पिपल्याबुजुर्ग काहीजण यालाच पितामली म्हणतात.आम्ही राम मन्दिरात राहिलो होतो.येथे पिप्पलेश्वरतिर्थ आहे. सकाळी लवकरच चालायला सुर्वात केली कारण खेडीघाटला आज पोहोचायचेच होते.धारेश्वर{दारुकेश्वर तीर्थ},सेमल्दा;येथे मनकामेश्वरमन्दीर आहे. यालाच गन्गातखेडी असेही म्हणतात.य ठिकाणी वर्षातुन एकदा गन्गामाता काळ्या गाईच्या रुपाने येउन नर्मदा स्नान करुन स्वतः शुद्ध होउन पान्ढर्याशुभ्र गाईच्या रुपाने परत जाते अशी आख्यायिका आहे. वैशाख पौर्णिमेला ती येते असे म्हणतात. म्हणुन हे स्थान गन्गाप्राकट्य स्थान म्हणुन ओळखले जाते. विमलेश्वर या ठिकाणी चन्द्रेश्वर मन्दिरात भलीमोठी घन्टा आहे. तिचे वजन सोळामण आहे असे समजले. रामगड-रामपालघाट येथे रामकुटीर आश्रम खुप सुन्दर आहे.मार्कन्डेय सन्यास आश्रमही आहे. येथे पोहोचेपर्यन्त दुपारचे तीन वाजले होते आज सकाळपासुन जवळ असलेली बिस्किटे आणि चहाच फक्त घेतला होता.२१कि.मि. चाल झाली होती .उशीर झाला असल्याने भोजनाचे कसे विचारावे असा प्रश्न आम्हाला पडला होता.श्रीराम दर्शन करुन थोडावेळ बसुन पुढे जाऊ खेडीघाट फक्त तीनच कि.मि. आहे असे ठरवले,पण मैय्या आपल्या लेकराना थोडिच उपाशी राहू देईल. एक माताजी आल्या; म्हणाल्या थक गये ना? यहा सदाव्रत मिलता है,मगर मैने दाल-तीक्कड बनाये है, आओ प्रसादी पाओ.डोळ्यात टचकन पाणी आले.खरच खुप भुक लागली होती आणि सदाव्रत मिळाले असते तरी चुल पेटवून स्वयम्पाक करणे मला कसे जमणार होते. ओम्कारेश्वरला भेटलेल्या साधुमहाराजान्ची आठवण झाली,ते म्हणाले होते बेटा आपको हमेशा बनाबनाया खानाही मिलेगा.आज त्याचा प्रत्यय आला.खरेच,आज पर्यन्त जेव्हा जेव्हा सदाव्रत घेउन भोजन बनविण्याचा प्रसन्ग आला तेव्हा तेव्हा कुणीतरी बनवुन दिले. नर्मदे हर!
चार वाजता पुढे निघालो.सहा वाजता खेडीघाटला श्रीराम महाराजान्च्या समर्थकुटी आश्रमात पोहोचलो,वाटले आपण आपल्या घरीच आलो. महाराज काहीलोकाना घेऊन बसने नर्मदापरिक्रमेलाच गेलेले होते.गरुडेश्वरला असताना त्यान्च्याशी फोनवर बोलणे झालेले होतेच. श्री.आणि सौ. देशपान्डे त्यान्चा मुलगा धनन्जय हे व्यवस्था पाहात होते,त्याना महाराजानी आमच्या बद्दल सान्गितलेले होते. त्यानी भक्त निवासात आमची व्यवस्था केली व.महाराज चारएक दिवसात येतील तोपर्यन्त येथेच रहायचे असा महाराजान्चा निरोपही दिला.
श्रीराम महाराज यान्चे आडनाव इनामदार आहे. ते गोन्दवल्याचे राहाणारे असुन त्यान्च्या लहानपणीच त्यान्च्यावर गोन्दोवलेकरमहाराजान्चा अनुग्रह झालेला आहे. गोन्दवले येथे शालेय शिक्षण झाल्यावर त्यानी नाशिकला तपोवनात बारावर्ष तपोसाधना केली,नन्तर गुरुनी दिलेल्या आदेशानुसार तीन वेळा नर्मदापरिक्रमा केली आहे.
समर्थकुटी येथे श्रीराममन्दीर आहे. गोन्दोवलेकर महाराजान्च्या पादुका आहेत. मोठे भक्तनिवास आहे. प्रशस्त भोजनशाळा आहे. येथे सोवळे नेसुन स्वयम्पाक करतात. गोशाला आहे. गोन्दवलेकरमहाराजान्च्या स्वारीचा घोडा आहे. ध्यान मन्दीरात अखन्ड रामनामाचा जप चालतो. सर्व अनुग्रहीत भक्त आळीपाळीने श्रीराम जयराम जयजय राम हा जप करतात. मराठमोळे वातावरण आहे. पुजाविधि,आरत्या मराठीच असतात. महाराज काही व्रुद्धान्चाही विनामोबदला साम्भाळ करत आहेत. स्वतः त्यान्ची मुलाप्रमाणे सेवा करतात.शुभ्र केस दाढी असलेले श्रीराम महाराज साठीकडे झुकलेले हसतमुख प्रसन्नचित्त व्यक्तिमत्वाचे ग्रुहस्थ आहेत.
