महेश लंच होम..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
28 Oct 2011 - 3:12 pm

महेश लंच होम हा मुंबईतला एक बर्‍यापैकी जुना ब्रँड आहे. मुंबईत फोर्टात ७७ साली पहिलं महेश लंच होम निघालं आणि तेव्हापासून जुहू सेंटॉरला लागून, अंधेरीला साकीनाक्याजवळ, ठाणे आणि पुणे अशा अजून चार ब्रांचेस त्यांनी काढल्या.

एकदोनवेळा यातल्या ठाणे ब्रांचमधे गेलो होतो. पण तब्ब्येतीत नीट खाण्याचा योग आला नव्हता. म्हणून मग पाचसात मित्रलोकांनी कुठे जायचं असा चॉईस आला तेव्हा मी "महेश लंच होम" असं नाव घेतलं.

आता "महेश लंच होम" या नावावरुन साधारण एक खानावळवजा थाळी हॉटेल डोळ्यासमोर येईल की नाही? पण हे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. एकदम हाय-फाय. किंमतीच्या बाबतीत कोणत्याही प्रीमियम फाईन डाईन जागेशी स्पर्धा करणारं.

त्यांच्या वेबसाईटवर "जगातील सर्वोत्कृष्ट सी फूड"पैकी एक.. असं वर्णन आहे. "महेश सीफूड इज ग्रेट" असं लिहिलेलं "बर्प" सर्टिफिकेशनही तिथे फ्रेम करुन लावलेलं आहे.

तेव्हा बघूया तरी काय चीज आहे असं म्हणत आम्ही सातजण तिथे पोचलो. "लंच होम" असं नाव आहे आणि आम्ही पोचलोही अगदी लंचच्या वेळीच.

दारातच एका काचेरी शीतकपाटात वेगवेगळे मासे आणि खाली काही कप्प्यांमधे जिवंत चिंबोर्‍या, शेवंडे वगैरे ठेवली होती. म्हणजे आत जाताजाताच तुमच्या भक्ष्यस्थानी काय पडणार आहे ते पाहून जाता येत होतं.

आतला अँबियन्स छानच होता. सी-फूडचा काहींना हवासा आणि काहींना अगदी नकोसा वाटणारा दरवळ सगळीकडे होता. संध्याकाळी जेवणार्‍यांसाठी इथे पूलसाईड एरियाही आहे.

अंतर्भागः

बार सुटसुटीत पण नीटनेटका होता.

अनेक वेटर्स जिवंत लॉबस्टर्स, खेकडे आणि जिवंत नसलेले पण ताजे मासे हे सर्व ट्रेजमधे घेऊन फिरत होते.. गिर्‍हाईकाला चॉईस दाखवायला.. मग पसंत केलेला साईझ आणि प्राणी ताजा शिजवायला आत घेऊन जायचे.

उदा.

आधी:

नंतर:

नेहमी नॉनव्हेजवरच भर असतो म्हणून यंदा काहीतरी व्हेजही मागवू असा विचार केला. चौकशीअंती कळलं की आलेल्या सातांतले पाच व्हेज होते.

घ्या.. म्हणजे आता नॉनव्हेजच नमुन्यापुरते मागवायची वेळ आली.

मग मेन्यूकार्डाकडे नजर टाकली. डोळ्यात भरणारी पहिली बाजू म्हणजे उजवीकडचे आकडे. बर्‍यापैकी भूक मारणारे आकडे. सुमारे पंचतारांकित हॉटेल्सचा रेट भासावा असे दर सगळीकडे दिसत होते. पण आता आलोच आहोत तर करुया मजा, म्हणत मेन्यूतले पदार्थ चापसू लागलो.

काही उल्लेखनीयः

स्टार्टर्सः

-तंदूरी पापलेट
-पापलेट ग्रीन मसाला
-रावस, सुरमई किंवा हव्या त्या माश्याचे तंदूरी काप
-फिश टिक्का
-फिश फिंगर
-महेश स्पेशल प्रॉन्स

सीफूडमधे:

-जिंगरी मसाला
-बटर पेपर चिली गार्लिक अशा कॉम्बिनेशनमधे तुम्हाला हवे ते सीफूड बनवून देण्याचा चॉईस. म्हणजे बोनलेस क्रॅब, शेलसहित क्रॅब, लॉबस्टर, जम्बो प्रॉन्स, म्हाकुळ ऊर्फ स्क्विड वगैरे..

-महेश स्पेशल चिकन आणि मटण: लाल ग्रेवी आणि क्रीम यांमधे बनवलेले शेफ स्पेशल आयटेम्स.

