नविन मिपाकरांना मिपाकरांची (कट्टाविरहीत) ओळख

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
30 Jul 2011 - 4:42 am

डिस्क्लेमर: हा धागा समस्त मिपाकरांसाठी जे मिपावर नवअर्भकावस्थेत आहेत, नवीन आहेत, वाचक आहेत आणि तळ्यात मळ्यात असणारे असे जे पाहुणॆ आहेत त्यांच्यासाठी आहे.

मिपाकरहो, मी सोकाजीरावत्रिलोकेर, गेली दोन वर्ष मिपाकर आहे जो प्रामुख्याने वाचक असलेला आणि नुकताच लिहीता झालेला. आज काही मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. फक्त एका व्यनीतुन भेटण्याची इच्छा मी व्यक्त केली आणि त्या इच्छेला मान दिला जाउन भेट जुळुन आली. हो खरच, भेटण्यासाठी एकही गाजावाजात्मक धागा न काढता (किंवा ‘न काढलेला’ धागा काढुन न टाकता) आणि ‘मिपा कट्ट्या’ची घोषणा न करता. खरे नाहे वाटत? पण असे झाले खरे, आणि हे फक्त मिपावरच होउ शकते असा आत्मविश्वास (फाजील नव्हे) आता मला आला आहे.

ह्या भेटीला ‘मिपा कट्टा’ म्हणावे कि नाही हा मुद्दा गौण आहे कारण नविन मिपाकरांना आपलेसे करुन जाणुन घेण्यास, औपचारिकतेस फाट्यावर मारून आणि गाजावाजा न करता केलेला हा स्तुत्य असा हा अट्टाहास होता ह्याची अनुभुती मला ह्या भेटीत आली.

ह्या भेटीत विवीध व्यक्तीमत्वाचे मिपाकर होते, पिणारे आणि न पिणारे. पण त्यामुळॆ माझ्यासारख्या नवमिपाकरास आणि इतरांस काहीही अडचण आली नाही. गडबड, राडा तर अजिबात झाला नाही उलट मझा आला. माझा हेतु, जो की आतरजालीय ओळख दृढ करून तीला मिपाच्या ओळखीच्या पुढची पायरी गाठणे हा होता. जो सर्व जाणत्या आणि प्रगल्भ मिपाकरांनी ह्या भेटीत सार्थ केला. पिणार्यांेसाठी पिणे हे फक्त एक साधन होते, मुळ हेतु होता (जो मला जाणवला) एकमेकांची ओळख करुन घेणे, समजणे (आणि आजमावणे सुद्धा ;))

आजच्या ‘बैठकीत’ प्रत्यक्ष, याची देहा याची डोळा भेटण्याचा योग आलेल्या मिपाकरांचा परिचय मी ‘नविन’ मिपाकरांना करून देणार आहे.

कोणाच्यातरी (बहुतेक वसईचे किल्लेदार) खरडवहीत हे वाक्य वाचले होते 'प्रथमच (घाबरत घाबरत) प्रवेश करतोय!'
खरेतर वाइट वाटले होते वाचुन. एवढी दहशत? मिपाच्या होमपेज वर 'अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.' असे घोषवाक्य असुनसुद्धा? म्हणुन हा 'पात्र'परिचय जेणेकरोन नवागतांची भीड चेपली जाउन ते बेधडक, तमा न बाळगता लिहीते व्हावे.

