तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-४०

खुशि's picture
खुशि in भटकंती
11 Sep 2012 - 3:12 pm

स्नान पुजा आरती करुन चेक आउट केले. समोरच असलेल्या बसस्टॉपवर गेलो,टपरीवर भाजीवडा चहा असा नास्ता केला. निवास मार्गे कुन्डम बस लागलेली होती,मिनि बस चान्गली होती.बसलो. नऊची बस बरोबर नऊला सुटली आणि बाहेर येउन उभी राहिली . हळू हळू लोक येत होते बसमध्ये बसत होते,पन्धराएक मिनिटे झाली बस निघाली साधारण २००मि. गेल्यावर परत थाम्बली. बराच वेळ झाला,घाई घाईने दोघीतिघीजणी आल्या बसमध्ये चढल्या, आज देर हो गयी दीदी ,कन्डक्टरने विचारले.जी. क्या करे? घरका कामकाज निपटाके आना पडता है भैय्याजी! दीदीने उत्तर दिले.बस निघाली,पुन्हा थाम्बली.पुन्हा वाट बघणे लोक येणे बस निघणे असे करता करता बस गावाबाहेर पडायला दहा वाजुन गेले.
रस्ता चान्गला होता. जन्गल होते पण घनदाट नव्हते. प्रत्येक स्टॉपला थाम्बत निवासला बस पोहोचली तेव्हा सकाळचे साडेअकरा वाजले होते. बस थाम्बली,आमच्या दोघान्शिवाय बाकी सारे प्रवासी उतरले,ड्रायव्हर-कन्डक्टरही गायब झाले. उन्हाचा चटका जाणवायला लागला होता.बराच वेळ झाला बस कधी निघणार? एका माणसाला विचारले,साडेबारा वाजता जाते असे त्याने सान्गितले.जवळचे पाणी सम्पले होते पण या आदिवासी भागात बिसलरीवॉटर मिळणे शक्य नव्हते. नाइलाजाने हापशाचे पाणी बाटलीत भरुन घेतले. आजारपण सुरु असताना असे पाणी पिणे योग्य नव्हते पण तहान खुप लागली होती प्यायले. एकदाचे साडेबारा वाजले पण ड्रायव्हर-कन्डक्टर साहेबान्चा कुठेच पत्ता नव्हता.
पन्धराएक मिनिटे गेली दुसरेच ड्रायव्हर-कन्डक्टर आले. लोकही आले बस सुरु झाली. २५/३० कि.मि. अन्तरावरच्या कुन्डमला पोहोचायला दुपारचे दोन वाजुन गेले. कुन्डम तालुका आहे,बर्‍यापैकी मोठे गाव असावे पण बसस्टॉप खुपच गचाळ आहे.एका दुकानाच्या फळीवर बसलो होतो,खुप भुक लागली होती पण काही खाण्यासारखे नव्हते म्हणून चहा-बिस्किटे घेतली. तीन वाजता एक बस आली पण ती मन्डला-महाराजपुर-दिन्डोरी मार्गे अमरकन्टकला जाणारी होती,मैय्या ओलान्डून जाणारी,त्यामुळे आम्हाला ती चालणार नव्हती. आम्हाला आज उमरियाला मुक्काम करुन उद्या अनुपपुर आणि परवा अमरकन्टक असाच प्रवास करावा लागणार होता.
नन्तर आलेल्या बसमध्ये जागा नव्हती पण पिशव्या वरती टपावर टाकुन कसेबसे बसमध्ये चढलो.मैय्याची कुपी असलेली शबनम पिशवी एका मुलीजवळ देउन कसेतरी उभे राहिलो. रस्ता चान्गला होता पण थाम्बत थाम्बत शाहपुरला चार वाजता पोहोचली. उमरियाची बस पाच वाजता होती. बसलो एका टपरीवर.
श्री.कुमार गुप्त्ता यानी चौकशी केली . आमच्यासाठी चहा सान्गितला. बोलता बोलता त्रम्बकेश्वरचा विषय निघाला म्हणाले, तेथे यात्रेकरुना लुबाडतात गन्गेचे तीर्थ देण्यासाठी सुद्धा पैसे घेतात.शरमेने मान खाली झाली कारण ते म्हणत होते ते सत्य होते.एवढ्या उन्च ब्रम्हगिरी,गन्गाद्वारला चढुन गेल्यानन्तर तीर्था साठी तिथले पुजारी पैसे दिल्याशिवाय पळीभर तीर्थही आपल्या हातावर देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.