याखेरीज

-नेहमीचे फिश फ्राय (रवा, बिनरवा तवा फ्राय, डीप फ्राय, तंदुरी.. जसे हवे तसे)
-मेंगलोरियन मसाल्यात फ्राय केलेले पापलेट आणि अन्य फिश
-शिंपले सुके फ्राय
-कारवारी प्रॉन्स
-चेट्टिनाड क्रॅब, चेट्टिनाड चिकन, क्रॅब करी
-सुके मटण, सुके चिकन, सुकी चिंबोरी, सुके प्रॉन्स.
-बांगडा, सुरमई, रावस कोलई. (मेंगलोरियन प्रकार असावा.)

त्यासोबत खायला भाकरी, रोटी, भात वगैरे होतेच पण खास लक्ष वेधून घेणारे प्रकार म्हणजे नीर डोसे आणि आप्पम.

चेट्टिनाड किंवा मेंगलोरियन प्रकारचे भरपूर खोबरेयुक्त चिकन आणि नीर डोसा अशी एक "नीर डोसा चिकन" नावाची डिशही होती.

परतलेल्या माशांचे तुकडे हवे तर किंवा अखंड मासा हवा असल्यास तशीही सोय होती:

नॉनव्हेजचे, विशेषतः सीफूडचे सर्व दर हे चारशे-पाचशेच्या वरच होते. माश्यांच्या किंवा शेवंडांच्या वगैरे बाबतीत "अ‍ॅज पर साईझ" म्हणजे ९००, १५००, २००० असे काहीही.

सुरुवातीला परतलेले मासे घ्यायचे ठरवले तेव्हा वेटर खालीलप्रमाणे मासे घेऊन दाखवायला आला.

सर्व पापलेट ९०० रुपयांच्या वर होते. मोठा तर २०००च्या घरात. तेव्हा आम्ही सध्या रावसावर भागवायचं ठरवलं. (तोच तो.. सर्व पापलेटभाईंच्या खाली दबलेला..) हा ७००चा होता. रुपये बरं.. ग्रॅम्स नव्हेत.

मग आम्ही काळजीपूर्वक मेनू ठरवला.

-जंबो रावस तवा फ्राय.. (रवा नको.. उगीच कटलेट बनून जातं..)
-सुरमई गस्सी (मेंगलोरियन स्टाईल मसाला आणि नारळाचा सढळ वापर असलेली रेसिपी)
-त्यासोबत आप्पम आणि नीर डोसे

महेश लंच होममधे व्हेज लोकांसाठी नेहमीचेच पदार्थ होते. वेटर तर म्हणालाही, तुम्हाला व्हेजमधे भरपूर चॉईस हवा असेल तर खालीच असलेल्या "शिवसागर प्युअर व्हेजमधे जावा". तेव्हा.. मागवलेले पदार्थ असे. :

-व्हेज क्रिस्पी
-कोबी लॉलीपॉप
-पनीर टिक्का
-व्हेज कोल्हापुरी
-व्हेज गस्सी (मेंगलोरियन.. हाच एक वेगळा पदार्थ)
-पुन्हा नीरडोसे आणि आप्पम.. रोट्या वगैरे

मग एकेक पदार्थ यायला सुरुवात झाली आणि आता "टेस्ट" ऊर्फ चवीचा क्षण आला. मोमेंट ऑफ ट्रुथ.

क्रिस्पी व्हेजः

हे चवीला छान होतं. पण नेहमीपेक्षा अफलातून खास काही नव्हे. उपस्थित शाकाहारी मंडळींनी अधिक टिपणी करावी.

त्यामागून रावस फ्राय होऊन आला:

याचीही टेस्ट समाधानकारक होती. रावसपेक्षा पापलेट कदाचित अजून थोडा चांगला असेल. पण "समाधानकारक" हा मचूळ शब्दच वापरायला लागतोय. "बेस्ट सीफूड इन द वर्ल्ड" या "महेश"च्या स्ववर्णनाला साजेसे "अफलातून, अप्रतिम, झक्कास" असे वर्णनात्मक शब्द काही तोंडी येईनात.

मग ती प्रसिद्ध स्पेशल मेंगलोरी सुरमई गस्सी (उच्चारी चूभूदेघे) आली.

त्याचा लुक मला तरी अजिबात आवडला नाही. रबडा नुसता. तरीही असेल चवीला बरी म्हणून टेस्टायला गेलो. सोबत आप्पम आणि नीरडोसा घेतला होता.

नीरडोसा आणि सुरमई गस्सी:

आप्पम आणि सुरमई गस्सी:

नीर डोसे लुसलुशीत मऊशार होते आणि आप्पम चांगलेच गुबगुबीत. मटणचिकनच्या किंवा झणझणीत माश्यांच्या कोणत्याही डिशला परफेक्ट अकंपनीमेंट असावेत असे.

पण ती गस्सी काही मला फारशी रुचली नाही. नारळ भरपूर होता. पण आंबटसर मसाला आणि सर्वकाही एकत्र मिसळून जणू रगड्यातून काढावे तशी (मेदूवड्याच्या बॅटरसारखी) गुळगुळीत ग्रेव्ही. त्यात कांदा, टॉमॅटो किंवा कोणताच घटकपदार्थ फील होत नव्हता.

