नमस्कार मंडळी
आत्तच ओ निगेटीव्ह रक्त हवे असल्यचे वाचले आणि वाटले "जे जे आपणासी ठावे , दुस-यासी सांगावे"
१.you can visit here = www.indianblooddonors.com OR
get info via sms on ur cell .........
type blood (space) STD code (space) blood group (space) your name & send it to 5676775
क्रुपया खरे की खोटे हे तपासण्यासाठी sms करु नका. (ही चुक मी केलि होती.) कारण उत्तरा दखल तुंम्हाला पाठविण्यात आलेल्या व्यक्तीने रक्त दान केले आहे असे समजुन पुढील ६ महीन्यांसाठी त्याचे नाव कुणालाही सुचविले जात नाही आणि एक महादाता, महादाना पासुन वंचित राहतो.
3.प्रत्येकाला किमान आपल्या कुटुंब सदस्याचे तरी रक्त गट माहीत हवेतच. ( मीत्र मंडळींची माहीती ठेवल्यास सोनेपे - सुहगा. या रीतिने २५ ते ३० जणांचा डेटा हाताशी सहज तयार होइल.)
आपल्याही सुचना येउद्यात.
ता.क. मिपा वर येथिल सदस्यांच्या रक्त गट माहीतीचे संकलन आणि संवर्धन केले तर?
===================================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
प्रतिक्रिया
30 Oct 2009 - 8:32 pm | धमाल मुलगा
O+ve.
ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला आवडेल. परंतु गेल्या वेळी मला एका डॉक्टरांनी माझा वैद्यकिय इतिहास (मेडिकल हिस्ट्री हो) विचारला, त्यात मी "मला काविळ झाली होती"असं सांगितल्यावर मला रक्तदानासाठी नकार दिला. जरी ती काविळ जवळपास १३-१४ वर्षांपुर्वी झाली होती तरी "आम्ही काविळीच्या पेशंटचे रक्त घेत नाही" असं सांगितलं.
ह्याबाबत काही मित्रांना विचारलं तर ते म्हणाले असं काही नसतं...
खरं खोटं देव जाणे.
30 Oct 2009 - 9:23 pm | संदीप चित्रे
माझाही ओ+ आहे.
लहानपणी कावीळ झाली होती तरीही रक्तदान करू शकतो/शकलोय.
फक्त अमेरिकेबाहेर चक्कर झाली की पुढचे किमान वर्षभरतरी इथे रक्तदान करू शकत नाही. काही ठिकाणी तीन वर्षांपर्यंत रक्त घेत नाही म्हणून सांगितलं.
30 Oct 2009 - 8:53 pm | प्रमोद देव
माझा रक्तगट आहे 'ओ'+
मी आजवर जवळपास ३०-३५ वेळा रक्तदान केलंय. अजूनही रक्तदान करण्यास सक्षम आहे.
माझ्याकडे ह्याआधी रक्तदान केल्याची बरीच कार्ड आहेत. ह्याआधी काही कार्ड वेळोवेळी गरजवंतांना उपयोगी पडलेत. बाकी असलेल्या कार्डांचा इतर कुण्या गरजूंना उपयोग करता आल्यास मला आवडेल.
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
30 Oct 2009 - 9:00 pm | jaypal
प्रिय धमालजी
मित्रांना विचारण्यापेक्षा आपल्या कौटुंबिक वैद्यांचा(family doctor हो) सल्ला घ्यावा ही विनंती.
माझ्या माहीती प्रमाणे जगात काविळ या रोगावर औषध नाही.(आयुर्वेदात मत्र आहेत. ही आयुर्वेदीक औषध आपले लिव्हर सुद्रुढ ठेवतात. antibiotic प्रमाणे प्रत्यक्ष रोगजंतुंशी लढत नाहीत.)
काविळचे जंतु आपल्या शरीरात १५/२० वर्षे सुप्तावस्थेत कोणताही त्रास न देता सहज राहु शकतात. मुख्य म्हणजे जेव्हा काविळीची लक्षणे आपल्याला दिसतात तो पर्यंत रोगजंतुंनी सगळे नुकसान केलेले असते आणि ती नैसर्गिक रित्या बरी होण्याच्या मार्गावर असते.
