Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०१८

श्रीगणेश लेखमाला - आठवड्यातून फक्त एक दिवस....

लेखक हेमंतकुमार यांनी शनिवार, 22/09/2018 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
एडवर्ड मर्फी या अवकाश अभियंत्याचे एक वचन (मर्फीचा दुसरा नियम) प्रसिद्ध आहे : Nothing is as easy as it looks. खरेय, एखादी गोष्ट वरवर दिसायला जेवढी सोपी वाटते, तेवढी ती प्रत्यक्षात नसते. दुसऱ्याच्या एखाद्या कृतीकडे बघून बऱ्याचदा आपण सहज म्हणून जातो, “हे काय मीसुद्धा केले असते, त्यात काय एवढे?” पण जेव्हा खरेच ती कृती आपण करू पाहतो, तेव्हाच आपल्याला त्या उद्गारांमागचा फोलपणा कळतो. कोणत्याही कृतीतील सहजता ही परिश्रमाशिवाय प्राप्त होत नसते.