स्नान पुजा आरती झाल्यावर घाटावर जाऊन मैय्याचे दर्शन घेतले नन्तर नास्ता करुन बसस्टॉपवर आलो. साडेदहाची हरदा बस मिळाली. नेहेमीप्रमाणे टूकू टूकू चालत होती,वाटेत लागणारी गावे बघुन सुहास लिमये काका याच रस्त्याने गेले होते हे समजले.साडेबारा वाजता बस पन्क्चर झाली,एक तास मोडला.दुपारी दोन वाजता हरदा येथे पोहोचलो.
कोर्टाजवळील हॉटेल राघव मध्ये चेक इन केले.दोन दिवस येथेच राहाणार आहोत कारण सोमवारी २३ जानेवारीला स्नानदानादिची सोमवती-मौनी अमावास्या आहे,यावेळी नर्मदास्नानाचा योग आला आहे. अन्नपुर्णा भोजनालयात भोजन. विश्रान्ती.
आज लवकर उठलो नाही. सावकाशीने सर्व आवरले स्नान पुजाआरती झाल्यावर नास्ता करुन रेल्वेस्टेशनवर गेलो,दिल्लीला जाण्यासाठी तिकिट मिळाले नाहीच अर्थात ते अपेक्षितच होते.आता परिक्रमा पुर्ण झाल्यावर तात्काळ सेवाच करावे लागणार असो. खान्ड्व्याला जाण्यासाठीही सुटेबल गाडी नाही त्यामुळे बस शिवाय पर्याय नाही.
सन्ध्याकाळी गोन्दवलेकर महाराजानी बान्धलेले श्रीराम मन्दीर बघायला गेलो.छान मन्दीर आहे. श्री. गोडबोले व्यवस्थापक आहेत.
जितेन्द्रशास्त्रीना ओम्कारेश्वरला फोन केला,ते म्हणाले पन्चवीस तारखेला येऊन गजाननमहाराज भक्तनिवासात उतरा सव्वीस तारखेला सकाळी सन्कल्पपुर्ती करु. वा! छानच झाले,सव्वीस जानेवारी,माघातील शुद्धचतुर्थी मोरयाचा जन्म दिवस मोठ्या पवित्र दिवशी परिक्रमा पुर्ती होणार ही मोरया आणि नर्मदामैय्या यान्चीच क्रूपा.
आज सोमवार २३ जानेवारी. सोमवती-मौनी अमावास्या. लवकर उठून सारे आवरुन बसस्टॉपवर गेलो हन्डियाला जाणार्या बसला खुप गर्दी होती पण आज मेळा असल्याने बस भरपुर होत्या, चौथ्या बसमध्ये जागा मिळाली मला बसायला,हे उभेच राहिले.
हन्डियाला नेमावरला जोडणार्या पुलाखाली नवीन घाट आहे. थन्डी खुप आहे पण मैय्याचे पाणी सुखद उबदार. स्नान केले.रिद्धेश्वराचे दर्शनाला गेलो. हे मन्दिर पुरातन आहे. पान्डवानी बान्धले असे म्हणतात.नेमावरच्या सिद्धनाथमन्दिरापेक्षा लहान आहे.
या बाजुने मैयाचे नाभिकुन्ड जास्त स्पष्ट दिसत होते परिक्रमेत असल्याने अर्थातच तिकडे जाता येणार नव्हते.वसुन्धरा आश्रम पाहिला.काशीवाले बाबा आश्रमातुन शिक्का मारुन घेतला.परिक्रमेतील हा शेवटचा शिक्का. आश्रमातील बाबान्चे पोट दुखत होते,त्याना गोळी दिली आणि काही गोळ्या लिहुन दिल्या. त्याना बरे वाटले.