सुरमईचे तुकडे उकडून घेऊन नंतर वरुन टाकल्यासारखे वाटत होते. मुरणे हा प्रकारच नव्हता.

व्हेज आघाडीवर काही आशादायक असेल अशा बेताने व्हेज गस्सी आणि आप्पम चाखून पाहिलं.

व्हेज गस्सी प्रकार म्हणजे सुरमईच्या गस्सीतलाच रस्सा सान्स सुरमई होता. त्यामुळे चवीत फरक नाहीच.

व्हेज कोल्हापुरी ठीकठाक.

यानंतर डेझर्ट्स आजमावून बघण्याची वेळ होती. कॅरामेल कस्टर्ड मागवलं.

चवीला ठीक होतं. पण त्याचा रस बशीभर पसरलेला आणि एकसंध दिसण्याऐवजी ते मोडतोड झाल्यासारखं वाटत होतं. निदान डेझर्टच्या बाबतीत प्रेझेंटेशनला महत्व आहे. त्यामुळे इंप्रेशन पडलं नाहीच.

वर उल्लेखलेल्या पदार्थांचं मिळून बिल पावणेचार हजाराच्या आसपास झालं. एकूण प्रकार ओव्हर हाईप्ड आणि महागडा वाटला.

महेश लंच होमला रेकमेंड करण्याविषयी:

तिथे सर्वकाही अगदी बेचव आहे असं मुळीच नव्हे. तिथले इतर प्रकार पूर्वी खाल्लेले चांगले असल्याचं आठवतंय. पण जेवढं वर्णन केलं गेलंय तेवढं अफलातून नक्कीच नाही. व्हॅल्यू फॉर मनी तर निश्चित नाही.

..................................

सोबत असलेले विमे, माशँ, किसन, विलासराव, प्रासभाऊ, सूड यांनी आपली मतं द्यावीत ही विनंती.

..................................

संस्कृतीप्रवाससमाजजीवनमानराहणीमौजमजाविचारप्रतिसादमाहितीप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

सन्जोप राव's picture

28 Oct 2011 - 4:47 pm | सन्जोप राव

पुण्यातल्या महेशच्या आता वाटेलाही जाणार नाही. असल्या महागड्या आणि बेचव ठिकाणांपेक्षा मला गावठी, स्वस्त पण झणझणीत चवीची ठिकाणे अधिक आवडतात. उदाहरणार्थ कोकणातले कुठलेही घरगुती जेवण (दिवे आगारचे पारकर, कर्द्याचे नागवेकर वगैरे)

पैसा's picture

28 Oct 2011 - 4:54 pm | पैसा

"नाव सोनूबाई" चा अनुभव बरेचदा येतो खरा. पण साधारणपणे हॉटेल जितकं साधं दिसतं, तितके पदार्थ चवीला चांगले असतात, हेही पाहिलंय.

हॉटेल जितकं साधं दिसतं, तितके पदार्थ चवीला चांगले असतात, हेही पाहिलंय

साधारणपणे माझीही अशीच समजूत होती पण पॉप टेट्स, माँडेगार, किव्हा लाऊंज, फिशरमन्स व्हार्फ वगैरेंनी ते चुकीचंही ठरवलं आहे...आणि अगदी मटणाच्या खानावळीतही रबरासारखं वातड खाल्लंय..

त्यामुळे चव आणि अँबियन्स यांचा संबंध नसतो असं म्हणू..

पैसा's picture

28 Oct 2011 - 5:04 pm | पैसा

*(आभार जावेद जाफ्री)

एकदम बरोबर. वाईट गोष्ट इतकीच समोर बर्‍यापैकी दिसणारा पदार्थ चवीला कसा आहे, हे खाल्ल्याशिवाय कळत नाही.

स्पा's picture

28 Oct 2011 - 5:01 pm | स्पा

बापरे बिलाचा आकडा पाहून आकडा यायची वेळ आलीये..
असो...

पुढील ३ ४ वर्ष तरी इतक बिल होणार्या हाटेलात जाण परवडणार नाही :)

बाकी सूड तू पिक्चर आला नाहीस ते बरेच केलेस हो ;)

>>बापरे बिलाचा आकडा पाहून आकडा यायची वेळ आलीये..
आकडा आला ?? कसला ?? आकडी येणारे लोक पाह्यले होते, तुला आकडा येतो म्हणजे नक्की काय होतं ते न कळल्यामुळे भांबावलोय.

