विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
मित्र हो,
आपण कडेगावच्या भानामतीची केस - प्रकरण 1 मधे वाचलीत. ती वाचून प्राचार्य अद्वयानंद गळतगे कोण? हे लिखाण का करत आहेत? असा प्रश्न साहजिक निर्माण होतो. त्यासाठी आपण विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे? याची भूमिका काय? ते वाचावे म्हणजे आपल्याला काही गोष्टींचा उलगडा व्हायला मदत होईल.
भूमिका
मोरा-अंगी असोसे। पिसे असती डोळसे।।
परि एकली दृष्टी नसे। तैसे ते गा ।। - ज्ञाने. 13.835
अर्थ – मोराच्या अंगावर डोळ्यासारखी पुष्कळ पिसे असतात. पण त्यांचा पाहण्यासाठी काहीच उपयोग नसतो. त्याप्रमाणे एकटी (अध्यात्मज्ञानाची) दृष्टी नसेल तर इतर (पुष्कळ शास्त्रांच्या ज्ञानाची) दृष्टी असून काय उपयोग? (ते लोक आंधळेच असतात)
काही महत्वाचे संदर्भ –
“सारख्याच दिसणाऱ्या समान तीन बालकांच्या मुर्तींप्रमाणेच शास्त्रज्ञांचेही तीन वर्ग पडतात. एक, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार रुढ विज्ञानाच्या नियमात बसत नसल्यामुळे खोटे म्हणून सोडून देतात. दुसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार खरे म्हणून स्वीकारले तर आपली शास्त्रज्ञ म्हणून असलेली इभ्रत जाईल या भितीने ते मनातच ठेऊन घेणारे; आणि तिसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार दुसऱ्यांना सांगणारे व त्यांच्या खरेपणाची शहानिशा करून घेण्यासाठी शास्त्रीय संशोधनाचा जाहीर आग्रह धरणारे. हा ग्रंथ शेवटच्या शास्त्रज्ञांच्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतो.
या ग्रंथाची भूमिका शुद्ध विज्ञानवादी आहे. (शुद्ध विज्ञान म्हणजे कुठलीही तत्वज्ञानाची बांधिलकी नसलेले विज्ञान)शुद्ध विज्ञानात दैवी शक्तीला (Divine Power) किंवा परमेश्वराला (Personal God) अजिबात स्थान नाही. सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुद्ध विज्ञान मानते व त्यांची नैसर्गिक (natural)उपपत्ती शोधते. पण नैसर्गिक उपपत्ती हे दुधारी शस्त्र आहे. ते जसे अंधश्रद्धेवर प्रहार करते तसे जडवादी तत्वज्ञानावर ही प्रहार करते. आणि हीच जडवादी लोकांची सर्वात मोठी अडचण आहे. म्हणून ते या शुद्ध विज्ञानरुपी शस्त्राच्या दुसऱ्या ‘धारे’कडे नेहमी व पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत असलेले दिसून येतात. ती धार जणु अस्तित्वातच नाही असे ते समजतात – नव्हे ते त्यांचे गृहितकृत्य असून त्या गृहितकृत्यावरच त्यांचे तथाकथित ‘विज्ञान’ उभे आहे. याविज्ञानाला आत्मवंचक - अर्थात डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजराच्या जातीचे व म्हणून ‘खोटे विज्ञान’ म्हणता येईल. या आत्मवंचक व खोट्या विज्ञानाला उघडे पाडणे , त्याचे खरे स्वरूप वाचकांपुढे ठेवणे हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे.”
“ अशा अनेक नैसर्गिक घटना आहेत ज्यांचा कार्यकारणभाव मानवाला माहित झालेला नाही. प्रश्न असा आहे की अशा घटनांची आदिकालिक मानवाप्रमाणे ‘चमत्कार’ म्हणून पुजा करायची का? की त्याच्या पाठीमागचा कार्यकारणभाव समजून घ्यायचा प्रयत्न करायचा ? की अशा घटना घडतच नाहीत, घडणे शक्य नाही असे म्हणून शत्रूला पाहून वाळूत डोके खुपसणाऱ्या शहामृगाची भूमिका स्वीकारायची? दुर्दैवाने काही शास्त्रज्ञ अशी भुमिका स्वीकारताना दिसून येतात.ही भूमिका आत्मवंचक, अवैज्ञानिक व म्हणून त्याज्य होय, हे या याग्रंथात वाचकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.”
