विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुनर्जन्म सिद्धांत प्रकरण 5 (अ)
या संबंधी वर्तमानपत्रातून आलेल्या काही बातम्या -इथे वाचा
पुर्वजन्म सांगणारा गणेश चुरी
रंजना गुप्ता आणि मनदीप कौर
मालती शंकर
पुर्वीची सुमित्रा ठाकूर आताची शिवा
जग प्रसिद्ध शांती देवी माथुर प्रकरण
दिल्लीच्या श्री. रंगबहादुर माथुरांची ही मुलगी 11 डिसेंबर 1926 ला जन्मली. ती मथुरेच्या पंडित केदारनाथ चौबेंची पत्नी आहे असे सांगत असे.
... या प्रकरणात म. गांधींनी इतका रस घेतला की शांतीदेवीला आपल्या आश्रमात बोलावून खास भेट घेतली नंतर त्यांच्या सल्यानुसार 15 जणांची कमिटी स्थापुन तिला आपल्या बरोबर मथुरेला - पुर्वजन्मातील गावातील तिच्या घरच्यांना भेटायला तिच्या वडिलांचे मन वळवून पाठवणी केली ....
.... प्रस्तुत लेखकाचे (प्राचार्य अद्वयानंद गळतगे. गळतगे) स्नेही प्रा.कीर्तीस्वरूप रावत शांती देवीला तिच्या मृत्युअगोदर 23 डिसेंबर 87ला चार दिवस भेटले होते. तेंव्हा तिने पुर्वी घडलेले अगदी खरे होते असे सांगितले होते....
पुनर्जन्म सिद्धातावरील शास्त्रीय आक्षेप
काही टीकाकार व संशयवाद्यांनी आक्षेप घेतले त्यावर स्टिव्हन्सन म्हणतात, त्यांचे काही आक्षेप मान्य आहेत पण ते पुनर्जन्म खोटे ठरवत नाहीत.
ते आक्षेप (व उत्तरे ब्लॉगवर वाचावीत) असे –
- फसवणूक
- अतिशयोक्ती
- सामान्यपणे दडलेल्या स्मृती
- अतींद्रिय शक्तीचे ज्ञान
- अनुवंशिक स्मृती
- झपाटणे वा परकाया प्रवेश
पुनर्जन्माची इतर काही लक्षणे –
- लिंगांतर
- अपघाती मृत्यू
- भाकिते वा सूचक स्वप्ने
- जन्मखुणा
- दोन जन्मातील अंतर
- दोन जन्मातील अवस्था
समारोप –
पुनर्जन्माचे शास्त्रीय संशोधन कसे करावे या विषयावर मार्गदर्शन करणारे अलाहाबादचे डॉ. जमुना प्रसाद यांचे पुस्तक New Dimensions in Reincarnation Research आहे.
प्रतिक्रिया
4 Aug 2012 - 7:04 am | निकित
धन्य ते गळतगे आणि धन्य ते जमुना प्रसाद !
ह्या गतजन्म आठवणाऱ्या लोकांचं एक बरं असता बुवा - मागल्या जन्मी आपण भारतातच माणूस म्हणून जन्मल्याचच सगळ्याना आठवतं ! मागल्या जन्मी मी सायबेरिया मधील एक अस्वल होतो आणि खुद्द स्टालिनने माझी शिकार केली होती असा साक्षात्कार कधीच कोणाला होत नाही. छे !
4 Aug 2012 - 1:39 pm | sagarparadkar
अहो एखादेवेळेस तसं आठवत असेलही .... पण त्या जन्मात पशू म्हणून काय काय चाळे केले असतील ते आता सांगणं प्रशस्त वाटत नसेल .... :)
शिवाय जे लोक पुनर्जन्म संकल्पनेअवर श्रद्धा बाळगणारे असतील ते असंही म्हणू शकतील कि त्या अस्वलाच्या जन्मात त्याला माहिती कसं असेल की आपणाला मारणारा हा स्टॅलिनच होता म्हणून .... अस्वलांना माणसाचं नाव कसं कळेल ?
माझा काही ह्या पुनर्जन्म प्रकाराबद्दल फारसा अभ्यास नाही, पण जे आपल्याला आपला मागील जन्म आठवतो असं सांगतात, त्यांचे मागील जन्म बहुतेक वेळेला अश्या भागात झालेले असतात जिथे प्रत्येक नागरीकाची व्यवस्थित नोंद झालेली नसते. उदाहरणार्थ, ह्यांचा एक तरी जन्म हा लेह, लडाख, तिबेट अश्या ठिकाणी शे-दोनशे वर्षांपूर्वी होउन गेलेला असतो. आता त्या भागात शे-दोनशे वर्षांपूर्वी प्रत्येक माण्साच्या जन्म-म्रुत्युची आणि इतर सर्व माहिती ठेवण्याची सोयच नसणार, त्यामुळे तुम्ही त्याच्या माहितीची पडताळणीच करू शकत नाही.
