१. भारतीयांचा "संघ". २. अतिस्वतंत्रता

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
31 Oct 2009 - 6:24 pm

खालील दोन घटना एकमेकांशी घट्ट बांधलेल्या नसतीलही पण कळत-नकळत आपण इतरांबाबत कशी मते बनवतो त्याची ही उदाहरणे आहेत.

भारतीयांना सांघिक कामे येत नाहीत अशी सर्व-साधारण समजूत अनेक युरोपी राष्ट्रांतील लोकांची आहे. अमेरीकेतील लोक जितक्या उघडपणे युरोपी लोक बोलतात तितके उघडपणे बोलून दाखवत नसावेत.
माझ्याबरोबर काम करणाऱ्या दोन ब्रिटीश लोकांनी मला हे दोन-तीन वेळा सांगितले होते की, भारतीयांबद्दल तिकडे असे बोलले जाते. माझा त्यावर विश्वास नव्हता. पण पुढे नमुद केलेली घटनाच माझे मत बदलायला पुरेशी होती. अर्थात मी त्या मताशी सहमत आहे असे मुळीच मानू नका.

एकदा एक स्वीडीश कंपनीचे शिष्टमंडळ काही महत्वाच्या कामगिरीवर आम्हाला भेटायला आले. आम्ही "विकणाऱ्यांच्या" भूमिकेत होतो व ते "घेणाऱ्यांच्या". आमचे अधिकारी व ते अशी बैठकीला सुरुवात झाली- ओळखी-पाळखी झाल्या व आमच्या प्रमुखाने सांगितले की, ही आमची "कोअर टीम" आहे. "टीम" शब्द ऐकताच त्यांच्या प्रमुखाचे कान टवकारले व तो चक्क सहजतेने म्हणाला, "आर यु शुअर दे कॅन वर्क ऍज अ टीम?" ब्रिटीश सहकाऱ्याने सुचक अर्थाने माझ्याकडे पाहिले; मी हसलो. नंतरची ५-१० मिनीटे ह्या "ऐनवेळेच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल" ह्या धाटणीप्रमाणे पार पडली व आमची "कोअर टीम" ही कशी एकसंध आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न झाला.

ह्या प्रसंगाने मात्र खरे काहीही असले तरी बाहेरचे जग आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहते ह्याची जाणीव झाली. अशी समज त्यांची कशामुळे झाली असावी व ती दुरुस्त कशी करावी (आणि आवश्यक आहे का) हा एक वेगळा विषय होऊ शकतो.

************************************
खालील घटना-विचारांशीही मी पूर्णपणे सहमत आहेच असे नाही. (आजच मिळालेल्या साप्ताहिक सकाळच्या अंकात वाचलेल्या एका गोष्टीमुळे आठवलेले)

महाराष्ट्राच्या मातीशी समरस झालेले अनेक इतर-भाषिक आपण पाहतो व ते अस्खलित मराठीत संवाद साधू शकतात हे ही आपण अनुभवतो. अशीच एक व्यक्ति, जी सी. ए. आहे आणि तो पुण्याच्या .<....>बागेत राहतो. त्याचे पुर्ण बालपणच तेथे गेल्यामुळे त्याचे मित्र मराठीच. त्याच्यावर घरचे व्यवसायाचे व बाहेर मराठी उच्च-मध्यमवर्गाचे संस्कार झालेले. तो स्पष्टपणे म्हणतो की, मला शिकायची ओढ लागली ती ह्याच मित्रांमुळे मी त्यामुळेच सी.ए. झालो.