श्री. कुमार गुप्ता यानी फोन करुन उमरियाच्या बसमध्ये दोन जागा रिझर्व केल्या. बस आल्यावर आमचे सामान बसमध्ये चढवले,एका तिकीटाचे पैसेही दिले.आणि म्हणाले तेवढीच मैय्याची सेवा.धन्य ती नर्मदामैय्या आणि धन्य तिची ही सेवाभावी लेकरे.
जन्गलच्या चान्गल्या रस्त्याने उमरियाला पोहोचायला सन्ध्याकाळचे सात वाजले.काळोख झाला होता बसस्टॉप गावा बाहेर होता रिक्षाही नव्हत्या बसच्या कन्डक्टर मुलाने सोबत केली,एक सायकल रिक्षा मिळवुन दिली.रूप हॉटेलमध्ये एक अगदी लहानशी रुम मिळाली,रात्रीपुरता निवारा मिळाला. खालीच एक गुरुक्रुपा भोजनालय होते तिथे थाळी घेतली. उद्या अनुपपुर. उमरियावरुनही अमरकन्टकसाठी रेल्वे असते पण अमरकन्टकचे रेल्वेस्टेशन पेड्रारोड हे मैय्या पार असल्याने आम्हाला चालणार नाही म्हणून उद्या अनुपपुर आणि परवा बसने अमरकन्टक.
लाइट नसल्याने उजाडेपर्यन्त थाम्बुन नन्तर प्रातर्विधी स्नानपुजा करुन चालतच रेल्वेस्टेशनवर गेलो.जवळच होते,समोरच बसस्टॉप होता पण काल काळोख पडल्यामुळे रिक्षा करावी लागली होती. अनुपपुरसाठी गाडी पावणेअकराची होती. तिकिट खिडकी नऊ वाजता उघडणार होती.बाहेरच बसलो थन्डी खुप पडली होती. स्टेशनच्या फलाटावर ऊन आले होते पण तिकीट काढल्याशिवाय आत कसे जाणार? नऊ वाजता खिडकी उघडली ति़कीट काढायला गेले तर तिकीट बाबू म्हणाले गाडीको देर है,धुपमे बैठना है बिना तिकीट अन्दर कैसे जाए ? मी विचारले. चलता है ते म्हणाले पण मी वह गैरकानुनी है असे म्हटल्यावर हसुन त्यानी तिकिट दिले. आम्ही आत जाऊन उन्हात बसलो.
गाडी वेळेवर आली आम्ही स्लिपरकोच मध्ये चढलो.गाडीला गर्दी नव्हती . आमच्या समोरच्या सीटवर आदिवासी विकास खात्यात ऑफिसर असलेले अजयसिन्ग बसले होते. गप्पा मारताना आम्ही परिक्रमावासी आहोत म्हटल्यावर त्यानी अनुपपुर मधील त्यान्च्या मित्राला फोन करुन हॉटेल गोविन्दम मध्ये आमच्यासाठी रुम बुक केली. दुपारी दोन वाजता अनुपपुरला पोहोचलो. अजयसिन्ग यानी रिक्षा करुन दिली.गोविन्दम हॉटेलला गेलो. हॉटेल खुपच सुन्दर आहे. स्नान पुजा करुन भोजन ग्रुहात गेलो.ते मात्र खुपच महाग होते.
सन्ध्याकाळी गाव पाहण्यासाठी गेलो.अनुपपुर जिल्हा आहे पण आदिवासी बहुल क्षेत्र असल्याने फारसे मोठे शहर नसावे. साधारण बाजारपेठेतच बसस्टॉप आहे. अमरकन्टकसाठी सकाळी साडेआठला बस आहे. दुपारी उशिरा जेवल्यामुळे रात्री फक्त दुध घेतले. उद्या अमरकन्टक.
