भौत विज्ञानाकडून अतींद्रिय विज्ञानाकडे - विज्ञान आणि बुद्धिवाद - प्रकरण 1

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
2 Jun 2012 - 11:08 pm

भौत विज्ञानाकडून अतींद्रिय विज्ञानाकडे - प्रकरण 1
या प्रकरणात प्रा. अद्वयानंद गळतगे म्हणतात.....
जे पाच इंद्रियांना जाणवते , त्याचाच फक्त वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे शक्य आहे, असे समजण्याचे काऱण नाही. मनोविज्ञान हे मनाचा वैज्ञानिक व पद्धतीने अभ्यास करते. पण मन हे इंद्रियविषय होऊ शकत नाही. पण म्हणून मनच अस्तितावात नाही असे म्हणता येणार नाही. जीव विज्ञान (Biology) जीवाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करते. पण जीव इंद्रियविषय नाही. पण म्हणून जीवच अस्तित्वात नाही असे म्हणता येणार नाही. जीव व मन हे स्वतंत्रपणे अस्तित्वात नसून ते भौतिक विश्वाचेच भाग आहेत, असे मात्र भौत वैज्ञानिक म्हणू शकतात. पण ते भौतिक विश्वाचे कसे भाग होऊ शकतात, हे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करणे भाग आहे. तसे सिद्ध झालेले नाही. मनाचा किंवा जीवाचा 'फॉर्म्युला' तयार करता आलेला नाही. पण म्हणून त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासच करता येत नाही , असे समजता येईल काय?....
... आपण काल भूत कालाकडून भविष्यकालाकडे जात आहे असे मानतो. पण फेनमनच्या शोधानुसार काल भविष्याकडून भूतकालाकडे जात आहे (या शोधाबद्दल 1965 साली फेनमनला नोबेल पारितोषक मिळाले आहे.) ज्याला 'फेनमनची आकृती' (Feynman's Diagram)म्हणतात. त्या आकृतीत जो कण भूतकालातून भविष्यकालाकडे जात आहे तो कण आकृती फिरवली की भविष्याकडून भूतकालाकडे जात असल्याचे दिसतो. काळाच्या या कल्पनेनुसार मी जसा भूतकालाचे 'अपत्य' ठरतो तसे भविष्यकालाचे 'भूत' ही ठरतो. म्हणजे माझे अस्तित्व भूतकालाप्रमाणेच भविष्यकालावरही अवलंबून आहं. दुसऱ्या शब्दात मी भूतकालाप्रमाणेच भविष्यकालाशीही जखडला गेलो आहे. कशाने? हे भौतिक शास्त्र सांगू शकत नाही. अध्यात्मशास्त्र मात्र 'कर्मा ने' हे उत्तर देते. आणि या जखडण्यालाच 'पुनर्जन्म' हे नाव देते. यातून सुटका करून घेणे म्हणजे स्थलकालातीत होणे होय...
इथे आपण आणखी काय वाचाल?

मन स्थळ काळाची मर्यादा ओलांडू शकते...
मन भौतिक विश्वाची मर्यादा ओलांडू शकते...
क्वांटम भौत वाद...
गूढवादी भौतिक शास्त्र
एकात्म विश्व ...
या पुढील संशोधन....

मांडणीविज्ञानविचारआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

भरत कुलकर्णी's picture

2 Jun 2012 - 11:18 pm | भरत कुलकर्णी

या या. तुमचीच वाट पाहत होतो आम्ही.
(गळतगे यांना म्हणतोय हो मी.)
बाकी काका, लेख काही समजत नाही मला, मात्र तुमचे अक्षर फार छान, रेखीव आहे हं.
:-)

अर्धवटराव's picture

3 Jun 2012 - 12:32 am | अर्धवटराव

सगळ्याच कुळकर्ण्यांना आजकाल अतींद्रीय अनुभव येताहेत कि काय... पित्रे साहेबांच्या लेखाचे नाव वाचुन मी "या, तुमचीच वाट बघत होतो..." असाच काहिसा प्रतिसाद देणार होतो... आणि धागा उघडुन बघतो तर तुम्ही "अतींद्रीय शक्तीने आमच्या मनीचे भविष्याकालीन विचार" अगोदरच मांडुन ठेवलेले :D

अर्धवटराव

मुक्त विहारि's picture

3 Jun 2012 - 12:12 am | मुक्त विहारि

लेख काही समजला नाही..

