प्रचन्ड थन्डी आहे. स्नानासाठी घाटावर गेलो, मैय्याचे पाणी सुखद ऊबदार होते. स्नान तर छान झाले पण नन्तर दातावर दात वाजायला लागले. पटकन आश्रमात परतलो. दोन स्वेटर चढवले शाल गुन्डाळून घेतली तेव्हा कुठे बरे वाटले. थोड्यावेळाने पुजा आरती करुन बाहेर टपरीवर जाऊन गरम गरम चहा घेतला कारण आश्रमात चहा सात नन्तर मिळतो,आश्रमाच्या गाई आहेत त्यान्चे दुध काढणे झाल्याशिवाय चहा कसा मिळणार? असो.
आठ वाजता सन्तोष यादवला फोन केला आम्ही तयार असल्याचा. साडेआठला तो आला. त्याने प्रथम ७कि.मि. वरील कपिलधाराच्या स्टॉपवर नेले तिथुन २कि.मि. जन्गलातुन पायवाटेने चालत कपिल धाराला गेलो. या ठिकाणी कपिलमुनिनी तपश्चर्या केली,येथे नर्मदामैय्या जवळ जवळ ६०/७० फुटा वरुन खोल दरीत उडी घेते त्यामुळे येथे बाराही महिने कोसळत असलेला सुन्दर धबधबा आहे. कपिलमुनी यान्ची कुटी असुन तिथे तेव्हापासुन म्हणजे तीन युगान्पासुन पेटती असलेली अखन्ड धुनी आहे.{शिर्डी येथे आहे तशी} मध्यप्रदेश सरकारने तिथे व्हू पॉइन्ट रेलिन्ग,बसण्यासाठी बाकडी वगैरे करुन तयार केलेला आहे. शान्त निसर्गरम्य स्थान आहे. त्याच्याच पुढे दाट जन्गल झाडीतुन पायवाटेने काही ठीकाणी पायर्या उतरुन दुध धाराला गेलो. या ठिकाणी दुर्वासमुनीनी तपस्चर्या केली त्यावेळी ते काहीच खात नसत म्हणुन मैय्या त्यान्च्यासाठी आपल्या पाण्याचे दुधात रुपान्तर करुन देत असे अशी आख्यायिका आहे. अजुनही सकाळी दहा वाजेपर्यन्त पाण्याचा रन्ग दुधासारखा पाण्ढरा असतो. आम्ही तेथे पोहोचलो त्यावेळी दहा वाजायला आले होते,पाण्याचा रन्ग पान्ढरा दिसत होता पण ओन्जळीत पाणी घेतले ते पाण्यासारखेच नितळ होते,तेथे पाण्याच्या प्रवाहाला वेग आहे साधारण दहा-पन्धरा फूट उन्चीवरुन दोन धारात तो धबधबा कोसळत असतो त्यामुळे जो फेस निर्माण होतो त्यामुळे लाम्बुन बघताना दुधासारखा पान्ढरा रन्ग दिसत असावा. दू धारा म्हणजे दोन धारा असाही एक अर्थ आहे. तिथे एक कमी उन्चीची पण आतमध्ये बर्यापैकी मोठी गुहा आहे. तिच्यात दुर्वासमुनीन्ची एक मुर्ती आहे ती इतकी हुबेहुब आहे की प्रथम दर्शनी खरोखरीच कुणी साधू तिथे बसले आहेत असे वाटते. एक शिवलिन्गही आहे. याच मार्गावर रामक्रुष्णमिशनचे केन्द्र आहे त्यात एक दवाखाना चालवला जातो.मोफत सेवा आहे. राहण्याचीही सोय आहे. तिथे असलेल्या स्वामीन्शी बोलत असताना ते म्हणाले नर्मदामैय्याच्या पाण्याचे प्रुथ्करण के असता त्यामध्ये गाईच्या दुधातील गुणधर्म आढळले आहेत. हे स्वामी सायन्सचे द्विपदवीधर असुन विवेकानन्दान्च्या विचाराने प्रेरीत होऊन सन्यास घेउन या ठीकाणी राहुन रामक्रुष्ण मिशनचे सेवाकार्य करीत आहेत. सेवा देणारे डॉक्टरही एम्.डी. आहेत.
