मोराची चिंचोळी व रांजणखळगे.

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
4 Feb 2011 - 12:20 am

सहल - मोराची चिंचोळी व रांजणखळगे.

मित्रहो, अचानक ठरवुन देशस्थात ब-याच गोष्टी नीट होतात हे बाबांचं वाक्य सिद्ध करण्यासाठीच की काय दोन दिवसात हि सहल ठरवली आणि यशस्वी केली. या बद्दल आम्ही सर्व प्रथम आमचे मित्र कि जे श्री. राजशेखर व श्री. अभिजित यांचे अनेक आभार. तर या सहलीचा रिपोर्ट खालीलप्रमाणे सादर आहे.

रविवारी सकाळी ठरल्याप्रमाणे लवकर उठुन घरातुन मिंटित बसुन निघालो, मुंबई-पुणे हायवेला फारशी वर्दळ नसल्याने बरोबर २० मिनिटात राजशेखरच्या घरी पोहोचलो आणि शिरस्त्याप्रमाणे चहा पाणि घेउन शिक्रापुरला निघालो,मोशि -आळंदि -सणसवाडि मार्गे शिक्रापुरला साडेनवुला ट्च, आहा लई मजा आली गाडी चालवायला सकाळी सकाळी. अभिजित हडपसरहुन येउन तिथेच जॊईन झाला. शिक्रापुर पासुन डाव्या हाताला एक फाटा जातो तो पाबळला, त्याच रस्त्यावर साधारण १७ - १८ किमि वर मोराचि चिंचोळी हे गाव आहे, आता जे नावात आहे ते गावात पण आहे, हो दोन्ही चिंच पण आणि मोर पण. इथे श्री. आनंदराव थोपटे यांच्या घरीच जेवणा खाण्याची सोय आहे, त्यांच्या बरोबर आधीच बोलणी झालेली होती, तसेच त्यांनी पण सकाळपासुन ३-४ फोन करुन कुठे आलेलो आहोत ते विचारलेले होतेच.

गाड्या त्यांच्या घराच्या समोर लावल्या आणि सगळी पोरं खाली उतरवली. जवळ जवळ दोन तास पोरांना मांड्यावर घेउन आया व पोरं दोन्ही पार्ट्या जाम कंटाळल्या होत्या, अशा वेळी ड्रायव्हर असणं हे सर्वात सुखाचं काम असतं, रिझर्व्ह सिट आणि हात पाय हलवायला जागा. थोपटेंनी काही मोराची अंडि साठवुन तसेच छोटि पिल्लं पकडुन त्यांना वाढवणं सुरु केलं आहे,

पुढच्या वर्षी हे मोर मोठे झालेले असतील आणि लहानपणापासुन - यहां मॆ घर घर खेली - असल्याने तिथंच आसपास राहतील. ’ पोहे होत्याती गरम तवर रानातुन जाउन या चटदिशि ’ इति, थोपटेमावशी लगेच चहा घेउन त्यांच्या घराच्या मागच्या रानात फिरायला निघालो. मागं एका तात्पुरत्या पाटामधुन मोटार चालु करुन पाणि सोडलेलं होतं, पोरं आणि त्यांचे आईबाप असे सगळेच त्यातुन चालत चालत गेलो, आसपासची शेती पाहिली, मग गोव्यात जसे डॊल्फिन दर्शनाचे होतात तसे मोर दर्शनाचे कार्यक्रम झाले. परत येताना माझ्या बायकोला अबोलीचं झाड दिसलं, ही तिची अतिशय म्हणजे अतिशय आवडती फुलं ( पुरावा - आज पर्यंत सासरहुन ३ अबोली रंगाचे शर्ट मिळालेत). आमच्या सोलापुरच्या घरि सुद्धा खुप झाडं आहेत अबोलीची असो.. तिनं खुप फुलं गोळा केली,

तेवढ्यात थोपटेअण्णांच्या लेकाचा आवाज ऎकुन परत घराकडे आलो, गरम गरम पोहे तयार होते, हाण हाण हाणले कारण आता इथुन पुढे रांजणखळगे पाहायला जायचं होतं आणि तिथं बरेच चालावं लागणार होतं. तो पर्यंत सगळी पोरं मातीत खेळुन मजा करत होती, आज काल घराच्या बाहेर पडलं की डांबर नाहितर सिमेंट्चे रस्ते आणि जी बाजुला माती असते ती नको नको त्या गोष्टींनी रंगलेली पण इथं पोरांना मातील खेळायला त्यांच्या आरोग्य निरिक्षक आया पण काही म्हणत नव्हत्या.

