दाम करी काम येड्या....

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
21 Oct 2009 - 10:10 am

घटना १:
गावचे पाहुणे थोड्यावेळा पूर्वी आले आहेत.. हातपाय धुवून, चहा मारून फ्रेश झाले आहेत आणि गप्पा टप्पा सूरू आहेत..
यजमानः काय मग? काय म्हणते तुमच्याकडली निवडणूक
पाहुणे: मुख्यमंत्री आमचाच!
यः हो तुम्ही त्यांच्या गावचे ना! त्यांना फाईट कशी आहे?
पा: कसली फायीट, इरोधी बावीस आहेत.. येक बी कामाचा नाय..
यजमान नुसतेच हसतात
पा: आता बघा कसंय.. सम्द शेटिंग हाये..
सेटिंग म्हटल्यावर आणखी चार कान टवकारले जातात. यजमान चेहर्‍यावर उसनं प्रश्नचिन्ह आणतात
पा: आता बघा.. बावीसातला येकबी मराठा न्हायी.. शिवशेनेनं बामण दिलाय.. त्याला काय मतं मिळणार.. लिंगायत लोकांची मत फोडाया ३ लिंगायत हायेत, एक बसपा, एक रिडालोस हाए, अगदि मनशेनंही पुचाट उमेदवार दिलाय.. पण मराठा एकच गडी..
यजमान मुंबईतला एकदम अशी खुल्लंमखुल्ला जातीवर चर्चा आलेली पाहून मुलाला बाहेरचं दार लोटायला सांगितलं
यः म्हणजे अजूनही जातीवर मत देतात?
पा: मग कशावर देणार? आता बघा गावकर्‍यांकडे ना शिक्षान, ना पैका, ना जिमिन.. अश्या गोष्टी असल्या की जात सुटते.. तोपर्यंत सोत्ताचं काय हवं की नको? तेव्हा गावकर्‍यांकडे सोत्ताची अशी फक्त जातच हाए.. ती त्यांनी सोडावीच का?
यजमान निरूत्तर
---------------------------------------------------------------
घटना २:
रविवारचा दिवस, लोकलमधे पुरुषांच्या डब्यात बायकांनी चढून अरेरावी करण्याचा दिवस.. अश्याच बिकट प्रसंगी मला एका बिकट कोपर्‍यात ढकलून दोन विशाल महिला गप्पा ठोकत आहेत
१: ही गं कुठली साडी
२: तीच गं म्हटलं नाहि का तुला, १२ तारखेला रात्री आमच्याकडे वाटल्या त्या!
१: अच्छा.. ती मी अजून वापरायला काढलीच नाहि. आमच्या वस्तीत पण वाटल्या पण आमच्याकडे ऑप्शन होते साडी हवी का पैसे, चांगले पैसे घ्यायचे तर ह्यांनी साडी घेतली ती इतकी फालतू आहे की घालवतही नाहि. तुझी तशी बरी आहे
२: हो मग, त्यांना म्हटलं आधी साडी दाखव आवडली तर घेईन नाहितर आपले पैसेच दे! बरी वाटली उगाच प्रचाराला निघाल्यासारखं वाटायला नको
१: यंदा बरं झालं निवडणूका दिवाळीच्या आधी आली. अगं गंमत माहिती आहे का आमच्या बाजुंच्या सामंत वहिनीच्या मुलीचं लग्नाची तारीख बदलली आणि आधी केली आम्हाला कळेना तुळशीच्या आधीच लग्न? मग कळलं!
२: काय ते?
१: अगं तिला लग्नाला म्हणून जवळ जवळ प्रत्येक उमेदवार "मदत" देऊन गेला आणि वस्तीतही आपलं कसं लक्ष आहे हे सांगून गेला
२: सामंतकाकुंना फक्त सोन्याचा आणि जेवणाचा काय तो खर्च आला बाकी असाच सुटला
१: हा हा हा
२: तु गेली होतीस की नाहि मतदानाला?
१: छे गं! ह्या नव्या साडीला बिडींग करायचं होतां ब्लाऊज शिवायचा होता.. त्यात मशीनची सुई तुटली.. दिवस त्यातच गेला कोण जाणार आहे मतदानाला
२: हो गं! मी पण नाहि गेले.. नवरा रात्री प्रत्येक मांडवात जाऊन फुकटची पिऊन आला होता.. दुसर्‍या दिवशी ओकायला लागला त्याला घेऊन हास्पिटलातच होते.. चला आपलं स्टेशन येईल आता

महिला उतरल्या आणि गाडीच्या ट्रेनबरोबर डोक्यातील बरीचशी जागा रिकामी झाल्यासारखं वाटू लागलं

समाजअनुभव

प्रतिक्रिया

सहज's picture

21 Oct 2009 - 10:30 am | सहज

मार्मिक ....

पाषाणभेद's picture

21 Oct 2009 - 10:32 am | पाषाणभेद

आता उद्या साड्या देणारे हरले म्हणजे कळेलच त्यांना साडी धेतली म्हणजे काय असते ते.

--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

चिरोटा's picture

21 Oct 2009 - 10:32 am | चिरोटा

गेली चुलीत असे बाळासाहेब ठाकरे मार्मिकमध्ये लिहायचे ते उगीच नाही.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

अवलिया's picture

21 Oct 2009 - 10:49 am | अवलिया

मस्त :)

-- अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रसन्न केसकर's picture

21 Oct 2009 - 1:15 pm | प्रसन्न केसकर

भाऊ! आवडलं एव्हढंच म्हणतो.

ऋषिकेश's picture

21 Oct 2009 - 9:43 pm | ऋषिकेश

सर्वांचे प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
निवडणुकांचे हे दाम+जात अंग सगळ्यांनाच परिचित आहे. मात्र यंदा याचा वापर इतका सढळ हस्ते झाला की लोकांना भर गर्दीतही त्यावर बोलणे टाळाता आले नाहि.

उद्या जो काहि निकाल लागेल तो लागेल मात्र तो जनतेचा कौल किती आणि सर्व पक्षांनी निर्माण केलेला मता पेक्षा धनप्रवाह किती हे ज्याने त्याने ठरवावे.

ऋषिकेश
------------
भ्रष्टाचार थांबविण्याचा सर्वात सोपा (किंबहुना सर्वात कठीण) मार्ग म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

भास्कर केन्डे's picture

22 Oct 2009 - 12:19 am | भास्कर केन्डे

माझ्या परिचयातल्या ज्या एकदोघांनी लोकशाहीवर विश्वास ठेवत गावी जाऊन मतदान केलं त्यांनी सांगितलं की पदरमोड करुन गावाला जाऊन मतदान करण्यात काही शहाणपण नाही. जर एखादा उमेद्वार फारच जवळचा असेल तर मुंबईहून गावला जाण्यायेण्याच्या खर्चात त्याच्यासाठी दोन-तीन मतं विकत घेऊन देता येतील.

निवडणूक आयोग काय झोपला आहे का? शेषन साहबींनी घालून दिलेली शिस्त आयोगाने गुंडाळून ठेवली वाटतं.