आबा's picture

3 Jun 2012 - 12:42 am | आबा

:) :) :) :) :) :) :) :)

मैत्र's picture

3 Jun 2012 - 2:46 am | मैत्र

रिचर्ड फेनमन यांना नोबेल पुरस्कार अणुवि़ज्ञानातल्या संशोधनाबद्दल मिळाला होता. प्रोटॉन, न्यूट्रॉन पेक्षाही लहान क्वार्क पार्टिकल्स च्या गुणधर्मांसंबंधित हे संशोधन होते.
त्यात काल सापेक्षता नसावी....
स्पेस टाईम - अवकाश काल आकृती विशेष प्रसिद्ध आहे स्टिफन हॉकिंग्ज आणि मिंकोवस्की यांची .

नितिन थत्ते's picture

3 Jun 2012 - 11:52 am | नितिन थत्ते

काळ भविष्याकडून भूतकाळाकडे जातो असे कुठलेही संशोधन नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेले नसावे.

सापेक्षतेचा सिद्धांत मांडल्यानंतरच्या लगेचच्या काळात अशा चर्चा होत असतील.

काळाची एकच दिशा असते
१. भूतकाळात एन्ट्रॉपी कमी असते, भविष्यकाळात जास्त
२. भूतकाळात (आपले) विश्व लहान असते, भविष्यकाळात मोठे.

रामपुरी's picture

3 Jun 2012 - 10:16 am | रामपुरी

"इथे आपण आणखी काय वाचाल?"
काही नाही.

हे गळतगे कोण???

गवि's picture

3 Jun 2012 - 12:42 pm | गवि

हे गळतगे कोण???

अरे, ये पीएसपीओ नही जानता..!

सोत्रि's picture

4 Jun 2012 - 12:08 am | सोत्रि

खीक्क...

- ( गविंचा PSPO पंखा ) सोकाजी

बॅटमॅन's picture

4 Jun 2012 - 7:16 pm | बॅटमॅन

+१०^१००!!!!!

नव्वदीच्या दशकातील एक अजरामर जाहिरात होती ती!

तिची आठवण करून दिल्याबद्दल आभार :)

(नॉस्टॅल्जिक)

jaypal's picture

3 Jun 2012 - 11:08 am | jaypal

लेख आवडला. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

नेमकं काय समजलं ते सांगता का जरा? नै आवडला म्हणताय म्हणुन विचारलं इतकंच.

संजय क्षीरसागर's picture

3 Jun 2012 - 1:35 pm | संजय क्षीरसागर

पृथ्वीच्या स्वत:भोवती (आणि सूर्याभोवती) फिरण्यामुळे तो निर्माण होतो. तुम्ही संपूर्ण पृथ्वी दिसेल इतक्या उंचीवर जर सरळ वर आकाशात गेलात तर लक्षात येईल की सूर्य सदैव प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या एका अवधीचे भाग करून काल या संकल्पनेची निर्मीती झालीये.

अस्तित्वात काल नाही पण प्रक्रिया आहेत आणि त्यांच्या मोजणीसाठी काल या भासमान परिमाणाचा माणसानं `वापर केलाय'. जी गोष्ट निव्वळ भासमान आहे ती कुठूनही कुठे जात नाही, तस्मात तुमचे सर्व संशोधन (पुढच्या लेखापूर्वी) पुन्हा तपासून पाहा.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2012 - 10:42 pm | अत्रुप्त आत्मा

अहो संजयजी...

या लोकांना हे सगळ पूर्णपणे माहित असत... बनवेगिरी करायला मुद्दाम पेडगावला जातात ही मंडळी.
अहो गरज भासली तर पाण्याला हवा आणी हवेला पाणी म्हणायला कमी करत नाहीत हे लोक! :-)

त्यांनी डायरेक्ट फेनमनच मधे आणलाय, गृहितक चुकीचं असेल तर नंतर चर्चा निष्कारण विस्तृत होत जाईल !

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jun 2012 - 9:10 am | अत्रुप्त आत्मा

@त्यांची लेखमाला सुरु होण्यापूर्वीच क्लिअर केलं >>> होय...! तेही एक खरच. :-)

शशिकांत ओक's picture

4 Jun 2012 - 10:54 am | शशिकांत ओक

प्रतिसाद पुन्हा टाकला गेला म्हणून काढला.