असेच बोलत असतांना तो म्हणाला, "मी ज्या भागात वाढलो तेथे बहूतांश मराठी लोक खूप हुशार, खूप शिकलेले आणि घरातील प्रत्येक मोठी व्यक्ति मोठ्या हुद्द्यावर, वगैरे. पण घरात इतके शिकले सवरलेले लोक असुन त्यांच्यात एकत्र राहण्याचा कल नाही. आई-वडील एकीकडे, मुले-सुना दुसरीकडे स्वतंत्र, सगळ्यांकडे भरपुर पैसा त्यामुळे स्वंतत्र घरे घेऊन राहू शकणारी ही कुटूंबे आहेत."
"मग काय म्हणायचे आहे तुला पुढे?"
तो, "हाच मोठा फरक आमच्या कम्युनिटीमधे आणि मराठी लोकांमधे आहे. आम्ही कितीही शिकलो, कितीही पैसा मिळवला तरीही एकत्र राहण्याकडेच आमचा कल असतो; त्यातच आम्हाला अनेक चांगल्या बाजू दिसतात", तो पुढे, "माणूस खूप शिकला की, तो अतिस्वंतंत्र विचारांचा होतो; पण तो इतका स्वतंत्र होऊ नये की, त्यामुळे स्वकीयांपासून तुटून जाउ नये. मला वाटते की, एकत्र राहण्याचे जे तोटे आहेत त्यापेक्षा जास्त तोटे स्वतंत्र राहण्याचे आहेत."

त्याच्या ह्या विचारावर असहमत अनेक जण असतील. "हे प्रक्टीकल नाही" असेही आपण म्हणून सोडून देऊ. एकत्र राहणारे कित्येक मराठी कुटूंबे मला माहित आहेत. मला वाटते त्याला सर्वसाधरण मत मांडायचे नव्हते, तर एक वैशिठ्य़पुर्ण वर्गाच्या अनुषंगाने त्याला जे दिसले त्याबद्दल तो बोलत होता असेही आपण म्हणू शकतो (की, जे मी त्याला म्हणालो). त्याला जे काही म्हणायचे आहे त्याचा "मराठी माणसाशी" जोडलेला संबंध काढून नुसता आशय लक्षात घेतला तरी तो महत्वाचा विचार आहे असे वाटले म्हणून हा प्रसंग माझ्या लक्षात राहिला आहे व सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणे, आपण इतरांबाबत कशी मते बनवतो त्याचे हे उदाहरण आहे.

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

31 Oct 2009 - 6:54 pm | चिरोटा

वर ब्रिटिश लोकांनी बनवलेली मते ईतर युरोपियन लोकांच्या मतापेक्षा वेगळी वाटतात्.जर्मनीत असताना मला वेगळा अनुभव आला होता."भारतिय लोक ग्रुप मध्ये रहातात्.कामात एकमेकांची मदत घेतात.स्वतंत्रपणे काम करत नाहीत" असे सर्वसाधारण मत होते.

मला वाटते की, एकत्र राहण्याचे जे तोटे आहेत त्यापेक्षा जास्त तोटे स्वतंत्र राहण्याचे आहेत."

सहमत.एकत्र रहाण्याला बर्‍याचवेळा पुरुषांपेक्षा स्त्रिया आक्षेप घेतात असे मला वाटते.सासु-सून संबंध त्याला कारणीभूत असावेत.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

शक्तिमान's picture

31 Oct 2009 - 9:39 pm | शक्तिमान

"भारतिय लोक ग्रुप मध्ये रहातात्.कामात एकमेकांची मदत घेतात.स्वतंत्रपणे काम करत नाहीत" - हेच भारतीयांबद्दलचे साधारण मत आहे!

हा लेख वाचून नवीनच माहिती मिळाली...

