समर्थकुटीत स्वयम्पाक अगदी महाराष्ट्रियन असतो. वरण भात भाजी पोळी चटणी कोशिम्बीर लोणचे पापड.खुप दिवसानी घरी जेवल्या सारखे वाटले. दुपारी महाराजान्च्या लायब्ररीतिल पुस्तक वाचायला घेतले. गोन्दोवलेकर महाराजान्चे चरित्र. ग्रुहस्थाश्रमात राहुनही परमार्थ कसा साधता येतो हे महाराजान्च्या जीवनचरित्रावरुन समजते. नामस्मरण करता करता आपला सन्सार करत राहावे, समाजाच्या उपयोगी पडत असावे. दीनदुबळ्यान्ची सेवा करावी.भुकेलेल्या तहानलेल्याना अन्न-पाणी द्यावे,पशुपक्षान्चीही काळजी घ्यावी,व्रुक्षवल्लीना साभाळावे. देश धर्म कार्यात कधिही कमी पडू नये ही त्यान्ची शिकवण .त्यानी केलेली नर्मदा परिक्रमा.सारे सारे वाचताना सन्ध्याकाळ कधी झाली समजलेच नाही. सन्ध्याकाळी मैय्याच्या घाटावर गेलो.पहाटे दिसली त्यापेक्षा आताचे मैय्याचे रुप निराळेच होते. लोकान्ची येजा सुरु होती. स्थानिक नावाडी पात्रात होड्या घालुन मासेमारी करत होते. दक्षिण तिरावरील आश्रम दिसत होते.मैय्या सन्थ वाहात होती .
भालोदच्या प्रतापेमहाराजान्कडील राहुल गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी समर्थकुटीत सात दिवसान्साठी आला आहे,तो आणि आम्ही घाटावर बसुन बोलत होतो तितक्यात पाणी एकदम वाढल्याचे दिसले,ओम्कारेश्वर धरणातुन पाणी सोडले होते,बघता बघता त्याची पातळी आणि वेग दोन्ही वाढले,पात्रात एक मुलगा होडीत बसुन मासे पकडत होता,एकाएकी त्याची होडी गर्कन फिरली ;क्षणात वाहून जायला लागली,आम्ही घाबरुन ओरडलो.क्षणभर तो मुलगाही सटपटला पण लगेच त्याने त्याच्या जवळील मोठ्या बाम्बुने नदीपात्रात आधार शोधला आणि होडीला स्थिरावले,आणि किनार्याकडे गेला. इकडे आमचाही जीव भान्ड्यात पडला. बाप रे! काही क्षण पण जीव थरारला होता.
तिन्हीसान्जा झाल्या. मन्दिरा-आश्रमात सन्ध्या-आरतीची तयारी सुरु झाली,मैय्याच्या पात्रात छोटे छोटे दिवे सोडले जाऊ लागले. बघता बघता आकाशात चान्दण्या आणि पात्रात दिवल्या यान्च्यात रात्रिच्या अन्धाराला पळवुन लावण्याची जणू चढाओढच सुरु झाली. मैय्याचे रुप त्या दिवल्यान्च्या सोनेरी प्रकाशाने चमचमू लागले.आकाशात शुभ्र चान्दण्या आणि नदीपात्रात मन्द पिवळसर प्रकाशाने चमचमणार्या दिवल्या,मोठे मनोहर द्रुश्य होते. आम्हालाही आश्रमातील आरतीला जायचे होते,म्हणुन पुन्हा पुन्हा मागे वळून बघत परत फिरलो.
आश्रमात धुप धालण्याचे काम धनन्जय करत होता,धुपाच्या वासाने सर्व परिसर दरवळत होता.मन्दिरात देशपान्डे आरतिची तयारी करत होते.आम्ही सभाग्रुहात नामस्मरण करीत बसलो. पुजा झाल्यावर आरतीला सुरवात झाली,सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची,नुरवी पुरवी प्रेम क्रुपा जयाची. गणपती,श्रीराम,दत्त्,शन्कर,देवी,गुरुदेव गोन्दवलेकरमहाराज आणि नर्मदामैय्याची ओम जय जगतानन्दी,मैय्या जय जगतानन्दी ही आरती शेवटी घालिन लोटान्गण वन्दीन चरण म्हणुन आरती सम्पन्न झाली.त्या नन्तर अकरा माळा श्रीराम जयराम जयजय राम असा जप केला. नन्तर गोन्दोवलेकर महाराजान्च्या प्रवचनान्तील काही वाचन झाले. असा सुन्दर सोहळा असतो.