>>बाकी सूड तू पिक्चर आला नाहीस ते बरेच केलेस हो
त्याचं कायै, आम्हाला न येण्यासाठी निमित्त करावी लागत नाहीत रे !! त्यादिवशी दहा वर्षांनी आम्ही शाळेतले मित्रमैत्रीणी भेटणार होतो. पिक्चर मी आजही पाहू शकतो, तो दिवस आज येणार आहे का ?? पिक्चरला जाऊन एक परिक्षण लिहून चार लोकांची वाह वाह घेण्यापेक्षा मला दहा वर्षांनी भेटणारे मित्रमैत्रीणी लाखमोलाचे वाटले. आणखी झणझणीत प्रत्युत्तर द्यायची इच्छा होती, पण सोड ना काय फरक पडतो. पैसा अगदीच महत्त्वाचा नसतो असं नाही, पण सगळ्याच गोष्टी पैशात मोजता येत नाहीत. निदान मला तरी !!

स्पाकाकांच्या प्रतिसादाच्या प्रति़क्षेत.

सूड आनि स्पा..

अरे हे काय चालू आहे ???

चला मांडवली करुन टाका..

झालं गेलं गंगार्पण करा.. तिथेच गंगातीरी होडन सावर प्या आणि मन साफ करा पाहू...

कसे??

स्पा's picture

30 Oct 2011 - 11:22 pm | स्पा

its getting too personal. i dont want to comment on this.i think its my fault that i fail to pick right friend. thanks a lot sud for such a nice feedback

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Oct 2011 - 12:51 am | विश्वनाथ मेहेंदळे

गविंशी सहमत. होडन सावर हाच अक्सीर इलाज आहे. मित्रांनो, बरेचसे वाद हे गैरसमजुतीतून होत असतात. कृपया गुडघा झटका प्रतिक्रिया (नी जर्क रीअ‍ॅक्शन) टाळा आणि मुख्य म्हणजे लेट्स कीप इट ऑफलाईन.

प्रचेतस's picture

31 Oct 2011 - 8:33 am | प्रचेतस

होडन सावर सूप पिवूनच या रे, वर चीता तेल पण लावा रामबाण.

सारखे काय रे उंदरा-मांजरासारखे भांडता. कधी तरी एकमेकांना समजून घ्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Oct 2011 - 10:58 am | llपुण्याचे पेशवेll

बाकी सूड तू पिक्चर आला नाहीस ते बरेच केलेस हो
लाआआआ लालालालालाला लालालालाला लालाआआ/
पिक्चर नंतरचा ला टंकायचा राहीला का मुंबईत हिंदी लोकांबरोबर राहून विभक्ती प्रत्यय टाळायची सवय?

सुनील's picture

28 Oct 2011 - 5:03 pm | सुनील

किसन शिंदेंचा महेश लंचला होमला जाण्याबाबत फोन आला तेव्हा फारच उशीर झाला होता.

ठाण्यात मासे खाण्यासाठी मस्त आणि (फार नसले तरी बर्‍यापैकी) स्वस्त हॉटेल म्हणजे प्रताप टॉकीजजवळील फिशलँड.

मग ती प्रसिद्ध स्पेशल मेंगलोरी सुरमई गस्सी (उच्चारी चूभूदेघे) आली.
मंगळूरी उच्चार जवळपास घशी असा असतो.

सुहास झेले's picture

30 Oct 2011 - 2:00 pm | सुहास झेले

महेश लंच होम इतकं खास आवडलं नाही, जेव्हा गेलो तेव्हा मी वेजिटेरीअन होतो.... आता वेजची ऍलर्जी आहे ;)

फिशलँड बेश्ट आहे... माझं आवडतं हॉटेल :) :) :)

प्रास's picture

28 Oct 2011 - 5:35 pm | प्रास

लक्ष्मी पूजनाच्या रात्री विमेंचा समस आल्यावर मागच्या हुकलेल्या स्वाद थाळीच्या कट्ट्याची आठवण ताजी होऊन पाडव्याच्या भेटीस तात्काळ होकार दिला. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी अस्मादिक 'विमेकाकां'सह ;-) ठाण्याला पोहोचलो. गविंनी आम्हा अ-ठाणेकरांना एकापाठोपाठ एक त्यांच्या गाडीने पिकप केल्याने घोळक्यानेच 'महेश लंच होम'ला धडकलो.

आम्हां निरामिषाहारींचं बहुमत असूनही प्योर वेज. शिवसागरात न जाता आम्ही ठरल्याप्रमाणे 'महेश लंच होमा'तच गेलो.

प्रथमदर्शनी हे ठीकाण चांगलंच प्रशस्त आणि व्यवस्थित आहे. गविंनी म्हण्टलं तशी आतली सजावटही छानच आहे पण या दोन्ही गोष्टींचा पोट भरण्यासाठी उपयोग होत नसल्याने स्थानापन्न होताच मेनुकार्ट्यावर नजर टाकली.

शेवटी घासफुस खाणारेच असल्याने त्या मेनुकार्ट्यात आम्हाला पर्यात खूपच कमी होते आणि अधिक विचारणा केली असता दरवाज्यातून बाहेरचा शिवसागरचा ;-) रस्ता दाखवण्यात आला. भुकेने आपला चांगला इंगा दाखवण्यास सुरूवात केली होती म्हणून तिथे दुर्लक्ष करून ऑर्डरी सुटल्या.