खेडीघाट हे नर्मदेच्या उत्तरतीरावरील तीर्थक्षेत्र आहे. येथुन काही अन्तरावर चोरलनदी आणि नर्मदा यान्चा सन्गम असुन दादा धुनीवाले,विरक्तकुटी-अवधुतेश्वर महादेव आश्रम हरिओम आश्रम वगैरे बरेच आश्रम आहेत. येथे दादा दरबार ट्रस्टचे मोठे धर्मादाय हॉस्पिटल असुन तेथे सर्वप्रकारच्या शस्त्रक्रिया अल्पदरात केल्या जातात. तसेच आय. सी.सी.यू. स्त्री बाल रुग्णसेवाही उपलब्ध आहेत.
मैय्या किनारी वासुदेवानन्दसरस्वती स्वामीन्चे तपस्या स्थळ आहे. पण देखभाली अभावी दुर्लक्षित आहे.खेडीघाट ते मोरटक्का जोडणारा नर्मदेवर मोठा पुल आहे. मोरटक्क्याहुन श्रीक्षेत्र ओम्कारेश्वर फक्त बारा कि.मि. दुर आहे. अर्थात परिक्रमेत असल्यामुळे आम्हाला सध्या तिकडे जाणे नव्हते. ह्या पुलापासुन थोड्या अन्तरावर एक पुल आहे. तो कशासाठी आहे ? अहो ! ओम्कारेश्वर धरणातुन कालव्यात सोडलेले पाणी यापुलातिल कालव्यातुन पलीकडे नेउन इन्दोरला नेले जाते. नर्मदेच्या पात्रावरुन नर्मदेचे पाणी वाहते,अशी गम्मत. क्रमशः
प्रतिक्रिया
24 Aug 2012 - 5:02 pm | स्पा
वाचतोय
24 Aug 2012 - 5:32 pm | इनिगोय
का..? :~
(ह घ्या...)
24 Aug 2012 - 6:44 pm | sagarpdy
एखादं तरी छायाचित्र टाका. एवढी अक्षरं लिहिलीत, एकही छायाचित्र नाही? नर्मदेच नसेल तर मुळा-मुठेच टाकलं तरी चालेल! नुसतं वाचायला लई कंटाळा आला आता! :P
26 Aug 2012 - 12:57 pm | खुशि
नमस्कार. भरपूर फोटो आहेत हो!पण मला ते कसे पोस्ट करायचे ते येत नाही. मी नाशिकची असल्याने मुळामुठाचे फोटो माझ्याकडे नाहीत नर्मदेचे आहेत.तुम्ही सान्गा सोप्या पद्धतीने फोटो कसे टाकायचे मग मी टाकेन.धन्यवाद.
26 Aug 2012 - 6:01 pm | पैसा
पुढे दिलेली लिंक वाचा आणि फोटो पोस्ट करा. समजा काही चुकलंच तर आम्ही मदत करू. पिकासा किंवा फ्लिकर वर फोटो असायला पाहिजेत. मग प्रॉब्लेम नाही.
http://www.misalpav.com/node/13573
25 Aug 2012 - 12:45 pm | मोदक
अनुस्वार = Shift + M
आणखी येवूद्यात.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
टोटल किती भागाचे टारगेट ठेवले आहे..?
सर्वांना शुभेच्छा.
25 Aug 2012 - 1:42 pm | अत्रुप्त आत्मा
@टोटल किती भागाचे टारगेट ठेवले आहे..? >>> काय रे टार-गट मुला ? तुला किति किलोमिटर ह्रायले असं विचारायचय का? ;-)
25 Aug 2012 - 1:57 pm | स्पा
खुशिताई
तुम्ही अशा कुजकट प्रतिक्रियांकडे लक्ष देऊ नका..
तुम्ही लिहित जा.. भरपूर लिहा
नर्मदे हर
25 Aug 2012 - 3:49 pm | अत्रुप्त आत्मा
हलकट स्पाजी माणसा ;-) तुझा कळफलक मांजर खावो :-p
26 Aug 2012 - 1:34 am | मोदक
>>>तुम्ही अशा कुजकट प्रतिक्रियांकडे लक्ष देऊ नका.
श्री (किंवा कुमार.. किंवा काहीही..) स्पा - तुम्हाला काय कुजके दिसले माझ्या प्रतिसादात?
प्रत्येक तयारीचा लेखक (उदा. खुशीताई) लेखमाला लिहीताना किती भाग लिहायचे / कुठे संपवायचे / संपवायचेच का? असे बरेच आखाडे बांधून लिहीत असतो.
एकूण किती भाग योजले आहेत हे विचारण्याचा हाच उद्देश आहे की परिक्रमेचे अजून किती भाग शिल्लक आहेत.. अजून कोणते कोणते अनुभव येवू शकतात वगैरे वगैरे गोष्टींची कल्पना असली की वाचन 'सुलभ' होते.
दृष्टी तशी सृष्टी अशी काहितरी म्हण माहिती आहे का?
25 Aug 2012 - 12:45 pm | मोदक
.
25 Aug 2012 - 10:44 pm | अर्धवटराव
श्रीराम महाराजांचे दर्शन घेतले तुम्ही... भाग्यवान आहात.
अर्धवटराव
25 Aug 2012 - 10:59 pm | मितभाषी
वाचतोय
और आंदो