शेवटी रांजण्खळगेला निघताना पोरांना अक्षरक्ष: उचलुन थोडं विसळलं आणि पुन्हा गाड्यांत बसवलं, अभिजितच्या गाडित थोपटेअण्णा गाईड म्हणुन बसले होते, तिथुन निघुन मलठणमार्गे रांजणखळगे पाहायला आलो, पार्किंगच्या गोंधळाच्या नियमाच्या पुरेपुर पालन करत मोकळ्या मॆदानात २-३ वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं पार्किंग करुन मंदिराजवळुन खाली नदी पात्रात खळगे पाहण्यासाठी उतरलो. थोपटे अण्णांच्या वॊकिंग कॊमेट्री आणि अभिजित बरोबरच्या ’ खळगे म्हणजे पाणि व ज्वालामुखी व उल्कापात’ अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.असेहि सगळ्या सिव्हिल इंजिनियरना दगड म्हणलं की किति ब्रास याचीच काळजी असते, पण अभिजित तसा नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि असा एक मित्र असल्याबद्दल माझाच अभिमान वाटला. आता हे खळगे कसे का कधी असले शास्त्रीय प्रश्न विचारु नका,आम्ही रविवारच्या सहली या साठी काढत नाही त्या साठि गुगला. इथं फक्त फोटो पाहा आणि मजा करा.

गालावरच्या खळीत जी मजा आहे ती नदितल्या खळग्यात कुठं असं म्हणु नका, फोटोवरुन कल्पना येईलच नाहीतर प्रत्यक्ष जाउन पाहा हा फार जबरदस्त नजारा आहे, विशेषत: फोटोग्राफर्स साठी तर निश्चितच, ब्लॆक व्हाईट फोटोग्राफिसाठी तर खुपच सुंदर. हे त्या खळग्यांचे फोटो.




हा चेहरा राजशेखरने दाखवला म्हणुन लक्षात आला, (नाहीतर आम्हाला प्रत्येक दगड म्हणजे आमचेच पत्रिबिब वाटते)

असे बरेच छोटे छोटे दगडी पुल आहेत तिथे.

तिथंच एका खळग्यातल्या पाण्यातले बेडुकदादा.

हे खरंच रांजणासारखं दिसतय.



बालविक्रमादित्याला सापड्लं त्याचं सिंहासन.

सगळे खळगे पाहण्यात १-२ तास गेले, आता तिथल्या देवळाजवळ आणि आमच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होति. मग तिथुन परत आलो थोपटे अण्णांच्या घरी, तोवर मावशींनी जेवण करुनच ठेवलेलंच होतं, भाकरी, पिठलं, वांग्याची भाजी, दोन प्रकारचा ठेचा, शेंगादाण्याची चटणी, मसालेभात व कढी असा बेत होता. भाकरी होतानाचा मला यापेक्षा चांगला फोटो अजुन मिळाला नाही,


घराबाहेरच खाटांसमोर टेबलं मांडुन जेवायची व्यवस्था केलेली होती. ताटं वाढुन आणली, आधीच भुक लागलेली होती त्यात असं जेवण
पुढं आल्यावर कशाला थांबा असा विचार केला त्यातच थोपटेअण्णा एका भल्या थोरल्या किटलीतुन घरचं तुप घेउन आले आणि भातावर आमटी घ्यावी तसं तुप भाकरीवर घालु लागले, अगागा अस्सल घरगुती तुपाच्या वासानं भुक अजुनच खवळली आणि आम्ही सगळ्यांनी मनसोक्त घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर एका चिंचेच्या झाडाखाली विश्रांतीची सोय केलेली होती,
हे महाशय खांबावर बसुन मजा पाहात होते आमची.
तिथं थोडि विश्रांती घेउन निघताना १-२ मोरांनी दर्शन देउन आमचा दिवस सार्थकी लावला व आपल्या गावाचं नाव राखलं.