स्टार्टरसाठी पनीर टिक्का, वेज क्रीस्पी आणि गोबी लॉलीपॉप आणि मेन कोर्सात वेज गस्सी, वेज कोल्हापुरी या भाज्या नि अप्पम्, नीर डोसा आणि रोट्या घेतल्या.

वेज क्रीस्पी, गोबी लॉलीपॉप आणि पनीर टिक्का कुठल्याही हॉटेलात मिळतात तसेच साधारण होते. वेज कोल्हापुरी ही तशीच. वेज गस्सी हा प्रकार खास मेंगलोरीयन म्हणून तिथे रेकमेण्ड केला गेला होता. नारळाच्या दाट ग्रेवीमधला हा नवीन पदार्थ ठीक होता पण अगदी कुणाला रेकमेंड करण्याइतका खास वाटला नाही. माझ्यामते तिथे सर्व्ह झालेले अप्पम् आणि नीर डोसा हे पदार्थ दुसर्‍या कुठल्याही असे पदार्थ सर्व करणार्‍यांपेक्षा चांगले वाटले. चांगले फुललेले अप्पम् आणि तोंडात पटकन् विरघळणारा नीरडोसा हेच महेश लंच होमातले हाय-पॉईण्ट वाटले. साध्या लोणच्याबरोबरही खायला मस्त वाटले. जे काही पोटाचं समाधान झालं ते या तीन पदार्थांनीच पण मग त्यासाठी झालेला दर माणशी खर्च फारच व्यस्त प्रमाणात वाटला.

एकूण काय तर हा अनुभव वर पैसाताईंनी म्हण्टलंय तसं "नाव सोनूबाई...." या म्हणीला पुन्हा एकदा अधोरेखित करून गेलाच..... पण त्याबरोबरच गविभाऊ, विमेकाका, किसनद्येव, माशँ, सुड नि विलासरावांची भेटही करून देऊन गेला.

दिवसान्ति त्यांच मैत्रंच मनात गुंजारत होतं, महेश लंच होम नव्हे......

माझीही शॅम्पेन's picture

29 Oct 2011 - 11:08 am | माझीही शॅम्पेन

प्रास आणि गवी आणि अगदी सुरेख वर्णन केल आहे. आता माझे काही सेंट्स..

महेश लंच होमच नाव बरेच दिवसा पासून ऐकल होतो लक्ष्मीपूजनच्या रात्री वि-मेंचा भ्रमण संदेश मिळाला आणि प्लान नक्की केला. गवी प्रास , विलासराव , विमे सूड हे ठाणे स्थानकावरून येणार होते , मी त्या अगोदरच २० मिनिटे अगोदर पोहोचलो.

महेश मधले आतले वातावरण एकदम झकास होते , बाकी मंडळी यायला वेळ होता , मॅनेजरने संगितल तुम्ही आरामात बसा तुमच्या पार्टीला वेळ लागला तरी हरकत नाही. आजु-बाजूला काही प्रेक्षणीय स्थळे असल्याने वेळ चांगला गेला :) , तेवढ्यात किसन आपल्या ३ वर्षाच्या पुताण्याला घेऊन आला , मग बाकीची मीपा पार्टी पोहोचली. पुढच प्रास ने लिहिलाच आहे.
आम्ही चक्क दीड ते साडे-चार अस तीन तास जेवत होतो. कदाचित बिल जास्त झाल असल्याने वेटर किवा मॅनेजर आम्हाला डिस्तर्ब केल नाही. :)
वेज़ जेवणा साठी अगदीच सो-सो हॉटेल आहे. नॉन-वेज़ बद्दल गवींनी लिहिलेच आहे.
आमच्या गप्पा एकदम जोर-दार झाल्या आणि त्यानेच दिवाळीचा पाडवा आम्ही साजरा केला. असे मित्र-मंडळी असतील तर गोखले उप-हार गृहातही कट्टा अगदी जोर-दार होऊ शकतो :)

jaypal's picture

28 Oct 2011 - 6:56 pm | jaypal

सातत्याने वाटत की फोर्टातील महेश लंच होमच ठाण्यातल्या पेक्शा कितीतरी भारी आहे.
सुनील भाऊ "प्रताप टॉकीजजवळील फिशलँड. " हे सर्व्साधारण चविच पण ऊगाचच महाग आहे अस वाटत.
खरं सांगायच तर (माझ्या सारख्या) ज्याला घरी मासळी खायची चटक लागली त्याला बाहेरची चव सहसा पसंत पड नाही. दर तर मुळीच नाही.त्या मत्स्यगंधेशी आर्धा आर्धा (एवढा वेळ का ते विचारु नका ;-)) तास भाव केल्यावर त्या मासलीचा स्वादच बदलतो राव
f

प्रचेतस's picture

28 Oct 2011 - 7:52 pm | प्रचेतस

नीर डोसा खल्लासच दिसतोय एकदम.
महेश लंच होमचे नाव पुष्कळच ऐकून आहे. पण शाकाहारी असल्याने कधी योग आला नाही.
बार्बेक्यु नेशन अशा वेळी नक्कीच भारी वाटते. अर्थात थोडेसे महाग वाटले (५५० ते ६५० रू. प्रत्येकी) विविधता भरपूर असल्याने निराशा नक्कीच होत नाही. शिवाय महेशपेक्षा नक्कीच स्वस्त पडते.
शाकाहार्‍यांसाठी तर झवेरीबाजाराचे भगत ताराचंद तर मस्ट.