या ग्रंथाच्या मथळ्याविषयी थोडेसे .... व अन्य मजकूर
.... शिवाय
सादर अर्पण
अनुक्रमणिका
मुखपृष्ठावरील चित्र
प्रकाशक
माहिती 'ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे' या ब्लॉगवर
तेथे वाचा
प्रतिक्रिया
18 Jan 2012 - 2:57 pm | गवि
अहो... त्याच लेखात "हा प्रकार भानामतीचाच" असं एक शीर्षक आहे..
आणि काही वाक्यं आहेत जी लेखकाने चक्क आधाराकरिता वापरली आहेत. उदा:
अशा लेखकाला किंवा लेखनाला शुद्ध विज्ञानवादी म्हणू नका हो प्लीज..
ही वाक्यं विज्ञानवाद दाखवत नाहीत, ती फक्त भीषण परिस्थिती दाखवतात.
18 Jan 2012 - 3:13 pm | प्रचेतस
पूर्णपणे सहमत.
वास्तविक ओकांसारख्या सु़शिक्षित, सुसंकृत, उच्चपदी पोहोचलेल्या माणसाने समाजाचे प्रबोधन करण्याऐवजी अंधश्रद्धांचीच कास धरावी याचेच वैषम्य आहे.
18 Jan 2012 - 3:21 pm | अन्या दातार
गविंशी सहमत.
आता जर प्रत्येकाने आपलेच ज्ञान म्हणजे विज्ञान म्हणायचे ठरवले तर म्हणोत बापडे. कारण त्या दाव्यांच्या सिद्धतेसाठी दुसरा कुठलाच उपाय त्यांच्याकडे नसतो.
18 Jan 2012 - 3:28 pm | मोदक
+३
18 Jan 2012 - 3:30 pm | गणेशा
सहमत ..
अंधश्रद्धेची कास किंवा अंधश्रद्धा निर्मुलन करणार्यांची विद्नानबुद्धी काढणे हे पटले नाही ..
अशीच अंधश्रद्धा का असते असे कायम वाटत होते.. मला वाटते अभ्यास किंवा त्यावेळेसची परिस्थीती काय होती ते अनुभवावे ..
लेख आणि अंधश्रद्धेश समर्थन आजिबात पटले नाही..
-----------------
घरात चालणारे अंधश्रद्ध मी बर्याच दा पाळत नाही, पण थोडा अभ्यास केला की जाणवलेले विचार खाली देत आहे ..
अंधश्रद्धा १ :
जेवताना मिठाला मिठ म्हनुन नये ( साखर म्हणावे)
--> माझ्या घरात/गावात अजुन ही प्रथा आहे, मी स्वता कधीच मिठाला साखर म्हणत नाही ...
पण नंतर थोडा अभ्यास/वाचन केल्यावर लक्षात आले..
गावाकडे स्त्री ही घरासाठी राबुन स्वयपाक बनवायची.. त्यात जर घरच्या इतर लोकांनी मिठ कमी आहे, आळणी झालेय असे म्हणुन नावे ठेवली तर तिला वाईट वाटत असे म्हणुन तिला वाईट वाटु नये म्हनुन मिठ मागु नये असा नियम केला असेन..
पुढे जावुन फक्त हिच मिठ मागु नये चे म्हणु नये होउन पुढे असे म्हम्टले जात आहे.
अंधश्रद्धा २ :
ग्रहनात इळीवर/चाकुवर प्रेगनंट बाईने काही कापु नये , बाळाचे ओठ/ कन कापले जातात..