हन्डियाहुन परत येताना एक अतिशय भयानक दुखःद घटना बघितली.एका हिरोहोन्डा मोटरसायकलवरील दोघाना अज्ञात वाहनाने उडवले होते.एक जण डोके फुटुन जागीच गेलेला होता,दुसर्याच्या दोन्ही पायाना मल्टिपल फ्र्क्चर झाली होती दोघेही अगदी तरुण दिसत होते.गेलेला तरुण कपड्यावरुन मोठ्या घरचा दिसत होता आणि दुसरा बहुदा त्याच्याकडे काम करणारा मजुर असावा. आज सोमवती अमावास्या त्यातच नर्मदाकिनारी मरण आले होते तो आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे कैलासाला गेला,मोक्ष मिळाला. पण मागे राहिलेल्या त्याच्या कुटुम्बियान्चे काय?
आज माघ शुद्धप्रतिपदा. पालीला मोरयाच्या{बल्लाळेश्वर} जन्मोत्सवाला सुरुवात झाली.सर्वच अष्टविनायक स्थानी उत्सव सुरु झाला. सकाळी स्नानपुजा आटपुन बसस्टॉपवर आलो. पाचच मिनिटात खान्डव्याची बस मिळाली.बस चान्गली होती सामान व्यवस्थित ठेवता आले. नेहेमीप्रमाणे बस वेळेवर सुटली आणि गावाबाहेर येउन थाम्बली. सर्व बस भरल्यावरच सुटली.रस्ता चान्गला होता पण तरीही थाम्बत थाम्बत खान्डव्याला पोहोचायला दुपारचा एक वाजला.
खान्डवा येथे रेल्वेस्टेशनसमोर पार्वतीबाई धर्मशाळेत उतरलो्. ही धर्मशाळा १९२१ साली बान्धलेली असुन खुप मोठी आहे.सन्ध्याकाळी किशोरकुमारचे स्मारक पाहिले,छान बगिचा आहे. किशोरकुमारची प्रसिद्ध् गाणी वाजत असतात. पण त्यान्चे घरमात्र जिर्णावस्थेत आहे. दादा धुनीवाले यान्चे समाधीमन्दिर आश्रमही पाहिला.छान आहे,अखन्डरामधुन, अन्नछत्र,व्रुद्धाश्रम आहे.
रेल्वेस्टेशनवर जाऊन तात्कालसेवा तिकिटाची चौकशी केली,उद्या २५ तारखेला सकाळी २७च्या मन्गलाएक्सप्रेसचे तिकीट मिळेल कारण गाडीच्या सुटण्याच्या आदल्या दिवशी तिकीट काढता येते.२७ला खान्डव्याला येणारी मन्गला २५ला रात्री एर्नाकुलमहुन सुटेल म्हणून तिचे तिकीट मिळेल.चला,आमचा प्रॉब्लेम सुटला उद्या तिकीट काढून ओम्कारेश्वरला जाता येईल मैय्या! खरच तुलाच काळ्जी तुझ्या लेकरान्ची. नर्मदे हर!
सकाळी लवकर ति़किटाला नम्बर लाउन उभे राहिलो.आठ वाजता तिकिट मिळाले. सर्व आवरुन बसस्टॉपवर आलो. इन्दुर बस लागली होती बसलो.सनावदला आल्यावर ही बस मोरट्क्क्याला मैय्या क्रॉस करेल म्हणून बदलली आणि अन्जरुद कोठी मार्गे ओम्कारेश्वरला जाणारी बस घेतली. ही बस एकरोटी आश्रमावरुन ओम्कारेश्वरला आली त्यामुळे मैय्या उजव्या हातालाच राहिली.
गजाननमहाराज भक्तनिवासात आसन लावले. लगेच भोजन आणि विश्रान्ती. सन्ध्याकाळी जितेन्द्रशास्त्री यान्चा भाऊ देवेन भेटायला आला. उद्या सकाळी साडेनऊ वाजता सन्कल्पपुर्ती पुजा करायची आहे.