बाकी पाडवा असूनही महेश लंच होमच्या भेटीबद्दल अंमळ आश्चर्य वाटले.

सुहास झेले's picture

30 Oct 2011 - 2:01 pm | सुहास झेले

भगत ताराचंद... अहाहाहा, तोंडाला पाणी सुटले तिथलं जेवण आठवून :)

सध्या गविंनी न आवडलेल्या हाटेलांची लेखमालिका सुरु केलेली दिसते आहे.;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Oct 2011 - 12:13 am | निनाद मुक्काम प...

गवी मस्त माहितीपूर्ण लेख डिसेंबर ला मुंबईत दोन आठवड्यांसाठी येत आहे. महेश मध्ये जाण्याचा बेत होता. पण नाव मोठे अनु लक्षण खोटे असा प्रकार पाहून बेत रद्द .
''गवी आवडलेल्या उपहारगृहांची लेखमाला काढाच ''.
मुंबईत चांगल्या व दर्जेदार उपहारगृह अभक्ष भक्षणासाठी कोणते रेकमेंड कराल .?

शिल्पा ब's picture

29 Oct 2011 - 7:37 am | शिल्पा ब

हं..चव चांगली नसेल तर पैसे वाया गेलेत असंच माझं मत असतं. शिवाय जवळपास ४हजाराच्या आसपास एवढ्या जेवणाचं बिल म्हणजे अतिच आहेत. असो.

मुंबईत फोर्टात ७७ साली पहिलं महेश लंच होम निघालं आणि तेव्हापासून जुहू सेंटॉरला लागून, अंधेरीला साकीनाक्याजवळ, ठाणे आणि पुणे अशा अजून चार ब्रांचेस त्यांनी काढल्या.

पुण्यातल्या ब्रांचमधे जाण्याचा योग आला नाही. पण आता कोण जाणार महेशमधे हे वाचल्यावर.

फिशकरी अथवा चिकन बरोबर निरडोसा, अप्पम हे कॉम्बीनेशन झकास असते हे पुण्यातच "कोकोनट ग्रो" येथे खाल्ल्यावर कळले. दरसुद्धा वरच्यापेक्षा कमीच आहेत.

दर्दी लोकांनी तीथे खाउन बघावे.

किसन शिंदे's picture

29 Oct 2011 - 1:49 pm | किसन शिंदे

'आज ठाण्यात कट्टा आहे. १ वाजता. महेश लंच होम. मला यायला जमणार नाही.......बाकिच्यांना कळव '

सकाळी सकाळी उठल्यानंतर स्पावड्याचा असा थोडक्यात यस.यम.यस पाहीला अनं त्यालाच फोन करून विचारलं, "अजुन कोण कोण येणारे". मग त्यानेच दिलेल्या माहीतीवरनं प्रास, विलासराव हि दोन नविन नाव(म्हणजे आधी भेट न झालेली) कळली. लगोलग रामदास काका, सुनील, लिमाऊजेट, सविता००१ या सगळ्यांना येण्याचं निमंत्रण देऊन टाकलं, पण त्यांच्या आधीच ठरलेल्या शेड्युलप्रमाणे कोणालाच जमण्यासारखं नव्हतं. मग 'एकला चालो रे' म्हणण्यापेक्षा आमच्या छोट्यालाही बरोबर घेऊन ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशीराच पोहचलो. महेशला पोहचलो तेव्हा फक्त माशॅ तिथे एकटाच माश्या मारत बसलेला :D. हातातल्या शंकरपाळ्याच्या ड्ब्याला(ह्या खास सुडने रेकमेंड केलेल्या)पाहून सगळ्यांनी असं काहितरी आणायचंय असच त्या बिचार्‍याला वाटलं. थोड्या वेळाने बाकिचीही मंडळी आली आणी मग चालु झालेला गप्पांचा फड पार ४.३० वाजेपर्यंत रंगला. बाकीचे सगळे नेहमीचेच होते फक्त विलासराव आणी प्रास यांना पहिल्यांदाच भेटलो.

सहज म्हणून दोन चार फोटो काढले होते...

