गंगाजल

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
20 Oct 2009 - 1:24 pm

"आई गेली रे' भाउ म्हणाला.
मी निर्विकार.
" तु येणार आहेस का"
बाबांच्या वेळी गेलो नव्हतो.
माझ्या चेहेर्‍याकडे बघुन त्याने माझा रुकार ओळखला.
हा जुळा भाउ माझा.
जरा भोळसटच.
आम्ही दोघेही सी.ए.
पण नसत्या आदर्शवादाच्या पाठी लागुन ४ वर्षे मास्तरकीत घालवली.
वहीनीने माझी प्रगती बघुन वहीनीने दबाव टाकला नसता तर असाच मास्तर राहीला असता.
ह्याच्या ऑफिसच्या उदघाटनाला सुद्धा गेलो नव्हतो.
लग्न झाल्यावर मी माझे घर वेगळे थाटले.
चांगला कमावत होतो.
मुलगी मोठ्या घरातली.
भावाला वाईट वाटले.
पण माझा नाईलाज होता.
दोघांनाही दोन दोन मुलगे.
सर्व काही सुरळीत चालले होते,
अचानक...

स्मशानात गेल्यावर चिता तयार होती.
आईच्या तोंडात गंगाजल घातले.
चितेवर चंदन ठेवले.
चिता पेटल्यावर सर्व जण मागे सरले.
सर्वांना धग लागत होती.
मला काहीच नाही.
मनाचा अक्रोश होत होता.
पण तो कुणालाही दाखवु शकत नव्हतो.
भावाला समजत होते.
चिता संपुर्ण विझल्याशिवाय मी तिथुन निघणार नाही हे भावाल कळले होते.
तेवढेच हातात होत माझ्या.
तीचा शेवटचा प्रवास संपुर्ण बघणे.
खुप सेवा केली तीने माझी.
कुणीतरी तीला सांगितले असणार 'जेनेटीक डीसॉर्डर'

मी हा असा गेली १५ वर्षे अपंग.
मस्क्युलर डीस्ट्रॉफी ने बाधीत.
सर्व गोष्टीत परावलंबी.
पण कंपनीने माझ्या मेंदुची किंमत ओळखुन ऑफिसमधे 'वार्ड कम केबिन' केली होती.
स्क्रिन वर वाचुन सल्ला द्यायचो.
कंपनी ला लाखो रुपयांचा फायदा.
जे काही थोडे फार बोलायचो ते फक्त भावाला आणि सेक्रेटरी लाच कळायचे.
भावाची ह्या 'उपकरण' आधारीत जिवनात भरपुर साथ मिळाली.
आता रेस्पिरेटर पण आणला आहे.
श्वास बंद पडु नये म्हणुन.
पण एक ठरवले आहे.
मरण माझ्या हातात नाही.
पण रोज मरणार नाही.
लढणार.
बोझ नाही बनणार कुणावर.
अवयवानी, स्नायुंनी अपंग आहे.
मेंदुच्या शक्तिने नाही.
एकच वाईट वाटते.
गंगाजल देण्यापुरता तरी हातात तात्पुरती शक्ती हवी होती.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

20 Oct 2009 - 1:35 pm | पर्नल नेने मराठे

"मस्क्युलर डीस्ट्रॉफी " बापरे!!!
चुचु

पर्नल नेने मराठे's picture

20 Oct 2009 - 1:35 pm | पर्नल नेने मराठे

"मस्क्युलर डीस्ट्रॉफी " बापरे!!!
चुचु

सहज's picture

20 Oct 2009 - 2:03 pm | सहज

मस्क्युलर डीस्ट्रॉफी पार लहानपणापासुन नव्हती हे त्यातल्या त्यात बरे म्हणायचे.

शारीरीक परावलंबी जीवन वाईटच. असो पुन्हा इच्छामरणाच्या धाग्याची आठवण झाली.

JAGOMOHANPYARE's picture

20 Oct 2009 - 2:25 pm | JAGOMOHANPYARE

सुन्न !

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

टारझन's picture

20 Oct 2009 - 2:40 pm | टारझन

मास्तरांनी लेख लिहायचे म्हणून लिहू नयेत !!
आणि लिहीले तर सविस्तर लिहावे !
उगाच एका वाक्याची एक लाईन लिहून कविता लिहील्यासारखं ही लिहू नये .. (हल्ली चेंगटसाहेबही तसेच लिहीतात)
इन शॉर्ट नॉट इम्प्रेशिव

-(स्पष्ट) टारझन

अवलिया's picture

20 Oct 2009 - 5:48 pm | अवलिया

सहमत आहे.

(अनुमोदक) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

20 Oct 2009 - 6:04 pm | दशानन

निशब्द !!!!!

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

वेदश्री's picture

20 Oct 2009 - 7:31 pm | वेदश्री

भन्नाट लिहिलेयत, विप्र ! जबर इच्छाशक्ती असली की काय करता येऊ शकते याचे प्रतिक. शेवटचे वाक्य मात्र आत कुठेतरी खोल हलवून टाकणारे! डोळे कधी पाणावले कळले देखील नाही...

लवंगी's picture

20 Oct 2009 - 7:56 pm | लवंगी

:(

बाकरवडी's picture

20 Oct 2009 - 9:16 pm | बाकरवडी

:S :S

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

अजुन कच्चाच आहे's picture

20 Oct 2009 - 10:14 pm | अजुन कच्चाच आहे

शेवटचे दिवस फारच वाईट असतात रे......
वाट पहायला लावणारे.
सारे मिळून एकंदर आयुष्य १७ ते १८ वर्षे.

.................
अजून कच्चाच आहे.