अंगाची काहिली करणाऱ्या उन्हात एखाद्या बिल्डींग च्या मागील बाजूस कागद गोळा करणारी भंगार जमा करणारी, चार पाच पोरे बसलेली दिसल्यास आपल्या सारख्याला त्यांची दया येण्याचीच शक्यता जास्त.आपण म्हणू कि कदाचित उन्हाने आणि कामाने शिणून बिचारे सावलीत निवांत गप्पा मारत बसले असतील, पण जरा जवळ जाऊन पाहिल्यावर आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास नाही बसत.
हि सगळी कार्टी अगदी मजेत नशा पाणी करत असतात, तुम्हाला वाटत असेल कि नशा फक्त दारू सिगारेट तंबाखू,गांजा यांनीच केली जाते, पण आता नशे बाज जे काही शोध लावतात ते तमाम विज्ञानाच्या शोधांना देखील मागे टाकू शकतात.
मादक पदार्थांचा नशे साठी वापर करणार्यांनी शोधलाय नवीन पदार्थ .............
कुणालाही अगदी सहज पणे उपलब्ध होणारा, कुणालाही सहज परवडणारा , आणि नशा अशी हुकमी कि सरळ मेंदूवर अंमल करणारी.
साधारण पणे वीस रुपयां मध्ये अगदी कुठल्याही जनरल स्टोर मध्ये मिळणारी छोटीसी बाटली , जी आपण सुशिक्षित लोक वापरतो आपल्या लिखाणातल्या चुका मिटवन्या साठी, पांढर्या कागदावर काळ्या शाईने केलेले चुकीचे लिखाणपुसून टाकण्या साठी ,
होय व्हाईटनर ज्यांनी कधी आयुष्यात हातात पेन पकडला नाही आणि पकडण्याची शक्यता देखील नाही ते हात आता केवळ नशे साठी हातात घेत आहेत व्हाईटनर च्या बाटल्या ते हि एक वेळेस पाच सहा किंवा खिशाला परवडतील एवढ्या.स्वतः च्या आयुष्याला या जीवनाच्या कागदावरून पुसून टाकण्या साठी.
अगदी जीवासाठी हानिकारक असलेले हे व्यसन करताना व्हाईटनर रुमालावर घेऊन त्याचा अगदी छाती भरून श्वास घेतला जातो किंवा कागदावर लावून सुकल्यावर त्या कागदाची सिगारेट बनवली जाते आणि ती ओढतात अन आनंद सागरात बुडून जातात . इतर नशां पेक्षा हि नशा तीव्र असते आणि अधिक वेळ टिकून रहाते.
https://mail.google.com/mail/h/e1drmoxv0ks2/?view=att&th=12fb59a82b13207...
डॉक्टरांच्या मता नुसार या व्यसनाने त्या मुलांना क्षणिक उत्साह, क्षणिक एकाग्रता मिळते , पण त्या बरोबरच जिवावरची जोखीम प्रत्येक कश घेताना सोबत असते. चक्कर येणे ,फिटस येणे, विस्कळीत संभाषण, डोळ्यांना अंधारी येणे , धुरकट दिसणे ,डोक्यात प्रचंड वेदना आणि एक असंतुलित व्यक्तिमत्व किंवा मानसिक रोग हे सर्व विकार पण सप्रेम भेटी दाखल मिळतात.
अति सेवनाने वेडेपणाचे दौरे पडू शकतात किंवा कोमा मध्ये सुद्धा जाऊ शकतात किंवा हृदयाचा दौरा सुद्धा येऊ शकतो.
आणि या नशे वर काही इलाज देखील नाहीये.
गड्या आपला गाव बरा असे समजणारा मी अगदी हादरून गेलो जेव्हा हि वस्तुस्थिती माझ्या समोर आली कि शहर असो वा गाव आपल्याला व्यसना विरुद्धची लढाई आता घरोघर लढावी लागणार आहे. संस्कारांची शस्त्रे घराघरात परजावी लागणार आहेत.
--
प्रतिक्रिया
4 May 2011 - 11:05 am | रामदास
बर्याच कंपन्यांनी थिनर देणे बंद केले आहे. पण त्याचा फारसा काही उपयोग नाही. थिनर नाही तर पेट्रोलवर काम भागवले जाते.
4 May 2011 - 12:08 pm | सूर्यपुत्र
ब्रेडला आयोडेक्स किंवा अमॄतांजन जॅमसारखे लावून खाणे. :(
-सूर्यपुत्र.
4 May 2011 - 2:08 pm | चिरोटा
हे वाचूनच डोके दुखले.!
4 May 2011 - 4:03 pm | नगरीनिरंजन
हृदयाचा दौरा? म्हणजे हृदय आपली जागा सोडून शरीरभर फिरते की काय?
असो.
चांगल्या घरातली आणि 'सुसंस्कृत' मुलेही असे उद्योग करतात. फक्त रस्त्यावरच्या 'कार्ट्यां'च्या नावाने गळा काढण्याची गरज नाही.
4 May 2011 - 4:56 pm | झंम्प्या
------चांगल्या घरातली आणि 'सुसंस्कृत' मुलेही असे उद्योग करतात. फक्त रस्त्यावरच्या 'कार्ट्यां'च्या नावाने गळा काढण्याची गरज नाही---------
भलत्याच ज्वलंत प्रतिक्रीया असतात राव तुमच्या...
अगदी... बेंबीच्या देठापासुन बोलता अस वाटंत... असो...
4 May 2011 - 7:25 pm | नगरीनिरंजन
काय? हे वाचून मला धक्का बसला. माझ्या प्रशांत स्वभावातून निर्माण झालेलं माझ्याभोवतीचं प्रसन्नतेचं नीलरम्य वलय भंग पावलं आणि बाह्यजगातले कर्कश आवाज माझ्या मनःपटलावर गंजलेले ओरखडे उमटवून गेले. आत्यंतिक कणवेतून आलेले माझे दु:खोद्गार कोणाला बेंबीच्या देठापासून आलेले वाटतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
असो. पुन्हा एकदा शांतपणे बोलणारा मनुष्य जसे वाचेल तसे वाचून पाहावे ही नम्र विनंती.
4 May 2011 - 6:29 pm | शुचि
बाप रे हे माहीत नव्हते :(
4 May 2011 - 10:01 pm | ५० फक्त
ह्या असल्या नशा करणा-यांना वरचा ननिचा संदेश वाचुन दाखवा, एका झटक्यात नशा खल्लास.
4 May 2011 - 10:39 pm | दैत्य
सहमत आहे!
4 May 2011 - 10:35 pm | राही
मुंबईच्या लोकलगाड्यांमधून पाचसहा वर्षाची,वाढ खुंटलेली पोरे भीक मागून पैसे गोळा करतात आणि थोडेसे पैसे जमले की लगेच 'सोलुशन' आणून तोंडात ओततात की दिवसभराची बेगमी झाली, हे जेव्हा प्रथम दिसले आणि कळले होते तेव्हा प्रचंड अस्वस्थता आली होती.
5 May 2011 - 1:21 am | टुकुल
लेखाच नाव वाचल तेव्हाच वाटल कि हा विषय असेल....
स्वस्तातल्या नशेचे ढिगभर प्रकार आहेत, काही काही मधे तर जराही खर्च नाही. पण तब्येतीला एकदम वाईट.
--टुकुल