सकाळी स्नानपुजा नास्ता करुन चालतच बसस्टॉपवर आलो. बस लागली होती,बसायला जागाही मिळाली. बस मध्ये काही परिक्रमावासीही होते.वेळेवर बस सुटली. गावा बाहेर पडताच दाट जन्गल सुरु झाले. थोड्याच वेळात घाट सुरु झाला. रस्ता चान्गला आहे. जसजसे वर चढत होतो तसतशी थन्डी वाढत चालली होती. घनदाट झाडान्मधुन हळूच सुर्यकिरणे डोकावत होती. पक्षान्चा किलबिलाट कानसुख देत होता. मधुनच माकडान्च्या टोळ्या इकडेतिकडे ह्या झाडावरुन त्या झाडावर झेपावत होत्या. वार्‍याच्या मधुनच येणार्‍या झुळूकेबरोबर रानफुलान्चा येणारा मन्द मन्द सुगन्ध मनाला उल्हासित करत होता. मधुनच एखाद्या खळखळणार्‍या झर्‍याचेही दर्शन होत होते. काही झाडान्वर मोठमोठी मधाची पोळी लटकत असलेली दिसली. उन्च डोन्गर, दाट जन्गलानी गच्च भरलेल्या खोल दर्‍या एकदा या बाजुला एकदा त्या बाजुला बस जसजशी वळणावरुन वळत असे तसतश्या होत होत्या. मजेत प्रवास चालु होता.वाटेत लहान लहान अनेक गावे लागत होती. पुष्पगढ हे एकच मोठे गाव लागले. हे पुर्वीचे सन्स्थान होते. राजवाडा आहे.
कालच्या त्रासदायक प्रवासानन्तर आजच्या सुखद प्रवासाने मन प्रसन्न झाले. साडेबारा वाजता अमरकन्टकच्या बसस्टॉपवर पोहोचलो. तिथे मार्गदर्शक नकाशा लावलेला आहे. त्यावरुन आश्रम एक कि.मि. अन्तरावरच आहेत ,नकाशा पाहण्याआधी रिक्षावाल्याने तीस रुपये मागितले होते आणि म्हणून पुढे निघालो होतो,नकाशा पाहिल्यामुळे फार लाम्ब नाही हे कळले. विनोबा एक्सप्रेस निघाली. प्रथम गुरुद्वारा आले पण तिथे चान्गली खोली नव्हती. पुढे निघालो कल्याण आश्रम खुप सुन्दर आहे पण त्याचे ऑफिस बन्द होते,पुढे निघालो म्रुत्युन्जय आश्रम भव्य आणि सुन्दरही आहे. तिथे परिक्रमावासीन्साठी कॉमन हॉलमध्ये मोफत राहण्याची सोय आहे तसेच पैसे भरुन स्वतन्त्र खोलीही मिळते. आम्ही पैसे भरुन खोली घेतली. आमची खोली तीसर्‍या मजल्यावर होती. खिडकीतुन मैय्या आणि खालच्या बगिच्यातील नयनमनोहर द्रुश्य दिसत होते. हातपाय धुवुन हे भोजनप्रसाद घेण्यास गेले.माझा चतुर्थीचा उपास असल्याने मी जवळ असलेला बटाट्याचा चिवडा खाल्ला.
सन्ध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. अमरकन्टक ला नर्मदामैय्याचाचे उगमस्थान असल्याने हे तीर्थक्षेत्रतर आहेच पण आपल्या महाबळेश्वर सारखे थन्डहवेचे ठीकाण आहे. त्यामुळे चान्गल्यापैकी हॉटेल्स वगैरे सोयीसुविधा आहेत. बर्‍यापैकी स्वच्छताही आहे. सन्तोष यादव ह्या मुलाची रिक्षा अमरकन्टक दर्शनासाठी ठरवली. उद्या कपिलधारा,ज्वालेश्वर वगैरे ठिकाणे दाखवेल आणि परवा मकर सन्क्रान्तीच्या मुहुर्तावर माईका बगिचा येथे मैय्याचा उत्तर किनारा ओलान्डून दक्षिण किनार्‍यावर जाऊन पुजा कढई करुन दक्षिण किनार्‍याने ओम्कारेश्वरकडे परिक्रमा सुरु . नवीन बान्धकाम चालु असलेले जैन मन्दिर पाहिले. मैय्याच्या मन्दिर समुहापर्यन्त गेलो पण ते कुन्ड दक्षिण किनार्‍यावर असल्याने आज तिथे जाता येणार नव्हते. येथे मैय्याला सुन्दर घाट बान्धलेला आहे,आमच्या म्रुत्युन्जय आश्रमासमोरच तो असल्याने खुप वेळ तिथे बसलो.
रात्री भोजनशाळेत थोड्या पोळ्या करण्याची सेवा केली. सायन्पुजा आरती झाल्यावर भोजनप्रसाद घेतला.आता विश्रान्ती. क्रमशः

