सकाळी स्नान पुजारती करुन भगवान गुरुदत्तात्रयान्चे दर्शन घेउन भालेराव यान्चा निरोप घेउन विनोबा एक्सप्रेस निघाली.काशिविश्वेश्वर,वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीन्चे दर्शन घेतले.जहागिरदार वहिनीनी दिलेला चहा घेउन त्यान्चा निरोप घेतला.थोड्याच वेळात छप्पन्नदेव मन्दिर आले.पुरातन शिवमन्दिर आहे. याच ठिकाणि आद्य श्रीशन्कराचार्य आणि मन्डलेश्वर यान्चा प्रसिद्ध वाद झाला अशी आख्यायिका आहे. पुढे गुप्तेश्वर महादेव मन्दिरात गेलो.येथे शन्कराचार्यानी मन्डलेश्वरपत्नी माता सरस्वती यान्च्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी परकाया प्रवेश करुन एका राजाच्या शरीरात एक महिना वास्तव्य करुन माता सरस्वतीच्या सान्सारिक प्रश्नान्ची उत्तरे देउन त्यान्चा वादात पराभव केला होता. जगद् गुरुनी परकाया प्रवेश केला असताना त्यान्च्या देहाचे येथील गर्भग्रुहात त्यान्च्या शिष्याने रक्षण केले होते. अशी आख्यायिका आहे. हा सारा परिसर खुप रमणीय आहे.आश्रम,शिवमन्दिर,गुप्तगुहा सुन्दर आहे.
दर्शन घेउन पुढे निघालो. येथुन पुढे महेश्वर-मन्डलेश्वर धरण आणि हायड्रोपॉवर प्रोजेक्टचा परिसर सुरु होतो त्यामुळे मैय्याकिनारा दुर राहतो.रस्ता चान्गला होता.साधारण ३कि.मि. चालल्यावर दोन रस्ते आले,उजव्या बाजुचा रस्त्यावर नर्मदेवर पुल आहे,त्यावरुन लेपाघाटला रस्ता जातो. आम्हाला नर्मदा ओलान्डने वर्ज्य असल्याने आम्ही डाव्या रस्त्याने निघालो. थोड्याच वेळात पॉवरप्रोजेक्टचे गेट आले. तिथे चहा नास्त्याची टपरी होती,आठ वाजले होते म्हणुन तिथे चहा घेतला आणि नास्त्यासाठी पोहे बान्धून घेतले.आम्ही परिक्रमावासी म्हणुन टपरीवाल्याने चहाचे पैसे घेतले नाहीत्,एका ग्रुहस्थाने पोह्यान्चे पैसे दिले.तिथे असलेल्या सर्वानी आम्हाला नमस्कार केला.त्यान्ची ही नर्मदामैय्या आणि तिचे परिक्रमावासी यान्च्याबद्दलची अपार श्रद्धा पाहुन आनन्द होतो.
गेटसमोरील कच्च्या रस्त्याने पुढे निघालो.जलोद,उतवली,सुलगाव अशी गावे लागली प्रत्येक गावात आदरातिथ्य होत होते. सुलगावाच्या बाहेर एका माळरानावर बसलो.दहा वाजले होते. जवळचे पोहे खाल्ले पाणी पिउन थोडावेळ विश्रान्ती घेतली.ऊन तापु लागले होते. विनोबा एक्सप्रेस पुढे निघाली. गोगाव आले. आतापर्यन्त १०/१२कि.मि. चाललो होतो.थकवा जाणवत होता.एका ठिकाणी कम्पाणुन्ड लगत सुन्दर अशोकाची झाडे होती.वाटले एखादी शाळा असावी,गेट उघडुन आत गेलो,रविवार असल्याने शाळेला सुटी असावी असे वाटले व्हरान्ड्यात बसलो.थोडा चहा मिळाला तर बरे होईल असे मनात आले न आले तोच एक व्रुद्धबाबा आले.ती शाळा नव्हती त्यान्चे घर होते.पाटीदार आडनाव होते त्यान्चे.आस्थेवाइकपणे आमची चौकशी करुन त्यानी चहा दिला.त्यानी जवळचा रस्ता दाखवला.त्यामुळे पथराडला जावे लागले नाही. वाटेत सगळी आवळ्याच्या झाडान्चीच शेती होती. भरपुर आवळे लगडलेले होते. एका ठिकाणि एका शेतात लमाणान्चा तान्डा उतरलेला होता,त्यान्चे उन्ट,शेळ्या-मेन्ढ्या,गाई असा बारदाना होता.त्यान्च्याबरोबर काही फोटो काढले.त्यानी गाईचे दुध दिले.असेही आपले देशबन्धू.या परिक्रमेच्या निमित्ताने भारतमातेचे असे दर्शन घडते आहे. हे पुर्वसुकृतच म्हणायचे.
