कंटाळा

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
17 Oct 2021 - 2:51 pm

एके दुपारी आम्ही कार्यालयात टंगळमंगळ टोलवाटोलवी इत्यादी महत्वाची कामं करत बसलो असतानाच शेजारचे रावसाहेब नामक समवयस्क सहकारी मित्र बोलले की, "पाटील, आज जरा कंटाळाच आलाय बुवा."

मुक्तकराहती जागानोकरीप्रकटनलेखविरंगुळा

सकाळ कोवळी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
17 Oct 2021 - 11:36 am

सकाळ कोवळी रात्रीनंतर हासत येई
हिरव्या गवताचा गर्द गंध घेवून येई

धुक्यातून दव फुलले उतरे अलगद पानांवर
शिखरावर झाडांच्या उन्ह सोनेरी हळूच येई

झुळू़क हवेची थंडगार वाहते चुकार अल्लड
सरत्या पावसाची सर ठिबठिबणारी सोबत येई

रान फुलले रानफुलांचे रंग लेवून ताजे सुंदर
वार्‍यावरती हालती डूलती नजरेला सुखवीत जाई

फुलपाखरांसवे पक्षी उडती वरती आरव करती
खोल दरीतून दूर कुणीतरी आल्हादक गीत गाई

- पाषाणभेद
१७/१०/२०२१

निसर्गकविता

सन्नाटा

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
16 Oct 2021 - 9:48 pm

पक्की दुपारी “ खेळ खल्लास” सिनेमा बघून आला होता. त्याच्या सर्व आवडत्या सुपरहीरोंची झालेली दयनीय अवस्था बघून त्याला वाईट वाटत होते. सन्नाटा नावाच्या खलनायकाने सर्व सुपरहीरोंना पळवून लावून पृथ्वीवर कब्जा केला होता. हवाहवाईने केलेले हवाई हल्ले त्याने परतवून लावले होते. सूर्यकुमारच्या झळाळीला सन्नाटाने झाकोळले होते. सूर्यकुमारच्या तेजस्रोतामागे असणारी अणुप्रक्रिया त्याने ग्राफाईटचे अस्त्र सोडून बंद पाडली होती.त्यामुळे सूर्यकुमार खग्रास ग्रहण लागल्यासारखा निस्तेज झाला होता. मिस्टर इंडिया सन्नाटाच्या समोर जो अदृश्य झाला तो पुन्हा कोणालाही दिसला नाही.

कथा

कंबोडियाविषयी दोन लेखांची नोंद

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in जनातलं, मनातलं
16 Oct 2021 - 6:27 pm

लोकहो,

कांभोज देश अर्थात कंबोडिया याबद्दल संदीप कुलकर्णी यांनी दैनिक सकाळ मधल्या पैलतीर सदरात दोन लेख लिहिले होते. सकाळ वर्तमानपत्राचे सदर दुवे कालबाह्य झाले आहेत. म्हणून ते दोन लेख इथे डकवतो आहे.

अशी डकवणी मिपाच्या नियमाविरुद्ध आहे. परंतु नोंद ठेवण्यासाठी या लेखाचा व चर्चेचा उपयोग होईल. तसंच सदर घटनेचा भारताच्या सुरक्षेशी व दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय धोरणांशी अप्रत्यक्ष संबंध आहे. त्यामुळे सदर डकवणीचा अपवाद करावा ही संपादकमंडळास विनंती. __/\__

----x----x----

लेख क्रमांक १ / २

इतिहासविचार

अवघाचि संसार- जांभुळपाडा

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
16 Oct 2021 - 3:44 pm
मांडणीप्रकटन

उत्तर दे पण...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
16 Oct 2021 - 9:19 am

इंदिरा संतांची एक नितांत सुंदर कविता "पत्र लिही पण नको पाठवू". पण आजकाल पत्र तर सोडाच, हातानं लिहिणंसुद्धा दुर्मिळ झालंय. संवाद होतो तो मेसेज आणि इमोजीमधून.
इंदिरा संतांच्या त्या कवितेवर आधारित ही कविता.
* शेवटचं कडवं मूळ कवितेतील तसंच ठेवलंय.