बसायला जागा पुरेना म्हणून या दोन माणसांसाठी स्वतंत्र टेबल घ्यावं लागलं. ;)

हा आमचा छोटू...चैतन्य

बाकी वर सर्व जाणकार मंडळींनी सांगितल्याप्रमाणेच आम्हीही तेच म्हणतो, शाकाहार्‍यांसाठी तिथे खास असं काहीच नव्हतं पण मासे खाणार्‍या अट्टल खवय्यांसाठी मात्र महेश लंच होम एक चांगलं ठिकाण म्हणाव लागेल अर्थात खिशात जास्त पैसे खुळखूळत असतील तर.

प्रास's picture

29 Oct 2011 - 2:23 pm | प्रास

फोटो तर मस्तच पण काही स्पष्टिकरणं आवश्यक वाटल्याने प्रतिसाद....

१. गविंबरोबर टेबल शेअर करण्याचा मान अस्मादिकांना मिळालेला आहे.

२. किसनद्येवांसमोर आणि माशँच्या शेजारी विलासराव ब्राझिलकर आहेत.

३. आमच्या अगम्य नावांचा (मिपा आयडी) उल्लेख होणार्‍या गप्पांमुळे चैतन्य महाराज जे निद्रादेवींच्या कुशीत विराजमान झाले ते पार आम्ही बाहेर पडता पडताच नाईलाजाने पुन्हा आमच्यात सामिल झाले.

:-)

माझीही शॅम्पेन's picture

29 Oct 2011 - 2:35 pm | माझीही शॅम्पेन

महेशला पोहचलो तेव्हा फक्त माशॅ तिथे एकटाच माश्या मारत बसलेला

अरे किस्ना वरची प्रतिक्रिया वाच , तिथे लिहिलय काय करत होतो ते :)

त्या मुळे तू लवकर कडमडलास अस म्हणाव का :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Oct 2011 - 2:17 am | विश्वनाथ मेहेंदळे

बरेच दिवसात मिपावरील मित्रांची भेटगाठ झाली नव्हती. सूड शी बोलताना हा विषय निघाला. दिवाळीत भेटता येईल असे ठरले. सहज म्हणून १-२ फोन फिरवले, तर गवि, स्पा भेटायला एका पायावर तयार होते. दिवाळीचा दिवस असल्याने नक्की किती जण येतील याचा अंदाज आला नाही आणि ऐनवेळेला ठरल्याने धागा पण टाकता आला नाही. तरीही जितके फोन नंबर होते, त्यांना संपर्क केला. विलासराव तर ५ मिनिटांच्या नोटीस वर आले. माशॅ पण असाच ऐनवेळी कळवून पण आला.

असो, तर साधारण ११:३० ला घरून निघालो, अनेक फोन, काही समस, एक फोन चालू असताना दुसरा फोन येणे, पाठवलेला समस समोरील व्यक्तीने न वाचणे असे सगळे प्रकार घडून आम्ही साधारण २ च्या सुमारास हाटीलात स्थानापन्न झालो. यावेळीपण पुरेपूर कोल्हापूर ची पुनरावृत्ती. मी आणि गवि मस्त्याहारी बाकी सगळे प्राणीमात्रांवर दया करणारे. विलासरावांवर भरवसा ठेवून होतो. पण ते पण शाकाहारी निघाले. त्या निमित्ताने मग मिपावर मुंबई आणि परिसरात कट्टेच्छुक आणि न-शाकाहारी सभासदांची भरती केली पाहिजे असा एक विचार मनात आला. लवकरच टेंडर काढण्याचा मनोदय आहे. भाषांतर यकु करतील काय? असो, तर गविंनी वेटरशी बातचीत करून आमची ऑर्डर दिली. इतर ५ जणांनी गवताच्या गंजीतून सुई शोधावी त्या चिकाटीने त्या भरभक्कम मेन्यूतून शाकाहारी पदार्थ शोधले.

आमच्या हपिसातील एका अडाणी माणसाने घातलेल्या गोंधळामुळे मला २:३० ते ३:०० हा बहुमूल्य वेळ फोन वर घालवावा लागला, ते पण महेश लंच होम च्या बाहेर येरझाऱ्या घालत (तरी नशीब, ते काम नीट झाले) मी परत येईपर्यंत, तळलेला रावस येऊन थंड होऊन पडला होता. त्यामुळे त्याची मजा आली नाहीच. त्यातून मी सुरुवात केली तो तुकडा त्या माशाचे डोके निघाला त्यामुळे अजूनच विरस झाला. सुरमई घश्शी ठीकठाक होती. एकूण किमतीच्या मानाने काहीच खास नाही. कॅरामल पुडिंग ठीक ठक होते. पण साधारण १०० च्या जवळपास किंमत होती. दिल्ली दरबार मध्ये याहून चांगले ३५ ला मिळते ;-)

फोर्ट मधल्या महेश मध्ये मागे गेलो होतो. ते मात्र आवडले होते. तिथला आमचा वेटर मराठी असल्याने त्याने आमची आवड ओळखून आणि अत्यंत अगत्याने ऑर्डर घेण्यापासून ते वाढण्यापर्यंत केले होते. तिथेही सुरमई घश्शी खाल्ली होती. ती छान होती. त्या महेश मध्ये सुक्के चिकन आणि सुरमई किंवा पापलेट चांगला मिळतो. फोर्टात महेशाच्याच जवळ अपूर्व नावाचे एक हॉटेल आहे. ते एकदम फर्स्ट क्लास आहे. आणि महेश पेक्षा बरेच स्वत पण. गवि, एकदा तिथे धाड टाकू.

