तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-३७

खुशि's picture
खुशि in भटकंती
4 Sep 2012 - 5:22 pm

पहाटे येथे सुर्यपुजा करुन सर्वानी बारा सुर्यनमस्कार घालण्याचा प्रघात आहे.सर्वान्बरोबर महाराजही सुर्यनमस्कार घालतात.आम्हीही सहभागी झालो. रामदासी परम्परा आहे या आश्रमाची.
महाराजाना नमस्कार करुन निघण्याची परवानगी मागितली,चहा घेउन मग निघा म्हणाले म्हणुन तसेच केले. शिन्दे काका म्हणाले उद्या गेला असतात तर मला सोबत झाली असती.आम्ही त्याना मराठे आणि कोथमिरे हे आमचे सहकारी आज उद्याकडे येतील त्यान्च्या बरोबर या तोपर्यन्त येथेच थाम्बा दमला आहात विश्रान्ती घ्या असे सान्गितले.
विनोबाएक्स्प्रेस निघाली.मैय्या किनार्‍याने वाटचाल सुरु.गव्हाची हिरवीगार शेते शिणवटा घालवत होती.दप्पर,चिचली गावे पार करुन करोन्दला एका चहाच्या टपरीवर चहा घेतला,१०कि.मि. चाल झाली होती. नन्तर पिपलतेरिया आले. एक आश्रम दिसला शिरलो आत. महाराज म्हणाले भोजनप्रसादी पाओ,आम्ही लगेच हो म्हणालो. बोलता बोलता कळले श्री. सुहास लिमये येथेच येउन गेले होते.आम्हीही परिक्रमा त्यानी त्यान्च्या पुस्तकात दिलेल्या मार्गावरुनच बहुतान्शी करत आहोत. त्यामुळे आमचा आजचा मुक्काम छिपानेर येथे दादाधुनिवाले यान्च्या आश्रमात असणार होता.
दोन वाजता पुढे निघालो. लिमयेकाकानी म्हटल्याप्रमाणे खरेच बोरीची खुप झाडे होती,भरपुर बोरे खाल्ली. शेताच्या कडेने बोरे वेचुन खाण्याची गम्मत काही न्यारीच.सिहोर जिल्ह्यात प्रवेश केला.सन्ध्याकाळी सहा वाजता छिपानेरला दादाधुनिवाले आश्रमात आलो.
इथे नर्मदामैय्याचे रुप सुन्दर आहे.पण पाणी कमी होते.स्नान केले पाणी गार होते,थन्डी वाजु लागली.थन्डीचे दिवस आहेतच असा विचार केला. पुजा आरती केली.आज आमच्याबरोबर मध्यप्रदेशातील परिक्रमावासी आहेत सगळे शेतकरी. त्यान्ची गावरान हिन्दी समजत नाही. भोजनाला खिचडी-कढी असा बेत होता. आता विश्रान्ती.
रात्री मला ताप भरला,मैय्या ! असे २०/२२कि.मि. चालल्यावर ताप येऊ लागला तर आमची परिक्रमा कशी पुर्ण होणार? आम्ही उठलेले पाहिल्यावर आश्रमाचे महन्त आले,त्यानी चौकशी केली मला रडू यायला लागले,ते म्हणाले बेटा रोना नही,परिक्रमा पैदल हो या बससे कुछ नही परिक्रमा पुर्ण होना काफी है. आप कल बससे बुधनी जाओ मी मान डोलावली,नाइलाज को क्या इलाज.
सकाळी चहा घेउन निघालो. सात वाजता बस मिळाली. ४५कि.मि.वरील बुधनीला पोहोचायला दुपारचे १२ वाजले. दर दोन कि.मि.वर बस थाम्बत असे. बसमधुन उतरलो. घाट दोनकि.मि. आतमध्ये होता. लागलो चालायला. रेल्वे क्रॉसिन्ग आले,फाटक बन्द होते.थोडावेळ थाम्बावे लागले.गाडी गेली फाटक उघडल्यावर वाहनान्ची ही गर्दी उसळली,कशीबशी वाट काढत असताना व्हायचेतेच झाले.माझा पाय मुरगळला आणि मी पडले,हे पुढे गेले होते,माझी हाक त्याना अ‍ॅकू गेली नाही.एका भाऊने हात देउन उठवले. पाय लचकला होता,गुडघ्याला खरचटले होते. कसेतरी त्याना गाठले,झालेले सान्गितले. थोडे चालल्यावर बुधनीचे कोर्ट आले,बाहेर चहाची टपरी होती,बसलो. चहा सान्गितला,गुडघ्याला नी़क्याप चढवली.घाट कुठे आहे चौकशी केली जवळच आहे,थोड्या अन्तरावर भन्डारा चालू आहे तिथे भोजन घेउन मग घाटावर जा असे एका भाऊने सान्गितले.
पुढे निघालो.पाय दुखत होता,चालायला त्रास होत होता,भन्डार्‍याचे ठीकाण निघुन गेलेले कळलेच नाही. घाटावर पोहोचलो.आश्रमात गेलो पण तिथे नुसता गान्जेकसान्चा अड्डा होता,ते गोपाल मन्दिर होते पण तिथले महाराज ब्रम्हलीन झाल्यापासुन अनावस्था आहे असे कळले.ठाकूरसमाज आणि दुसरीएक धर्मशाळाही चान्गल्या नव्हत्या.एका चहाच्या टपरीवर बसलो,कथिया हॉटेल.त्याचे मालक दिनेशचन्द्र राठौर यानी मा रेवा किराणासेन्टरचे मालक श्री.दुबे यानी बान्धलेल्या खोलीत रहा असा सल्ला दिला,श्री.दुबे बाहेर गेले होते ते येईपर्यन्त हॉटेलमध्ये वडा खाऊन चहा घेतला.
बोलता बोलता कळले कथिया होटेलचे मालक दिनेशचन्द्र हे आग्र्याचे राहाणारे आहेत.आमच्या मुलीचे सासरचे गाव आणि त्यान्चे गाव एकच आहे,जरार; जिल्हा आग्रा. ते तिच्या सासर्‍याना चान्गले ओळखतात.मग गावकी बहुके माता-पिता म्हणुन मोठे आगत-स्वागत झाले. दुबे आल्यावर त्यानी दिलेल्या खोलीत सामान ठेउन आसन लावले. रात्री दुबे डबा देणार आहेत.
थोडी विश्रान्ती घेउन सन्ध्याकाळी घाटावर गेलो. ४० पायर्‍यान्चा बान्धीव घाटाचे १९९८ साली नुतनीकरण झाले आहे,महामहीन राष्ट्रपती शन्करदयाळ शर्मा यान्च्या शुभहस्ते. मैय्याचे रुप मनमोहक आहे. भरपुर मासे आहेत. घाटावर मैय्याची आरती झाली. परत खोलीवर आल्यावर पुजा आरती केली.आशिष दुबे यानी डबा आणुन दिला,भोजन झाले.पाय सुजला आहे,तापही आहे गोळी घेतली.उद्या बसने पतईघाटला जायचे असे ठरवले.आता विश्रान्ती. क्रमशः