विष्णुसूत's picture

1 Nov 2009 - 6:42 am | विष्णुसूत

भारतीय लोकां बद्दल चे वरील मांडलेले मुद्दे मला पटतात.
माझ्या अनुभवा वरुन मला हि असे वाटते कि भारतीय लोकं "टिम अ‍ॅक्टिविटि किंवा टिम वर्क" मधे कमी पडतात. त्याला अनेक खरी -खोटि, चांगली -वाईट कारणे असतील.
एकत्र ग्रुप मधे रहाणं आणि टिम अ‍ॅक्टिवीटि ह्यात फरक आहे. टिम अ‍ॅक्टिविटि म्हणजे प्रत्येकाने सारखी जवाबदारी घेउन कोणावर हि खापर न फोडणे असे होते. अमेरीकन आणि युरोपियन लोकं टिम वर्क आणि टिम स्पिरीट मधे प्रोफेशनल आहेत.

चिरोटा's picture

1 Nov 2009 - 1:04 pm | चिरोटा

अमेरीकन आणि युरोपियन लोकं टिम वर्क आणि टिम स्पिरीट मधे प्रोफेशनल आहेत.

व्यक्ती तितक्या प्रकृती!! प्रोजेक्टची कशीही अवस्था असो, ५.३० वाजले की लॅपटॉप बंद करायचा आणि बॅड्मिंटन्/फूटबॉल खेळायला तडक चालते व्हायचे. आपण आणि आपले काम्,दुसरा काय करतोय काही संबंध नाही्. हे युरोपियन देशांत बघितले.आज जास्त काम आहे तेव्हा जास्त वेळ बसायचे आहे अशी विधाने फक्त भारतातच ऐकून घेतली जात असावीत.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

पिवळा डांबिस's picture

1 Nov 2009 - 7:29 am | पिवळा डांबिस

आज मी नाही म्हटलं तरी किमान वीस वर्षे भारताबाहेर आहे....
मला काही भारतीय सहकारी (निवासी आणि अनिवासी, दोन्ही!!) असे भेटले आहेत की जे टीमवर्कमध्ये अगदी जीवाला जीव देणारे...
त्यांच्या खांद्यावर मान टाकून झोपायला मला अजिबात शंका न वाटणारे...
आणि काही असे भेटले आहेत की पहिला चान्स मिळताच टीमची/ प्रोजेक्टची/ स्वतःच्या संस्थेची काशी करून स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न करणारे....
("साहेव, मी तुम्हाला इथली सगळी सिक्रेटस सांगतो, जरा माझ्या ग्रीन कार्डच्या स्पॉन्सरशिपचं बघाल काय?" वगैरे वगैरे!!)
त्यामुळे भारतीय सहकार्‍यांबद्दल असं जनरलायझेशन करणं मलातरी कठीण आहे...
इथे हे ही स्पष्ट केलं पाहिजे की वरील दोन्ही प्रकारचे नमुने मला अन्यदेशीयांतही आढळले आहेत....
तेंव्हा हा नॅशनॅलिटी इश्यू नसावा....
व्यक्ती तितक्या प्रकृती, इतकंच....

आता एकत्र रहाण्याविषयी...
माणूस शिकला की तो स्वतंत्र विचार करायला लागतो हे तर खरेच आहे...
किंबहूना शिक्षणाचा तो एक मोठा फायदा आहे...
पण फक्त विभक्त राहिले म्हणून सगळे संबंध तुटून जातात असे म्हणणे मला तरी गैर वाटते....
आपापल्या स्वतंत्र घरांत राहून एकमेकांसाठी जीव टाकणार्‍या फॅमिलीमधील मी आहे....
आणि एकाच छपराखाली राहूनही एकमेकांची अजिबात कदर न करणारेही मी पाहिले आहेत....
मराठी लोकांतही आणि विशेषतः अमराठी लोकांतही......
माझ्या एका अमराठी मित्राने आर्थिक सुबत्ता असूनही फक्त धंदा एकत्र राहावा म्हणून दीड खोलीत एकत्र राहिलेल्या कुटूंबातील तीन दांपत्यांच्या लैगिक व्यवहारामुळे त्याच्या कोवळ्या मनावर झालेल्या परिणामांचे केलेले वर्णन ऐकतांना मी शहारलो...
(पता है, सिर्फ आवाजसे हम बच्चे जान जाते थे की आज किस चाची की सुहागरात है!!!!:()
असो, तो एक स्वतंत्र व्यक्तिचित्राचा विषय आहे....