शशिकांत ओक's picture

4 Jun 2012 - 10:52 am | शशिकांत ओक

मित्रानो,

त्यांनी डायरेक्ट फेनमनच मधे आणलाय,

त्यांनी म्हणजे (गळतगेंनी ) .....
मला (ओकांना) फेनमनची आकृतीबद्दल माहिती नाही. मी विज्ञानशाखेचा अभ्यासक नाही. पण आपण व इतरांनी दिलेले संदर्भ पाहून विकीवर त्याबद्दल माहिती वाचली त्यातील काही भाग गळतग्यांना आधार म्हणून अपेक्षित असावा. तो असा....
....Feynman diagrams are a pictorial representation of a contribution to the total amplitude for a process which can happen in several different ways. When a group of incoming particles are to scatter off each other, the process can be thought of as one where the particles travel over all possible paths, including paths that go backward in time....
...There are three different types of lines: internal lines connect two vertices, incoming lines extend from "the past" to a vertex and represent an initial state, and outgoing lines extend from a vertex to "the future" and represent the final state.
... Feynman diagrams became the tool that undergirded calculations in everything from electrodynamics to nuclear and particle physics to solid-state physics and beyond. ....
मिपा सदस्यांनी गळतगे यांच्या विचारांची दखल घ्यावी. त्यावर मते मांडावीत. गळतगे यांचे म्हणणे मान्य व्हावे असा आग्रह नाही व नसावा.

शशिकांत ओक's picture

4 Jun 2012 - 1:09 pm | शशिकांत ओक

मित्रा,

अस्तित्वात काल नाही पण प्रक्रिया आहेत आणि त्यांच्या मोजणीसाठी काल या भासमान परिमाणाचा माणसानं `वापर केलाय'. जी गोष्ट निव्वळ भासमान आहे ती कुठूनही कुठे जात नाही,

आपण जे म्हणता तेच नेमके गळतगे ही (इथे वर कळ दाबली तर) पान १० वरील एका परिच्छेदात म्हणतात. ते आपण वाचले असेल. त्यामुळे आपले व त्यांचे म्हणणे एकाच दिशेचे आहे असे वाटते. आपल्या व त्यांच्या कथनांत तत्वतः भेद काय वाटतो ते सवडीने सांगावे. विचारांना चालना मिळेल. असो.

मध्येच लिहिल्याबद्दल सॉरी,
पण, पान नं. १० वर गळतगे सर जे म्हणतात, त्यावरून त्यांना फक्त टेलीपोर्टेशन मध्ये अध्यात्म वगेरे घुसवायच आहे असं वाटतंय. एखादी गोष्ट फक्त आश्चर्यकारक वाटली, म्हणून लगेच त्यात कर्मविपाक वगेरे ठोकून बसवण्याची गरज नाही. इंटरनेटवर शोधाशोध केलित तर याविषयावर किती काम झालेलं आहे ते समजेल.

आणि "कृत्रीम म्हणून खोटे" हे कसलं लॉजीक आहे?

अवांतरः "कशाने" किंवा "का", हा प्रश्न तुम्ही कर्मविपाक थेअरीमध्ये विचारू शकता काय?

मी काय म्हटलय ते नीट वाचलत तर तुम्हाला काल भास आहे हे कळेल आणि तुमचा सिद्धांत व्यर्थ ठरेल. जे वाचायचय ते अध्यात्मिक असेल तर त्या विषयात मला काही वाचायच उरलं नाहीये. विषय तुम्ही मांडलाय त्यामुळे तो सिद्ध करण्याची जवाबदारी तुमची आहे. मी विचारांना चालना देण्याविरूद्ध आहे, मला प्रश्न सोडवण्यात रस आहे (ते देखील मला आवडतील ते)

ऋषिकेश's picture

4 Jun 2012 - 10:41 am | ऋषिकेश

इथेही इंटरव्हेंशन गरजेचे आहे काय?
माझ्या मते होय!

ओक, तुम्हाला मदतीची गरज आहे. दुष्ट चक्रात तुम्ही नुसते अडकतच नाहि तर इतरांनाही भरीस पाडता आहात. हे समाजाला हानी पोहोचवणारे काम थांबवा अशी विनंती.

