या दिवाळीत सहलीसाठी चक्क स्वर्गात जायचे असे ठरवले. त्या प्रमाणे एका दिवशी भल्या सकाळी निघालो. सातार्याच्या खिंडीतल्या गणपतीबाप्पा ला जाताजाता डावीकडे न वळता उजवीकडे सज्जन गडाकडे वळालो. सज्जन गड मागे टाकून चाळकेवाडी ला आलो.
येथे पवनचक्क्यांचे जंगल आहे. उसाच्या शेतात उभे रहावे तसे आम्ही पवनचक्क्यांच्या शेतात उभे होतो
हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार. महाबळेश्वरच्या उंचीइतकेच.
इथला भन्नाट वारा आणि रानफुले. कास पठारासारखेच हे सुद्धा वॅली ऑफ फ्लॉवर्स आहे.
इथे काही वनस्पती चक्क मांसाहारी आहेत. त्या किडे खातात. किडे फुलाना चिकटतात आणि तेथेच विरघळतात.
मी गेलो तेंव्हा फुलांचा बहर ओसरला होता.
पण काही म्हणा या सानुल्या गवतफुलांची ऐट काही औरच
येथून पुढे पठारावरून रस्ता नसलेल्या भागातून विचारत विचारत येड्यासारखे गाडी रेटत पुढे गेलो. हा रस्ता पुढे पाटणला उतरतो
पाटणहून पुढे चिपलूण रस्त्याला लागल्यावर पुढे कोयनानगर लागते. नेहरू गार्डनला उजव्या बाजूला ठेवत थोडे पुढे गेलो की मग विशाल शिवसागर सुरु होतो. तुमचे डोळे पोहोचतील तिकडे हिरव्या रंगाच्या लक्षावधी छटा दिसू लागतात.
त्या सागरनिळ्या हिरव्या रंगाचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे
कोयनानगरचा निसर्ग काहीही हातचे राखून ठेवत नाही. तो मुक्त हाताने उधळण करत असतो. आपल्या पिशवीतलीएकेक रत्ने उलगडून दाखवत असतो
कुबेराने खजीना उघडावा त्यातला पाचूचा कप्पा आपल्याला देऊन टाकावा आणि चल घे ऐश कर म्हणावे तशा थाटात हा खजिना आपल्या पुढ्यात येत असतो.
कधी अवखळ बनून मस्ती करत तर कधी एकदम घनगंभीर होत ;
निसर्ग आपल्या समोर वेगवेगळ्या रुपात येतच रहातो.
यातले कोणते रूप डोळ्यात साठवु आणि कोणते राखीव ठेवु हे ठरवताच येत नाही
खरच निसर्ग जे लिहितो ते गद्य पद्य अशा शब्दात मांडताच येत नाही . जे असते ते सर्व हृद्यच असते.
आकाशाचा निळा गवताचा पिवळसर हिरवा. पालवीला आलेल्या फांदीचा तांबूस हिरवा. जुन्या पानाचा कच्च हिरवा. मधूनच पोपटी झाक मिरवणारी नवी पाने. अशी काही सरमिसळ होते की सांगता येत नाही
शिवसागराच्या आरस्पानी पाण्याच्या परिणामामुळे काही वेगळीच जादू होत असते
हवेत इतका उत्साह असतो की त्यापुढे मध्यानीचा सूर्य सुद्धा शीतळ भासू लागतो
बोट हळुहळु आपल्या कोयनेच्या जंगलाकडे नेत असते.
इथले काही जंगल हे मुद्दाम लावलेले आहे.
उघड्याबोडक्या डोंगराना पहायची सवय असलेले डोळे .
त्याना ही मेजवानी च होती
ते जरा कमी घनदाट आहे. पण घनदाट म्हणजे नक्की काय हे इथे येऊनच पहावे
त्याहून पुढे वासोटा बाजूला गेले की नैसर्गीक जंगल पहायला मिळते. त्यासाठी बोटीने दोन तास प्रवास करावा लागतो.
या जंगलात बिबटे ,अस्वले, ससे, खारी ,कुत्री, तरस असे अनेक प्राणी आहेत. पण ते बहुतेकदा उन्हाळ्यात तलावाच्या काठाशी पाणी प्यायला आल्यावर पहायला मिळतात. जंगलात पाणी असताना प्राणी बाहेर फारसे पडतच नाहीत.
दूरचे हिरवे डोंगर, हिरवे लुसलुशीत गवत नितळ पाणी स्चच्छ आकाश प्रदुषण मुक्त हवा..परत जायला येथून पाय निघत नाही
आपण या चित्रमय निसर्गातलेच एक होऊन जातो.
पण नाईलाज असतो. अजून बरेच काही पहायचे बाकी असते.
निसरडे कडे. अक्षरशः उभ्या चढणीचे डोंगर त्यातून अव्याहत कोसळणारे गडगडाटी धबधबे हे निसर्गाचे रौद्र रूप पाहून घाबरायला होते.
पण ते काहीसे आपल्या आजोबांसारखे ....... नातवाला अंगाखांद्यावर खेळवताना उग्र मिशाळ चेहेर्याच्या मागे कौतूक भरलेले असते.
