हम है राही प्यार के

अनुप्रिया's picture
अनुप्रिया in जनातलं, मनातलं
23 Oct 2009 - 9:52 pm

मित्रांनो,
११ नोव्हेंबर २००९ ला एक खास गोष्ट आहे, पुण्यात "निषाद" च्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली आहे सदाबहार "देव आनंदच्या" गाण्यांची 'आनंद'यात्रा........" हम है राही प्यार के......".
देवच्या या 'दिल के करीब' गाण्यांची महफिल घेऊन येणार आहेत....चंद्रशेखर महामुनी.

यामधले विशेष म्हणजे सॅक्स सुप्रिमो श्री. मनोहरी सिंग यांचा सहभाग व ऑडीओ विज्युअल सादरीकरण.
हा कार्यक्रम ११ नोव्हेंबर २००९ रोजी "यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे" येथे रात्री ८.३० वाजता आहे. तिकीट विक्री ८ नोव्हेबर २००९ पासून सुरू होईल.

तिकीटाचे दर- रू २००/- रू १५०/- रू १००/- आणि रू. ८० - बाल्कनी
या आधी तिकीट जर बुक करायचे असेल तर चंद्रशेखर महामुनी यांच्याशी ९८२२०४५५४६ या क्रमांकावर संपर्क साधा किंवा
नंदू शिंदे
अशोक स्पोर्ट्स, हॉटेल गिरीजा जवळ, टिळक रोड, पुणे
मोबाईल - ९४२३००१२२२७
यांच्याशी स. १० ते रा. ८ पर्यंत संपर्क साधा.

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

6 Nov 2009 - 10:51 pm | प्राजु

कार्यक्रमास माझ्या शुभेच्छा!
महामुनी यांच्या आवाज खूप सुंदर आहे. ऐकला आहे मी. हा कार्यक्रम सुंदर होईल यात काही शंकाच नाही.
मिपा करांपैकी कोणी गेले या कार्यक्रमास तर त्याची चित्रफीत काढून यू ट्यूब वर चढवावी ही विनंती.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

परिकथेतील राजकुमार's picture

7 Nov 2009 - 3:14 pm | परिकथेतील राजकुमार

विशेष म्हणजे चंद्रशेखर महामुनी हे आपल्या मिपाचे सदस्य असुन आमचे एक चांगले मित्रही आहेत (हे जास्ती विशेष आहे), त्यांच्या काही कविता मिपावर प्रसिद्धही झाल्या आहेत.

कार्यक्रमास खुप खुप शुभेच्छा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रदीप's picture

7 Nov 2009 - 7:10 am | प्रदीप

देवसाहेबांवर चित्रीत केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा!

अवलिया's picture

7 Nov 2009 - 8:47 am | अवलिया

गाण्यांच्या कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुधीर काळे's picture

7 Nov 2009 - 12:03 pm | सुधीर काळे

अपनी तो हर आह इक तूफान है, ऊपरवाला जानकर अनजान है.....
कार्यक्रमाला शुभेच्छा. प्राजक्ताताईंनी सुचविल्याप्रमाणे कुणी व्हीडियोशूटिंग केलं तर यू-ट्यूबवर जरूर चढवा!
सुधीर
------------------------
असेल हिंमत व आवड, तर ऐका हे मुळात पंकज उधासने गायलेले गीत! http://www.youtube.com/watch?v=4HUwuNk0Tc4

प्रदीप's picture

7 Nov 2009 - 12:25 pm | प्रदीप

"अपनी तो हर आह इक तूफान है, ऊपरवाला जानकर अनजान है.....'

रफीसाहेब व एस. डी. बर्मन ह्यांनी अजरामर केलेल हे गाणे देव साहेबांनी पडद्यावर गायले आहे. हे गाणे आगगाडीत म्हटले आहे. वास्तविक आगगाडीचा ठेका ४ बीट्सचा असावा, फार तर फार ६ चा. हे गाणे मात्र ७ बीट्समधले आहे. हे थोडे अनोखे आहे. पण गीताची मोहक चाल, रफीसाहेबांचे सहजसुंदर म्हणणे, ह्यामुळे ते न खटकता चालून गेले, इतकेच नव्हे ते गाणे पॉप्युलरही खूप झाले. अजूनही त्या काळातील गीतांच्या आठवणीत ह्या गाण्याच क्रमांक बराच वर लागतो.

sneharani's picture

7 Nov 2009 - 12:27 pm | sneharani

गाण्याच्या कार्यक्रमास शुभेच्छा...!

नेहमी आनंदी's picture

7 Nov 2009 - 12:52 pm | नेहमी आनंदी

माझ्यातर्फे या गाण्याच्या कार्यक्रमाला शुभेच्छा.