आज उघडुन बसले होते
सगळी जुनी पत्रे
तुझी, माझी, काही जपलेली,
न पाठवलेली, काही फाडलेली....
कधी डोळे भरुन येत होते
कधी रागाने लाल होत होते..
कधी मी उदास होत होते
कधी हरवून जात होते...
एक पत्र तुझं मला पाठवलेलं
एक असच खुप जुन्या मैत्रिणीचं
पहिल्यांदा माहेरी गेल्य नंतर
एकटं वाटत असताना तू लिहिलेलं
तसचं तुझ्या सोबत आल्यानंतर
सखी ने पा्ठवलेले खास बंध....
असच एक पत्र हाती आलं
खुप खोल दडवून ठेवलेलं..
माझ्या बाबांच......
लग्नानंतर आलेल पहिलं पत्र...
खुपसं काळजी करणारं
तेवढचं धीर देणारं..
खुप न सांगता खुप काही सांगणारं....
जपुन ठेवलय मी आज ही
आज तेच पत्रं म्हणजे
माझे बाबा झालेय
मला सोडून गेलेले पण तरीही
आजही सतत सोबत असणारे........
प्रसन्ना जीके...
प्रतिक्रिया
26 Oct 2009 - 11:36 pm | धनंजय
पुढील कवितांसाठी शुभेच्छा.
26 Oct 2009 - 11:42 pm | अक्षय पुर्णपात्रे
आनंदी, चांगला प्रयत्न. शेवटची ओळ 'प्रसन्ना जीके...' हे आपले नाव आहे की कवितेतीलच एक ओळ आहे?
26 Oct 2009 - 11:52 pm | अश्विनीका
चांगला प्रयत्न.
- अश्विनी