आमचीबी आंटी जन टेस

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
26 Apr 2021 - 10:50 pm

आमचीबी आंटी जन टेस

गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं.
त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला.

या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

तर मलाबी वाटलं की आपलीबी करून घ्यावी आंटी जन टेस. आंटी जन टेसला काय काय करावं आसं कोनाला तरी विचारावं आसं वाटत व्हतं. कारन, आंटीपर्यंत ठिक हाय पन जन म्हणजे जनता. आता ती आंटी आन मी, समद्या जनांसमोर काय आन कसं करनार आसा मला प्रेश्न पडला. कोनाला विचारायचीबी लय लाज वाटत व्हती. जनांसमोर काय झालं तर गावात त्वांड दाखवायला जागा नव्हती. सगळे सगे सोयरे गावातच. तसं झालं तर कायम तोंडाला पट्टी लावावी लागणार आशी भिती मनात आली. पन आंटी काय करनार, ती कशी आसंल, ती काय काय देईल, न देईल या विचारानं रात्रीची झोपबी येईना झाली.

संज्या आन राम्या तसं आंटी टेस करून आल्यालं व्हतं, पन त्यांना विचारावं म्हंजे आगीत हात घालन्यासारखं व्हतं. आन संज्या तर माझी हिरॉईन करीनाच्या शेजारीच राहतो. भाड्या मुद्दाम माझ्यासमोर तिचं खरं नाव करूना मोठ्यानं बोलत राहतो. माला सांगा, कोरूनाच्या काळात आसं चिडवनं बरं हाय का? ऊस जळलं त्याच्या वावरातला अशानं. कांदा करपलं उन्हाळ्यातला त्याचा.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

मनाचा हिय्या करून लालचंद मारवाड्याच्या दुकानातून मुद्दाम वीस किलो तांदूळ घेतांना या आंटी जन टेसची थोडी माहीती काढली. त्ये म्हनलं की, आधार कार्ड घेवून जा आन लायनीत थांब. नंबर आला की आंटी टेस व्हईल.

आता या आंटी जन टेसला आधार कार्ड नंबर देऊन लायनीत थांबायचं म्हनजे लई काळजी वाटू लागली. आंटीनं आधार नंबर कुनाला दिला आन त्ये आपल्या घरी पत्ता काढत आलं म्हणजे? आंटीनं काय काळाबाजार केला तर काय आशी चिंता मनाला लागून राहीली.

धडगत करून आरोग्य शेंटरला गाडी लावली. सकाळी गेलेलो. बाहेर धा बारा जनांची लाईन व्हती. वळखीचं कुनीच नव्हतं हे बरं होतं. मधी आसलेली आंटी जन, लोकांना कवा भेटल आसं वाटत व्हतं. एकानं आधार नंबर घेतला. नाव बीव लिहून घेतलं. एक आडूसा होता. तिथंच आंटी आसल, अन जन, लोकं तिथंच तिला भेटत आसतील आसं वाटलं. एवढ्या गर्दीत आंटीला भेटनं काय बराबर वाटंना. पन एकदा का व्हईना भेट झाली म्हंजे आपलं गाडं पुढं रेटता येईल आसा विचार मनात आला.

माझ्यावाला लंबर आला आन मी आडूशामागे गेलो. तवा आंटी बिंटी काय दिसली नाय.

तिथं दवाखान्यासारखं मांडलेलं व्हतं अन एक नर्स व्हती. मंग त्या पोरीनंच नाकात कायतरी खुपासलं. आन जा म्हनाली.

लय फसगत झाली राव. द्राक्षे काढणीला यावे आन पाऊस पडून सगळा माल बेचीराख व्हावा, अगदी पावडरी मारायलाबी येळ मिळू नये आसं झालं. आसं कुठं आसतंय व्हय?

आशी झाली आमच्यावाली आंटी जन टेस.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

- पाषाणभेद
२६/०४/२०२१

कथासमाजजीवनमानमौजमजाप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवप्रतिभाआरोग्यविरंगुळा

प्रतिक्रिया

येवडं गुऱ्हाळ झालं.. पर ती आंटी जन टेस पाजीटिव आली का निगीटिव त्ये नाय सांगितलं?

जाऊद्या, आपल्याला काय म्हना!!

चित्रगुप्त's picture

27 Apr 2021 - 1:24 am | चित्रगुप्त

अरारारा.. आमालाबी ह्ये वाचताना सारखी ती आंटी कशी दिसत अशीन, तिनं कपडं कोन्तं घातलं अशीन, ती लाडं लाडं कसं बोलत अशीन, ह्येच दिसत व्हतं. पन शेवटी ती आन्टी का आली न्हाई ह्ये काय बी समजलं नाय. पुन्यांदा येकदा जाऊन पघा शेंटर मदी. भेटंन यंदा.

मुक्त विहारि's picture

27 Apr 2021 - 8:52 am | मुक्त विहारि

काॅपी पेस्ट करून, What's App करा...

होऊ द्या कल्लोळ

चौकटराजा's picture

27 Apr 2021 - 9:09 am | चौकटराजा

सगळ्या मेडिकल टर्म वापरून कंटाळा आला आहे .. अशा वातावरणात आंटी दिसलिबी न्हाई तरी चालंल पण करुणा बाई नको बाबा .... वाचून मजा आली. बाकी आंटी बघायची असेल तर " कॉरि ऑन डॉक्टर " मधली बार्बारा विंडसर पहा !

मुक्त विहारि's picture

27 Apr 2021 - 10:00 am | मुक्त विहारि

आवडला

लई भारी's picture

27 Apr 2021 - 1:47 pm | लई भारी

आवडल! :-)

आसं कुठं आसतंय व्हय?

आक्शी बराबर हाय. आपण ऑनलाईन आंदोलन करूया!

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2021 - 4:06 pm | टवाळ कार्टा

=))

वामन देशमुख's picture

27 Apr 2021 - 4:13 pm | वामन देशमुख

+१