विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
मित्र हो,
आपण कडेगावच्या भानामतीची केस - प्रकरण 1 मधे वाचलीत. ती वाचून प्राचार्य अद्वयानंद गळतगे कोण? हे लिखाण का करत आहेत? असा प्रश्न साहजिक निर्माण होतो. त्यासाठी आपण विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे? याची भूमिका काय? ते वाचावे म्हणजे आपल्याला काही गोष्टींचा उलगडा व्हायला मदत होईल.
भूमिका
मोरा-अंगी असोसे। पिसे असती डोळसे।।
परि एकली दृष्टी नसे। तैसे ते गा ।। - ज्ञाने. 13.835
अर्थ – मोराच्या अंगावर डोळ्यासारखी पुष्कळ पिसे असतात. पण त्यांचा पाहण्यासाठी काहीच उपयोग नसतो. त्याप्रमाणे एकटी (अध्यात्मज्ञानाची) दृष्टी नसेल तर इतर (पुष्कळ शास्त्रांच्या ज्ञानाची) दृष्टी असून काय उपयोग? (ते लोक आंधळेच असतात)
काही महत्वाचे संदर्भ –
“सारख्याच दिसणाऱ्या समान तीन बालकांच्या मुर्तींप्रमाणेच शास्त्रज्ञांचेही तीन वर्ग पडतात. एक, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार रुढ विज्ञानाच्या नियमात बसत नसल्यामुळे खोटे म्हणून सोडून देतात. दुसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार खरे म्हणून स्वीकारले तर आपली शास्त्रज्ञ म्हणून असलेली इभ्रत जाईल या भितीने ते मनातच ठेऊन घेणारे; आणि तिसरे, ऐकलेले किंवा पाहिलेले चमत्कार दुसऱ्यांना सांगणारे व त्यांच्या खरेपणाची शहानिशा करून घेण्यासाठी शास्त्रीय संशोधनाचा जाहीर आग्रह धरणारे. हा ग्रंथ शेवटच्या शास्त्रज्ञांच्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतो.
या ग्रंथाची भूमिका शुद्ध विज्ञानवादी आहे. (शुद्ध विज्ञान म्हणजे कुठलीही तत्वज्ञानाची बांधिलकी नसलेले विज्ञान)शुद्ध विज्ञानात दैवी शक्तीला (Divine Power) किंवा परमेश्वराला (Personal God) अजिबात स्थान नाही. सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुद्ध विज्ञान मानते व त्यांची नैसर्गिक (natural)उपपत्ती शोधते. पण नैसर्गिक उपपत्ती हे दुधारी शस्त्र आहे. ते जसे अंधश्रद्धेवर प्रहार करते तसे जडवादी तत्वज्ञानावर ही प्रहार करते. आणि हीच जडवादी लोकांची सर्वात मोठी अडचण आहे. म्हणून ते या शुद्ध विज्ञानरुपी शस्त्राच्या दुसऱ्या ‘धारे’कडे नेहमी व पद्धतशीरपणे दुर्लक्ष करीत असलेले दिसून येतात. ती धार जणु अस्तित्वातच नाही असे ते समजतात – नव्हे ते त्यांचे गृहितकृत्य असून त्या गृहितकृत्यावरच त्यांचे तथाकथित ‘विज्ञान’ उभे आहे. याविज्ञानाला आत्मवंचक - अर्थात डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजराच्या जातीचे व म्हणून ‘खोटे विज्ञान’ म्हणता येईल. या आत्मवंचक व खोट्या विज्ञानाला उघडे पाडणे , त्याचे खरे स्वरूप वाचकांपुढे ठेवणे हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे.”
“ अशा अनेक नैसर्गिक घटना आहेत ज्यांचा कार्यकारणभाव मानवाला माहित झालेला नाही. प्रश्न असा आहे की अशा घटनांची आदिकालिक मानवाप्रमाणे ‘चमत्कार’ म्हणून पुजा करायची का? की त्याच्या पाठीमागचा कार्यकारणभाव समजून घ्यायचा प्रयत्न करायचा ? की अशा घटना घडतच नाहीत, घडणे शक्य नाही असे म्हणून शत्रूला पाहून वाळूत डोके खुपसणाऱ्या शहामृगाची भूमिका स्वीकारायची? दुर्दैवाने काही शास्त्रज्ञ अशी भुमिका स्वीकारताना दिसून येतात.ही भूमिका आत्मवंचक, अवैज्ञानिक व म्हणून त्याज्य होय, हे या याग्रंथात वाचकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.”
या ग्रंथाच्या मथळ्याविषयी थोडेसे .... व अन्य मजकूर
.... शिवाय
सादर अर्पण
अनुक्रमणिका
मुखपृष्ठावरील चित्र
प्रकाशक
माहिती 'ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे' या ब्लॉगवर
तेथे वाचा- भौत विज्ञानाकडून अतींद्रिय विज्ञानाकडे - विज्ञान आणि बुद्धिवाद - प्रकरण 1
- बुद्धिप्रामाण्यवाद आणि परामानसशास्त्र - विज्ञान आणि बुद्धिवाद - प्रकरण 3
- विज्ञानाच्यादृष्टीकोनातून मरणोत्तर अस्तित्व - प्रकरण 4
- विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुनर्जन्म सिद्धांत प्रकरण 5 (अ)
- विज्ञान आणि बुद्धिविज्ञान आणि बुद्धिवाद - प्रकरण 5 (ब) लेबॅननच्या इमद एदवारची पुनर्जन्माची केस
- विज्ञान आणि चमत्कार - ग्रंथ परिचय
Book traversal links for विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अहो... त्याच लेखात "हा प्रकार
+१
+२
+३
+१
@ गणेशा, " शनिवारी/ बुधवारी
जाशील बुधी तर येशील कधीउत्तर
"बुध म्हणजे बुध ग्रहावर लांब
+४
प्रकाटाआ
मी स्वतः निरीश्वरवादी नसून
+1
तुम्ही वर उधृत केलेला
का हो काका
तुम्हाला मिपाचा पत्ता नक्की
++++ टू गवि,वल्ली,अन्या,मोदक,गणेशा
हेच तर आम्हिहि (आदरार्थी
आमची ( कधीकालची ) अंधश्रदधा .
आमची ( कधीकालची ) अंधश्रदधा .
अरे इथं काय अंधश्रद्धांची
लेखन समजले नाही..तरीही
>>>>विज्ञान आणि अंधश्रद्धा