सकाळी लवकर नर्मदा स्नान करुन आलो. गजाननमहाराजान्चे दर्शन घेतले. खोलीत आल्यावर कुपितिल नर्मदामैय्याची पुजा आरती केली. आता केलेली पुजा आरती पुन्हा परिक्रमेला येईपर्यन्त्ची अखेरची आरती. आता मैय्याच्या घाटावर जाऊन हे जल थोडे तिच्या जलात,थोडे ममलेश्वरला आणि थोडे ओम्कारेश्वराला वाहायचे की परिक्रमा सुफलसम्पुर्ण होणार.
साडेनऊला गोमुख घाटावर गेलो,जितेन्द्रशास्त्री यान्ची वाट बघत एका उन्च खडकावर बसलो. मैय्याचे रुप सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होते.स्थानिक लोकान्ची रोजचीच लगबग चालू होती.कोणी स्नान करत होते,कोणी कपडे अगदी मनाई असतानाही साबण लावुन धुत होते. काही भक्त पर्यटक नौकाविहाराचा आनन्द लुटत होते. लहान मुले धडाधड मैय्याच्या पात्रात उन्चावरुन उड्या घेत पोहण्याचा आनन्द लुटत होती मैयाच्या वेगवान प्रवाहाची भिती त्यान्च्या मनात सुतरामही नव्हती कारण ती सर्व जन्मापासुनच तिच्या अन्गाखान्द्यावर खेळत बागडत आहेत. ती आई आहे त्यान्ची मग भीती कशी वाटेल.
दोन बस भरुन परिक्रमावासी आले होते परिक्रमा करण्यासाठी आलेले होते,त्या सर्वान्चा सन्कल्प होता होता आमच्याकडे येण्यास जितेन्द्रशास्त्रीना अकरा वाजले. मग पुजा झाली,आरती प्रसाद झाला. जितेन्द्रशास्त्री घरुनच कढईचा हलवा घेउन आले होते. खुप मुली मुले आमच्या भोवती जमली होती,सर्वाना प्रसाद दिला.कन्येला देण्याचा पोषाख जितेन्द्रशास्त्रीच्या मुलीसाठी त्यान्च्याजवळ दिला.त्यान्च्या सौभाग्यवती साठी आणलेल्या परिक्रमा प्रारम्भ आणि पुर्ती दोन्ही वेळच्या साड्या आधीच तिच्याकडे दिलेल्या होत्या. प्रकृतीअस्वास्थ्यामुळे ही परिक्रमा खुपवेळा वाहनाचा उपयोग करुन पुर्ण करावी लागली म्हणून ही झाली परिभ्रमण परिक्रमा.चातुर्मासानन्तर पुन्हा पायी परिक्रमेला येईन असे नर्मदामैय्याला सान्गितले. नन्तर ममलेश्वराला जल वाहिले. पुलावरुन पलीकडे जाऊन ओम्कारेश्वरालाही जल अर्पण केले.आणि सन्कल्पपुर्ति झाली.
भोजनप्रसाद घेतल्यावर रिक्षाने मोरटक्कामार्गे खेडीघाटला श्रीराममहाराजान्च्या समर्थकुटी आश्रमात आलो.महाराजान्चे दर्शन झाले. त्याना बघितल्यावर सम्पुर्ण पायी परिक्रमा झाली नाही म्हणून मला खुप रडू कोसळले,त्यानी माझी समजुत घातली,आणि पुन्हा निघा चातुर्मासानन्तर परिक्रमेला असे म्हणाले. आशीर्वाद दिला.
तिथे ठेवलेले आमचे काही सामान घेउन पुन्हा एकदा महाराजाना वन्दन करुन निघालो. बडवाहला धर्माधिकारी मावशीना भेटून परत भक्त निवासात आलो. उद्या ओम्कार पर्वताची परिक्रमा आणि माझे परिक्रमेबद्दलचे मनोगत सान्गुन ही लेखमाला पुर्ण करेन.
रिद्धेश्वरासमोरचा नंदी हांडिया
रिद्धेश्वर मंदिर हांडिया
क्रमशः
.
प्रतिक्रिया
25 Sep 2012 - 4:13 pm | sagarpdy
एव्हढ्यात संपली ?!!
