश्रम वगैरे पहायला बाहेर पडलो तेव्हा तिथली परिस्थिती पाहिल्यावर वाटले.
बाल नर्मदा
कपिलधारा अमरकंटक
श्री अमरेश्वर
दुर्गधारा अमरकंटक
नर्मदा कुंड - नर्मदेचा उगम
क्रमशः
प्रतिक्रिया
14 Sep 2012 - 7:17 pm | पैसा
वंदनाताई, तुम्हाला न विचारता तुमचे अमरकंटक इथले फोटो अपलोड केले आहेत. काही बदल हवे असतील तर सांगा. छान लिहिताय.
16 Sep 2012 - 4:58 pm | खुशि
धन्यवाद ज्योती. अजुनही बाकी फोटो जे आपल्याला चान्गले वाटतील ते टाका माझी काहिच हरकत नाही.
14 Sep 2012 - 7:47 pm | sagarpdy
फोटू आले!
15 Sep 2012 - 9:55 am | इरसाल
पहिला फोटो पाहुन भिमाशंकरला जाण्यासाठी सकाळी सकाळी जेव्हा खांडसहुन चढायला सुरुवात करतो तेव्हा उगवत्या सुर्याच्या कोवळ्या किरणांनी जी अनुभुती मिळते त्याचा पुनःप्रत्यय येतोय.
धन्यवाद.
16 Sep 2012 - 5:09 pm | खुशि
नमस्कार.
खरेच भिमाशन्कर,भन्डारदरा,माळशेजघाट, आम्बोली आपला सारा महाराष्ट्रच खुप सुन्दर आहे.
16 Sep 2012 - 12:14 am | शिल्पा ब
ते सगळं ठीक हो!! पण ४०च्या वर भाग लिहुनही इथल्या दुसर्या कोणाच्याही धाग्यावर या बाईंनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही. मिपा म्हणजे त्यांचा ब्लॉग नाही.
16 Sep 2012 - 1:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मिपाचे धोरण पुन्हा वाचले. त्यात असे काही लिहिले नाही आहे. ज्याला धागा काढायचा आहे तो काढेल, ज्याला वाचायचा तो वाचेल आणि ज्याला जिथे प्रतिक्रिया द्यायची असेल तिथे देईल. त्याचे गुणोत्तर* काय असावे हे कसे ठरवणार ?
*म्हणजे किती प्रतिक्रिया टाकल्या की एक धागा लिहिण्याचा हक्क मिळेल* वगैरे
16 Sep 2012 - 5:20 pm | खुशि
नमस्कार विश्वासराव.
आपले म्हणणे बरोबर आहे. मला जे आवडते ते वाचल्यावर मी प्रतिसाद देते.पण होते काय की मी अजुन शिकतेच आहे,त्यामुळे माझा लेख लिहिण्यात म्हणजे टाइप करण्यातच माझा बराच वेळ जातो आणि काम साम्भाळुन हे करते एखाद्या दिवशी वेळच मिळत नाही मग लिहिणे-वाचणे राहुनच जाते. असो. आपल्याला वाटते ते आपण करावे ज्याना माझे लिखाण आवडत नसेल त्याना तसे सान्गण्याचा हक्क आहे आणि तसे सान्गणारेही आपले मित्रच असतात असे मला वाटते.
आपल्याला लेख आवडले हे माझ्यासाठी खुप आहे. धन्यवाद.
16 Sep 2012 - 10:05 pm | शिल्पा ब
इथे नुसतेच लेख टाकण्याबरोबरच इतरांनी काय लिहिलंय ते वाचुन त्यांचाही उत्साह वाढवायला धोरण कशाला लागतंय?
16 Sep 2012 - 11:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे
खरे आहे, नाही लागत. पण "मिपा म्हणजे त्यांचा ब्लॉग नाही" अशी आणि या प्रकारची वाक्ये डोक्यात जातात. ते वाक्य नसते तर गप्प बसलो असतो. प्रतिसाद देऊन उत्साह वाढवावा या जनरल मताशी सहमत आहे.