थोपटेअण्णांच्या घरातील धाकटे सदस्य - लई अ‍ॅटिटुड होता याला.

हे गव्हाच्या शेतात बसले होते,

नेहमीप्रमाणे मला मोहवणा-या तेजोनिधी लोहगोलाची ही छायाचित्रं,

आणि त्या सुर्यास्ताच्या बरोबरच हा एक व्रुक्षास्त, सुर्य नारायण उद्या पुन्हा येतील पण ह्याचा पुन्हा उदय होण्यासाठी आपल्यालाच हात पाय हलवले पाहिजेत, किमान आपल्या लेकरा बाळांसाठी तरी.

फोटोंसाठी अभिजितला धन्यवाद. राजशेखरकडचे फोटो आले की टाकतो खाली.

तर अशी ही या वर्षातली दुसरी ट्रिप सुफ़ळ संपुर्ण झाली.

मदत हवी आहे - एच्डि व्हिडिओ युट्युबवर टाकण्यासाठी लहान कसे करावे ते सांगावे.

हर्षद.

संस्कृतीप्रवासवावरराहती जागाजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रणसद्भावनाशिफारसअनुभवमाहितीप्रतिक्रियाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

4 Feb 2011 - 12:35 am | टारझन

एक णंबर ... आत्ताच २६ जाणेवारीला निघोज ला जाऊन आलो होतो .. त्या आठवणी पुण्हा जाग्या झाल्या :)
लेख आणि फोटु ... जबराच !!

आम्ही ३०ला गेलो होतो, तु काय बाईकवर गेला असशील ना ?

प्राजु's picture

4 Feb 2011 - 1:01 am | प्राजु

मस्तच! एकदम मस्त!!

सखी's picture

4 Feb 2011 - 1:57 am | सखी

सहीच फोटो आणि वृत्तांत, अबोली आणि भाकरीचा तयार होतानाचा फोटो केवळा अप्रतिम!
आणि हो सिहांसनाधिष्ट एकदम छान दिसत आहेत.

चित्रा's picture

4 Feb 2011 - 7:04 am | चित्रा

असेच सर्व म्हणते. सुरेख वृत्तांत.

खळगे फारच चित्तवेधक आहेत. अबोलीची फुले, सिंहासनाधिष्ठित चिरंजीव फारच छान.

स्वाती दिनेश's picture

4 Feb 2011 - 2:18 am | स्वाती दिनेश

फोटो , वृत्तांत दोन्ही छानच!
स्वाती

मस्त वृत्तांत आणि फटु पण

आता हे खळगे कसे का कधी असले शास्त्रीय प्रश्न विचारु नका,आम्ही रविवारच्या सहली या साठी काढत नाही त्या साठि गुगला. इथं फक्त फोटो पाहा आणि मजा करा.

हे सगळ्यात मस्त :)

रांजणखळगे मस्तच दिसत आहेत

(लवकरात लवकर काहीतरी जमवून पातळ थापलेली मऊसूत ज्वारीची भाकरी खायलाच पाहिजे. कोण बनवून देणार? :-( सोडा तो मोह...)

रांजणखळग्यात गोटे दिसतात. पाण्याच्या प्रवाहात ते गोटे घुसळल्यामुळे असे गोलाकार खळगे बनतात म्हणे. आणि एकदा का खळगा थोडा खोल झाला की चांगले घुसळले गेल्याशिवाय छोटे गोटे बाहेर पडूच शकत नाहीत... मग आणखीनच खोल होतात.

नरेशकुमार's picture

4 Feb 2011 - 7:14 am | नरेशकुमार

अरे वा ! छान छान.
जायला पाहीजे.