1. परा (परिकथेतील राजकुमार) : ह्या पराचा कावळा होउ शकत नाही कारण हा ऑलरेडी ‘डोमकावळा’ आहे. मनाने अतिशय निर्मळ (?) आहे परा. ह्याने तुमच्या धाग्यावर येउन कितीही आणि कसाही गोंधळ घातला किंवा कितीही ‘काड्या सारल्या’ तर अजिबात मनावर न घेता खुशाल ह्याला फाट्यावर मारा. क़ाड्या घालणे ही त्याची आवड (की धंदा?) आहे ;)
2. धमाल मुलगा: ‘पोपटपंची करणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ असा खाक्या असलेला गुणी (?) मुलगा आहे हा. हुषार, सालस आणि गुणी (स्वयंघोषित बर का) आहे आपला धमु. परा खालोखाल क़ाड्या घालण्यात पटाइत आहे, म्हणुन जो कायदा पराला तोच ह्याला, फाट्यावर मारणे.
3. श्रावण मोडक: दांडगा व्यासंग आणि वाचन असलेला गृहस्थ. भला माणुस कारण दारु पित नाही (हे 'शुद्ध शाकाहारी' मत आहे) :). पण ‘मी दारु पीत नाही, मी दारू पिणार्यांसबरोबर बसणार नाही’ असा आजिबात ‘हट्ट’ नाही. मोकळ्या मनाने भेटा बोला (काहीही, वाट्टेल ते) त्याबरोबर दारू प्या, शिव्या घाला मला काहीही फरक पडत नाही असा स्वभाव आहे ह्यांचा
4. चिंतामणी: आजच्या ‘बैठकीची’ सोय ह्यांनी लावली म्हणुन नाही पण एकंदरीतच छान व्यक्तीमत्व. काहीसे अबोल पण ‘सौ सुनार की एक लोहार की’ ह्या उक्तीप्रमाणे दणका देणारे. तब्बेतीने दारवा पिणारे, वयाचा मुलाहिजा न बाळगता आपलेसे करून घेणारे. (पण शेवटी गाडी आणायला जातो म्हणुन गुल होणारे ;))
5. बिपीन कार्यकर्ते: आपले बिपीनदा, हे आपलेसे झाले की छान छान पुस्तके भेट देतात (स्वत:ची सही बीही करुन). तर ह्यांच्याशी गट्टी जमवा, ह्यांना व्यनी पाठवा, खरडी लिहा, हमखास पुस्तक भेट मिळण्याची सोय :) पण हो तुमचा तेवढा व्यासंग हवा ह्यांच्याशी गट्टी जमवायला. उगाच काहीतरी करायला जाल तर तोंडघशी पडाल. हो नाहीतर काय, फुकट पुस्तक मिळवायची हौस अंगाशी यायची. ‘मंडळींच्या’ परवानगीने 2 बीअर प्यायची परवानगी आहे ह्यांना पण त्यामुळे तुम्हीही तेवढीच प्या अशी ह्यांची बोंब नाही. आणि जर पान बीन खायची आवड असेल तर ह्याच्याबरोबर ‘मसाले पान जमवायचा’ आनंदही लुटु शकाल.
6. छोटा डॉन: डॉन्या, हा ‘वायदेआजम’ म्हणुन मशहुर आहे. वेळ देउन न पाळण्याची कारणे द्यायच्या शिकवण्या घेतो हा. व्यनी किंवा खरड टाकली की फी माफ आहे इथे (स्कॉलरशीपही चालु करणार आहे म्हणे). पंढरपुर आणि पंढरपुरच्या वारीवर काही धागा काढायचा मनसुबा असेल तर बाबांनो (बाबींनो सुद्धा) जरा जपुन. खवचट आणि जिव्हारी लाग़णारे प्रतिसाद ह्याच्याकडुन येण्याची दाट शक़्यता आहे.

आता जरा सचित्र ओळख

डावीकडुन: (टाय घातलेला नव्हे तो वेटर आहे :D) धमु, बिपीनदा आणि परा

डावीकडुन: सोकाजी, श्रावण मोडक आणि वायदेआझम उर्फ छोटा डॉन उर्फ डॉण्या

डावीकडुन: परा आणि चिंतामणी

इथे फ़ॉर अ चेंज पराचा ‘कावळा’ झाला आहे आणि तो गायब झाला आहे ;)

मोराल ऑफ द स्टोरी (तात्पर्य) :
1. येवा मराठीजनहो मिपा आपलेच आहे, सर्व मिपाकर आपलेच आहेत. इथे आपपरभाव नाही
2. प्रतिसादांची आणि कंपुबाजांची तमा न बाळगता अभिव्यक्त ह्या आणि बिन्धास्त लिहा
(व्याकरणाची आणि शुद्धलेखनाची चिंता न करता ;))
3. मोकळ्या मनाने इथे वावरलात तर माणसे जोडाल, किंतु घेउन वावराल तर कंपुबाज बनाल
4. फाट्यावर मारणे हे इथले ब्रीदवाक्य आहे, हे जाणुन घ्याल तर धाग्यावर धागे काढाल आणि ते काढुन टाकण्याची वेळ न येउ
द्याल ;)

उगाचच अवांतर (स्वगत) : च्यायला हे फोटो बघुन आणि पात्रपरिचयावरून 'एक दारूकट्टा' झाला शांततेत असा फील राहुन राहुन येउन राहिलाय.