परतीचे वेध लागलेले असतात. उन्हे उतरु लागलेली असतात. पण पाऊल निघत नाही. निसर्गावर दुपारच्या उन्हाने काही वेगळेच रंग चढवलेले असतात
खरे तर इथून शहरात परत जायला आम्ही सर्वच नाखूष होतो. निसर्गसुद्धा या रे बसा रे जाल रे आत्ता आलात आन आत्ता लगेच कुठे निघालात असेच म्हणत असतो. तो आग्रह मोडवत नाही. पाऊल धबधब्यात थोडेसे विसावते.
प्रतिक्रिया
27 Oct 2009 - 1:04 am | शेखर
जिवंत माणसांना फोटो दिसत नाहीत का?...
28 Oct 2009 - 2:50 pm | प्रभो
येस्स...वासोट्याचे जंगल/कोयनानगर आहेच स्वर्गा सारखे सुंदर.
(आम्ही सर्व प्रकारचे स्वर्गदर्शन केलेय असे आम्हाला नेहमीच वाटते.) =))
वर्णन मस्तच पण फोटोंचा जुगाड करा विजुभाऊ.....
मग सविस्तर देतो प्रतिसाद...
फोटू पाहिले...मस्तच ......स्वर्गवासी व्ह्यायची ईच्छा झाली....कधी जायचं बोला...
(वासोट्या)प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
28 Oct 2009 - 2:30 pm | गणपा
इजुभाय फटुकाय दिसना राव.
स्वर्गाचे फटु स्वर्ग वासी झाल्यावरच दिसतात कि काय :?
स्वर्गवासी झालो.
विजुभाई मस्त वर्णन आणि फोटो.
27 Oct 2009 - 9:35 am | विजुभाऊ
फ्लिकर वरुन फोटो कसे चढवायचे याचे कोणी मार्गदर्शन करेल का?
पिक्चरची यु आर एल देउनही काहीही होत नाहिय्ये.
एहटीएमेल चा टॅग पूर्ण टाकायचा म्हणजे नक्की काय?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
27 Oct 2009 - 5:13 pm | स्वाती२
फ्लिकर वरच्या फोटोवर राईट क्लिक करा. प्रॉपर्टी सिलेक्ट करा. त्यातला अॅड्रेस कॉपी करुन घ्या. इथे insert image च बटन वापरलं की छोटी खिडकी उघडेल तिथे तो डकवा.
27 Oct 2009 - 11:05 am | अमोल केळकर
या भूतलावर भरपुर पाप करत असल्याने स्वर्गाचे दर्शनही आम्हाला दुर्मीळच आहे बहुतेक :D
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
27 Oct 2009 - 12:14 pm | jaypal
भौ फोटो कवा दाखिवनार?
शब्द चीत्र आवड्ले
काठि नी घोंगड घेउद्या कीरं
मला बी तुमच्या संग्ग येउद्या कीरं
28 Oct 2009 - 12:00 am | विजुभाऊ
बघा रे आता दिसायला लागलीत चित्रे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
28 Oct 2009 - 12:02 am | शेखर
धन्यवाद
28 Oct 2009 - 2:02 am | धनंजय
छान चित्र-प्रवासवर्णन
28 Oct 2009 - 11:44 am | sneharani
"डोंगर दर्यातून, झाडीमधुन फिरताना अन् धबधब्याच्या गार पाण्यात उतरताना मिळणार सुख काहीतरी वेगळाच आंनद देऊन जातं" हे अनुभवलं असेल ना?
सुंदर वर्णन...!!!
:)
28 Oct 2009 - 1:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोयनेचा परिसर पिंजून काढलेला दिसतो.
फोटो, वर्णन सुरेख.....!
-दिलीप बिरुटे
28 Oct 2009 - 1:10 pm | पर्नल नेने मराठे
:D मस्त्च
चुचु
28 Oct 2009 - 1:12 pm | भाग्यश्री कुलकर्णी
छानच आहेत फोटो.
28 Oct 2009 - 1:13 pm | विनायक प्रभू
चा फ्टु कुठाय?
28 Oct 2009 - 2:47 pm | विजुभाऊ
मास्तर परी भूतलावरच (म्हणजे मुलुंड आणि पुणे) असते.
स्वर्गात एकदम तरूण आणि मारू दिसणार्या साधारणः हजारो वर्ष वयाच्या अप्सरा असतात ;)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
28 Oct 2009 - 2:47 pm | अवलिया
वा.. वा.. छान.. छान !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Oct 2009 - 3:24 pm | स्वाती२
छान फोटो आणि वर्णन.
28 Oct 2009 - 8:44 pm | मैत्र
छान फोटो आहेत. खूप वर्षांपूर्वी चौथा टप्पा पहायला गेलो होतो त्याची आठवण झाली. महाराष्ट्रातला सगळ्यात निसर्गरम्य भाग असेल हा. आणि त्या मानाने माणसांनी - तथाकथित पर्यटकांनी खराब न केलेला.
पण गेल्या चार दिवसातच झाडाझडती वाचल्याने केवळ भयाण वाटलं फोटो आणि धरणाचं पाणी बघून..