शक्तिमान's picture

1 Nov 2009 - 12:18 pm | शक्तिमान

असो, तो एक स्वतंत्र व्यक्तिचित्राचा विषय आहे....

वाचायला आवडेल.. येऊ द्या पिडांकाका..

आंबोळी's picture

1 Nov 2009 - 12:37 pm | आंबोळी

>>वाचायला आवडेल.. येऊ द्या पिडांकाका..
हो . खरच....
आंबो(ट)ळी

मिसळभोक्ता's picture

3 Nov 2009 - 10:59 am | मिसळभोक्ता

आज मी नाही म्हटलं तरी किमान वीस वर्षे भारताबाहेर आहे....

मी ही

मला काही भारतीय सहकारी (निवासी आणि अनिवासी, दोन्ही!!) असे भेटले आहेत की जे टीमवर्कमध्ये अगदी जीवाला जीव देणारे...

मलाही

त्यांच्या खांद्यावर मान टाकून झोपायला मला अजिबात शंका न वाटणारे...

अगदी मलाही. पण मी कुणाच्या खांद्यावर मान टाकून सहजा झोपत नाही. उशी गादी मिळाल्याशिवाय मी सहसा झोपतच नाही.

आणि काही असे भेटले आहेत की पहिला चान्स मिळताच टीमची/ प्रोजेक्टची/ स्वतःच्या संस्थेची काशी करून स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न करणारे....

मलाही. पण मला पोळी पेक्षा भाकरी जास्त आवडते.

("साहेव, मी तुम्हाला इथली सगळी सिक्रेटस सांगतो, जरा माझ्या ग्रीन कार्डच्या स्पॉन्सरशिपचं बघाल काय?" वगैरे वगैरे!!)

डांबिसा. अशा लोकांकडून सगळी शिक्रिटे ऐकून घे. ती फारशी उपयोगाची नसतात. च्यायला, ज्याला स्वतःच्या ग्रीन कार्डाचं सांभाळता येत नाही, त्याला शिक्रीटं कोण सांगणार ? आणि तुला तो काय सांगणार झा* ?

त्यामुळे भारतीय सहकार्‍यांबद्दल असं जनरलायझेशन करणं मलातरी कठीण आहे...

हॅ हॅ हॅ ! तुला एका तरी चिन्यानं आजवर "माझ्या ग्रीनकार्डाचं बघा, तुम्हाला शिक्रेट सांगतो" म्हटलंय का रे ? आरे, त्यांची ग्रीनकार्ड वेगळ्या पद्धतीने होतात बाबा. "माझं ग्रीन कार्ड झालं तर तुझ्या आठ वर्षाच्या पोरीच्या पायातले लाकडी बूट काढीन, माझा काका आहे कम्युनिष्ट पार्टीत." अशी डील्स होतात तिकडे.

इथे हे ही स्पष्ट केलं पाहिजे की वरील दोन्ही प्रकारचे नमुने मला अन्यदेशीयांतही आढळले आहेत....
तेंव्हा हा नॅशनॅलिटी इश्यू नसावा....

हॅ हॅ हॅ

व्यक्ती तितक्या प्रकृती, इतकंच....

खॅ खॅ खॅ. भारतीय व्यक्तींविषयी बोलत असशील, तर प्रकृती ठीक आहे. नाही तर व्यक्ती तितक्या विकृती म्हणायला हरकत नाही.

आता एकत्र रहाण्याविषयी...
माणूस शिकला की तो स्वतंत्र विचार करायला लागतो हे तर खरेच आहे...

नाना "दास कापिताल" स्वतःहून वाचतो. ह्याला स्वतंत्र विचार करणे म्हणतात का ?