प्रतिक्रिया

पैसा's picture

4 Sep 2012 - 5:30 pm | पैसा

वाचत आहे. तुम्ही सवय नसताना इतकं टाईप करताय त्याचं कौतुक वाटलं. फोटो जर पिकासा किंवा फेसबुकवर अपलोड केले असतील तर कृपया लिंक द्या.

वन्दना परान्जपे फेसबुक डॉट कॉम. फोटो टाकलेले आहेत. पिकासावरही आहेत येथेच टाकायचे जमत नाही.का कोण जाणे.

हे वाचा. कदाचित उपयोगी पडेल.

मन१'s picture

4 Sep 2012 - 5:51 pm | मन१

परिक्रमा सध्या सुरु आहे की पूर्ण झाल्यानंतर हे भाग लिहायला घेतलेत?

विनोद स्वामी's picture

4 Sep 2012 - 5:57 pm | विनोद स्वामी

तुमचे परिक्रमेवरचे सर्व लेख वाचले, अतिशय सुंदर लिखाण आहे तुमचे.
सर्व म्हणतायत त्याप्रमाणे फोटो काढले असतील तर लिंक द्या इथे.

पु.ले.शु.
________________________________________________________________
---------------------------------------------------------------------------------------

sagarpdy's picture

4 Sep 2012 - 6:01 pm | sagarpdy

नेहमीप्रमाणेच सुंदर लिखाण, ओघवती लेखनशैली
तब्येतीची काळजी घ्या
पु भा प्र

खूपच सुंदर..
लेख माला इतक्यात संपवू नका..
तुमच्याबरोबर आम्हालाही परिक्रमा घडतेय

शुचि's picture

6 Sep 2012 - 1:44 am | शुचि

खरय. फार आवडती लेखमाला आहे माझी. कौतुक वाटते खुशी यांचे.

कौशी's picture

4 Sep 2012 - 10:46 pm | कौशी

लेखमाला छान सुरु आहे.

छान चाललीय लेखमाला.

अर्धवटराव

भरत कुलकर्णी's picture

5 Sep 2012 - 8:54 am | भरत कुलकर्णी

छान वाचतोय

राजो's picture

6 Sep 2012 - 11:04 am | राजो

चान चान

इरसाल's picture

6 Sep 2012 - 11:16 am | इरसाल

खरडवह्यांमधे परिक्रमेविषयी टर उडवणारे इथे श्रद्धाभाव/लेखनाचा आग्रह व्यक्त करत आहेत हे पाहुन डोळे अंमळ पाण्याने जडावले.