मग बाहेर पडून परत गप्पा, ठाणे दादर प्रवासात गप्पा, दादर ला उतरल्यावर पुन्हा चहा पिता पिता गप्पा असे विविध कार्यक्रम करून, साधारण ७ च्या सुमारास घरी आलो तेव्हा दिवस सत्कारणी लागल्याचे समाधान होते. पुढील कट्टा ठाण्यात न करता मुंबईत करावा या दृष्टीने जोरदार लॉबिंग आम्ही करत आहोत. बघू कसे जमते ते :-)

विलासराव's picture

30 Oct 2011 - 11:56 am | विलासराव

>>>>>>फोर्टात महेशाच्याच जवळ अपूर्व नावाचे एक हॉटेल आहे. ते एकदम फर्स्ट क्लास आहे.
पुर्ण सहमत.
मी मटन्/चिकन खायचो त्यावेळेस आमचा अड्डा होता अपुर्व.
माझा एक मावसभाउ आनी त्याचे ३-४ मित्र तर अपुर्वचे चाहते आहेत. कितीतरी वेळा ते फक्त आनी फक्त मासे खाण्यासाठी पुण्यावरुन अपुर्वला येतात.
एकदा तर ते दुपारी आले. आम्ही अपुर्वात गेलो. ऑर्डर केली तर वेटर म्हणाला जे काय तुम्हाला हवे असेल ते लगेच सांगा कारण दुपारी हॉटेल बंद होते. मग आम्ही ऑर्डर तर दिलीच पण नियोजीत वेळेत काय आमचा कार्यभाग साधणार नव्हता. मग आम्ही तेथील मॅनेजरला विनंती केली तर त्याने सुरवातीला ठाम नकार ठोकला. पण आमच्या मावसभावाने जाउन त्याच्याशी बराच खल केल्यावर त्याने आम्हाला बसायला परवानगी दिली. हॉटेल ६ वाजता चालु झाले तरी आम्ही तिथेच होतो. एक वेटर खास आमच्यासाठी थांबला होता मग आम्ही त्यालाही यथोचित भेट देवुन ७ वाजाता तेथुन निघालो.
तिथले मासे बॉम्बे डक, पापलेट फ्राय विथ ग्रीन सॉस्/चट्नी हे भावाचे फेवरीट आहेत. तो प्राणी फक्त मासे खाण्यासाठी कुठेही जाउ शकतो. तो भारतभर फिरत असतो तरीही त्याचे मासे खाण्यासाठीचे नं -१ अपुर्वच आहे.
मी मासे खात नव्हतो आणि आता तर मांसाहारच करत नाही.

होतं असं कधी कधी !!!! मी सुरुअण्णा कर्केरांना भेटीन (उधारी थोडी बाकी आहे) तेव्हा त्यांना हा धागा दाखवीन. तोपर्यंत अल्वाशेठच्या अपूर्व मध्ये जाऊ. अपूर्व नाही जमलं तर चेकनाक्यावर सिंधुदुर्गमध्ये जाऊ. सिंधुदुर्ग नाही जमलं तर संदीप ला बसू. गवि आणि किसनची सोय म्हणून विक्रोळीला आकर्षण मध्ये जेवू. (आकर्षण म्हणजे पूर्वीचे जगन्नाथ लंच होम) लालबाग सोयीचे असेल तर क्षीरसागरच्या ताटावर बसू. खवय्ये सलामत तो हॉटेल पचास.
पण तोपर्यंत ठाण्यात लुईस वाडीत एका खानावळीचा शोध लागला आहे तिकडे जाउ या. नाही जमली चव तर मास्तरांचं घर जवळच आहे. (हघतुप)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Oct 2011 - 4:01 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>> ....अपूर्व मध्ये जाऊ. .... सिंधुदुर्गमध्ये जाऊ. .... संदीप ला बसू. ....आकर्षण मध्ये जेवू. .... क्षीरसागरच्या ताटावर बसू. ....ठाण्यात लुईस वाडीत एका खानावळीचा शोध लागला आहे तिकडे जाउ....
एकच प्रश्न... कधी ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Nov 2011 - 2:30 am | निनाद मुक्काम प...

मी डिसेंबर मध्ये मुंबईत येत आहे. तेव्हा एखादा मिपा कट्टा करूया का ?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

2 Nov 2011 - 11:05 am | विश्वनाथ मेहेंदळे

नक्की करू. तू इथे कधी कधी आहेस त्या तारखा कळव.