कोणी आपलं त्या जन्मातील नावही सांगू लागेल. आता 'तुंडुप' हे नाव त्या भागात अगदी प्रसिद्ध आहे, शिवाय ते 'जेंडर न्युट्रल' देखील आहे. म्हणजे मुलाचं आणि मुलीचं नावही 'तुंडुप' असू शकतं. तर हा पुनर्जन्म आठवणारा माणूस सांगू शकतो की १८५० मधे मी लेहमधे जन्माला आलो होतो आणि तेव्हा माझं नाव तुंडुप लेपचा असं होतं. आता एखादा खरोखरच तपास करायला गेलाच, तर त्याला तेथील एखाद्या लोककथेत हे नाव मिळू शकतं ... नाहीच मिळालं तर तो माणूस म्हणू शकतो कि मी त्या जन्मात काही फार प्रसिद्ध, पराक्रमी वगैरे नव्हतो .... त्यामुळे तुम्हाला काही त्याचे पुरावे मिळू शकणार नाहीत ..... :)
अवांतरः इथे एक गोष्ट आठवली. पूर्वी जेव्हा 'टाईम्स ऑफ इंडिया' आणि 'इंडियन एक्सप्रेस' ह्यांचे सर्क्युलेशनबद्दल जाहिरात युद्ध चालत होतं तेव्हा टाईम्समधे अनेक सेलिब्रिटीजची एकेका दिवशी परिचयवजा जाहिरात येत असे. त्यात त्यांचे बरेच गुणगान करून सर्वात शेवटी ते 'टाईम्स ऑफ इंडिया' वाचण्याला विशेष प्राधान्य देतात कारण की ..... असे एकूणात प्रकार असत. तर ह्या सेलिब्रिटीजपैकी एक म्हणून 'पुष्पक' मधील अभिनेत्री अमला हिचा देखील परिचय असे. त्यात असा दावा केला जात असे की तिला आपले पूर्वीचे अनेक जन्म लक्षात आहेत .... पण गंमत अशी की त्या जाहिरातीविरुद्ध 'अंनिस'ने कधी विरोध, चर्चा, निषेध वगैरे केल्याचे किमान माझ्यातरी ऐकीवात नाही. असो.
डिस्क्लेमरः वरील माहिती मला जशी आठवते आहे त्यानुसार दिली आहे, चुकीची ठरल्यास आधीच क्षमस्व म्हणून ठेवतो. (उगाच भल्त्याच लफड्यात अडकायला नको .... :) )
4 Aug 2012 - 3:16 pm | आत्मशून्य
लिंगांतर म्हणजे काय ?
तसच पुनर्जन्म सम्जौन फायदा काय होतो ? असं म्हणतात की गेलेला वेळ, सोडलेला बाण कधी परत येत नाही. मी आज झोपेतुन उठल्यावर मला काल झोपण्यापुर्वी काय "स्टेटस" होतं ते लक्षात रहाणं गरजेचं आहे कारण आज त्याचा "रेलेव्हन्स" उपयोगी येतो. तस पुनर्जन्म कळुन काय फरक पडतो ? उलट तो कळुनही शेवटी आपण आपल्याला परकेच उरतो... नाही का ?
4 Aug 2012 - 4:57 pm | विनायक प्रभू
तोफ पुन्हा धडध्डायला लागली व्वाट्ट.
5 Aug 2012 - 12:52 am | संजय क्षीरसागर
माणसाचा मेंदू बायो कंप्युटर आहे आणि स्मृतीचा संबंध फक्त मेंदूशी आहे मग ती मागल्या क्षणाची असो की मागल्या जन्माची.
माणूस जातो तेव्हा त्याचा संपूर्ण देहच पुन्हा अस्तित्वात विलीन होतो आणि त्या प्रोसेसमधे मेंदू संपूर्णपणे फॉरमॅट होतो, थोडक्यात डिस्क पुन्हा कोरी होते.