किंबहूना शिक्षणाचा तो एक मोठा फायदा आहे...

खि खि खि !

पण फक्त विभक्त राहिले म्हणून सगळे संबंध तुटून जातात असे म्हणणे मला तरी गैर वाटते....

वरील दोन वाक्यांची, ह्या तिसर्‍या वाक्याशी काय सांगड जमेना बॉ.

आपापल्या स्वतंत्र घरांत राहून एकमेकांसाठी जीव टाकणार्‍या फॅमिलीमधील मी आहे....

आतल्या बातम्या अशा जाहीर करत जाऊ नकोस रे. तू त्या स्वतंत्र घरांत राहून "ही माझी शेजारीण. हिच्यावर माझा फार जीव." असे म्हटले तर काय शेजारीण तुझ्या फ्यामिलीत येते काय रे ? अनेक दिग्गज ह्या जीव टाकण्यामुळे उद्ध्वस्त झालेत, येड्या.

आणि एकाच छपराखाली राहूनही एकमेकांची अजिबात कदर न करणारेही मी पाहिले आहेत....

ख्या ख्या. वेलकम टू मिसळपाव.

मराठी लोकांतही आणि विशेषतः अमराठी लोकांतही......

च्या मारी. हे अमराठी लोक, म्हणजे भय्या ना ? हाणा साल्यांना.

माझ्या एका अमराठी मित्राने आर्थिक सुबत्ता असूनही फक्त धंदा एकत्र राहावा म्हणून दीड खोलीत एकत्र राहिलेल्या कुटूंबातील तीन दांपत्यांच्या लैगिक व्यवहारामुळे त्याच्या कोवळ्या मनावर झालेल्या परिणामांचे केलेले वर्णन ऐकतांना मी शहारलो...

पुन्हा अमराठी ! अरे, ह्या भय्या लोकांना घालवण्यासाठीच तर "काका लोकांविरुद्ध" आंदोलन उभारले आहे आमच्या राजने ! ह्या स॑र्व काकांना घालवण्यासाठीच आम्ही देखील आजकाल मनसेत !!!

(पता है, सिर्फ आवाजसे हम बच्चे जान जाते थे की आज किस चाची की सुहागरात है!!!!Sad)

शी... आमच्या काकूंविषयी असे काही घाण घाण बोलू नकोस.

असो, तो एक स्वतंत्र व्यक्तिचित्राचा विषय आहे....

काकूं पैकी कुणाचेही व्यक्तिचित्र लिहिले तरी डांबीसास घालवून टाकावे, अशी सर्व संपाद॑कांना "नम्र" विनंती.

- काकांना घालवा, पण काकूच्या सुहागरातीविषयी लिहू नका, अशी डांबीसकाकांना विनंती करणारा....

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

लबाड लांडगा's picture

3 Nov 2009 - 11:14 am | लबाड लांडगा

विषय सोडून काहीतरी पांचट लिहिणार्‍या मिसळ्भोक्त्याचा प्रतिसाद संपादित करावा ही संपादकांना नम्र विनंती.
विनम्र लांडगा.

अमोल नागपूरकर's picture

3 Nov 2009 - 9:57 am | अमोल नागपूरकर

"Indians Are Individually Smart But Collectively Dumb" अशी catchline असलेले एक पुस्तक वाचले होते. त्याची आठवण झाली.

अजय भागवत's picture

3 Nov 2009 - 12:16 pm | अजय भागवत

अशा नावाचे पुस्तक असल्याची आंतरजालावर तरी खूण दिसली नाही. पण ह्या पुस्तकाबद्दल आपण बोलत आहात का?

अमोल नागपूरकर's picture

3 Nov 2009 - 12:38 pm | अमोल नागपूरकर

अगदि बरोबर. हेच पुस्तक आहे. भारतीयान्ची मानसिकता गेम थिअरी चा उप्योग करुन सम्जौन दिली आहे त्यात.