रात्रीच्या भोजनाला मुगाच्या डाळीची खिचडी,त्यावर साजुक तुप पापड लोणचे असा छान बेत होता.भोजन झाल्यावर अन्गणात सर्वजण गप्पा मारत बसलो.टिपुर चान्दण्यात गप्पा मारायला मजा आली.दोन दिवसाच्या सहवासाने आम्ही आणि आश्रमवासी जणु एकमेकान्चे नातेवाईकच झालो होतो.बर्याच वेळाने सर्वजण झोपायला गेलो.
आज पहाटे उठल्यावर आधी भोजन शाळा,आम्ही राहात असलेला हॉल,आणि अन्गण झाडण्याची सेवा केली व नन्तर घाटावर जाऊन नर्मदा स्नान केले.पुजा आरती करुन खाली नास्त्यासाठी खाली भोजनशाळेत गेलो तर देशपाण्डे वहिनी म्हणाल्या अहो एवढे सगळे एकट्याने कशाला झाडले दमला असाल ना ? दोघानी मिळून केले तेवढीच सेवा मी म्हणाले. नास्त्याला खमन्ग पोहे होते.
नास्ता करुन फिरायला बाहेर पडलो. दादा दरबार हॉस्पिटल पहायला गेलो,भव्य इमारत आहे. आत गेलो तर तिथे डॉ. गोखले आणि डॉ.सौ. निलम गोखले हे गुहागरचे राहणारे व आता येथे सेवा देत असलेले दाम्पत्य भेटले. एकाच व्यवसायातील असल्याने गप्पा रन्गल्या,माझे सर आणि निलमताईन्चे सर एकच आहेत. नाशिकचे डॉ.प्रमोद शिन्दे.त्या मिरजेला असताना सर त्यान्चे वरिष्ठ होते.त्यानी मला दादा दरबार मध्ये सेवा करण्याची ऑफर दिली.मी परिक्रमा पुर्ण झाल्यावर बघू असे सान्गितले.
नन्तर रिक्षाने बडवाह येथे गेलो,मोठे शहर आहे. बाजारपेठ आहे.रेल्वे स्टेशन,बस स्थानक पाहिले.आश्रमासाठी काही वस्तुन्ची खरेदी करुन ,आमचा पुढील मार्ग कुठुन आहे ते पाहुन परत आश्रमात आलो.भोजनानन्तर कालच्या प्रमाणेच ग्रन्थवाचन विश्रान्ती घेउन सन्ध्याकाळी राहुल बरोबर तो पारायण करीत असलेल्या वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीन्चे तपस्यास्थळ पहायला गेलो. पण तेथील अवस्था पाहुन वाईट वाटले.मैय्या किनारी लहानसे मन्दिर आहे,आजुबाजुला भरपुर मोकळी जागा आहे पण ट्रस्टीन्चे लक्ष नाही त्यामुळे अनावस्था आहे.
उद्या श्रीराम महाराज येणार आहेत्.त्यान्चे दर्शन घेउन पुढे निघायचे. क्रमशः
प्रतिक्रिया
28 Aug 2012 - 4:52 pm | सुजित पवार
गोन्दोवलेकर महाराजानि कधि परिक्रमा केलि?
30 Aug 2012 - 12:35 pm | खुशि
नमस्कार.
गोन्दवलेकर महाराजानी १८५८ ते १८६३ या काळात नर्मदा परिक्रमा केली.असे म्हणतात.आणि नैमिषारण्यात तपश्चर्या केली. तिथे त्यानी १८५७च्या स्वातन्त्रयुद्धात पराभव झाल्यावर नानासाहेब पेशवे याना १८५८/१८५९ मध्ये नैमिषारण्यातच एका गुहेत आश्रय देउन त्यान्च्यावर क्रुपा केली होती,नानासाहेब अखेरपर्यन्त त्या गुहेतच १९०६ मध्ये म्रुत्यु येईपर्यन्त राहिले होते. असा उल्लेख महाराजान्च्या चरित्रात आहे.
28 Aug 2012 - 4:57 pm | स्पा
छान लिहिताय..
मध्ये मध्ये प्याराग्राफ सोडलेत तर वाचायला सुटसुटीत वाटेल..
28 Aug 2012 - 11:47 pm | शुचि
चान चान आत्ताच सर्व भाग एकसलग वाचून काढले. समाधी लागली अगदी. :)
29 Aug 2012 - 8:39 am | हंस
मग मंगळावर जाउन आलात की नाही? गेलाबाजार परिक्रमातरी करुन यायचे होते. ;)
30 Aug 2012 - 12:39 pm | खुशि
नमस्कार,
आपले आशीर्वाद असतील तर मन्गळावरही जाऊ.गेला बाजार उज्जयिनी येथील मन्गळाची जन्मभूमि पाहण्याचा योग मात्र आला.