श्री. आनंदराव थोपटे यांच्या घरीच जेवणा खाण्याची सोय आहे, त्यांच्या बरोबर आधीच बोलणी झालेली होती.

या सद्गृहस्थांचा काही पत्ता / संपर्क क्र. वगेरे द्या. आमी पण गेलो तर त्यांच्याकडे उतरू.

नरेशभाउ,

हा घ्या फोन नंबर - ९६७३१३२४९७, त्यांना माझा रेफरन्स छत्रपति सर असा द्या, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. मोराची चिंचोळो मध्ये अजुन एक जय मल्हार हे एक केंद्र आहे, पण ते खुप जास्त प्रोफेशनल आहे, जेवणाची प्रत पण फार चांगली नाही. फक्त त्यांच्याकडचे चिंचेच्या झाडावरचे घर व झोके हे छान आहेत. तसेच त्यांनी एक जुनं घर तयार केलं आहे ते सुद्धा छान आहे. पण तिथल्या ड़िजेमुळे तिथे मोर जास्त येत नाहीत व आपल्याला गावात आल्याचं समाधान पण नाही.

हर्षद.

नरेशकुमार's picture

4 Feb 2011 - 10:15 am | नरेशकुमार

संपर्क क्र. नोंद करुन घेतला आहे.
आणि माहीती बद्दल विशेष आभार !

प्रचेतस's picture

4 Feb 2011 - 8:41 am | प्रचेतस

हर्षदभौ खूपच सुरेख फोटो व वर्णन.

मोराच्या चिंचोली बद्दल या तीन संकेतस्थळांवर पण अधिक माहिती मिळेल.

http://morachichincholi.com

http://www.chincholimorachi.com

http://chincholi-morachi.com

एकूण एक फोटू जबर्या

खूपच मस्त....
जायला हवं एकदा :)

मृगनयनी's picture

4 Feb 2011 - 9:25 am | मृगनयनी

चारशब्द!.. सगळेच फोटो खरोखर अप्रतिम!

_______

सूर्यास्ताचे दोन्ही फोटो स्पेशली आवडले!

_______

बाकी मोराच्या चिन्चोली'ला जाण्यासाठी आम्हाला उद्युक्त केल्याबद्दल आभार आणि धन्यवाद! :)

_______

आणि ते सगळ्यांत पहिलं "देशस्थां" बद्दलंच वाक्य मनाला अंमळ सुखावून गेलं! :)

आत्मशून्य's picture

4 Feb 2011 - 9:17 am | आत्मशून्य

मदत हवी आहे - एच्डि व्हिडिओ युट्युबवर टाकण्यासाठी लहान कसे करावे ते सांगावे.

मी Zwei-Stein वापरायचो, बघा एक ट्राय देऊन .....

शिल्पा ब's picture

4 Feb 2011 - 9:21 am | शिल्पा ब

वाह!! फोटो मस्त...ताट पाहुन तोंडाला पाणी सुटले...दोन्ही ठीकाणे छान दिसताहेत..
खुप काळाने आबोलीची फुले पाहीली..

इन्द्र्राज पवार's picture

4 Feb 2011 - 9:26 am | इन्द्र्राज पवार

हर्षद....

वर्णन असे काही ओघवते आणि आपुलकीचे वाटते की, जणू काय मी स्वतःच तुमच्या बाजूला उभे राहून तो परिसर पाहात आहे.

फोटोंबद्दल तर सर्वांनी प्रशंसेचे उद्गार काढलेले आहे. मी दोन गोष्टी सांगतो त्याबद्दल....

१. कित्येक वर्षांनी 'चुलीवर' भाकरी भाजताना पाहिले. माझ्या आजीच्या गावी 'माही' ला गेलो होतो, त्यावेळी तिथे अशाप्रकारे भाकर्‍या तयार होताना पाहण्याच्या/खाण्याचा आनंद घेतला होता त्याची आठवण झाली. खूप सुंदर....विशेषतः ते तेजस्वी लालबुंद निखारे (कोल्हापुरकडे "इंगळ" म्हणतात.)