25 Sep 2012 - 5:16 pm | यशोधरा
संपलीही परिक्रमा?
25 Sep 2012 - 7:50 pm | राही
परिक्रमा मालिका संपूर्ण वाचली. आवडलीही. एव्हढ्या दीर्घकाळातल्या कष्टमय यात्रेसाठी किती पूर्वतयारी करावी लागली असेल त्याच्या कल्पनेनेच छाती दडपून गेली. चालण्याचा सराव तर केलाच असेल. शिवाय शारीरिक तंदुरुस्तीसाठी काळजी घ्यावी लागली असेल. कितीजणांचे पत्ते, संपर्कक्रमांक आधीच गोळा करून ठेवावे लागले असतील. या संदर्भवह्या सांभाळणे हेही एक जोखमीचे काम. खरे तर अनेक ठिकाणी फक्त एक दोन दिवसांचा मुक्काम. त्यात पूजा-अर्चादि नित्यनेम. रोज सामान सोडायचे, आवरायचे, बांधायचे. वस्तू हरवण्याची, विसरण्याची खूपच शक्यता. किती ठिकाणी मोबाइल्-सिग्नल मिळत नसतील, चार्जिंगची सोय नसेल, तितका वेळ मिळत नसेल,आपला फोन लागेल तेव्हा समोरचा माणूस भेटेलच असे नाही. काही वेळा निराशाही पदरात पडत असेल. ही सर्व अवधाने बाळगून शांत मनाने नित्यक्रम आचरणे यासाठी मनाची स्थिरता आणि धैर्य (पेशन्स) असणे आवश्यकच. या सर्वातून तावून सुलाखून निघून आपली परिक्रमा पूर्ण झाली (मिपावर होणार आहे) याबद्दल अभिनंदन. यापूर्वी नर्मदेविषयीची आणि परिक्रमेची बहुतेक सर्व पुस्तके वाचलेली आहेत. कुठे कधी हृदयाचा ठाव घेणारी गोनींची साहित्यिक, तरल शैली, कुठे कधी कुंट्यांचे आध्यात्मिक अनुभव, कुठे कुणा ठाकुरांचे अल्पाक्षरी स्वगत, कुठे कुणाच्या लांबच लांब जंत्र्या. या सर्वात तुमच्या लेखनातला साधेपणा आणि प्रामाणिकपणा भावला. मनाचा निर्मळपणा प्रतीत झाला. अश्या निर्मळ मनाच्या संगतीत तुमच्या लेखमालेद्वारे काही दिवस रहाता आले हे आमचे भाग्य.
25 Sep 2012 - 8:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखिकेने अनेक भाग टाकलेत कोणताही भाग वाचला तर तो नवीनच वाटावा असा होता. माझं म्हणाल तर सर्वच भाग वाचले नाही. धरसोड करत करत वाचले. लेखिकेची चिकाटी आवडली. आवडते नावडते प्रतिसाद आलेत पण चिकाटी सुटली नाही, त्याचं मला कौतुक वाटतं. राहींनी आपल्या लेखांबद्दलच्या भावना अगदी नेमक्या शब्दात आणि उत्तम शब्दबद्ध केल्या आहेत. दोघींचेही आभार.
-दिलीप बिरुटे
26 Sep 2012 - 3:47 pm | खुशि
नमस्कार डॉक्टरसाहेब.
आपल्याला लेखमाला आवडली,खुप छान वाटले. परिक्रमा करण्यासाठी चिकाटीच लागते. आपल्या दोघान्च्या व्यवसायातही चिकाटीच लागते,कुठलीही सर्जरी ओपन आणि क्लोज असे करुन चालतच नाही,अगदी बारिकशी मलिग्नन्ट सेलही सुटता कामा नये तेव्हाच राडीकल सर्जरी होते खरे की नाही?
मनापासुन धन्यवाद.