तुम्ही स्वतः ती तत्व वापरुन पाहिली असतील तर मजाये, त्याला शेअरिंग म्हणतात. तुम्ही कन्विंस्ड असाल तर इतर दुवे द्यावेच लागत नाहीत, तुम्ही स्ट्रेटावे तुमचं म्हणणं सांगता. स्वतःच्या समर्थनासाठी दुसर्‍यांचा आधार घेणं आणि त्याही पुढे जाऊन इकडचे तिकडचे दुवे वाचायला लावून दुसर्‍यांना कामला लावणं गैर आहे

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jun 2012 - 12:13 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय सुरेख आणि माहितीपूर्ण लेखन.

श्री. ओक ह्यांनी समाजविघातक लोकांकडे लक्ष न देता, समाजाला चार शहाणपणाच्या गोष्टी शिकवणारे लिखाण असेच करत रहावे, अथवा असे विचार इथे चोप्य पस्ते करावेत अशी विनंती.

यावर संशोधन उपलबध असल्यास प्रकाश टाकावा ही विनंती

श्रावण मोडक's picture

4 Jun 2012 - 12:26 pm | श्रावण मोडक

हाहाहा... मस्त!

विश्व हे ताणलेल्या इलास्टिक सारखे आहे. सतत प्रसरण पावतेय. कधी ना कधी ताण असह्य होऊन इकडे तिकडे उडून जाईल किंवा मोडून पडेल.
हीच का ती बिग क्रंच थियरी काय हो?

शिल्पा ब's picture

9 Jun 2012 - 10:11 am | शिल्पा ब

अहो म्हणुनच ते नाडी वापरा म्हणुन सांगतात ना!! कमाल ए!

शशिकांत ओक's picture

9 Jun 2012 - 3:56 pm | शशिकांत ओक

ताई,
जरा जपून नाडीकडे पहा. नाडीचे वापर वाढलेत. संदर्भ - येरवडा मध्यवर्ती कारागृहातील हत्या...

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jun 2012 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार

नाडी विषयी काय माहिती हवी असेल तर बोला.

प्रचेतस's picture

4 Jun 2012 - 12:30 pm | प्रचेतस

नाडी इलास्टिकची असेल.

म्हणून ही नवी नाडी काढलीये

नाना चेंगट's picture

4 Jun 2012 - 1:29 pm | नाना चेंगट

कुठली काढली ????????

५० फक्त's picture

4 Jun 2012 - 1:26 pm | ५० फक्त

हे म्हणजे बैलाचं गोमुत्र म्हणल्यासारखं झालंय बघा.

संजय क्षीरसागर's picture

4 Jun 2012 - 1:40 pm | संजय क्षीरसागर

हजाकला (http://www.misalpav.com/node/21846#comment-401910) ही कल्पना घावली तर त्याच्या आगामी महाकाव्यात नक्की गुंफेल!

शशिकांत ओक's picture

6 Jun 2012 - 11:53 am | शशिकांत ओक

मित्रांनो,

ओकसरांच्या लेखात मानवी संस्कृतीच्या आदिमतेकडे होणार्‍या प्रवासाबद्दल म्हटलंय. परंतु मी इथे स्पष्ट करु इच्छितो की माझ्या प्रस्तुत कवितेचा या विषयाशी संबंध नाही.

हजांनी त्यांच्या पोस्टवर खुलासा केला आहे. त्यामुळे तो प्रश्न तिथे संपवता येईल
संजय, अन्य मित्र हो,

मी काय म्हटलय ते नीट वाचलत तर तुम्हाला काल भास आहे हे कळेल आणि तुमचा सिद्धांत व्यर्थ ठरेल. जे वाचायचय ते अध्यात्मिक असेल तर त्या विषयात मला काही वाचायच उरलं नाहीये. विषय तुम्ही मांडलाय त्यामुळे तो सिद्ध करण्याची जवाबदारी तुमची आहे. मी विचारांना चालना देण्याविरूद्ध आहे, मला प्रश्न सोडवण्यात रस आहे (ते देखील मला आवडतील ते)

खुलाश्याची तशी गरज नाही पण आपण लिहिले आहेत त्यातील काही बाबींचे निराकरण कराला हवे-

  • या पोस्टमधून मी कुठलाही सिद्धांत मांडलेला नाही. त्यामुळे तो सिद्ध मी करावा हा आरोप लागू होत नाही. असो.

  • प्रा. गळतगे यांच्या प्रा. गळतगे यांच्या लेखातील काही वेचक उतारे मी सादर केले. ते अध्यात्मिक असावेत असा आधीच पुर्वाग्रह करून वाचायला आपल्याला आवडत नसतील तर नका वाचू.