वावरसमाजजीवनमानमौजमजाछायाचित्रणप्रकटनसद्भावनाप्रतिक्रियाआस्वादलेखअनुभवसल्लामाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Jul 2011 - 5:09 am | विश्वनाथ मेहेंदळे

अरे वा !! छान छान. असेच कट्टे होत राहू देत.

वि.मे.

निवेदिता-ताई's picture

30 Jul 2011 - 8:17 am | निवेदिता-ताई

छान छान..........

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Jul 2011 - 8:36 am | विश्वनाथ मेहेंदळे

प्रतिसाद टाकला कधी, संपादित कधी केलात ? :-)

बाकी.... तुंम्ही दिलेला पात्र परिचय सॉल्लीड आहे...वाचुन लई मजा आली.

गटारी गटारी बहुगुणी ही गटारी
जाताना मिळू देत...आपापल्या मोटारी
अशी ही गटारी पिऊन त्रुप्त व्हावे
प्रत्येकास दारू चढो ती 'स्व'-भावे...

मद्यधर्मराज सोकाजीमहाराज त्रिलोकेकर की जय हो.........

नरेशकुमार's picture

30 Jul 2011 - 8:30 am | नरेशकुमार

व्वा व्वा छान छान.

स्पा's picture

30 Jul 2011 - 9:28 am | स्पा

झकास.. असेच कट्टे वारंवार होत राहोत

(नवीन मिपाकर) स्पा

--संस्थापक
मिसळपाव 'नवनिर्माण' सेना

सहज's picture

30 Jul 2011 - 9:30 am | सहज

वरील आयडी पैकी काही जण त्या दिवशी तुम्हाला त्यांच्या दुसर्‍याच व्यक्तिमत्वाने (स्प्लिट पर्सनॅलिटी) भेटले होते असे तुम्ही दिलेल्या वर्णनावरुन वाटते आहे इतकेच नमूद करु इच्छितो. ;-)

अगदी असेच म्हणतो..

आम्हाला भेटलेले श्रामो आणि बिका वेगळे आणि खूपच तरूण दिसत होते. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2011 - 8:25 pm | बिपिन कार्यकर्ते

@ सहज : सहमत आहे. ;)

@ अर्धवट : तुला भेटायच्या आधी तसेच होतो आम्ही.

आनंदयात्री's picture

30 Jul 2011 - 9:55 am | आनंदयात्री

पर्‍या अंमळ साउथ इंडियन लोकांसारखी केशरचना बदलाय लागलाय असे उगाच वाटुन गेले.

ऋषिकेश's picture

1 Aug 2011 - 9:43 am | ऋषिकेश

(एकेकाळी) प्रत्यक्ष बघितलेला परा आणि फटुतला अंमळ येगळा दिसतोय :प

(पण शेवटी गाडी आणायला जातो म्हणुन गुल होणारे )

चान चान. पण....अबे साल्या. प-याला विचारायचेस ना हे लिहीण्या आधी

का तुलासुद्धा गुण लागला प-याचा काड्या सारायचा. ;)

सोत्रि's picture

30 Jul 2011 - 10:41 am | सोत्रि

चिंका,

कालच तर दिक्षा मिळाली की तुम्हा गुरुजनांकडुन (काड्या सारण्याची) ;)

- (मिपा सर्टीफाइड काड्याघालु) सोकाजी

मृत्युन्जय's picture

30 Jul 2011 - 11:14 am | मृत्युन्जय

भला माणुस कारण दारु पित नाही.

ह्यो चेंज कधीपासुन झाला?

त्यांच्यासमोर जे पांढरे द्रव्य ठेवले आहे ते स्प्राइट आहे की काय मग?

नावातकायआहे's picture

30 Jul 2011 - 2:38 pm | नावातकायआहे

>>भला माणुस कारण दारु पित नाही.
आयला कवा पासुन?
खर का काय?? :-(
आनी शीतपेयात तो हलव्या काय करतोय मग?

प्रचेतस's picture

30 Jul 2011 - 2:33 pm | प्रचेतस

सोकाजीराव, फोटू व वृत्तांत एकदम झकास.

स्मिता.'s picture

30 Jul 2011 - 2:44 pm | स्मिता.

वा वा चान चान ;)
असेच कट्टे करत रहा आणि वृत्तांत कळवत रहा.