------>
पुर्वी प्रत्येक घराला झरोके असायचे, स्वयपाक घरातुन चुलीचा धुर बाहेर जावा म्हणुन ही जागा होतीच ..
ग्रहानातील प्रकाश हा अशय वस्तुंवर किंवा चाकु वर पडुन तो पराव्रुत्त होउन बाळाला हाणीकारक होत असतो.. त्यामुळे
ह्या विद्नानवादाला आधार म्हनुन अंधश्रद्धेसद्रुष्य गोष्ट सांगितली गेली..
आता सूर्य दिसायची बोंबाबोंब आहे, त्यामुळे आता असे काही होत नाही...
अंधश्रद्धा ३ :
शनिवारी कटींग करु नये..
----->
बाराबलुतेदार पद्धतीत,रविवारी न्हावि लोक वस्तींवर फिरुन कटींग/ धाडी करत असे, त्यासाठीचे हत्यारे ते व्यव्स्थीत शनिवारी निट करत, शिवाय रविवार च्य आधी आराम म्हणुन शनिवार उपोयागात येत असे.
त्यामुळे त्यांच्या सोयीने त्यांनी शनिवारी नसते करायची कटींग असे रुढ केले आणि सामान्य माणसाने त्याच री पुड्।ए ओढला..
आजकाल शहरात रविवारी ही गर्दी असते.. त्यामुळे सोमवारी सुट्टी दिली जाते ( जास्त काम पडल्याने) आणि म्हणुन आता सोमवारी कटींग करु नये असे म्हंटले जाते ( अगदी माझ्या घरात ही..)
अंधश्रद्धा ४ :
शनिवारी/ बुधवारी नवविवाहितेने सासरहुन माहेरास किंवा माहेरुन सासरास जावु नये
---> याचे योग्य उत्तर शोधत आहे, कारण आज बुधवार आहे आणि आमची ही माहेरीच बसुन उद्या येणार आहे.
कोणी तरी याला योग्य उत्तर द्यावे.
नोट : वरील गोष्टी माझ्या वापरातील आहेत म्हणुन मी त्याच्या तहापर्यंत गेलो ..
पण जुने लोक म्हणतात म्हनुन तेच खरे असे नव्हे..
त्यामागची कारणे वेगळी असतात ..
आपण अभ्यास करावयाचा की उगाच सगळ्यासारखी री ओढायची हे ज्याने त्याने ठरवावे.
18 Jan 2012 - 3:45 pm | शिल्पा नाईक
@ गणेशा,
" शनिवारी/ बुधवारी नवविवाहितेने सासरहुन माहेरास किंवा माहेरुन सासरास जावु नये
---> याचे योग्य उत्तर शोधत आहे, कारण आज बुधवार आहे आणि आमची ही माहेरीच बसुन उद्या येणार आहे.
कोणी तरी याला योग्य उत्तर द्यावे. "
अशी एक म्हण आहे "जाशील बुधी तर येशील कधी" म्हणजे तीथे परत जाणं होत नाही. म्हणून असे म्हणत असावेत.
-शिल्पा.
18 Jan 2012 - 5:03 pm | गणेशा
उत्तर पटते आहे.. पण अजुन निटसे मनाचे समाधान होत नाहिये ..
बुध म्हणजे बुध ग्रहावर लांब जावे लागते आणि येता येणार नाही असे का ?
अवांतर :
असे असेल तर मी आजच तयार करतो ,
जाशील मंगळी .. तर होशील पांगळी
आणि अंधश्रद्धेत भर घालतो [:)]
बाकी वरील मुद्दा क्रमांक २ बद्दलचे मत चुकीचे असु शकते ..
कदाचीत जे योग्य असेन ते आनखिन काही काळाने कळेल ...