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
30 Oct 2009 - 9:06 pm | धमाल मुलगा
जयपालराव,
माहितीबद्दल धन्यवाद.
आमच्या वैद्यांना ही गोष्ट नक्की विचारेन.
31 Oct 2009 - 11:31 am | प्रदीप
वरील सर्व विधानांशी सहमत. मात्र Hepatitis-C ही काविळ खतरनाक आहे. ही हळूहळू लिव्हर निकामी करते. हिच्यावरील इलाज म्हणजे काही तीव्र स्टेरॉईड्सच्या स्वरूपात असतात. पण त्यांचे दुषःपरिणाम बरेच आहेत. ही कावीळ फक्त रक्तातूनच पसरते.
रक्त देतांना व घेतांनाही एड्स प्रमाणेच ह्या काविळीचाही जरूर विचार व्हावा.
31 Oct 2009 - 8:44 am | दशानन
B+ !
गेली आठ वर्षे नियमित करतो रक्तदान !
:)
देवाची दया आजपर्यंत आजारी असा पडलोच नाही त्यामुळे मला रक्तदान करता आले नाही असे घडलेच नाही.
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
31 Oct 2009 - 6:42 pm | लवंगी
गेले ५ वर्ष मी नियमीतपणे रक्तदान करतेय
31 Oct 2009 - 10:22 am | प्रभो
माझा रक्तगट आहे 'ओ'+
नियमित रक्तदान करतो.....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
31 Oct 2009 - 11:19 am | अमित बेधुन्द मन...
नियमित रक्तदान करतो
31 Oct 2009 - 12:33 pm | सन्दीप
मागच्या दोन वर्शा पर्यन्त ६७ वेळा रक्तदान केल. आता नाही करु शकत. शर्करा रोगी झालोय. असो रक्तदान महादान.
सन्दीप
31 Oct 2009 - 12:33 pm | सन्दीप
मागच्या दोन वर्शा पर्यन्त ६७ वेळा रक्तदान केल. आता नाही करु शकत. शर्करा रोगी झालोय. असो रक्तदान महादान.
सन्दीप
31 Oct 2009 - 12:41 pm | jaypal
रक्त दान करता येत नाही म्हणुन काळ्जीचं कारण नाही.
इच्छा असल्यास "समाज जाग्रुती" करु शकता ती देखिल खुप महत्वाची आहे.
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
31 Oct 2009 - 1:16 pm | चन्द्रशेखर सातव
माझा रक्तगट O-ve आहे. गेली ५ वर्षे मी गरजेनुसार रक्तदान करतो आहे.१०-११ वेळा केले आहे ,
पण साठवलेल्या रक्ताची shelf life हि ३५ दिवसांपर्यंत असते असे रक्तपेढीत सांगितले गेले .त्यामुळे
रक्तपेढी मधून फोन आल्यावरच रक्तदान करतो.
31 Oct 2009 - 1:24 pm | चन्द्रशेखर सातव
मला रक्तदान करून ३ महिने झाले आहेत.
कोणत्या ठिकाणी रक्ताची गरज असल्यास मला विरोप पत्ता shekhusatav@gmail.com द्वारे निरोप पाठवावा.
31 Oct 2009 - 1:27 pm | गणपा
जयपाल स्युत्य धागा.
माझा रक्त गट B+ve.
31 Oct 2009 - 1:52 pm | jaypal
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
31 Oct 2009 - 1:59 pm | पर्नल नेने मराठे
A +ve :D अजुन कधीही रक्तदान केले नाहिये , कोणी मागितलेच नाही
चुचु
31 Oct 2009 - 3:34 pm | नेहमी आनंदी
माझा आणि माझ्या सर्व भाऊ बहिनिंचा रक्त गट ओ- आहे. मी रक्त दबावामुळे रक्त देउ शकते की नाही ते माहित नाही. पण माझे दोन्ही भाऊ नियमित रक्त दाता आहेत. एक स्तुत्य धागा...
31 Oct 2009 - 4:40 pm | ऋषिकेश
बी +
(गेले ३ वर्षे नियमित रक्तदाता) ऋषिकेश