बाकी काही लोक उत्साह कमी करण्याची सुपारी घेऊन बसलेले असतात त्यापेक्षा हे बरे की नाही (संदर्भ:- याच लेखमालेवर झालेली टीका)
17 Sep 2012 - 7:55 am | शिल्पा ब
सगळीकडे आपली बौद्धिक कुवत दाखवणारे पण डोक्यात जातात.
रोज २-३ भाग टाकत राहील्या अन ते पण रोज काय काय केलं याची यादी देत बसल्यानेच या लेखमालेवर टीका झाली.
उत्साह कमी करणारे प्रतिक्रिया देण्याआधी लेख वाचतात त्यामुळे "हे बरे" नाहीच. अर्थात तुमच्याकडुन फार अपेक्षा नाहीतच. असो.
16 Sep 2012 - 2:31 pm | sagarpdy
अन्यत्र हि प्रतिक्रिया आहेत. हे पहा.
16 Sep 2012 - 2:44 pm | ५० फक्त
शिल्पा ब यांचेशी सहमत आणि विमेंशी देखील पण गुंजभर कमीच.
अर्थात याबद्दल संपाद्कांपैकी कुणीतरी त्यांच्याशी काही संवाद साधला असेलच नसेल तर साधावा ही विनंती, किंवा तांत्रिक दृष्ट्या शक्य असेल तर हे लेखन संपुर्ण होईपर्यंत मिपावर भटकंती मध्ये - परिक्रमा नर्मदेची असा - एक वेगळा विभाग करुन द्यावा, कारण श्री. विलासराव, श्री. यकु, श्री, आत्मशुन्य हे अशातच या परिक्रमेला जाउन आलेले मिपासदस्य आहेत, त्यांचे अनुभव, याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी हे वेगळं असणार, निदान परिक्रमेचा दुस-या बाजुने विचार केला जाउ शकतो, केला जातो हे तरी लक्षात येईल.
ज्या सद्स्यांना या विषयावर प्रतिसाद देण्यात इंटरेस्ट असेल ते तो विभाग उघडुन वाचतील इतर दुर्लेक्ष करु शकतील, पण किमान मुख्यपानावर भटकंती मध्ये इतर सद्स्यांचे वेगळ्या विषयावरचे धागे तरी दिसु शकतील, गेला काही काळ पाच पैकी २ धागे तरी खुशिकाकुंचेच असतात. कधी कधी तर चार देखील.
16 Sep 2012 - 5:03 pm | खुशि
नमस्कार.
मी ज्याना प्रतिसाद दिला ते लेख आपण वाचले नसतील,असेही होऊ शकते नाही का? भटकन्तीवर आलेल्या किल्ला भ्रमन्तीला,पाककृती मधील कान्दे भात्,कविता मधील चिमणी ही काही उदाहरणे आहेत.
17 Sep 2012 - 7:57 am | शिल्पा ब
शक्य आहेच.
17 Sep 2012 - 7:31 am | निनाद
सुंदर झाला आहे हा भागही. चित्रांमुळे अजून मजा आली. पैसाताईंना धन्यवाद!
पुढील भागाची प्रतीक्षा आहेच...
17 Sep 2012 - 9:13 am | यशोधरा
मस्त. पुढचे भागही लवकर टाका.
24 Sep 2012 - 3:46 am | स्पंदना
बाल नर्मदा पाहुन डोळ्यांच पारण फिटल खुशीताई.
अगदी पहिल्या भागापासुन वाचल्याने तुम्ही कश्या ही परिक्रमा पुर्ण करायचा ध्यास घेतला हे माहित आहे.
फोटोंसाठी पैसातईला धन्यु.
आणखी एक खुशीताई...तुम्ही लिखाणात जे पुराणकथांचे छोटेछोटे दाखले दिलेत त्याने लेख जास्त रोचक होतो आहे.
बाकि 'नर्मदे हर' परिक्रमा पुर्ण व्हायला आली आहे.