भला माणुस कारण दारु पित नाही
काहिही काय???? वाचणार्‍यांचा विश्वास बसेल असं काही बोला ना राव!

विकाल's picture

30 Jul 2011 - 3:23 pm | विकाल

भाउ....

जे पी मोरगन अन टारझन कुठे आहेत कल्पना आहे का?

वाचनमात्र (कंपूविहीन) मंड्ळीची एक प्रामाणिक विचारणा

मी-सौरभ's picture

31 Jul 2011 - 5:10 pm | मी-सौरभ

:(

वसईचे किल्लेदार's picture

30 Jul 2011 - 3:41 pm | वसईचे किल्लेदार

धन्यवाद सोकाजीराव ...

श्रावण मोडक's picture

30 Jul 2011 - 4:43 pm | श्रावण मोडक

इथं माझ्या पूर्वेतिहासावरून आलेल्या काही हलकट प्रश्नांना एका भारी माणसाचा आधार घेऊन उत्तर -
गालिब छुटी शराब पर अब भी कभी – कभी
पीता हूं रोज-ए-अब्र-ओ-शब-ए-महताब मे

यातील उर्दू शब्द चुकला असल्यास माफ करावे.

अर्धवट's picture

30 Jul 2011 - 5:27 pm | अर्धवट

>>भला माणुस कारण दारु पित नाही

मी परत दोन दोन वेळा फोटो बघितला ना... :) बरं "दारू पीत नाही" हे एकवेळ चालेल.. पण "भला माणूस" ;)

अर्धवट's picture

30 Jul 2011 - 5:23 pm | अर्धवट

>>भला माणुस कारण दारु पित नाही

<पंगा मोड ऑन>

आपल्या वरील वाक्यावरून किंबहूना आपण ही दोन वेगळी वाक्ये कार्यकारणभावाने जोडल्याने माझा असा समज होत आहे की,
१. दारू पिणार्‍या व्यक्ती भल्या नसतात
२.दारू न पिणार्‍या सर्व व्यक्ती भल्या असतात
३. भल्या व्यक्ती दारू पीत नाहीत.
४. दारू न पिणे हे भलेपणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे

वरील अर्थ खरंच तुम्हाला अभिप्रेत आहेत का ते कळाल्यास बरे होईल.

बाकी चालू देण्यास आमची परवानगी लागत नाहीच.

थंडीत जागाघट्ट

<पंगा मोड ऑफ>

श्रावण मोडक's picture

30 Jul 2011 - 5:40 pm | श्रावण मोडक

दंडवत. स्वीकार करावा. भेटीअंती प्रत्यक्ष दंडवत करूच. ;)

सोत्रि's picture

31 Jul 2011 - 11:57 am | सोत्रि

भला माणुस कारण दारु पित नाही

हे माझे वैयक्तिक मत आहे. (हिणकस शेरा: मी माझ्या मताची पिंक टाकुन मोकळा झालो आहे) ;)
प्रत्येक चाणाक्ष मिपाकर ह्या वाक्याचा कसाही अर्थ लावायला मोकळा आहे कारण व्यक्ति तितक्या 'प्रवृत्ती'..... :)

त्यात पुन्हा भारतीय लोकशाहीने प्रत्येक भारतीयाला व्यक्तीस्वातंत्र्याचा जन्मसिद्ध हक्क दिलाच आहे. :)

- (व्यक्तीस्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता) सोकाजी

सोत्रि's picture

31 Jul 2011 - 12:09 pm | सोत्रि

तुमच्या <पंगामोड> प्रश्नांमुळे वाक्यात थोडा बदल केला गेल्या आहे :)

- (शुद्ध मांसाहारी) सोकाजी

विनायक प्रभू's picture

30 Jul 2011 - 5:59 pm | विनायक प्रभू

परा हा बराच 'हँडसम' दिसतो.
बराचसा त्या इर्शाद हाश्मी सारखा.

