आता समर्थकुटीत दोन तीन दिवस राहायचे आहे,कारण श्रीराम महाराजाना परिक्रमा पुर्ण करुन येण्यास तेवढा अवकाश आहे.आणि त्यानी ते येईपर्यन्त राहावे असे सान्गितले आहे.
पहाटे पक्षान्च्या मधुर किलबिलाटाने जाग आली. खुप प्रसन्न वातावरण आहे.प्रातर्विधी आटपुन स्नानासाठी घाटावर गेलो. चन्द्रप्रकाशात मैय्या मनमोहक दिसत होती.शीतल मधुर जल शान्तपणे झुळझुळ वाहात होते.भक्तजन स्नानासाठी जमत होते. नर्मदेहर जयघोष सुरु होता. हलकी गुलाबी थन्डी पडली होती. मैय्याचे जलमात्र सुखकर उबदार होते. परिक्रमेत पात्रात उतरुन स्नान करायचे नसते,काठावर बसुन ताम्ब्याने पाणी घेउन स्नान करायचे असते. नर्मदेहरचा घोष करत स्नान करत होतो,लोटेच्या लोटे पाणी घेउन सचैल स्नानाचा आनन्द वर्णनातीत आहे. बाहेर यायला मन तयारच होत नव्हते.पण झुन्जुमुन्जु होऊ लागले होते,पुर्वेला अरुणोदय होत होता,पुर्वा लालगुलाबी शालु परिधान करुन त्या भास्कराच्या स्वागतासाठी सलज्ज तयार झाली होती.मैय्याच्या जलावरची रुपेरी छटा जाउन लालसर गुलाबी छटा उमटू लागली होती. नाइलाजाने ओलेत्याने उगवत्या दिनकराला अर्घ्य देउन आश्रमाकडे परतलो.
आमचे आसन लावलेल्या हॉलमध्ये मैयाची पुजा आरती करुन मन्दिरात दर्शनाला गेलो. सर्वात वरच्या मजल्यावर श्रीराम लक्ष्मण सीता ,मधल्या मजल्यावर शिवलिन्ग,तळमजल्यावर गोन्दवलेकरमहाराजान्च्या पादुका आणि मोठा फोटो समोर भक्ताना बसण्यासाठी प्रशस्त जागा. तिथेच उभे राहुन पहाटे काकड आरती,सकाळची,माध्यान्ह,सन्ध्याकाळची धुपारती,रात्रीची शेजारती करतात.
तिथेच मागच्या बाजुला एक ध्यानमन्दिर आहे,तिथे अनुग्रहीत भक्त { श्रीराम महाराजान्कडून ज्यानी अनुग्रह घेतला आहे असे} आळीपाळीने नामस्मरण जप करायला बसतात.
दर्शन घेउन आम्ही त्या हॉलमध्ये बसलो. हॉलमध्ये मन्द प्रकाशाचा दिवा होता,समोर महाराजान्च्या पादुकान्पुढे समई शान्तपणे तेवत होती.फोटोला घातलेल्या ताज्या सुगन्धी फुलान्च्या हाराचा आणि पादुकान्वर वाहिलेल्या फुलान्चा तसेच लावलेल्या उदबत्त्यान्चा सुगन्ध वातावरण अधिकच प्रसन्न करत होता. आम्ही डोळे मिटुन शान्त बसुन नामस्मरण करत होतो.
मिटल्या डोळ्यान्पुढे परिक्रमेची आतापर्यन्तची वाटचाल सरकत होती.मी परिक्रमा का सुरु केली,सुखीसन्सार आहे. चान्गली नोकरी आहे. हे सरकारी नोकरीतुन सेवानिव्रुत्त झाले आहेत.एकुलतीएक मुलगी तिच्या सासरी सुखात आहे. आमची उभयतान्ची शरीर प्रकृती निरोगी आहे. म्हणजे सर्वकाही उत्तम आहे.म्हणजेच सन्सारासाठी मैय्याकडे काही मागण्याची आवश्कता मोरयाच्या क्रुपेने नाही. काही मागण्यासाठी परिक्रमा सुरु केली नाही.वीस-बावीस वर्षापुर्वी सटाण्याच्या अहिरेगुरुजीन्चे नर्मदापरिक्रमा हे पुस्तक वाचले आणि मैय्याच्या प्रेमात पडले.तेव्हापासुन रोज परिक्रमा करायची आहे असे म्हणत होते.या वर्षी योग आणला मैय्याने.