फक्त अंधश्रद्धा ह्या अश्या चुकीच्या बरोबर कल्पनांनी पुढे ओढल्या गेल्या आहेत .. त्या चुक आहेत हे मान्य करणेच योग्य
अस परमार्श काढु इछितो
18 Jan 2012 - 5:04 pm | शिल्पा नाईक
"बुध म्हणजे बुध ग्रहावर लांब जावे लागते आणि येता येणार नाही असे का ? "
सासरी जाणं हे एका ग्रहावर जाण्यापेक्षा कमी नसतं. खोट वाटत असेल तर माहेरी न जायला मीळणार्या स्त्री ला विचारून बघ. - ह. घे.
18 Jan 2012 - 3:44 pm | नगरीनिरंजन
गविंशी सहमत.
शिवाय उगाच कोणत्याही पुस्तकाला ग्रंथ-ब्रिंथ म्हणू नका राव.
उद्या गल्लीतले बालमंडळवाले आले वर्गणी मागायला 'पावतीग्रंथ' घेऊन तर कसं वाटेल?
19 Jan 2012 - 8:58 am | मोदक
प्रकाटाआ
18 Jan 2012 - 3:49 pm | मृत्युन्जय
मी स्वतः निरीश्वरवादी नसून किंबहुना थोडा अध्यात्मिक आणि धार्मिक प्रवृत्तीचा असुनही मला तुमचे विचार पटत नाहीत. भानामती वगैरे तर तद्दन बोगस, फालतु, बाष्कळ प्रकार आहेत यावर माझा विश्वास आहे. निरीश्वरवाद्यांनी तर असल्या लेखांचे भांडवल करुन एकुणच सगळ्याच सश्रद्ध लोकांची रेवडी उडवली तर मला फारसे आश्चर्य वाटणार नाही.
श्रद्धा आणी अंधश्रद्धा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि जेव्हा सारासार विचाराचे श्राद्ध घातले जाते तेव्हा आपसूक श्रद्धेचे अंधश्रद्धेत रुपांतर होते किंवा अंधश्रद्धाच श्रद्धेचे रुप घेते. मल वाटते हे खुप घातक आहे तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसासाठी.
18 Jan 2012 - 4:01 pm | यकु
मृत्यूंजयच्या शब्दाशब्दाशी सहमत आहे.
ओक साहेबांना काय सांगावे?
सुशिक्षित, उच्चपदस्थ असूनही काही समज घट्ट धरुन बसलेले जुन्या पिढीतील लोक पाहिले आहेत.
ओक साहेबांचेही तसेच आहे असे वाटते. अधिक काय बोलावे.
18 Jan 2012 - 3:52 pm | मनीषा
तुम्ही वर उधृत केलेला दृष्टान्त वापरून -
ज्याच्याकडे विज्ञाननिष्ठ, वस्तुनिष्ठ, आणि साक्षेपी दृष्टी नाही, त्याचे मिळालेले/ मिळवलेले सारे सारे ज्ञान व्यर्थ आहे.
18 Jan 2012 - 3:53 pm | मन१
तुम्हाला मिपाचा पत्ता नक्की कसा/कुणामुळे लागला ते सांगू शकाल का?
बाकी, गविंशी सहमत, आणि "पावतीग्रंथ" तर क्लासच.
उद्या मिपाच्या विड्म्बन काव्यांना ज्ञानग्रंथ म्हणू नये म्हणजे मिळवली.
18 Jan 2012 - 5:30 pm | मितभाषी
:D.
यावरुन एक गोष्ट आठवली. एका गावात गायनाच्या कार्यक्रमासाठी गवय्याला आमंत्रीत केले जाते. रात्रीच्या वेळेस गायनाचा कार्यक्रम चालू होतो. बेसूर आवाजात गायकाने गायन चालू केले. रसिकांचा भ्रमनिरास झाला. आरडाओरड चालू झाली. तेवढ्यात रसिकांमधून दोन तरुण उभे राहीले. त्यांनी तलवारी काढल्या व क्रोधीत नजरेने पाहू लागले. इकडे गायक जाम घाबरतो आणी पलायनाची तयारी करतो. तोच ते तरुण गायकाला सांगतात " तुम्ही घाबरु नका, आम्ही तुम्हाला इजा करणार नाही. आम्ही त्यांना शोधतो आहोत कि ज्यांनी तुम्हाला इथे आमंत्रीत केले आहे".