प्रतिक्रिया

पुजारी पैसे दिल्याशिवाय पळीभर तीर्थही आपल्या हातावर देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.

पावती देतात का?
बाकी नेहमीप्रमाणेच सुंदर लिखाण, ओघवती लेखनशैली

अहो पावती कुठली,हाकलुन देतात जणू गन्गा गोदावरी त्यान्च्या पुर्वजानी त्याना आन्दण दिली आहे.

या लोकांना भर चौकात ....., जाऊदे.
पण अशा प्रकारे तीर्थ "विकत" घेऊन भ्रष्टाचार करावा आणि तेच पिऊन पुण्य लागावे अशी ईच्छा बाळगावी - किती मूर्खपणा आहे हा ?!

विजुभाऊ's picture

11 Sep 2012 - 3:39 pm | विजुभाऊ

तुमच्या चिकाटीला सलाम

सस्नेह's picture

12 Sep 2012 - 11:40 am | सस्नेह

कृपया फोटो टाका.
मदत हवी असल्यास खफ.वर लिहा.

पहिल्यापासून बरेच जण या धागाकर्तीला फोटो टाका असं म्हणताहेत. पण पूर्वीच्या परिक्रमावर्णनवाचनांनुसार अशा परिक्रमेत सुरुवातीला कुठेसे दरवडेखोर येऊन* सर्व सामान लुटतात आणि नेसत्या वस्त्रानिशी नि:संग होऊन पुढचा प्रवास करावा लागतो. हा जर परिक्रमेचा महत्वाचा आणि अपरिहार्य भाग असेल तर कॅमेरा कसा नेणार सोबत? आणि नेला तरी त्या सुरुवातीच्या (शूलपाणी किंवा तत्सम) ठिकाणापर्यंतचे फोटो निघतील आणि केमेरा जाईल चोरांकडे.. मग ते बघत बसतील फोटो.

(*परिक्रमा पूर्ण चालत केलेली नसली तरी लुटले जाण्याचा महत्वाचा टप्पा याही परिक्रमेत असणार असं गृहीत धरुन..)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 Sep 2012 - 3:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हल्ली लूटमार होत नाही असे विलासराव म्हणत होते.
आदिवासी प्रगत जगात सामील होत आहेत हळूहळू असे वाटते.

हल्ली लूटमार होत नाही असे विलासराव म्हणत होते.
आदिवासी प्रगत जगात सामील होत आहेत हळूहळू असे वाटते.

प्रगत झाले असतील तरी इन द्याट केस ऑल्सो परंपरा बंद नसावी पडत.. फार तर चोरलेल्या क्यामेर्‍यातले फोटो प्रिंट करुन दिलेल्या पत्त्यावर कुरियरने पाठवणे वगैरे सर्व्हिसेस सुरु झाल्या असतील..

पण परंपरा इज परंपरा.. वी आर लाईक द्याट ओन्ली...

त्यांनीच एकदा सांगितलं होतं, खूप फोटो काढलेत, पण अपलोड करायला जमत नाहीये. त्यावर मी आणि ५० फक्त आम्ही अपलोड करून देऊ असंही म्हटलं होतं, पण त्यांनी पिकासाची जी लिंक दिली ती मराठीत लिहिली होती त्यामुळे शोधता आली नाही. :( 'वन्दना परान्जपे' एवढ्यावरून मला शोधता आलं नाही.

५० फक्त's picture

13 Sep 2012 - 7:39 am | ५० फक्त

@ पैसातै, कुठे आहे ती लिंक ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2012 - 2:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. छान झाला आहे हा भाग.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

12 Sep 2012 - 6:28 pm | पैसा

यावेळेला जरा मोठा लेख आहे आणि वर्णनही आवडलं.

खुशि's picture

13 Sep 2012 - 3:17 pm | खुशि

नमस्कार.
पिकासा वेब अल्बम वन्दना परान्जपेज फोटोज अशी लिन्क आहे. सारी अक्षरे इन्ग्रजीत आहेत. बघा दिसतात का फोटो आणि दिसले तर टाका मिसळपाव वर. मी रोज प्रयत्न करते पण मला काही ते जमत नाही. मी कॉम्पुटरचे शिक्षण घेतलेले नाही.असेच आपल्या सारख्या सुह्रुदान्च्या मार्गदर्शनाने एकेक शिकत गेले अजुन शिकते आहे.मला फक्त माझ्या कामापुरते म्हणजे पोस्टीन्ग करणे ,बिल सबमिट करणे ,इन्डेन्ट टाकणे वगैरेच शिकवले होते . अहो माझ्या कॉम्प्युटर मध्ये इन्टरनेट आहे हे ही मला योगायोगाने आमच्या एका डॉक्टरने ते एकदा ओपन केले म्हणून समजले. अशी मी अडाणी . प्लीज. टाका फोटो.

हे पेज उघडल्यावर अ‍ॅड्रेस बार मध्ये जे काही येते ते कॉपि पेस्ट करा इथं, पाहु काही करता येतंय का ते.

गवि's picture

13 Sep 2012 - 4:12 pm | गवि

त्यांनी फोटोंना अपलोड झाल्यानंतर "पब्लिक" असं स्टेटस न देता "प्रायव्हेट" स्टेटसच ठेवलं असेल. त्यामुळे ते शेअर होऊ किंवा गूगलबाबाला सापडू शकत नसतील.