दरवेळी रेल्वे प्रवासात होशन्गाबादला मैय्याचे होणारे भव्यदिव्य सुन्दर दर्शन परिक्रमेची ओढ वाढवत असे.मग श्रावण महिन्यात ओम्कारेश्वरला गेलो तिथले स्वच्छ सुन्दर आणि भव्य श्रीगजाननमहाराज देवस्थान,भक्तनिवास. नर्मदामैय्याचा अहिल्याबाई होळकर यानी बान्धलेला गोमुख घाट,ब्रम्हपुरी मधला लाम्बलचक आधुनिक घाट. मैय्याच्या उत्तरतीरावरील ओम्कारेश्वर आणि दक्षिण तीरावरील ममलेश्वर प्रत्यक्षात दोन वेगवेगळी मन्दिरे असलेले एक ज्योतिर्लिन्ग,ओम्कारेश्वर परिक्रमेचा बान्धीव मार्ग आणि त्यावर लिहिलेले श्रीमदभग्वत्गीतेचे अठरा अध्यायान्चे स्तम्ब.दाट जन्गलझाडी,नर्मदा-कावेरी सन्गम,परिक्रमा मार्गातील ॠणमुक्तेश्वर,गौरीशन्कर, लम्बे हनुमान{झोपलेल्या अवस्थेतील हनुमानमुर्ती} ही मन्दिरे सर्वच खुप सुन्दर्ए सर्व पाहुन याचवर्षी परिक्रमा करायची असे ठरवणे त्यासाठी फक्त याच वर्षी येणारा ११/११/११ हा योग साधुन सकाळी बरोबर११वाजुन ११ मिनिटानी परिक्रमा उचलणे { परिक्रमेची वाटचाल सुरु करणे} असे सगळे सगळे डोळ्यापुढुन सरकत होते,किती वेळ गेला हे समजलेच नाही. क्रमशः
प्रतिक्रिया
26 Aug 2012 - 8:30 pm | इरसाल
जो तुम्ही एक एक करुन भाग टाकत आहात त्या ऐवजी दोन भाग एकत्र करुन टाका.
26 Aug 2012 - 8:45 pm | पैसा
आणि फोटो टाकायचा प्रयत्न करा. आम्ही मदत करू.
26 Aug 2012 - 9:35 pm | प्रचेतस
+१
लिहीत रहा, वाचत रहा.
26 Aug 2012 - 10:14 pm | स्पा
आजचा भाग मस्तच ..
वाचतोय
फोटो नाही टाकलेत तरी हरकत नाही..
27 Aug 2012 - 6:23 am | अत्रुप्त आत्मा
@आजचा भाग मस्तच ..
वाचतोय>>> अस्सं काय??? :-D
नर्मदे हर... आणी आधी या, खोट्या प्रतिक्रिया देणाय्रा बोक्याला धर... ! ;-)
27 Aug 2012 - 9:42 am | स्पा
खोट्या प्रतिक्रिया देणाय्रा बोक्याला धर..
अरेरे खोटे आरोप
.. नर्मदा मैया तुमचं भल आणि रक्षण करो .....
27 Aug 2012 - 4:18 am | priya_d
खुशीताई
खुपच छान. तुम्ही नर्मदा परिक्रमा का व कशी सुरु केली तसेच त्यामागची प्रेरणा याबाबतचे लेखन खरेच प्रोत्साहन देणारे आहे. दोन वर्षांपूर्वी श्री.जगन्नाथ कुन्टे यांचे 'नर्मदे हर' अचानकपणे हातात आले आणि ते वाचल्यापासून परिक्रमेची ओढ लागली आहे. अजूनही संसार+मुले या जबाबद-या असल्याने त्या पूर्ण होण्याची वाट पहात आहे. तोपर्यत परिक्रमबाबत जे काही वाचायला मिळेल तोच आनंद मानून मैय्याच्या क्रुपेसाठी मनोमन धन्यवाद निघतात. परिक्रमेची तीव्र इच्छा जाग्रुत ठेवण्यासाठी आपल्यासारख्यांचे लेखन अतिशय उद्बोधक आणि प्रोत्साहक आहे. त्यासाठी आपणाही मनःपूर्वक धन्यवाद.
असेच लिहीत रहा. पुलेशु.
प्रिया.
27 Aug 2012 - 7:13 am | स्पंदना
नर्मदे हर!
तुम्ही जे मनातल लिहिलत ते आवडल.
6 Sep 2012 - 1:53 am | शुचि
११/११/११ ११:११ - क्या बात है!!
फारच आवडते आपली लेखमाला