अस्तित्व विस्मयकारक असल्यानं काही वेळा स्मृतींच्या काही स्ट्रींग्ज अन्फॉरमॅटेड राहतात आणि एखाद्या नवीन जन्मणार्या बालकाच्या मेंदूच्या पेशींवर त्या पुनर्स्थापित होतात (किंवा एखाद्या अनइंटीग्रेटेड मनाच्या माणसाच्या मेंदूत त्या शिरकाव करतात) अशा वेळी त्या व्यक्तीच्या जाणीवेतून त्या स्मृती पुन्हा रिट्राइव होतात. सदर व्यक्तीचा निधन झालेल्या व्यक्तीशी काही एक संबंध नसतो पण त्याला "आपल्याला आपला पुनर्जन्म आठवतोय" असं वाटायला लागतं.
अशा आठवणींचा किंवा अशा संशोधनाचा शून्य उपयोग आहे कारण सदर व्यक्तीला त्याचं सध्याचं जगणं अवघड होतं. खरं तर हे त्याला कुणी सांगितलं तर तो त्या स्मृतींकडे एक मजा म्हणून पाहून दुर्लक्ष करु शकेल आणि त्याचं सध्याचं वास्तविक जीवन मजेत जगू शकेल.
तुम्ही देखील या भानगडीत पडू नका, फुकट वेळ जाईल.
5 Aug 2012 - 1:15 pm | शशिकांत ओक
मित्रा संजय,
आपण काढलेला निष्कर्ष अत्यंत समर्पक आहे. आधीच्या व्यक्तिचा नंतरच्या व्यक्तिशी काही संबंध नसतो. सामान्यतः अशा केसेस मधील बालके 'मला पुनर्जन्म आठवतोय' असा 'दावा' करत नाहीत. ते फक्त त्या स्मृती बालपणातील निरागसतेने व्यक्त करतात. पण जवळच्या नातवेवाईक व इतरांना त्याच्या वक्तव्यावरून तसे मानावे लागते.
आपण वापरलेला 'अस्तित्व' हा शब्द फार मोलाचा आहे. प्रा. गळतगे यांचे ही कथन 'विस्मयकारक अतित्वाचे ते एक स्वाभाविक रुप असते. पुर्व स्मृतीं ज्या जोरदारपणे निर्माण होतात पण प्रस्थापित न होता अन फोर्मेटेड तशाच राहून जातात त्यांचे अनइंडिग्रेटेड मनाच्या व्यक्तिच्या मेंदूत शिरणे कसे होते याचा विचार करायला प्रवृत्त होण्याची प्राथमिक पायरी म्हणून अशा केसेसचा समतोलपणे अभ्यास करावा लागतो. तो डॉ स्टीव्हन्सननी केला.
खरे आहे. मी अशा पुर्व आठवणी जाग्याझालेल्या उत्तरा हुद्दार(यांची केस फार विरळा व क्लासिक आहे) यांना खूप वर्षांपुर्वी सहज भेटलो असताना त्यांचे मतही तेच पडले की आधीच्या व्यक्तिमत्वातील स्मृतींमुळे गल्लत होते. शिवाय संशोधकांच्या वारंवार भेटीगाठीं, टीकाटिपण्यांमुळे खाजगी जीवनात फार ढवळाढवळ केली जाते व मनस्ताप सहन करावा लागतो तो वेगळाच.
मित्रा, आपला सल्ला सुयोग्य आहे. मी फक्त असे शोधकार्य केले गेलेले आहे, असे गळतगे यांच्या लेखांतून वाचनात आले
ते वाचकांना सादर केले. त्याचा सामान्यांच्या जीवनात फरक पडतो किंवा काय त्यांनी आपला वेळ फुकट घालवावा का याची काळजी ते लोक करतील.
9 Oct 2020 - 1:35 pm | प्रकाश घाटपांडे
१९९५ च्या आसपास आजच्या सुधारक मधे यावर काही लेखन आले होते. अकोलकरांनी लिहिले होते. नेमेके डिटेल्स आठवत नाहीत. पण नंतर तो विषय बंद करण्यात आला.
5 Aug 2012 - 1:31 pm | आत्मशून्य
रोचक संशोधन... कोठुन उतरवला हा परिच्छेद ? संपुर्ण निबंध वाचावा म्हणतो.
5 Aug 2012 - 11:44 am | परिकथेतील राजकुमार
खरे आहे. पुनर्जन्म हा नक्की असणार आणि प्रत्येक मिपाकर गेल्या जन्मात पापी असणार.
आता भोगा फळे...
5 Aug 2012 - 3:53 pm | अत्रुप्त आत्मा
या लेखावर प्रतिक्रीया देण्यापेक्षा 'रमताराम' यांची ही प्रतिक्रीया पटते,
http://www.misalpav.com/node/19118#comment-417513
आणी उपशमनार्थ त्या'वरिल लेख वाचावा,हे उत्तम .