घनदाट जन्गल, नाना रन्गान्चे पक्षी , रानफुलान्चा सुवास , हे सारे सुख अनुभवत चालत होतो, आमच्या समोरुन अगदी भर्कन चारपाच पान्ढरे करडे मोठे कापसाचे गोळे पळाले आधी समजलेच नाही काय गेले ते पण लाम्ब जाऊन त्यातला एक गोळा थबकला, ते गुबगुबीत ससे होते. इतका आनन्द झाला पण हे सार एका क्षणात घडले फोटो काही काढता आला नाही. मोठ्या मजेत इकडे तिकडे पाहात चालत होतो आणि धप ,धप्कन एक आवाज झाला, बघते तर काय हे जमिनीवर लोटान्गन घालुन पडलेले , मी जाम घाबरले धावले माझे हात-पाय लट लट कापत होते,बापरे ! आता याना जास्त लागले असेल तर या जन्गलात मी कसे घेउन जावू आश्रमापर्यन्त . पण मैय्याची क्रुपा. त्याना ऊठून बसायला मदत केली,ते बसले पायजमा गुडघ्याजवळ फाटला होता,खरचटले होते,तळहातालाही खरचटले होते. हळूच उभे राहिले , चला थोड्क्यात निभावले. हळू हळू चालत रिक्षापर्यन्त गेलो.
सन्तोष म्हणाला इथेच काही खाऊन घ्या पुढे कदाचित मिळणार नाही. कपिलधाराला सरबत घेतले होते इथे भाजीवडा खाल्ला.मध्यप्रदेशात पोहे जिलबी आणि खुपश्या मिक्स भाज्या घालुन केलेले डाळिचे हे चपटे मोठे भाजीवडे प्रसिद्ध आहेत. निघालो ज्वालेश्वरला.
१०कि.मि. वरील हे ज्वालेश्वर आहे मात्र छत्तीसगड राज्यात. हे पुरातन मन्दीर छोटेसेच आहे. पान्डवानी याची स्थापना केली असे म्हणतात. तिथुन रस्त्या पलिकडे थोडेसे चालल्यावर गेलो अमरेश्वर दर्शनाला मध्यप्रदेशात . येथील पान्डवकालिन मन्दीर काळाच्या ओघात नष्ट झाले होते,आता नव्या भव्य मन्दिराचे बान्धकाम चालु आहे. अमरेश्वराची पिन्डी ११फूट ऊन्च आणि ५१ टन वजनाची नर्मदेच्या पात्रातील शाळीग्राम शिळेची आहे. तिथुन निघाल्यावर सन्तोषने एका ठिकाणी रिक्षा थाम्बवली आणि म्हणाला,आप इधरसे पगदन्डीसे उतरकर चलिये आपको दुर्गाधारा,दुर्गा मन्दीरके दर्शन होन्गे ,मै रास्तेसे उधर आउन्गा, यहाका खुबसुरत नजारा पगदन्डीसे अच्छा दिखेगा. आम्ही उतरलो,खरोखरच तो पायर्या पायर्यान्चा मार्ग खुप सुन्दर होता,घनदाट जन्गल भर दुपारच्या उन्हाला आम्हाला त्रास देण्यासाठी खाली उतरायला जागाच नव्हती. तरीही काही काही चुकार किरणे येत होती. धो धो पाणी उन्चावरुन कोसळण्याचा आवाज येत होता पण कुठून? दिसत नव्हता पायर्या खोल दरीत उतरत होत्या,बरेच खाली उतरलो आणि एक छोटी नदी दिसली सन्तोषने तिचे नाव अमरगन्गा असे सान्गितले होते,अमरेश्वरमन्दिराजवळच तिचा उगम होता. थोड्या पायर्या आणखी उतरल्यावर दुर्गामन्दिराचा कळस दिसला,नन्तर एक वळण घेउन थोडे उतरलो आणि दुर्गाधारा धबधब्याचे दर्शन झाले. हा धबधबाही कपिलधारा प्रमाणेच आहे.फक्त कपिलधाराजवळ जायला घनदाट जन्गलामुळे जागा नाही. आणि इथे सहज जाता येते. धबधब्याजवळच दुर्गामन्दिर आहे. येथे दुर्गादेवीने राक्षससन्हारासाठी शक्ती मिळावी म्हणून तप केले . या ठिकाणी सोलरलाइटची व्यवस्था आहे. यात्रेकरुन्साठी राहण्याची व्यवस्थाही आहे. नन्तर पुन्हा रिक्षात बसुन धरमपानी येथे गेलो. इथे पुर्वी एक साधुमहाराज राहात असत पण मध्यप्रदेश सरकारने ही जागा ताब्यात घेतली आणि तेथे एक रेस्टहाऊस बान्धले,व्ह्यू पॉइन्ट तयार केला आहे. तिथुन अमरकन्टकच्या जन्गलाचा खुप दुरवरचा भाग शोणनदीचा प्रवाह द्रुष्टीपथात येतो.शेजारीच एक कुन्ड;धर्मकुन्ड आहे. डोन्गराच्या कपारीत कालीमातेची मुर्ती आहे. तिचा फोटो काढण्या साठी मला त्या खोबणीत कसेबसे बसता आले. हा सनराइज पॉइन्ट आहे पण आम्ही तिथे भरदुपारी गेलो होतो. अमरकन्टक दर्शन झाले परत म्रुत्युन्जय आश्रमात परत आलो.भोजनप्रसादाची वेळ टळून गेली होती म्हणून मग भोजनप्रसादासाठी भोजनालयाचा आश्रय घेतला. सन्तोष उद्या सकाळी सात वाजेपर्यन्त येतो असे सान्गुन गेला.आम्ही आश्रमात परतलो.