उत्तर दे पण संदेशातुन
नको पाठवू बदाम रक्तिम,
रुक्ष कोरड्या जगण्यामध्ये
कसा साठवू पाउस रिमझिम?

नको पाठवू इमोजीतले
लाजाळू अन् सुमुख हासरे,
खुलता हासू ओठांवरती
प्रश्न विचारत बसती सारे.

भावकविताकविता

हंपी, हंपी आणि पुन्हा हंपी! भाग १

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
15 Oct 2021 - 2:32 pm

एखादं ठिकाण पाहून झालं की त्याच जागी पुन्हा जायला मी नाखूश असतो; मला तो पैशांचा नि वेळेचा अपव्यय वाटतो. पण काही जागा याला अपवाद आहेत. ताजमहाल, अजिंठा, वेरूळ, ओर्छा, मांडू, हंपी इ. काही. ह्या जागा पाहून झाल्या असल्या तरी आयुष्यात पुन्हा एकदा त्यांना भेट द्यायचा मानस आहे. ह्या यादीतल्या हंपीला भेट द्यायचा विचार बरेच दिवस मनात होता; शेवटी ह्या ऑगस्ट महिन्यात तो योग आला.

भिंगना आवाज

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Oct 2021 - 1:22 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

आमच्या लहानपणी अनेक मुलं भिंग पाळायचे. भिंग नावाचा एक मोठा उडणारा किडा असतो. जंगलात बोर, बाभूळ, हेंकळ अशा काट्यांच्या झाडावर तो सापडतो. भिंगाचे पंख लाल, हिरवे, पिवळे असे वेगवेगळ्या रंगांचे असतात. अंगही रंगीत आणि चकचकीत असतं. डोकं सोनेरी रंगाचं असतं. भिंगाची मान आणि बाकी अंग याच्यात एक बारीक फट तयार होते…
संपूर्ण लेख : https://sudhirdeore29.blogspot.com/2021/10/blog-post.html?spref=tw

साहित्यिकलेख

चांदणी अन प्रियकर

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
14 Oct 2021 - 11:25 pm

कुणी एक चांदणी नवथर
खाली आली धरणीवर
काय कसले तिला ना ठावे
इकडे तिकडे कोठे जावे
भूकेलेली रडवेली
रडून कोमेजलेली
तशात भेटला तिजला प्रियकर
अशाच चांदणीसाठी होता आतूर
कोण कुठली तू आलीस कशी
आपूलकीने त्याने केली चौकशी
लांब असते दूरदेशी येथे परदेशी
कोण मज पाठवील पुन्हा मजदेशी
प्रियकर उदार उमदा चांदणीस आवडला
परी स्वगृहाच्या ओढीने जीव खंतावला
मी तर तुझा आताचा प्रियकर
घर तुझे कधीचे सुखकर
नको तू गृह विरह सहू
तू अन मी वेगळे होवू
प्रियकर त्वरीत निर्णय घेई
प्रियेस त्याच्या पोहचवून देई

करुणकविता

लपाछपीचा डाव

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
14 Oct 2021 - 10:41 pm

निळ्या जांभळ्या ढगांआडूनी कोण बरे बोलावतो?
इकडे आहे मी इकडे तिकडे देखील मीच आहे असे बोलतो.

लपाछपीचा डाव असा हा राज्य माझ्यावर यावेळी
शोधण्यासाठी त्याला निघालो वेळ अवेळी

शोधता शोधता मी दमतो थकतो
त्यानंतर हळूच कधी तो चाहूल देतो.

दडूनी पुन्हा तो ढागांआड मला पुकारी
शोध घेण्या पुढे जातसे कानोसा घेऊनी

हा डाव कसला ठावूक नाही कधी संपतो
कधी येईल समोर त्याची मी वाट पाहतो

पाषाणभेद
१४/१०/२०२१

शांतरसकविता