न ठावे सख्या, तू कुठे गुंतलेला...
तुझ्या चाहुली जीव आतूरलेला
कधी वाटते की तुला जाणते मी
जरी चेहरा तो, नसे पाहिलेला
'असावा असा तो शिलेदार माझा'
कितीदा तुला मी मनी रेखलेला
इथे रोज नाती नवी गुंफताना
उरी भास वेडा, पुन्हा जागलेला
कसा तू कुठे भेटशी... कोण जाणे...?
कसे ओळखावे... मना राजसाला ?
म्हणे... तू विधात्या, असे योजलेले
जरा दे इशारा... दिशा वेधलेला