अ्चानकच तूला अस समोर बघितलं
आणि काय झालं न कळे
शुष्क असलेल्या जिवनात
एक कोम्बं अंकुरलं.....
निगा राखावी तर कशी कळेना
पाऊस प्रेमाचा कधी पडेना
रान वाळवंट झाले....
ग्रिष्माचे रण माजले....
मग केले हद्दपार पावसाला
या जिवनातून
तुझ्यासकट......
आणि पुन्हा अचानक....
हो अचानकच.....
तू समोर आलास..
ठरवलं होत थेंब हे
पडु द्यायचे नाहित तरी
उगाच पाणी तरळले
झिरपु नकोस म्हंटल तरी
हा पाऊस कोसळलाच
प्रसन्ना जीके
प्रतिक्रिया
27 Oct 2009 - 8:20 pm | मनीषा
ठरवलं होत थेंब हे
पडु द्यायचे नाहित तरी
उगाच पाणी तरळले
झिरपु नकोस म्हंटल तरी
हा पाऊस कोसळलाच ... वा!!
छान आहे कविता ..
27 Oct 2009 - 11:50 pm | नेहमी आनंदी
:)
28 Oct 2009 - 3:10 pm | मसक्कली
=D>
28 Oct 2009 - 3:17 pm | परिकथेतील राजकुमार
उत्तम कविता.
अचानक वाचली आणी अचानक आवडली.
©º°¨¨°º© अचानक प्रतिसादकर्ते ©º°¨¨°º©
आमचे राज्य
28 Oct 2009 - 3:23 pm | विशाल कुलकर्णी
छान कविता.. फ़क्त एक शंका..
<<एक कोम्बं अंकुरलं...<<>>
इथे कोंब अंकुरला असं हवं होतं बहुदा. :-) पुलेशु.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"