प्रभू मास्तरांशी सहमत
अवांतरः माताय या मास्तराना हल्ली बरा वेळ मिळायला लागलाय मिपावर यायला.
( खवचट सदाशिव पेठी हास्याची स्मायली )

विनायक प्रभू's picture

31 Jul 2011 - 2:27 pm | विनायक प्रभू

ओ विजुभौ,
आता ह्या प्रश्नाचे उतर पण द्या.
एवढा 'हँडसम' दिसणारा परा अजुनही "हँडसम" कसा राहीला?(सेल्फ प्रोक्लेम्ड)

सौन्दर्य's picture

30 Jul 2011 - 7:53 pm | सौन्दर्य

मला नेहेमी असे वाटत आले आहे की ज्यांच्याशी आपण संवाद साधतो ते संवाद साधताना डोळ्यासमोर आले पाहीजेत, नाहीतर उगाचच १-८०० नंबर वर बोलताना जी एक त्रयस्थपणाची जाणिव होते, तसे होते.

मिपा वरचे हे चतुरस्त्र खेळ करणारे गडी सोकाजिने 'ह्याचि देही ह्याचि डोळा' दाखवले, आणि आम्ही धन्य जाहलो. 'पंख होते तो उड आतारे' असे ही वाटले, पण हरकत नाही, असे योग पुन्हा येतील ह्याची खात्री आहे. मिपा वर अजुनही खूप गुणि खेळाडू आहेत, त्यांचा देखील परीचय व्हावा ही इच्छा.

सौन्दर्य

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2011 - 8:22 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद मिष्टर त्रिलोकेकर, दॅट वॉज फन, यु नो! ;)

बाकी, माझ्याकडे पुस्तकांबद्दल पृच्छा करणार्‍यांसाठी जाहिर सल्ला : "उत्तरासाठी श्री. छोटा डॉन यांच्याशी संपर्क साधा. (उत्तर ऑलरेडी त्यांना दिल्या गेले आहे.)" धन्यवाद.

अजातशत्रु's picture

30 Jul 2011 - 9:56 pm | अजातशत्रु

आवडली
सर्व सदस्य वयस्कर आहेत,, वाटले नव्हते :puzzled: (अपवाद छोटा डॉन)

असो,

या पार्टिवरुन आठवले
आजच हा मॅसेज आला
गटारिच्या शुभेच्छा

बार माझा देश आहे,
सारे बेवडे माझे बांधव आहेत
माझ्या ब्रॅन्डवर माझे प्रेम आहे
बार मधिल सर्व प्रकारच्या अल्कोहोलचा मि मान ठेविन
माझ्या बार मधे आनंदाने आणि विविधतेने झुलणार्‍या बेवड्यांचा मला अभिमान आहे
माझा बार आणि माझी दारु यातच माझे सौख्य सामावले आहे.
:drunk:
जय गटारी

सोत्रि's picture

31 Jul 2011 - 12:17 pm | सोत्रि

अजातशत्रु यांना काही प्रश्न:

  • वयस्कर नसावेत असे का वाटले होते?
  • वयस्कर असणॆ हा गुन्हा आहे का?
  • वयस्कर असण्यार्‍यांनी मिपावर येउ नये का?
  • वयस्कर असण्यार्‍यांनी कट्टे करु नयेत का?

असो, तुम्हाला हे गाणे माहित आहे काय ?
'पिवळ्या पानाचा देठ की हो हिरवा.......'

- (हिरव्या देठाचा) सोकाजी

अजातशत्रु's picture

1 Aug 2011 - 11:16 am | अजातशत्रु

वयस्कर नसावेत असे का वाटले होते?
त्यांच्या बोलण्यावरुन
वयस्कर असणॆ हा गुन्हा आहे का?
नाहि मि तरी तसा दावा केला नाहि आणी फिर्यादहि
वयस्कर असण्यार्‍यांनी मिपावर येउ नये का?
हा अतिशयोक्ति प्रश्न आहे.
कुणि यावे न यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न (अधिकार-मालक आहेत :))
वयस्कर असण्यार्‍यांनी कट्टे करु नयेत का?
अरेरे तुम्हि कहितरि वेगळाच अर्थ लावताय,
गैरसमजा बद्दल दिलगिर आहे.
तुम्हाला हे गाणे माहित आहे काय ?
'पिवळ्या पानाचा देठ की हो हिरवा.......'
हो हि लावणी आहे ;)

काय राव, तुम्हि आणि तुमचे मित्र मला नेहमी पुर्वग्रहानेच का पहात असता?

उद्या मि
कसे आहात, बरे आहात ना ? असे विचारले, तरी म्हणाल तुम्हाला बरे असलेले पहावत नाही काय :)

असो

पुढच्या कट्ट्याला मनापासून शुभेच्छा...!!