18 Jan 2012 - 4:09 pm | अत्रुप्त आत्मा
ओकांनी दिलिला अख्खा उतारा म्हणजे,,,मग्रूरपणे अंधःश्रद्धेच्या आहारी जाऊन त्याचं वाट्टेल त्या थराला जाऊन केलेलं अतिशय निलाजरं समर्थन आहे...
गळतळ्यांच्या नावानी उचलला विडा,
कारण तुंम्हालाच चावलाय अंधःश्रद्धेचा किडा...
स्वतःची मतं तुंम्ही मांडणार नाही
खुल्या हवेत कुणाशी भांडणार नाही...
गरज पडल्यास आंम्ही सावरकरांची तलवार(ही) आणू
आणी ऐकलच नाहीत तर अत्र्यांचा सोटा घेऊन हाणू... जय भवानी/जय शिवाजी...!
(गरज पडल्यास सविस्तर प्रतिसाद देइनच..!)
कृपया (पुनःप्रतिसादाचे) बुच मारु नये..ही विनंती
18 Jan 2012 - 4:19 pm | वसईचे किल्लेदार
हेच तर आम्हिहि (आदरार्थी एकवचन) म्हणतोय ... विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
काहि गरज होती का आपल्या (नसलेल्या) अकलेचे प्रदर्शन करण्याचे?
18 Jan 2012 - 6:35 pm | चौकटराजा
१. वाटीने पाणी पिउ नये पुढच्या जन्मी माणूस न्हावी होतो. ( नाभिक समाजाची कशा मागतो.उगीचच भावना दुखावल्याचे दुखणे वाढू नये ) .
२. तीन कधी देउन नये .
३. उम्बर्यावर शिंका देऊ नयेत.
४, उडदाच्या पापडाला केळीच्या खोपटाचे पाणी हवे.
५, दुधावरची साय चोरून खाउ नये आई मरते. ( आईला साईची काळची असल्याने आईनेच निर्माण केलेली)
18 Jan 2012 - 6:36 pm | चौकटराजा
१. वाटीने पाणी पिउ नये पुढच्या जन्मी माणूस न्हावी होतो. ( नाभिक समाजाची क्शमा मागतो.उगीचच भावना दुखावल्याचे दुखणे वाढू नये ) .
२. तीन कधी देउन नये .
३. उम्बर्यावर शिंका देऊ नयेत.
४, उडदाच्या पापडाला केळीच्या खोपटाचे पाणी हवे.
५, दुधावरची साय चोरून खाउ नये आई मरते. ( आईला साईची काळची असल्याने आईनेच निर्माण केलेली)
18 Jan 2012 - 9:41 pm | ५० फक्त
अरे इथं काय अंधश्रद्धांची यादी करायचा खेळ खेळतोय का आपण ?
अवांतर - मिपावर देखील एक अंधश्रद्धा होती पुर्वी, एक विशिष्ट आयडि लॉगइन झाला की लगेच मिपा बंद पडायचं,
18 Jan 2012 - 9:51 pm | कॉमन मॅन
लेखन समजले नाही..तरीही एकंदरीत सूर हा अंधश्रद्धावादीच वाटला. भाषा अत्यंत बोजड वाटली.
आपण कृपया असे दर वेळेला अगदी अट्टाहासाने अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे लेखन थांबवावे, एवढीच नम्र विनंती..
19 Jan 2012 - 10:16 am | प्यारे१
>>>>विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
आम्ही तेच विचारतोय... 'का लिहिला?'
गप्प बसायला जमत नाही काही काही लोकांना.
अशानं सो कॉल्ड विज्ञानवाद्यांचं सोकावतं आणि खरी श्रद्धा असणार्या व्यक्तींनाही आपण काहीतरी चुकीच्या मार्गात आलोय की काय अशी टोचणी लागते उगाच.
नको त्या गोष्टींचं कृपया समर्थन करु नये.