कतरा गावी दौलतराव भेटले त्यानी चहा दिला.सुहास लिमये यानाही हेच भेटले होते.बोथ्यापुरा,कोन्गवा गावे मागे टाकुन पिपल्या-बुजुर्ग यागावी राममन्दिरात मुक्कामाला थाम्बलो. भोजनप्रसाद मैय्याच्या क्रुपेने झाला. उद्या खेडीघाट. आजचा प्रवास ३०कि.मि. क्रमशः
प्रतिक्रिया
22 Aug 2012 - 1:42 pm | शिल्पा ब
उत्तम. आताच सगळे भाग वाचुन झाले.
पण हे झालं परीक्रमेचं, नेहमी रोज काय करता हे अजुन लिहिलं नैत ते !
पुढील लेखमालेच्या प्रतिक्षेत. अर्थात ही संपली तरची गोष्ट आहे म्हणा. पण आम्ही आशावादी आहोत.
24 Aug 2012 - 10:50 am | राजो
:D
22 Aug 2012 - 1:46 pm | गणामास्तर
आज सकाळ पासून वाट पाहत होतो. धन्यवाद.
आता रोज २-३ भागांच्या प्रतिक्षेत.
22 Aug 2012 - 2:15 pm | अत्रुप्त आत्मा
रोज २-३ भागांच्या प्रतिक्षेत. >>>
तुंम्हाला एका पुढे एक ...असं काही म्हणायचय का...?
22 Aug 2012 - 1:52 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्ही विदर्भाच्या आहात का हो ?
'बारदाना' शब्द जास्ती तिकडेच उपयोगात येत असतो.
22 Aug 2012 - 2:41 pm | अन्या दातार
परिक्रमा म्हणजे फुकट चहा-नाश्ता-जेवणाची सोय असे समीकरण एखाद्याच्या मनात बसल्यास त्यात काहीच वावगे वाटणार नाही.
नुसतेच चालायचे असेल तर नर्मदा परिक्रमा काय आणि मुळा-मुठा परिक्रमा काय; दोन्ही सारखेच.
22 Aug 2012 - 5:12 pm | ५० फक्त
मुळा मुठा परिक्रमेत फुकट चहा पाणी नाष्टा, हा भलताच आशावाद आहे हो.
22 Aug 2012 - 6:18 pm | अत्रुप्त आत्मा
हा भलताच आशावाद आहे हो. >>
23 Aug 2012 - 1:05 am | संजय क्षीरसागर
पण वाटेत चंबळच्या खोर्यातले डाकू कसं आदरातिथ्य करतील ? असा प्रश्न पडतो
यावर संशोधन करतांना इथल्या एका सदस्याचे, त्यांच्या नांवावरनं, तिथे काँटॅक्टस असतील असं वाटतं .
ते नांव जाहिर करताना आनंद होतोय, श्री चंबा मुतनाळ
23 Aug 2012 - 1:21 pm | गणामास्तर
२४ तास होत आले आता..अजून कसा नाही आला नवीन भाग?
असे नका करु हो, पटापट टाका. वाट पाहतोय.
24 Aug 2012 - 7:56 am | ५० फक्त
सलाईन थेंबाथेंबानंच जाणार बाव्डीत , ते काय एकदम बाटली तोंडाला लावुन प्यायचं नसतं,..