२. 'बाल विक्रमादित्य'....त्यांची 'दृष्ट' काढा.....जुगजूग जियो ! हीरोच दिसत्योय त्या सिंहासनावर, बिलकुल....हे मत त्याला आवर्जुन कळवा....उद्या खरेच हीरो झाला तर निदान यामुळे तरी मला झटकन ऑटोग्राफ देईल.

इन्द्रा

प्यारे१'s picture

4 Feb 2011 - 9:32 am | प्यारे१

छत्रपतिंचा जाहिर णिषेढ.......

काय रे भा* (प्रेमानं), साधं सांगता येत नाही का???

बाकी फटु आणि वर्णनात 'तयार' झालात साहेब आपण.

एक णंबर्स!

यशोधरा's picture

4 Feb 2011 - 9:34 am | यशोधरा

मस्त, मस्त!!

कवितानागेश's picture

4 Feb 2011 - 9:51 am | कवितानागेश

माझी पाकक्रुती बघून सुद्धा कधी जळजळ होत नाही,..पण हे फोटो बघून झाली.
नक्की जाणार आहे.
कोण कोण येणार माझ्याबरोबर? त्यांनी मला पण घेउन जायची तयारी करा! ;)

मुलूखावेगळी's picture

4 Feb 2011 - 10:19 am | मुलूखावेगळी

हर्शद,
फार सुन्दर वर्णन केलेत
आनि फोटो तर अप्रतिम
रांजणखळगे इतके कलात्मक असु शकत्तात हे १ल्यान्दाच कळले
आता मी पन जानार
अ लीमाउ येतेस का बोल लवकर?

sneharani's picture

4 Feb 2011 - 10:23 am | sneharani

मस्त फोटो!मस्त वर्णन!!
:)

इरसाल's picture

4 Feb 2011 - 10:35 am | इरसाल

चौथ्या फोटोत जो खड्डा आहे तो 'माधुरी & रणजीत' ने पाडलाय .
बाकी फोटो अतिशय सुरेख आणि वर्णन एकदम मस्त

मनराव's picture

4 Feb 2011 - 10:45 am | मनराव

फोटो सकट वर्णन पण मस्त

सविता००१'s picture

4 Feb 2011 - 11:44 am | सविता००१

वर्णन. फोटो तर केवळ लाजवाब.
झक्कास

क्रान्ति's picture

4 Feb 2011 - 8:41 pm | क्रान्ति

विक्रमादित्य जबरा! फोटो फारच खास!
लिहिलंस पण भारी! {लिहिणारच! बंधुराज कुणाचे आहेत?} :)
शिवम्माच्या भाकरीची आठवण झाली आणि घोळसगावची पण!

पैसा's picture

5 Feb 2011 - 12:09 am | पैसा

सगळेच फोटो आणि लिखाण पण खूप आवडले!

सहज's picture

5 Feb 2011 - 10:45 am | सहज

टकाटक वृत्तांत, फोटु..

सही आहे!!

शहराजाद's picture

6 Feb 2011 - 2:55 am | शहराजाद

छान लेख. खळग्यांचे फोटो आवडले. बालविक्रमादित्य लई ग्वाड.

मस्त एकदम , ट्रीप लेखन अआणि फोटो सुद्धा.

४ वर्षे शिरुर ला होतो , पण येथे जावु जावु म्हणता राहुन गेले तेंव्हा.
निघोज, मोराची चिंचोळी, पारनेर आणि त्या भागात भर्पुर मित्र राहत होते पण जाता आले नाही.
परत आत काहींना फोन करुन निघावे म्हणतो तिकडे ...

मुद्दाम धागा वर काढल्या गेला आहे.

sagarpdy's picture

12 Sep 2012 - 12:41 pm | sagarpdy

का ?

बॅटमॅन's picture

12 Sep 2012 - 1:54 pm | बॅटमॅन

फटू आवडले म्हणून.

सस्नेह's picture

15 Sep 2012 - 6:24 pm | सस्नेह

उत्खननाबद्दल धन्यवाद.

ज्ञानराम's picture

16 Sep 2012 - 2:27 pm | ज्ञानराम

मस्तच......