(हिरव्या-निर्मळ मनाचा)

तुम्हि आणि तुमचे मित्र मला नेहमी पुर्वग्रहानेच का पहात असता?

आता तुम्हीच वेगळा अर्थ लावाताय, ह्याला म्हणतात 'खाइ त्याला खवखवे'.

मी तुमच्या 'वयस्कर आहेत' ह्या मताबद्दल खुलासा मिळावा म्हनुन प्रश्न टाकले होते. तर तुम्ही मलाच कंपुबाज बनवायला निघालात.

असो अजुन काही प्रश्न

  • बोलण्यावरून 'वयस्कर नसावेत' असा तुमचा 'पुर्वग्रह' का व कसा झाला?
  • ते बोलणे बाळबोध होते का?
  • ते बोलण्याला पोच नव्हता का?
  • ते बोलण्याला अनुभवाची झालर नव्हती का?
  • अतिशयोक्ति प्रश्न म्हणजे काय?
  • लावणी हे गाणॆ नसते का?
  • मग आपण गाणे-बजावणे म्हणतो ते का?

- (पुर्वग्रहाचा चष्मा न घालाणारा) सोकाजी

अवांतर:
असे बादरायाण संबंध जोडता आहात गुगळ्यांचा "एक चित्रपट एक जाहिरात'' हा धागा फार मनावर घेतला आहे असे दिसते. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

1 Aug 2011 - 2:36 pm | परिकथेतील राजकुमार

हे बघा सोत्रे,
तुमचे दोन्ही प्रतिसाद मला अजिब्बात आवडलेले नाहीत.

असे कुणाला हिणवू नये, उद्या तुम्हालापण मोतीबिंदू झाला आणि कोणी असे प्रश्न विचारले तर ?

आलास का रे बाबा तु?

घे बाबा माझा 'खो'

- (खो-खो खेळाडु) सोकाजी

चिंतामणी's picture

31 Jul 2011 - 1:09 pm | चिंतामणी

सर्व सदस्य वयस्कर आहेत,, वाटले नव्हते (अपवाद छोटा डॉन)

ध.मु, परा,

Hope you had noted point.

(सोत्री Has already noted)

श्रावण मोडक's picture

30 Jul 2011 - 10:34 pm | श्रावण मोडक

... आणि
७. सोकाजीराव त्रिलोकेकर: राजा माणूस. मद्याचा आस्वाद हा अभ्यासाचा विषय. एखाद्या मार्मीक टिप्पणीवर, विनोदावर मनमुराद खळखळाट करणारा. गेली काही वर्षे पुण्यात वास्तव्य असल्याने गुण लागला आहेच. एरवी, मद्याचा आस्वाद, त्यातलं सुख यांची महत्ती गाणारा, त्यातली कलात्मकता सांगणारा, मद्याची चव तोंडात घोळवत ते घशाखाली उतरावं असं म्हटल्यावर मनमुरादपणेच "अहाहाहाहा" म्हणणारा हा माणूस मी मद्य घेत नाही हे कळल्यानंतरही मला 'भला माणूस' म्हणतो, यातच सारं काही आलं. ;)

दुसर्‍या फोटोत मोडक डान्याला का दरडावून र्‍हायलेत? ;-) (अन म्हणे भला माणूस! भल्या माणसाचे बाकीचे मुद्दे इतरांनी वरती खोडून काढलेच आहेत.) :P

इष्टुर फाकडा's picture

31 Jul 2011 - 2:40 am | इष्टुर फाकडा

गविंना भेटण्याची आस आहे :D योग कधी जुळून येईल माहित नाही, पण त्यांचं लेखन वाचून येड्या मनं जुळल्यागत वाटायल ब्वा ! (म्हणजे लेखनात्मक अभिव्यक्तीतून ; बाकी काही नव्हे )

प्यासा's picture

31 Jul 2011 - 12:57 pm | प्यासा

मी 'चला व्यसनांना बदनाम करुया' या मोहिमेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तांबड्या पिवळ्या पेयांकडे दुर्लक्ष केल्यावर फोटो अन पेयतृप्त चेहरे बघून खूप मस्त वाटले ...

मी-सौरभ's picture

31 Jul 2011 - 5:14 pm | मी-सौरभ

असं असेल तर पहिला आय डी बदला....