  • गळतगे यांच्या लेखाचे शीर्षक व विषयाची मांडणी वेगळी आहे. त्यांनी विवेचनाच्या ओघात फेनमन यांचे विचार संदर्भ म्हणून दिले गेले. प्रा. गळतगे यांच्या लेखाचे शीर्षक व विषयाची मांडणी वेगळी आहे. त्याची सार्थकता कशी आहे ते मी विकीवरील संदर्भ पाहून नंतर सादर केले. गळतगे यांच्या लेखाचा मुख्य मुद्दा बाजूला ठेऊन काळ हा आभास आहे असे आपले निवेदन असेल तर ते गळतगे यांच्या विचाराजवळ जाते असे मला वाटते. हे ही सांगून झाले. आपण म्हणता तसे आपल्याला आवडतील ते प्रश्न सोडवायला गळतगे यांचे विचार वाचून काही वाटले तर जरूर सादर करा.

    आबा,

    "कृत्रीम म्हणून खोटे" हे कसलं लॉजीक आहे?

    गळतगे म्हणतात,....विश्व हे स्थळाच्या दृष्टीने एकात्म आहे. ...ते काळाच्या दृ्ष्टीनेही एकात्म असावयाला पाहिजे. म्हणजे जे 'येते' घडते ते 'तेथे' घडण्यावर अवलंबून आहे, तसे जे 'आज' घडते ते 'उद्या' घडण्यावर अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात काळाचे आपण भूत, वर्तमान व भविष्य, तुकडे पाडतो ते कृत्रिम म्हणून खोटे आहेत. भूत काल होऊन गेलेला नाही व भविष्य काल अजून व्हायचा आहे असे ही नाही. दोन्ही वर्तमानच आहेत. म्हणून भूत व भविष्य काल जाणणे शक्य आहे. या विषयी फेनमन या भौतिक शास्त्रज्ञाने कालाच्या उलट्या दिशेने जाणाऱ्या कणांना , ज्याना अँटिपार्टिकल - विरोधी कण म्हणतात ....

    कर्मविपाक वगेरे ठोकून बसवण्याची गरज नाही.

    ....जर काल एकमेकाला जोडलेला आहे असे मानले तर त्याचप्रमाणे त्यात केले गेलेली कर्मे ही अशीच एकमेकाला जोडलेली असू शकतात. यात ठोकाठोकी आली कुठे?
    विचार व्हावा..

    असा विचार करा,
    समजा विश्व काळाच्या दृष्टीने एकात्म असते,
    (म्हणजे काळ भूताकडून भविष्याकडे जातोय की उलटा, याने जर काहीच फरक पडत नसता)
    तर आपल्याला भूतकाळ आठवतो तसा भविष्यकाळही "आठवला" असता...

    बाकी एक्सप्लनेशन थत्ते काकांनी दिलंच आहे

    आणि त्या अँटिपार्टिकल वगैरेच्या संकल्पने बद्दल काहीतरी जाम घोळ झालाय.

    शशिकांत ओक's picture

    8 Jun 2012 - 11:43 am | शशिकांत ओक

    मित्रा,

    अँटिपार्टिकल वगैरेच्या संकल्पने बद्दल काहीतरी जाम घोळ झालाय.

    ती संकल्पना गळतगे यांची नाही. फेनमन यांची आहे. फक्त कथनाच्या ओघात त्यांनी तिचा उल्लेख केला आहे.तो घोळ गळतगे यांच्याकडून झाला असेल तर त्यावर योग्य स्पष्टीकरण दिलेत तर आम्हाला समजायला सोईचे जाईल.
    नाही द्यावेसे वाटले तरी चालेल.

    आबा's picture

    8 Jun 2012 - 4:32 pm | आबा

    नाही द्यावेसे वाटले तरी चालेल.
    ओके !

    परिकथेतील राजकुमार's picture

    6 Jun 2012 - 1:47 pm | परिकथेतील राजकुमार

    श्री. गळतगे ह्यांना इंटरव्हेन्शनची गरज आहे काय?

    संजय क्षीरसागर's picture

    6 Jun 2012 - 2:06 pm | संजय क्षीरसागर

    हल्ली इंटरव्हेन्शनला गर्दी वाढलीये

    ऋषिकेश's picture

    6 Jun 2012 - 4:39 pm | ऋषिकेश

    चिटिंग!
    मी आधीच हा प्रश्न विचारलाय. तिथे +१ कर बघु! :प