थोडी विश्रान्ती झाल्यावर उद्या करायच्या कढई साठी चौकशी करायला गेलो पण कमीतकमी दहा किलो रव्याचा शिरा म्हणजेच कढईची ऑर्डर घेतात म्हणून परत आलो. आश्रमाच्या बगिच्यात तेथेच सन्स्कृतचे अध्ययन करणारे गोपालस्वामी बसले होते त्यानी बोलावले म्हणून बसलो.भागवत,रामायण, भगवत्गीता यावर त्यानी बरेच सान्गितले. बोलता बोलता कढईचा विषय निघाला तेव्हा ते म्हणाले माईकी बगिचामे सौ दो सौ रुपये देना वो लोग कढाई कराते है,चला आमचा प्रश्न मिटलां. नर्मदे हर.
त्यान्चा निरोप घेतला तितक्यात काही महिला आल्या मला नर्मदे हर करुन म्हणाल्या,कल आपने रोटी बनानेमे हमारी मदत की तबसे बात करनी थी मगर सोचा आप इतनी पढी लिखी कैसे बोले? मी असे काहीच नाही सगळी समानच असतात एकाच नर्मदामैय्याची लेकरे असे म्हटल्यावर मग मनमोकळ्या बोलु लागल्या.
अमरकन्टक नगरपालिकेची कालच निवडणूक झाली होती आज मतमोजणी होऊन भा.ज.प. निवडून आले होते मोठ्या जल्लोशात मिरवणूक आश्रमात आली,गुलालाने आसमन्त रन्गीत झाला,आवारात असलेल्या झाशीच्या महाराणी लक्षुमीबाईन्च्या अश्वारुढ पुतळ्याला हार घालुन पेढे वाटले. आम्हालाही मिळाले. निवडून आलेल्या नगरसेवकान्शी स्वामीनी आमची ओळख करुन दिली ,महाराष्ट्रके अपनी महाराणीके देशसे आये है नर्मदामैय्याकी परिक्रमा कर रहे है. अभिमान वाटला महाराष्ट्रीयन असल्याचा.मध्यप्रदेशात थोरले बाजीराव,अहिल्यादेवी होळकर,महाराणी लक्षुमीबाई ,यान्च्या बद्दल प्रचन्ड अभिमान आणि प्रेम सर्वत्र दिसते आणि ते मराठी होते म्हणून इकडे मराठी लोकानाही मोठ्या आदराने वागवतात ,ह्याचा आम्हाला पदोपदी अनुभव आला ह्या परिक्रमेच्या काळात.
रात्री भोजनाला मुगाच्या डाळीची खिचडी होती,आज भोगी होती आपल्याकडे आजच्या दिवशी खिचडी वान्ग्याची भाजी तीळलावुन बाजरीची भाकरी असा बेत असतो. आम्हालाही भोगीच्या दिवशी खिचडी मिळाली. आता विश्राती. उद्या माईकी बगिच्यात नर्मदामैय्या उगमाजवळ मैय्या क्रॉस करुन पुन्हा दक्षिण किनार्याने परिक्रमा पुढे चालू.क्रमशः
प्रतिक्रिया
13 Sep 2012 - 6:35 pm | sagarpdy
नेहमीप्रमाणेच सुंदर लिखाण
13 Sep 2012 - 7:28 pm | यशोधरा
मला तुमचा प्रचंड हेवा वाटतो... ही परिक्रमा काय अनुभव असेल!