26 Sep 2012 - 4:18 pm | अन्या दातार
अहो बै, ते प्रा.डॉ. म्हणजे "प्राध्यापक डॉक्टर" आहेत. एकेकाळी आंजावर शाब्दिक सर्जरी करायचे अर्थात, पण सध्या तेही कमी केलेय त्यांनी.
26 Sep 2012 - 4:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या दोघान्च्या व्यवसायातही चिकाटीच लागते,कुठलीही सर्जरी ओपन आणि क्लोज असे करुन चालतच नाही,अगदी बारिकशी मलिग्नन्ट सेलही सुटता कामा नये तेव्हाच राडीकल सर्जरी होते खरे की नाही?
अर्रे देवा, सर्जरी वगैरे मला काही माहिती नाही. मी आपला कला शाखेतला डॉक्टरेट आहे. पण, आपल्याकडे असलेली चिकाटी निसर्गतः म्हणा किंवा आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने आलेली म्हणा. आहे ती चिकाटी ग्रेट. :)
-दिलीप बिरुटे
26 Sep 2012 - 1:17 pm | मूकवाचक
+१
26 Sep 2012 - 3:49 pm | खुशि
नमस्कार मुकवाचक.
आपला +१ खुप आवडला. धन्यवाद.
26 Sep 2012 - 3:23 pm | खुशि
नमस्कार राही.
आपणाला माझे लेखन आवडले हे वाचुन खुप छान वाटले.आज आपल्या मनातील प्रश्न भावना याना अनुसरुन मी काही लिहिणार आहे,तो आमच्या परिभ्रमण परिक्रमेचा समारोप असेल. जरुर वाचा. पुन्हा एकदा मनापासुन धन्यवाद.
26 Sep 2012 - 3:21 am | priya_d
वन्दनाताई,
राहींनी म्हंटल्याप्रमाणे खरोख्ररच तुमच्या लेखनातला साधेपणा आणि प्रामाणिकपणा भावला. अतिशय चिकाटीने लिहीलेल्या तुमच्या लेखमालेतील प्रत्येक पुढ्च्या भागाची मी आतुरतेने वाट पहात असे. तुमच्या मनाचा मोठेपणा म्ह्णूनच तिरकस प्रतिसादांना प्रत्युत्तर न देता तुम्ही लिखाण चालू ठेवले. परिक्रमा करण्याची इच्छा असलेल्या अनेकांना तुमच्या लिखाणातून निश्चितच प्रेरणा मिळेल. लेखमाला संपत असल्याबद्दल अंमळ वाईट वाटत असले तरी पुढची परिक्रमा पायी करण्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. ईश्वर त्यासाठी तुम्हास स्वास्थ्य व शक्ती देवो.
अतिशय तरल व सुंदर लिखाणासाठी तुम्हास धन्यवाद!
26 Sep 2012 - 3:28 pm | खुशि
नमस्कार प्रिया.
आज परिक्रमा आणि माझ्या भावना लिहुन या लेखमालेचा समारोप करणार आहे. जरुर वाचा. आपण वेळॉवेळी मला प्रोत्साहन दिलेत म्हणून हेलिखाण झाले.धन्यवाद.
26 Sep 2012 - 1:14 pm | श्रीवेद
परिक्रमा करण्याची इच्छा असलेल्याना तुमच्या लिखाणातून प्रेरणा मिळेल. पुढची परिक्रमा पायी करण्यासाठी शुभेच्छा.
नर्मदे हर !
26 Sep 2012 - 3:34 pm | खुशि
नमस्कार श्रीवेदजी.
आपल्यासारख्यान्च्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने माझी ही परिक्रमा पुर्ण पायी होईल याची खात्री मनाला वाटते आहे. लेखमाला वाचलीत खुप छान वाटले.मनःपुर्वक धन्यवाद.
26 Sep 2012 - 1:22 pm | सस्नेह
परिक्रमा करू इच्छिणार्यांसाठी ही लेखमाला मार्गदर्शक ठरेल. सुलभ, सहज अन प्रांजळ वर्णन.