सकाळी सर्वच लवकर उठले कारण मुलाना शाळेत जायचे होते.तयार होउन मुले शाळेत गेली,जाताना आम्हाला बजावुन गेली आजी-आजोबा तुम्ही जायचे नाही बर का! आम्ही हो ला हो केले कारण आज मराठे कोथमिरे आले की कसे काय करायचे ते ठरणार होते. मुले गेल्यावर आमचे आन्हिक स्नान पुजा पाठ झाला तेवढ्यात श्री.गिरिधर गुप्ता आम्हाला त्यान्च्याकडे चहा नास्त्याला बोलावयाला आले. मग त्यान्च्याकडे गेलो. श्री. गिरिधर गुप्ता,श्री. दिनेश गुप्ता यान्चे कापड दुकान आहे.त्यान्च्याकडे परिक्रमावासीना सदाव्रत देण्याची परम्परा आहे. घरातील सर्व आबालव्रुद्ध आमच्या पाया पडले आम्ही अगदी सन्कोचुन गेलो होतो,परिक्रमावासीना नमस्कार करणे तिकडे पुण्याचे समजतात.
आम्ही तिथे बसलो असतानाच एक १५/२० परिक्रमावासीन्चा जत्था तिथे आला.सर्वजण नगर औरन्गाबाद कडचे मराठी बन्धु-भगिनी होत्या. त्यान्च्या बरोबर एक पुण्याचे विघ्नेश पाटील होते. त्यान्च्यापैकी काही जणाना डॉक्टरानी गोळ्या दिल्या.
ज्योत्स्ना स्वयम्पाक करुन पन्कज बरोबर मुलान्च्या शाळेत काही कार्यक्रम होता म्हणून गेली होती. मराठे कोथमिरे ११ वाजता आले,त्यान्चे स्नान पुजा झाल्यावर भोजन केले.बाकी मराठी मन्डळी पुढे गेल्याचे कळल्यावर मराठेनी लगेच निघण्याची खुप घाई केली, पुढे सगळा जन्गलाचा भाग असल्याने ग्रुपने प्रवास करणे श्रेयस्कर असे त्यान्चे म्हणणे पडले.मग डॉक्टरान्चा निरोप घेउन निघालो.
३कि.मि. वर सितावन होते. याच ठिकाणी वाल्मिकीमुनी यान्चा आश्रम होता.श्रीरामाने त्याग केल्यावर ल्क्ष्मण सीतेला येथेच सोडून गेला होता.याच ठिकाणी लव-कुश यान्चा जन्म झाला.त्यानी याच परिसरात श्रीरामाच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवुन बान्धुन ठेवला होता,श्रीरामान्बरोबर युद्ध करुन त्यान्चा पराभव केला होता. अशी ही बालवीर भूमि,पण सध्या इथे एक मन्दिर आहे.श्रीराम सीता लक्ष्मण यान्च्या सुन्दर सन्गमरवरी मुर्ती आहेत. टेकडीच्या खाली पाण्याचे कुन्ड आहे. हा सारा परिसर मध्यप्रदेश सरकारच्या वनविभागाच्या अखत्यारीत आहे. त्यानी एक साधू आणि काही कर्मचार्यान्ची नेमणूक केलेली आहे.पण ते परिक्रमावासीन्ची दखलही घेत नाहीत. खुप वेळा सान्गितल्यावर त्या साधु महाराजानी आमच्या वहीवर शिक्का मारुन दिला. माकडे मात्र भरपुर आहेत. असणारच त्याना सीतामाईचे रक्षण करावे अशी श्रीरामप्रभुन्ची आज्ञाच आहे.
थोडी फोटोग्राफी करुन निघालो.उन्हाचा तडाखा मी मी म्हणत होता.तशात मराठे यान्ची तुफानमेल निघाली त्यापुढे आमची विनोबा एक्स्प्रेस म्हणजे ..... आम्ही बरेच मागे पडू लागलो,कोथमिरेही थकत होते त्याना आम्हाला सोडून पुढे जाववत नव्हते.शेवटी मीच त्याना पुढे जा असे सान्गितले.
उन्हामुळे माझी तब्येत बिघडायला लागली होती,माझे डोके खुप दुखायला लागले होते.१२कि.मि. वरील रतनपुरला पोहोचलो तेव्हा चार वाजायला आले होते.मराठे कोथमिरे चहा घेउन पुढे जाण्यास तयार होते.आम्हाला पाहिल्या बरोबर मराठे लगेच पुढे निघाले कोथमिरेन्चा पाय निघेना,आम्ही त्याना पुढे जा आमची चिन्ता करु नका असे सान्गितले.मोठ्या नाईलाजाने ते गेले. मी तिथेच एका घराच्या ओट्यावर पडले.मला चान्गलाच ताप भरला होता. नुकतीच तापातुन उठल्यावर लगेच उन्हातान्हा तुन चालण्याची घेतलेली ही मेहनत मला महागात पडणार बहुतेक असे वाटायला लागले.
चहा घेतला.आणि विचारान्ती परत पिम्परीला डॉक्टरान्च्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. रतनपुरचा सरपन्च राजेश देवडा आणि त्याचा मित्र ग्रामपन्चायतीचा सचिव प्रकाश चोयल हे आम्हाला मोटारसायकलवरुन पिम्परीला सोडायला आले.अर्थात आम्ही परत येत अस्ल्याचा डॉ. ना फोन केला.
घरी गेल्या गेल्या ज्योत्स्नाने चहा बिस्किटे दिली,डॉक्टरानी गोळी दिली.डॉक्टर म्हणाले मी म्हणणारच होतो तुम्हाला की उन्हाचे जाऊ नका,पण मराठे तुमचे सहकारी चला म्हणाले म्हणून. थोड्यावेळाने ताप उतरला.रात्री थोडी खिचडी खाल्ली.उद्या बसने नेमावरला जायचे असे ठरवले.
मध्यरात्री दोन मोटरसायकलस्वार अपघात झाल्याने आले.त्यान्च्या मोटरसायकलला एक रानडुक्कर आडवे आले होते.त्यान्चे ड्रेसिन्ग करायला डॉक्टराना मदत केली,एकाच्या डोक्याला टाकेही घातले,तेवढीच सेवा माझ्या हातुन मैय्याने घडवुन घेतली.क्रमशः
प्रतिक्रिया
3 Sep 2012 - 8:20 am | निनाद
तुम्ही सर्जन किंवा डॉक्टर आहात असे दिसते.
तरी तुमच्या लेखनात कुठेही अहमन्यता दिसून येत नाही!
इतक्या साधेपणा ने तुम्ही हे सर्व लिहित आहात.
लेखन ओघवते आहे आणि आवडतेही आहे.
तुम्ही फोटो काढलेत. ते नक्की दाखवाल...
3 Sep 2012 - 9:05 am | यशोधरा
+१
4 Sep 2012 - 5:45 am | स्पंदना
त्या नर्स म्हणुन काम करीत होत्या. एक मुलगी आहे. जी लग्न होउन सुखात आहे. या दांपत्यान संसाराची सारी जबाबदारी पार पाडली व आता दोघेमिळुन मस्त फिरताहेत.
4 Sep 2012 - 7:10 am | निनाद
माहिती बद्दल धन्यवाद अपर्णा!
खरच मस्त फिरत आहेत... :)