13 Sep 2012 - 7:55 pm | कवितानागेश
हे सगळे वाचून निदान अमरकंटकला तरी जाउन यावेसे वाटतय... :)
14 Sep 2012 - 12:33 am | श्रीरंग_जोशी
वंदनाताई अमरकंटक बद्दल वाचून बालपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या. मी चार वर्षांचा असताना आई वडिलांबरोबर बिलासपूर व भिलाईला नातलगांकडे गेलो होतो. अमरकंटक चा धबधबा, तिथली गुहा (घाबरून मी आत गेलो नव्हतो ; -)) आठवले.
लगोलगच भिलाईच्या मैत्री उद्यानातील जलविहार, दसऱ्याच्या दिवशी बिलासपूर ला गल्लोगल्ली बनविले जाणारे रावण व संध्याकाळचे त्यांचे दहन डोळ्यासमोर तरळून गेले.
फोटो - गूगल+ वर वंदनाताईंचे प्रोफाईल मिळाले त्यामध्ये खालील दोन अल्बम्स उपलब्ध आहेत.
14 Sep 2012 - 12:42 am | पैसा
लिंकसाठी धन्यवाद! आम्ही शोधून थकलो होतो!
14 Sep 2012 - 2:33 pm | खुशि
आपण शोधुन थकलो होता आणि मी माझे काय चुकते आहे म्हणून हैराण झाले होते. माझी लिन्क देते.पिकासा वेब .गुगल्.कॉम्/एल एच्/फोटो/केआय एम एम सी{ शेवटचे एम सी कपिटल} आज गमभन ची लिपिच चेन्ज होत नाही काय चुकते आहे कळत नाही. घ्या साम्भाळून वेडीला.
14 Sep 2012 - 7:31 pm | श्रीरंग_जोशी
वंदनाताई - इंग्रजीमध्ये लिहायचे असेल तर आणखी एक सोपा उपाय आहे. Notepad मध्ये इंग्रजी शब्द लिहायचे व ते इकडे मराठी मजकुराशेजारी पेस्ट करावे.
मराठी लिहिताना अनुस्वारासाठी 'M' वापरावा लागतो. जसे 'पांढरा रंग' हे शब्द लिहिण्यासाठी 'PaaMDharaa raMga' असे टंकावे.
त्याखेरीज दृष्टी लिहितीना 'R' चा वापर केल्यास मराठीत तो शब्द अचुकतेने लिहिता येईल, जसे 'dRuShTee' .
14 Sep 2012 - 9:06 pm | पैसा
श्रीरंग जोशीनी लिंक दिलीय तिथले सगळे फोटो पाहिले. छान आहेत.
14 Sep 2012 - 10:35 am | यशोधरा
फोटोंच्या अल्बम्सची लिंक दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!
14 Sep 2012 - 10:10 am | किरण शेलार
खुशि मैया ,
आपले लिखाण वाचुन प्रत्यक्श्यत नर्मदा परिक्रमा अनुभ्वित आहे.माझिहि खुप एचा आहे हा उपक्रम करन्याचि . मला मराठे शाहिचा एतिहास अभ्यासयाचि प्र्॑अच्नद आवड आहे. त्या अनुशगने एकदा रावेर्खेदिला गेलो होतो.पराक्रमि बाजिरावान् चि समाधि दर्शन घेउन आलो. तेवा तेथिल लोकन्चे जिवन जवलुन पहाता आले.
मग महेश्वरिचा अहिल्यदेविन्चा वाडा ,त्याचे सध्याचे वन्सन्ज यान्चिहि भेट घेतलि होति. श्रि खेत्र ओनकारेशवर चे दर्शन आनि मैयेचि आरतिहि अनुभवलि. बेदिया ,खर्गोन येथिल मिर्चि शेते पाहता आलि. थोरले बाजीराव,अहिल्यादेवी होळकर यन्चि समधि स्थाने पहुन आनि महेश्वर जवल एक परई़क्रमा करन्याचे भाग्य भेतले. खुप कहि आहे पन आपल्या लिखाना मुले ते सर्व परत आथवले.
असेच लिहित रहा. आनो आपले लिखान मि माझ्या आई-वदिलाना वाचवयास दिलेय.
सध्यातरि सह्यदि भतकनति चालु आहे. सर्व महिति बद्द्ल पुनहा एकदा आपनास सविनय प्रणाम !!!
नर्मदे हर !!
14 Sep 2012 - 2:02 pm | स्पंदना
नर्मदे हर!