प्यासा हे एक तीर्थ (??) क्षेत्र आहे असे आम्ही ऐकून आहोत.

इंटरनेटस्नेही's picture

1 Aug 2011 - 1:54 am | इंटरनेटस्नेही

प्यासा हे एक तीर्थ (??) क्षेत्र आहे असे आम्ही ऐकून आहोत.

या तीर्थक्षेत्री आम्ही एकदा पिऊन पडलो होतो.. नंतर तिकडच्या भल्या वेटरने आम्हाला रि़क्षात बसवुन दिले होते.. जुण्या आठवणी जाग्या झाल्या! :)

शाहिर's picture

5 Aug 2011 - 2:12 pm | शाहिर

पुण्यक्षेत्री कधीही मद्यप्रेमीची आबाळ होउ नये ..म्हनून प्यासा तीर्थक्षेत्री २४ तास वारुणी यज्ञ चालु असतो ....
पत्त हवा असल्यास व्य नि करा

अवांतर : गुरुदत्तचा प्यासा हे खरो खरच तीर्थ क्षेत्र आहे ..एकदा तरी भेट द्यावी असे !!

इरसाल's picture

31 Jul 2011 - 2:06 pm | इरसाल

आवडलं !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jul 2011 - 2:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोपनिय कट्टे, जाहीर कट्टे, चालू ठेवा. :)

मिपाकरांची सचित्र ओळख करुन दिल्याबद्दल सोत्रींचे आभार.

-दिलीप बिरुटे

मिपाकर्स रॉक्स............

इंटरनेटस्नेही's picture

1 Aug 2011 - 4:07 am | इंटरनेटस्नेही

चांगला धमाकेदार झालेला दिसतोय कट्टा!

प्रभो's picture

1 Aug 2011 - 9:16 am | प्रभो

हाहाहा.... सोकाजींची श्रामोंबद्दल गल्लत झाल्याचे शक्यता नाकारता येत नाही.. ;)

अवांतर: बाकी फ्ल्याश डब्बल मारलेला का?? डाण्याच्या चेहरा जरा उजळ दिसतोय. (यावेळेस अगदीच निगेटीव्ह सारखा दिसत नाहीये.. ) :D

जुन्यांनी नव्याला दिलेला दिक्षा समारंभ आवडला. ;)

-(दिक्षेच्या प्रतिक्षेत) गणा

चिंतामणी's picture

1 Aug 2011 - 3:37 pm | चिंतामणी

तुमचे पाय भारत भूला कधी लागणार आहेत????? म्हणजे लागणार आहेत की नाही?? (असे वाटायचे कारण म्हणजे तुम्ही पब्लीश केलेले मुलीचे स्टेटमेंट).

आगमनाची खबर सवीस्तर द्या. आमच्यासाठी निदान एका संध्याकाळी ४-५ तास वेळ ठेवा. मग बघा तुमचा दिक्षा समारंभ धडाक्यात होतो की नाही ते.

सोत्रि's picture

1 Aug 2011 - 4:05 pm | सोत्रि

अरे वा!

गणपाजी या या लवकर या, सुस्वागतम करायला जातीने हजर रहायला आवडेल.
खासच, ह्या निमीत्तने मलाही पुनश्च 'दिक्षीत' व्ह्यायला नक्कीच आवडेल.

- (पुनश्च 'दिक्षांदेही' असे म्हणणारा ) सोकाजी

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Aug 2011 - 8:39 pm | बिपिन कार्यकर्ते

गण्या भो***, येतोस तेव्हा कळवतही नाहीस... आणी म्हणे दीक्षेच्या प्रतिक्षेत वगैरे... साला दांभिक! ;)

अवांतर : तू येच रे एकदा, तुझ्यासाठी एवढा मोठा कट्टा करू की दुनिया याद करेल, काय!

गणपा's picture

1 Aug 2011 - 8:43 pm | गणपा

नोंद घेतली गेली आहे. :)

"वायदेआजम" हा किताब तुर्त तात्याबांसाठी राखीव आहे. ;-)

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Aug 2011 - 10:56 am | ब्रिटिश टिंग्या

सगळे एकजात बेवडे!

बिका चौथ्या फोटोत फोटोग्राफर ला दरडावत आहेत असे वाटते. खरे काय ते धमू सांगू शकेल.
कोपराने ढोसत तर नव्हतास ना धमू ?